Friday, February 6, 2009

का?

मला नाही म्हणून तू स्वतःला विसरलीस का?
मला दूर करून तू आणि जवळ आलीस का?
त्याच्यावर प्रेम करून तू माझ्यात गुंतलीस का?
मला खोटंच फसवून तू स्वतःवरच रुसलीस का?
बोलायचं बंद करून तू माझी वाट पाहीलीस का?
सोडून माझा हात तू माझ्या दारात थांबलीस का?
खोट्या बहाण्याने तू माझ्यासाठी जागलीस का?
मी बोलावं म्हणून तू असं काही वागलीस का?
माझी नवी कविता तू न सांगता वाचलीस का?
मूक माझी वेदना तू हळूच उराशी जपलीस का?
माझ्या नसण्याची तू काळजी थोडी केलीस का?
माझ्या प्रोफईलला तू मागून भेट दिलीस का?
जग चालून सारं तू आत तरी उरलीस का?
वजा करून मला तू तुला तरी पुरलीस का?
शहाणं करून मला तू अशी वेडी झालीस का?
शोधत होती तुला तू माझ्या घरी आलीस का?

किमंतुआनंदऋतू प्रकाशन३०/०१/२००९

1 comment: