तुझ्याच वलयात रहायची सवय झाली होती...
आता त्या वलयांचा गुंता झालय
वलयं वाफ होऊन केव्हाच हवेत विरुन गेलीत...
तुझा गुंता राहिलाय!!!
ज्यात गुंतलीय मी...
तुझ्या त्या विरलेल्या वलयाला
मुठीत पकडण्याची माझी अखंड धडपड
पण तु केव्हाच सुटुन गेलायस।
मी धडपडतेय,
आण्खीन गुंततीये,
गुंता वाढतोय,
वलयं संपलीत,
तु ही गेलास,
मी तिथेच,
तु नाहीस,
फक्त गुंता,
गुंता तुझा
गुंत्यात मी
तरीपण वेगळे
तु अन मी...
-अस्मित
No comments:
Post a Comment