जख्मा तू किती ही दे

जख्मा तू किती ही दे

जख्मांच काही वाटत नाही

पण फुंकर मारायला तू आलीस

हे काही पटत नाही

■════════■•◊◊◊•गीत•◊◊◊•■════════■

इथून दूर गेल्यावर,

इथून दूर गेल्यावर,

अनेक वाटा माज्या असतील,

पावला पावलावर आठवणी मात्र तुज्याच असतील.


काळ्जाची धडधड माझ्या

काळ्जाची धडधड माझ्या
जर तुला कळली आसती
फक्त आसती हुरहुर नी धडधड
आठवण माझ्याकडे राहिली नसती

बस आता, आठवण हीच सोबतीला राहते

"बर झाल तू गेलीस ते ............"
oceanheal

म्हणालो मी तुला फुल देइन भेटून,

म्हणालो मी तुला फुल देइन भेटून,

तेवढ्यात तूच फुल दिलेस एवढे दूर असून.

ते फूल सुकलय तस आणि सुगंधही विरळलाय,

पण त्यात तुझ्या प्रेमाचा गंध अजूनही नवाय.

© अमोल भारंबे (२००८).


नकळत सारे घडले...

नकळत सारे घडले...

पहिल्याच 'online' भेटित मन माझे तिच्यावर जडले...


मग सुरु झाल्या माझ्या 'messenger'च्या वारय़ा

आणि काहि दिवसातच तिच्या आवडी-निवडी माझ्याही झाल्या सारय़ा...


मी तिला न पाहिले...

तरीही माझ्या मनाचे फ़ूल तिच्या विचरान्च्या चरणी वाहिले...


नकळत सारे घडले...

आणि हे 'chatting' चे खूळ माझ्या खिशाला महागात पडले...


आमचे 'chatting' असेच सुरु राहिले...

आणि काही दिवसानी मी तिला पाहिले...


ती होती दिसायला बरी...

मला तरी कुठे मिळणार होती परी...


तब्बल एका वर्षाने आम्ही भेट्लो...

आणि एकमेकान्च्या सहवासात रमलो..


उद्या आहे तिच्या घरच्यान्शी माझे 'Introduction'...

आणि यापुढिल कविता 'Under-construction' !!!


Type rest of post here

प्रेम तुझे पाहून मन कळवळत

प्रेम तुझे पाहून मन कळवळत

मग माझ्या मजबुरीने मन तरफडत

कसे सांगु तुला ? काय समजावु

चुक माझी ही नसते , नशीबच खेळ करत


नाही जुळत शब्द

नाही जुळत शब्द

कशी बनवु चारोळी

यावे तु हसत सोबतीला

त्या साठीच ही आरोळी

गीत १७/५/०९


प्रेमामध्ये गमवावे लागतेच

प्रेमामध्ये गमवावे लागतेच

त्या शिवाय काही मिळत नाही

कसे समजविणार स्वताहा

प्रेमात पडल्याशिवाय काही कळत नाही

■════════■•◊◊◊•गीत•◊◊◊•■════════■


आसाच आहे मी कारण

आसाच आहे मी कारण

नसताना ही भांडनारा

आणि तरी ही मैत्रीवाचुन

पावलो पावली आड़नारा

गीत 2/4/09


प्रेमामध्ये गमवावे लागतेच

प्रेमामध्ये गमवावे लागतेच

त्या शिवाय काही मिळत नाही

कसे समजविणार स्वताहा

प्रेमात पडल्याशिवाय काही कळत नाही

■════════■•◊◊◊•गीत•◊◊◊•■════════■

आठविते ते गुज मजला,

आठविते ते गुज मजला,

साद हाकांवर ठरलेले.

पुढल्या जन्मी देइनच तुला,

या जन्मभरीचे जे उरलेले.

© अमोल भारंबे (२००८).


कोसळणारा पाऊस

कोसळणारा पाऊस

मला नेहमीच एक प्रश्न पडतो

माझं तर ठीक आहे

पण हा कुणासाठी रडतो

दव पडलेल्या गवतावरून

जेव्हा मी हात फ़िरवतो

तुझे अश्रू पुसतोय

आसाच मला भास होतो

गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,

खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,

नको अंतर नको दुरावा

पावसाला लाजवील, असा

असावा मैत्रीत ओलावा

मैत्री नको चंद्रा सारखी,

दिवसा साथ न देणारी,

नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी

मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी

मनात आसलेल सर्वच

मनात आसलेल सर्वच

पूर्णत्वास जात नाही

म्हणुनच मन वाहत राहत

शांत कही होत नाही

गीत

तु आहेस म्हणुन.......

तु आहेस म्हणुन.......

आयुष्य खुप छान आहे,

तुझ्यामुळेच तर मला,मी

माणुस असल्याचं भान आहे.

तशी माझी किंम्मत शुन्यचं

होतो मी ही जाणुन.

आता मलाही अर्थ आहे

तु आहेस म्हणुन.......

रात्र

आज आसवांत वेडी

पाहीली मी रात्र ती

चांदण्या-चंद्रात आता

राहीली ना रात्र ती...

वाटले माझ्याच साठी

ती जाहली वेडी-पिशी

पण हाय रे माझी कधीही

जाहली ना रात्र ती.....


भास!

आत्ताच कशास्तव

सामोरा आलास

नुकताच कुठे मी

नीट घेतला श्र्वास

दर आठवणींनी

छिन्न-छिन्न होताना

होतास तू, अन

तुझाच होत भास!

वादळवेडी...

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात...


कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे

देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात


कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे

कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात


तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी

कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात


नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा

नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा


उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी

कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात


हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी

कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात


ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया

हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात


कवी - कुसुमाग्रज

कणा

‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.


क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.


माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.


भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.


कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.


खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.


मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!


कवी - कुसुमाग्रज

तू अशीच येत जा

तू अशीच येत जा
काहि न बोलता जात जा

मी असाच वाट पाहिन

काहि न बोलता नूसतच पाहत राहीन

शद्बाचे अडसर आता हवेत कशाला ?

sparshya chi अडगळ ही नको आता

आता तू हि अशी बध मुक्त........

वारयाच छुळकि बरोबर येणारी आणि

मी असा trupt सचेतन पडलो

सागराचया किनारी आभाळाच

पतिबब mazzya डोलयात पडलय

तूझ चांदण माझया मनात दडलय

कधि तरी अशीच ये

सहज भेटून जा

तुझया प्रेमळ नि्शवासाने पापणया मिटून


कवि : अनामिक

हर्षदा बेटाची ( बेटीची) गोष्ट अति न्यारी

हर्षदा बेटाची ( बेटीची) गोष्ट अति न्यारी

अविश्वास वाटेल पण आहे खरी खुरी



होमी भाभा शिष्यवृत्ती विज्ञानासाठीची

नॅशनल टॅलंट सर्च मध्ये होती ही टॉपची



IITJEE ला होऊन सिलेक्शन टॉपला

आर्ट्स निवडले दिशा निवडली जाण्या समाजसेवेला



कविता हे तर एकच अंग अजून करते काही

गांवातील गरीब मुलांना शिक्षण देते सही



व्हायलिनचा सूर पकडते पण चिंता विश्वाची

अशी हर्षदा कवयत्री ही खाण असंख्य गुणांची



--- ये तो शुरुवात है....

संत्र्याच्या स्वादाची सोनपापडी

जिन्नस

१ १/४ कप बेसन

२ चमचे दुध

१/४ किग्रा. तुप

१ १/४ कप मैदा

२ १/२ कप साखर

१ १/२ कप पाणी

१/२ चमचा वेलची

संत्र्याचा अर्क

नारिंगी रंग

मार्गदर्शन
१. बेसन आणि मैदा एकत्र करा. त्या नंतर एका तव्यात तुप गरम करण्यास ठेवून द्या.
२. त्यामध्ये पीठ मिसळून मंद गॅसवर किंचीत सोनेरी रंग येई पर्यंत गरम करून बाजूला ठेवून द्या. थोड्या वेळाने चमच्याने फ़िरवत रहा.
३. साखरेचा पाक तयार करून घ्या. त्यामधे नारिंगी रंगाचे व संत्र्याच्या अर्काचे २ थेंब टाका. त्यानतंर ते पिठाच्या मिश्रणात एकदम ओतुन घ्या.
४. त्यानंतर मिश्रणाला तार सुटेपर्यंत मोठ्या चमच्याने ढवळून घ्या. तार सुटल्यानंतर मिश्रण एका तूप लावलेल्या थाळीत १" चा थर होईल असे ओता.
५. वेलचीच्या बिया वरून पसरून वरून हलकेच दाबून घ्याव्यात.६. थंड झाल्यानंतर चौकोणी आकारात कापून घ्या व हवाबंद स्टीलच्या डब्यात साठवण करा.


टीपा

पदार्थ अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी हवाबंद डब्यात सुती कपड्याखाली ठेवावा.

चहा

दोस्तानो या वीकान्तासाठीरेसीपी कोठे हे लिहायच्या हे कळाले नाही. पण मला वाटते की रेसीपी हा प्रकार आस्वादात्मक या प्रकारत मोडत असाव्यात्.म्हणुन येथे लिहीत आहे.( रसास्वाद ..........)ललित लेख, वेगवेगळ्या विषयावरील वैचारिक लेख, कथा, समिक्षण, अनुभव आणि आस्वादात्मक लेख, इत्यादींसारखे सर्व बहुरंगी बहुढंगी लेखन या भागात करावे ही विनंती!

आपण नेहमी ऐकत असतो की "बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणु नये"या वीकान्ता साठी चहा चे हे दोन वेगळे प्रकार्........पुरुषांसाठी आणि बायकांसाठी ही......काहवा....हा चहा कश्मिर मध्ये प्रचलीत आहे. मस्त थन्डी , मोकळी हवा , आणि सोबत निवान्त पण (गोव्याकडे "सुशेगाद" म्हणतात तेव्हढा निवान्त पणा हा चहा पिण्यासाठी अत्यावष्यक घटक. मस्त मंद आवाजात बासरी + सन्तूर अथवा शम्मी कपूर ची गाणी असतील तर सोने पे सुहागा)हा चहा मजेत चाखत माखत प्यायचा..उगाच घिसड घाई चालत नाही.असो. यातील घटक : ग्रीन चहा( नसल्यास काळाही चालेल) ,३ /४लवन्ग , वेल्दोडे, केसर , दालचीनी ,बारीक किसलेला बदाम,मध, मीठ,लिंबु१) प्रथम ३ कप पाणी ; लवन्गा , दालचीनी टाकुन उकळत ठेवावे. वेलदोडे ठेचुन त्यात टाकावे२) केसर थोडे पाण्यात भिजवुन ठेवावे.३) पाणी उकळल्यावर त्यात गाळणीत २ चमचे चहा पत्ती आणी ठेवुन गाळण चहा भिजेल इतपत पाण्यात बुडवुन ठेवावी.४) ३ ते ५ मिनीटानी चहाचा ( पाण्याचा)रंग सोनेरी झाल्यावर गाळण बाजुला काढावी. जास्त कडक हवा असल्यास जास्त वेळ ठेवावी५) या सोनेरी चहामधे ४ ते ५ चमचे मध टाकावा.( गोडी वाढवु शकता)६)किन्चीत मीठ टाकावे आवडत असल्यास थोडेसे लिंबु पिळावे७)केसर मिश्रीत पाणी टाकावे.दोन चमचेमस्त मोठ्या कपात गरम गरम असतानाच भरुन द्यावे७) वाढताना त्या हवे असल्यास किसलेला बदाम वरुन टाकावा.मस्त मंद आवाजात बासरी + सन्तूर लावुन झकास रिलॅक्स मधे काहवा प्या...* काही जण हा चहा थंड ही पितात. त्यावेळी त्यात स्मिर्नोफ व्होडका चा एखादा चमचा टाकल्यास हरकत नाही.