Wednesday, September 2, 2009

संपू नयेत कधीही दिवस ते college चे

आयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

आपल हे college, college चे क्याम्पस
क्याम्पस मध्ये मित्र मित्रांची ती भंकस
त्या मुलींच्या खोडी पटवण्याच्या चढाओढी
तो जोश तो जल्लोष आपल नव्हे असतात दोष त्या age चे
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

नव्या मित्रांची संगत त्या दिवसांची रंगत
कधी Friendsheep कधी chocolate असे निरनिराळे मौज Day
रोज रोज यावा असा वाटे तो Rose Day
रंगमंच हा असतो आपण नायक इथल्या stage चे
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

नवे फुटलेले ते पंख ती लेक्चरला बंक
काही शिक्षकांशी लपंडाव तो कॅन्टीन चा वडापाव
गैरहजेरी किती मग black list ची भीती
पडणारे प्रश्न मग parents च्या emage चे
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

ती अभ्यासाची जाण तो अभ्यासाचा ताण
ते परीक्षेचे क्षण ते मनाचे दडपण
मग Result ची वेळ सुख दूखाचा खेळ
सुटल्याने साथ जुन्या मित्रांचा होणारे अश्रुंचे Leakage ते
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

आयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

दिनेश...

No comments:

Post a Comment