Maharashta sathi je aahet te Marathi sathi aahet Majhya kadun Majhya ya Marathi Mansa sathi.. majhya kadun hi choti se..... mahiti kendra
Tuesday, February 10, 2009
कुणीही सांगेल…!
”तुम्ही सांगितलं तिथं येऊन दुपारपासून प्रत्येकाला विचारतोय हो, पण कुणालाही तुमचं घर माहीत नाहीए हो…”
”बरं बरं, असू दे… आत्ता तुम्ही कुठे उभे आहात तेवढं सांगा…”
”संपर्क एसटीडी बूथ.”
”अगदी बरोब्बर आलात बघा. त्या एसटीडी बूथची पाटी आहे ना, त्याच्या वरची खिडकी आमचीच. शेजारच्या जिन्यानं सरळ वर या… पहिल्या मजल्यावरचं पहिलंच घर… कुणीही सांगेल…!”
गिफ्ट पॅक
नेहमीप्रमाणे गोविंदरावांनी घड्याळे नीट निरखून पाहिली आणि विचारले, “केवढ्याला?”
“तशी एमआरपी दोन हजार रुपये आहे, पण आज आम्ही ती दोन्ही देत आहोत फक्त हजार रुपयांत!”
“ठीक आहे, पण मला पॅक पीस हवाय!”
“यस सर, पॅक पीसच देतो आणि खास तुमच्यासाठी कंपनीने केलेला गिफ्ट पॅकच देतो. वहिनी आल्या की थेट त्यांच्या हातीच द्या गिफ्ट पॅक फोडायला, बघा त्या किती खूष होतील तुमच्यावर!”
केवळ कल्पनेनेच गोविंदराव आनंदले आणि घाईघाईने त्यांनी पाचशेच्या दोन नोटा देऊन तो गिफ्ट पॅक ताब्यात घेतला. संध्याकाळी मोठ्या थाटात त्यांनी तो गिफ्ट पॅक पत्नीला दिला. मालतीबाईंनीही अलगद कागद उलगडून गिफ्ट पॅक उघडला. आत दोन घड्याळे होती. हुबेहुब विक्रेत्याने दाखवली तशीच… पण खेळण्यातली!
ऑनलाइन सुरक्षा / Online Safety
ऑनलाइन दुर्घटनेतून वाचण्याच्या काही युक्त्या आहेत:
- जर आपल्याला संशय असेल की आपली मुले जोखमीचे ऑनलाइन व्यवहार करित आहे, तर आपण त्यांच्या द्वारे पोस्ट केलेली माहिती पाहण्यासाठी त्यांच्या द्वारे पाहिलेली वेबसाइट शोधू शकता.
- गुप्त नीतिचे मूल्यांकन करा. अनेक वेबसाइट आपल्या ईमेल पतत्या सारखी माहिती इतर कंपन्यां बरोबर वाटू शकतात जे आपल्याला स्पॅम आणि स्पायवेअर सारख्या वस्तू देखील पाठवू शकतात.
- कम्प्यूटरला नेहमी भोजन गृह किंवा फॅमिली रूममध्ये ठेवा, जिथे आपण मुलांद्वारे बघितल्या जाणार्या वेबसाइटवर लक्ष ठेऊ शकाल
- आपल्या मुलांबरोबर इंटरनेट वापरण्याचा प्रयत्न करा.
- आपल्या मुलांना शिक्षित करा:
- आपल्या मुलांना अनोळखींशी चॅट करण्याचे धोके सांगा, जरी हे ऑनलाइन होत असेल.
- त्यांना समजवा की ऑनलाइन मित्रांना भेटणे सुरक्षित नसते.
- त्यांना प्रोत्साहित करा की जर त्यांना कुणाची भीती वाटत असेल, तर आपल्याला सांगावे.
ऑनलाइन चॅट वार्तालाप
ऑनलाइन सर्फर अनोळखींशी ऑनलाइन भेटतात आणि कोणतीही संधी न देता त्यांना भेटण्यास सहमत करतात. मुलांना विशेषकरुन किशोरांना यापासून सावध करायला हवे, कारण कोणीही अनोळखींपासून निश्चिंत नाही आहे.
चॅट वार्तालाप वार्तालाप एन्क्रिप्टेड
जॅकी अरे, आहेस का
स्वीटी अरे
जॅकी ASL? वय, लिंग, स्थान (Age, Sex, Location)
स्वीटी 21, F, मुंबई. ASL? स्त्री, 21 वर्ष
जॅकी 22, M, मुंबई
तुमचे नाव ‘छान’ आहे:)
कटुसत्य
”आणि ती?”
”तीही माझ्याकडे पाहायची…”
”काय सांगतोस!”
”…तसा मला भास व्हायचा.”
”अच्छा!”
”ती मला खूप आवडायची.”
”आणि तिला?”
”तिलाही मी खूप आवडायचो…”
”खरंच!””हो, असं मला वाटायचं.”
”मग प्रॉब्लेम काय झाला यार?”
”माझं तिच्यावर नितांत प्रेम होतं, हे त्रिकालाबाधित सत्य होतं…”
”मग?”
”पण… एक कटुसत्यही होतं.”
”काय?”
”मी तिला अजिबात आवडत नव्हतो आणि तिचं माझ्यावर तसूभरही प्रेम नव्हतं!”
”अरेरे….!”
पुढे-पुढे…मागे-मागे
, राजू की संजू? कोणाची निवड करणारेस?”
”कोणाचीच नाही!”
”का गं, बिच्चारा राजू तर तुझ्या कित्ती पुढे-पुढे करीत असतो.”
”म्हणूनच, असा पुढे-पुढे करून थुंकी झेलणारा शेळपट जोडीदार मला नकोय!”
”आणि संजू? तो तर तुझ्या कित्ती मागे लागलाय, तू जिथे जातेस तिथं असतो.”
”…असा सतत मागे-मागे राहून गोंडा घोळणारा वेडपट तर अजिबात नको!”
मुका.. बहिरा…
दुसरा - काय?
पहिला - जर का मला पुढचा जन्म मिळाला…
दुसरा - तर?
पहिला - तर लग्न करण्यापूर्वी मी किमान दहादा विचार करीन…
दुसरा - आणि…पहिला - आणि किमान शंभर मुली
पाहीन…. आणि मुक्या मुलीशीच लग्न करीन.
दुसरा - अरे पण का?
पहिला - कारण, या जन्मातली माझी बायको एवढी बोलते.. एवढी बोलते… एवढी बोलते…की मी पार मुका होऊन जातो आणि मला असं वाटतं, की मी बहिरा असतो तर किती बरं झालं असतं!
दुःख
”तुला सांगतो, कॉलेजात असताना माझी काय वट होती.
कॉलेजच्या गेटवर जरी माझं नाव सांगितलं तरी कुणीही माझ्यापर्यंत येऊन पोचत असे.”
”मग तुला खूप मुली ओळखत असतील नाही!”
”अरे, मुली तर माझी ओळख करून घेण्यासाठी ध़डपडायच्या…”
”काय सांगतोस’?”
”खरंच सांगतोय यार…”
”पण एवढ्या मुलींशी ओळखी असूनही वयाची चाळिशी तू ओलांडलीस तरी अजून तुझं लग्न कसं झालं नाही?”
”तेच तर दुःख आहे यार, कॉलेजात दर रक्षाबंधनाला माझे दोन्ही हात राख्या बांधायला पुरायचे नाहीत, पण फ्रेंडशिप डेला तेच माझे दोन्ही हात चक्क ओस पडायचे रे….!”
दुःखी मन मेरे…
मित्र म्हणाला, ”समोरच्या डायनिंग हॉलचं नाव काय आहे म्हणालास?”
”आनंदी डायनिंग हॉल.” उडपी उत्तरला.”अरे मग तू बार सुरू कर - दुःखी रेस्टॉरंट अँड बिअर बार!”
आवाज
राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू - गा S S णे!
राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू - दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…
काय करणार…
का हो?” बायकोने विचारले.”काय करणार, वेटर म्हणाला की फक्त बडीशेप देता येणार नाही. कमीत कमी एक पेग तरी घ्या म्हणजे बिलाबरोबर बडीशेप देतो. मग काय….”
सदाच्या बायकोने कपाळाला हात लावला.
रक्तदान
”यार मध्या, मला कधी कधी वाटतं ना की समाजासाठी काही तरी केले पाहिजे यार.” सदा म्हणाला.
”मग करू की” - मध्या म्हणाला.
”पण काय करणार यार?”
”अरे, उद्या गांधी पुण्यतिथीनिमित्त आपल्या कॉलनीत रक्तदान शिबिर आहे, तिथंच रक्तदान करू.”
”अरे ते तर आपण मागच्या वर्षी पण केलं होतं!”
”हो, मग या वर्षी पण करू, तेवढंच पुण्य गाठीला.”
दुसऱ्या दिवशी दोघेही मोठ्या उत्साहाने रक्तदानासाठी रांगेत उभे होते. तेवढ्यात संयोजक आला व म्हणाला, ”सॉरी,
तुम्हा दोघांना रक्तदान करता येणार नाही.”
”का?” दोघेही एकसुरात म्हणाले.”
कारण मागच्या वर्षी तुम्ही दोघांनीही दिलेल्या रक्तात रक्तघटकांऐवजी फक्त अल्कोहोलच निघालं!”
कित्ती छान…!
बायको - अय्या, पाहा ना, कित्ती छान आहे नाही…
नवरा - वा! छानच… सुंदर!
बायको - बघा ना, काळा रंगसुद्धा किती गोड दिसतो नाही.
नवरा - ऑ, काळा रंग?
बायको - हो!
नवरा - अगं, एवढ्या गोऱ्यापान, देखण्या स्त्रीला तू काळी म्हणतेस?
बायको - अहो, मी तिच्याबद्दल नाही, तिच्या साडीविषयी बोलतेय.
नवरा - अरेरे, आणि मी त्या ललनेबद्दल….!
बायको - रोखून काय पाहताय, चला…
बायको - रोखून काय पाहताय, चला…
जोड्या लावा….
हास्यक्लब!
पर्यटक - अरेच्चा!… कमाल आहे! हे कसं शक्य आहे?
गाईड - का हो?
पर्यटक - अहो, मागच्या ट्रिपला मी इथे आलो, तेव्हा तर इथे पाटी होती…
गाईड - कोणती?
पर्यटक - ‘हा-हा-ही हास्यक्लब’…. !
काय करू?
प्रियकर - प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
प्रेयसी - काय करशील?
प्रियकर - तू सांगशील ते करीन!
प्रेयसी - मग आधी नोकरी कर.
प्रियकर - का?
प्रेयसी - म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!
हलके हलके
फारच छान!!
प्रेयसी - राजा, तुझ्या घरी काय काय आहे रे?
प्रियकर - सर्व काही आहे राणी!
प्रेयसी - म्हणजे नेमकं काय काय आहे?
प्रियकर - अगं फोर व्हिलर, टू व्हिलर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन…
प्रेयसी - अजून?
प्रियकर - होम थिएटर, ओव्हन, कुलर…
प्रेयसी - आणखी काही?
प्रियकर - फूड प्रोसेसर, गॅस गिझर…
प्रेयसी - छान! पण तुझ्या घरी कोण कोण असतं रे?
प्रियकर - मला कुणीच नाही. आई होती, तीही सहा महिन्यांपूर्वीच देवाघरी गेली. पण तिची आठवण म्हणून तिचे दागिने मी कपाटात जपून ठेवले आहेत.
प्रेयसी - वा! फारच छान!!
काय करशील?
प्रेयसी - राजा, सारं सारं करील रे!
प्रियकर - म्हणजे नेमकं काय काय करशील?
प्रेयसी - समजा, दिवसभर काम करून तुझे हातपाय दुखले, तर मी ते चेपून देईल!
प्रियकर - डोकं दुखलं तर…प्रेयसी - दाबून देईल!
प्रियकर - पण समजा, दिवसभर तुझ्याशी भांडून भांडून माझा घसा दुखला तर….?
प्रेयसी - तर मी तुझा गळा दाबीन!!!
कारल्याची भाजी
अभिनेत्री
पती पत्नी
पत्नी सांगते : मुळीच नाही, उलट पटीनेच माझी फसवणूक केली. दौरवरून तीन दिवसात परत येतो म्हणून सांगितले व पहिल्याच दिवशी रात्री १२.०० ला ते परत आले. ही माझी फसवणूक नाही का?
मजेदार उतारे
एक वाचकपत्र
——————————————
प्रिय संपादक, लोकसत्ता, मुंबई
विषय - लोकमानस या सदराकरीता लेख.
महोदय,मी आपल्या पेपरचा खूप वर्षांपासूनचा वाचक आहे. आमच्या नगरसेविकेने आमच्या वॉर्डात एक पेपरचे वाचनालय सुरू केले आहे. ते आता बंद पडले. पण तेथील सगळे पेपर आता शाखेत पडतात. मी तेथे जाऊन तुमचा पेपर रोज वाचतो. मला तुमचे सगळे लेख खूप आवडतात. मी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंतचे सगळे अग्रलेख आवडीने वाचतो. बातम्यासुद्धा वाचतो.
तुमचा पेपर वाचून आम्हांस खूप नवीन नवीन माहिती मिळते. ती माहिती खूप उपयोगी असते. काही दिवसांपूर्वी तुम्ही सारेगमची हेडलाईन छापली होती. ती आम्हांला खूप आवडली कारण की आम्हांला ती मालिका खूप आवडते. आमच्या घरातील सगळेच जण ती मालिका पाहतात. गायिका लता मंगेशकर यांनी मुलांना आर्शिवाद दिला ते आम्हांला खूप आवडले. कारण की लता मंगेशकर यांच्या कॅसेटी आम्ही आवडीने ऐकतो व त्यांची गाणीसुद्धा ऐकतो. आम्हांला लता मंगेशकरांचे बाबा आणि बाळ हे सुद्धा आवडतात. त्या लहान लहान गायकांना भेटल्या ही बातमी खूप महत्वाची आहे, असे आमच्या खात्यात सगळेच म्हणाले. मी गोदरेज कंपनीत शिक्युरिटीत आहे. माझ्या कुटुंबाने सारेगमला आरया आंबेकरला चार एसेमेस पाठविले आहेत. तसेच आजची बिग बॉसची बातमीपण आम्हांला खूप आवडली. आम्ही ती मालिकापण पाहतो. पण त्याच्यापेक्षा आम्हाला चार दिवस सासूचे ही मालिका खूप आवडते. तिची हेडलाईन तुम्ही कधी छापणार याची वाट आम्ही पाहतो आहोत.
बिग बॉसच्या घरातील भाडेकरू पळून गेले हा सिक्युरिटीला मोठा धक्का आहे. सिक्युरिटी टाईट पायजे होती. आमच्या कंपनीत सिक्युरिटी एकदम कडक आहे. (कृपया हे वाक्य काटू नका. महत्वाचे आहे.)संपूर्ण देशातील सिक्युरिटीचे कसे बारा वाजले आहेत, हे तुमच्या बातमीमुळे सगळ्यांना कळले. देशाला दहशतवादाचा धोका आहे, हे पण बिग बॉसच्या बातमीमुळे कळले. याच्यावर तुम्ही एक सणसणीत अग्रलेख लिहा. काहीकाही मालिका लई लांबवित्यात. त्याच्यावरपण बातमी करायला जमली तर पाहा, कारण की त्याच्यामुळे मालिकांतला इंटरेस संपून जातो. हे समाजासाठी चांगले नाही.
चार दिवस सासूचेमधील मुख्यमंत्री कसे पण वागतात. एकदा त्यांचीपण बातमी छापा. तसेच असंभव सुलेखाला अटक झाल्यावर तिची नार्को चाचणी करण्याची गरज आहे, अशीपण बातमी छापा. ते फार महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक खुन उघडकीस येतील.
मला तुमचे अग्रलेख खूप आवडतात. म्हणून कृपया माझे हे पत्र पहिल्या पानावर ठळक बातमी म्हणून छापणे, ही विनंती.चुकलं माकलं माफ करा. थोडं लिहिलं जास्त समजा.
कळावे,तुमचा नम्र वाचक.
(Thanks to चांगदेव पाटील,(Baatmidar Blog), दि. १८ नोव्हेंबर २००८)
माझ्यावर हजार खटले भरले, तरी हिंदुत्वाचा लढा थांबवणार नाही ! - श्री. प्रमोद मुतालिक
प्रतिनिधी : पबमध्ये हल्ला केल्याने काय परिणाम झाला ?
श्री. प्रमोद मुतालिक :
१. असभ्य व गैरवर्तन करणार्या हिंदु मुलींना चाप बसला. आता त्या पबमध्ये जाण्यास व असभ्य वर्तन करण्यास घाबरतील. संस्कृती रक्षणाचे हे कार्य संपूर्णपणे यशस्वी झाले. मुलींचे पबमध्ये जाणे थांबवले पाहिजे, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सौ. निर्मिला व्यंकटेश यांनी स्वत: म्हटले होते.
२. आतापर्यंत आमचे कार्य कर्नाटकपर्यंत सीमित होते. आता या संस्कृतीच्या अभिमानी कृतीमुळे आम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलो आहोत. माझ्या अटकेमुळे उत्तरप्रदेश, दिल्ली, कोलकाता, विजयवाडा, भोपाळ येथे सर्वत्र निषेध नोंदवण्यात आला. श्रीरामसेनेला राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रभर याविषयी चर्चा सुरू झाली.
३. कर्नाटकचे मुख्यमंत्री व राजस्थानचे मुख्यमंत्री यांना पबसंस्कृतीच्या विरोधात प्रतिपादन करावे लागले.
४. मंगळुरूच्या या घटनेने हिंदु संस्कृती वाचवण्याविषयी चर्चा सुरू झाली.
प्रतिनिधी : कर्नल पुरोहित व तुमचे काय संबंध आहेत का ?
श्री. प्रमोद मुतालिक : कर्नल पुरोहित व मालेगाव बाँबस्फोट यांच्याशी काहीएक संबंध नाही.
प्रतिनिधी : पुढचे नियोजन काय ?
श्री. प्रमोद मुतालिक : संघटनेचे राष्ट्रीयकरण करणे, सर्व हिंदु संघटनांना संघटित करणे व हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे, हेच कार्य आम्ही आगामी काळात जोराने करणार आहोत.
प्रतिनिधी : तुम्हाला कोणाचा पाठिंबा आहे का ?
श्री. प्रमोद मुतालिक : भाजपचे माजी उपाध्यक्ष व राजकारणातून काही वर्षांपूर्वी संन्यास घेतलेले श्री. गोविंदाचार्य व त्यांची संघटना आमच्या पाठिशी आहे. पुणे येथील हिंदुत्ववादी संघटनाही आमच्या संपर्कात आहेत.
प्रतिनिधी : कर्नाटक पोलिसांनी अटक केल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती ?श्री. प्रमोद मुतालिक : कर्नाटक पोलिसांनी माझ्यावर हजार खटले भरले, तरी हिंदुत्वाचा लढा आम्ही थांबवणार नाही.
शिवसेनेचं भुजबळांना आमंत्रण? : ८ जानेवारी
कार्तिकीदेवीचा विजय असो!
कमाल झाली
कारणे द्या
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त
असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो
अफलातुन पुणे…अफलातुन वाक्ये :-
3) ख़ोदुन ठेवलेल्या रस्त्यावर: भव्य पुणे मोटोक्रॉस स्पर्धा :-: सौजन्य पुणे महानगरपलिका
4) लाकडी जीन्यावर : चढण्यासाठी वापर करावा… वाजवण्यासाठी नव्हे.
5) होटेल मधे : कामाशीवाय बसु नये..
6) दुपारी १ ते ४ दार वाजवु नये. येथे माणसे रहातात व ती दुपारी झोपतत..अपमान कसा होतो ते पहायचे असल्यास वाजवुन पहा….
7) कोर्या कागदाची झेरोक्स काधुन मिळेल.
8)येथे जोशी रहात नाहीत. चौकशी करु नये, अपमान होईल…
9)येथे कचरा टाकू नये साभार परत केला जाईल.
आठवण आली तुझी
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य…
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य…
पण तरिही………
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी….
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी….