का मला माहित नाही
पण आज अचानक दुपारी
मी माझ्या खोलीची खिडकी उघडली
रणरणत्या अशा दुपारी
भकास रस्त्यावर नजर माझी धावली
उजाड वाटेवर लक्ष जाताना
घामाच्या धारा शरीरातून वाहत होत्या
अंगाची काहिली होताना
दुर्गंधीचे धुमारे वातावरणात पसरत होते
दुरवर कोणी चिटपाखरू
डोळे फाडुन पाहिल तरी दिसत नव्हते
आणि एकदम अचानक....
कुठूनशी गार हवेची झुळूक आली
मला खर तर तुझी आठवण आली
आणि अचानक तू नजरेस पडली
माझी भकास दुपार तुझ्यामुळे गारेगार झाली
प्रसन्ना जीके
पुढच्या वेळी अजून चांगला प्रयत्न करावा.
ReplyDeleteफारच वाईट कविता होती.