Monday, May 18, 2009

आवडतो मज अफ़ाट सागर

लहानपणी पाठ्यपुस्तकात ही कविता आपल्याला होती. आजही ही कविता मला संपूर्ण आठवते. कवीचे नाव मला आठवत नाही पण फ़ार छान आहे ...तुम्हाला आवडली तर सांगा

आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावार करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो, मावळणारा रवी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

1 comment: