हर्षदा नावाचे एक बेट आहे राग आणि लोभ सगळं थेट आहे
या बेटाकडे जण्या~यांनी समजावे
हरवले तर परतण्याची हमी नाही
या बेटावर शब्दांना भाव आहे
कल्पकतेला सुद्धा काही कमी नाही
या बेटावरून येतात अनेक सूर
इथे मराठी चालते तसे इंग्लीश ही
संवेदनेच्या नद्या वाहतात इथे
चिमणीची निरागसता गरूड भरारी ही
..तुषार जोशी, नागपूर
No comments:
Post a Comment