तिच्या बाहुपाशात मला आहे सामायचं
जगुन झाल्यावर पुन्हा एकदा, तिच्यासमवेत जगायचं,
आकाशाच्या खिडक्यांतुन, खाली डोकावुन पहायचंय
मृत्यु समोर येताच, त्याला आहे बिलगायचं
निरोप घेऊनी शेवटचा, दूर निघुनी जायचंय
जीवनातील सुख-दुःखांना, पृथ्विवरच विसरायचं,
मृत्युच्या रम्यनगरीत, मला आहे हरवायचं
"तो" समोर येताच, त्याला आहे बिलगायचं
मी निघून गेल्यावर मात्र, कोणी नाही रडायचं
पीडा दूर झाली म्हणून, मनसोक्त हसायचं,
आठवण आल्यास माझी, हळुच आकाशाकडे पहायचं
मरण समोर येताच, त्याला आहे बिलगायचं
पण मलाही अजून, थोडं जीवन जगायचयं
सुख कुठे असतं का, हे नीट तपासायचयं
ज्याला मी हवा असेन, असं मन शोधायचयं
मृत्यु समोर येताच, त्याला थोडा वेळ थांबवायचयं..... त्याला थोडा वेळ थांबवायचयं....
~~~ ~~~ ~~~ सुरज ~~~ ~~~ ~~~
No comments:
Post a Comment