Wednesday, June 10, 2009

--------------- मुंग्या ---------------

मला वेळ काढायचा होता,
client meeting ठरली होती,
आत्ता तर् चारच वाजलेले...
दिड-एक तासाची निश्चींती होती
खारे दाणे खात खात...
बागेत आलो...
खुर्चीवरची धूळ झटकत....
मस्त रेलून बसलो..

झोपाळे झुलत होते,
ताटवे फुलांचे फुलत होते...
पोरं खेळत, कानात वारं भरल्यागत,
इकडून तीकडे पळत होती
मझं मन ही पळायला लागलं....
एक - दोन-- तीन-- पाच---सात वर्ष मागे..
उसवू लागले आपसूकच..
जुन्या आठवणींचे धागे !

No comments:

Post a Comment