Tuesday, August 11, 2009

मरण आणि आपण..!!!

सामान्यांचा जीव अजुनही घुसमटतोय
उच्च्भ्रुंच्या फ़क्त मेनबत्या जलतायत
सामान्यांचे जीव ट्रेन आणि रस्त्यात जाणारे
महागडे जीव फ़क्त ताजवाल्यांचे .....
महागड्या चाकातुन ........उतरनारे सेलेब्रिटी
तिथून चालत ......मेनबत्या जाळन्यासाठी
उद्वेग कशाचा .....???
मानस मेल्याचा ...???....की ताज जळल्याचा .......???
की आता वर्षभर पार्ट्या होणार नाहीत याचा....???
आपणही असतो यांच्या बरोबर ....... N Series घेउन फोटो काढत॥!!
१० आले ९ मेले...
१०० राजकारणी आले आणि एकही मेला नाही.........?
आता तर भाषणही संपली॥
लोकांचा प्रक्षोभ तर कधीचाच गाडला गेलाय
प्रत्यक्ष कृती ऐवजी नव्या शपथविध्या होतील॥
नव्या तिजोरया भरतील...... नव्या मंत्र्यांच्या ......!!!
भ्याड आहोत आपण...
लाचाऱ्यागत मदतीची भिक घेणारे....!!
स्वताचाच आक्रोश ऐकून कानावर हात ठेवणारे...!!

जगण्यापेक्षा मरनाच सोप्प जालय म्हननारे आपण
मुंबई स्पिरिटच्या नावाखाली घरून निघताना मुलांच्या तोंडाकड़े शेवटच पाहतोय अस पाहणारे आपण
धन्यवाद सहाव्या मजल्यावर बसलेल्या त्या मंत्र्यांचे
बाकि काही नाही निदान मरण तरी स्वस्त करणारे.....!!

शेवटी पुन्हा असेच जीव जाणार
पुन्हा अश्याच मेन्बत्या जळणार
सोन्याचा धुर निघनाऱ्या या जमिनितुन
आता फ़क्त रक्ताचे पाट मुरनार...!!!!
-----सागर

No comments:

Post a Comment