Tuesday, March 17, 2009

कविता वाचतो मी

हृदयाने ऐका तुम्ही
कविता वाचतो मी

लिहिलेली कुणीतरी ही
शाईने वेदनेच्या
त्या उत्कट तरल क्षणाला
प्रतिभेच्या प्रेरणेच्या
शब्दांच्या खोल तळाशी
घेऊन बघा जातो मी

कविता वाचतो मी.

क्षण काही विसरून जाऊ
या व्यवहारी जगताचे
क्षण काही होऊन जाऊ
आपण सगळे कवितेचे
कवितेचा सुगंध थोडा
तुम्हाला वाटतो मी

कविता वाचतो मी.

तुषार जोशी, नागपूर

No comments:

Post a Comment