भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक
वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.
टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्या - जाणार्या
वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही
त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः
पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.
तो म्हणाला, सार्या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे
आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ?
तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो.
त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.
त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच
नाहीत का ? सार्या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.
Maharashta sathi je aahet te Marathi sathi aahet Majhya kadun Majhya ya Marathi Mansa sathi.. majhya kadun hi choti se..... mahiti kendra
No comments:
Post a Comment