भेट अशी की...
भेट अशी की जिला पालवी
कधीच फुटली नाही
कोर शशीची घनपटलातून
कधीच सुटली नाही
मिठीविना कर रितेच राहिले
दिठीही फुलली नाही
ओठांमधली अदीम ऊर्मी
तशीच मिटली राही
युगायुगांचा निरोप होता
तोही कळला नाही
समीप येऊनी स्वर संवादी
राग न् जुळला काही
खंत नसे पण एक दिलासा
राहे हृदयी भरूनी
अलौकिकाची अशी पालखी
गेली दारावरूनी
- 'कुसुमाग्रज' - 'पाथेय' काव्यसंग्रहातून
कुसुमाग्रजांची ही कविता वाचायला दिल्या बद्दल आभार. सुरेखच.
ReplyDeletemahiti pahije tyanchi
ReplyDelete