Friday, August 28, 2009

गहिरे क्षण

गहिरे क्षण मनाच्या कोपऱ्यात..
तरळले पाणी तुझ्या डोळ्यात..
असे कसे आभाळाचे रितेपण..
होऊ दे मोकळे तुझे मन..

मनातून एक साद येई..
मला तुझी आठवण येई..
तुझे डोळे आस पाही..
क्षण क्षण मी जवळ येई..

अशीच प्रीत असते खुळी..
कसे उतरवू तुझ्या गळी..
गुंतून पडतो डोळ्यांच्या गहिराइत
शोधतो तेच क्षण त्याच मातीत..!!

-प्राग..
26/08/09

No comments:

Post a Comment