Thursday, May 21, 2009

** छाया **

आज
सहजच वाटलं
तुझ्या छायेखाली यावं

नाही रे,घडलं काहीच नाही
बस्स..
अगदी सहजच

भरल्या आभाळाची
काळी नजर
मला लागण्याआधी
तुझ्या धगधगत्या निखार्‍यांत जळून जाईल

नक्कीच....
.म्हणून आले..

- स्वप्ना

No comments:

Post a Comment