Friday, September 18, 2009

" पिरेमाचा सल्ला "

येकलेपनाची कास सोडू नगं
पिरेमाची वाट बाळा धरू नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

नुसतं रुपावर भाळू नगं
येड्या भवर्‍यापरमानं भुलु नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

नजर कुनाशी कदी भिडवू नगं
भिडलीच कदी तर येडा होऊ नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

काळ्या क्येसांच्या जाळ्यात अडकू नगं
पान्याविना असलेल्या ह्या तळ्यात पवू नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

पिरेमपतर कदी कुनाला ल्हिऊ नगं
कागूद अन शाई वाया घालवू नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

पोरीसाठी तुजं BP वाडवू नगं
सपनातला त्यो वाडा सजवु नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

पन आता मरायचंच हाय की ओ कवातरी
मंग दगडापरिस ही ईटंच बरी
म्हनुन पिरेम कराया कदी ईसरू नगं.....म्हनुन पिरेम कराया कदी ईसरू नगं.....

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ सुरज ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

No comments:

Post a Comment