Maharashta sathi je aahet te Marathi sathi aahet Majhya kadun Majhya ya Marathi Mansa sathi.. majhya kadun hi choti se..... mahiti kendra
Thursday, May 14, 2009
तीन वेडे मेंटल हॉस्पिटल मधून पळायचा प्रयत्नात असतात.
पहिला वेडा मांजरीचा आवाज काढत पहरेकर्याच्या मागून बाहेर पडतो. पहारेकर्याच्या ते लक्षात आले नाही हे बघून दुसरा वेडाही तेच करतो व बाहेर पडण्यात यशस्वी होतो.
तीसरा वेडा बघत असतो व तो मांजरीचा आवाज काढत पहारेकर्याकडे जातो व त्याला सांगतो मी पण मांजर आहे.
उखाणा
हा अस्सा कोणता आला कानुनी कायदा.....
हा अस्सा कोणता आला कानुनी कायदा..........
माझ नाव घेण्यात तुमचा कसला फायदा...............
उखाणा
न शिजलेले अन्न माला काही रुचेना....
न शिजलेले अन्न माला काही रुचेना ........
आणि रुचिता चे नाव असलेला उखाणा मला सुचेना.....
उखाणा
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
Amol ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
उखाणा
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव....
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव...........
निखिल रावांची बाहेर किती लाफडी ते विचारू नका राव
माझी कथा.... करण
तारूण्याची पहिली पायरी म्हणजे पौगंड! तेरा ते एकोणीस अशी ही सात वर्षं आपल्या आयुष्यातली सर्वात धाडसी अन स्वप्नवत. केवळ ब्लॅक व्हाईटच नाही, तर ग्रे विचारांची माणसं जाणण्याची ही सुरूवात. पहिल्या प्रेमाची हाक, पहिल्या चुंबनाची साद. आयुष्याची कठोर कटू सत्यं जाणून घ्यायची निकड. ती पचवायची धडपड. मनातल्या बऱ्या वाईट द्वंद्वाला "आय एम कूल!" म्हणवून घालण्यात येणारी एक निष्फळ फुंकर!
करणही ह्याच द्वद्वांत कुठेतरी फसलेला. पण शेवटी फिनिक्स सारखं राखेतून भरारी घेत आकाशी उडणाऱ्याला कोण थोपवतो? करणची ही गोष्ट वाचत "हा फिनिक्सही कदाचित टीनेजर असावा" असे वाटून जाते, ते उगीच नाही......
एक लघु कथा,
विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''
... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...
... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!''