Monday, March 30, 2009

अजुन तीच मन काही......... वळलं नाही......!

अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
काल तिच्या सोबत चालत होतो...
चालता चालता बोलत होतो...
बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलं नाही...
अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!

नविन बुटामुले पाय दुखत होता...
चालता चालता हाडाला खुपत होता...
तिच्या आनंदात पायाच दुःखण कळलं नाही...
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

काल खुप खुश होती.......म्हणाली मजा आली
आज का तू थाम्बलास.......माझ्यासाठी....
का थाम्बलो...... तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

होटेलात गेलो.......खुप खल्ल
उशीर झाला तिला......पण वेळ कसा गेला नाही कळलं
का तिने इतका वेळ घालवला.......तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

मग असेच चालत राहिलो रस्त्यावर........
घर तिचे जवळ येउच नये असे वाटत राहिले.....
बसस्टॉप येताच मी थाम्ब्लो
तेंव्हा डोळ्यांत तिच्या मी......आनंदाचे क्षण पाहिले

काही क्षण स्तब्ध झालो........आम्ही
एकमेकांना टाटा.......बाय नाही म्हणालो
कोणास ठाउक........का ते कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही

Saturday, March 28, 2009

Raj

' रा 'जा तुज आम्ही मानीले
' ज 'नतेचा तू कैवारू

' ठा 'कला उभा पुढे
' क 'रण्या मराठीचे रक्षण
' रे ' दिलीस हाक तू
अन् आम्हीही आलो तत्क्षण ,
चल गाजवू रणांगण !!
-ट्विंकल देशपांडे .

राज आज काय बोलणार ?

राज आज काय बोलणार ?
अवघ्या महाराष्ट्राला
ही उत्सुकता आहे,
राज हाती यावी सत्ता,
सगळ्यान्चिच ही इच्छा आहे.

लढाईस तयार असलेले सैन्य,
जसे इशार्याची वाट बघते,
ऐकण्या त्यांचे भाषण
आम्ही आतुर झालो इतके,

आज पुन्हा एकदा ठाण्यात,
ही राज तोफ धडाडनार आहे,
माहीत आम्हाला इतुकेच,
की भल्या - भल्यांची वाट लागणार आहे !!!
-ट्विंकल देशपांडे.

आमुचा राजा तू!!

'स्व'राज्यच घडवायचय तुला,
'र'ममाण व्हायचय तुला
'रा'जा होउन काम करण्यात महाराष्ट्रासाठी,
'ज'ळणारे जळु देत , बोलणारे बोलू देत,

'ठा'कलास उभा असा त्यांच्यासमोर तू
'क'रणार आहेस तू , नक्की करशील तू
'रे' म्हणुनच म्हणते मावळे आम्ही नि
आमुचा राजा तू!!

-ट्विंकल देशपांडे.

मना-मनात 'राज' आहे ,

दिल्लीलाही हादरवन्याचि ताकद या मनगटात आहे ,
महाराष्ट्र नवनिर्मानासाठी 'राज' आज अटकेत आहे ,

दिसते तसे नसते हे खरेच आहे ,
मराठ्यांच्या ताकदीचा हा फ़क्त ट्रेलर आहे ,
खरा पिक्चर तर अजुन बाकीच आहे ,

महाराष्ट्र काबीज करण्याचा ,
कितीही प्रयत्न करा तुम्ही ,
पण लक्षात ठेवा, 'राज'राज्य आल्यावरती ,
तुमची काही धडगत नाही ,

वेडे तुम्हास वाटलो आम्ही ,
तर हो आम्ही आहोत वेडे ,
कारण म्हनटले आहे थोर पुरुषांनी ,
की, इतिहास घडवितात ती वेडी माणसेच ,

मस्तवाल राजकार्न्याना ,
महाराष्ट्राचा एकच सवाल आहे ,
कुणा-कुणावर बंदी घालणार ,
मना-मनात 'राज' आहे ,
मना-मनात 'राज' आहे .
-ट्विंकल देशपांडे.

मराठी माणुस वाघ आहे

चुकुनसुद्धा कधी तुम्ही महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका ,
मराठी माणसाला मुळीच लेचापेचा समजू नका ,

मराठी माणूस खेलण नाही ,
विस्तवाशी खेलु नका ,
पेटला तर तुमची राख करेल ,
हे तुम्ही लक्षात ठेवा ,

मराठीच्या अभिमानाला नख कधी लावू नका
,मराठी माणुस वाघ आहे ,
उगाच त्याला दिवचु नका ,

धमकी नाही , इशारा नाही ,
ही आमची ताकीद आहे ,दूसरा तीसरा कोणी नाही 'राज ठाकरे' पाठीशी आहे !!
-ट्विंकल देशपांडे

होणार असेल लढाई

होणार असेल लढाई
तर होउनच जाऊ दे आज,
मराठी माणसासाठी उभा आहे 'राज'.

उपर्यांची दादागिरी इथे चालणार नाही,
आणि मै आऊंगा बिऊंगा खपवून घेतले नाही.

'राज'ला साथ द्यायला अख्खा महाराष्ट्र सज्ज आहे,
त्याला एकटा समजनार्याननि आधी डोळे तपासून घ्यावे.

राजकारणातल्या म्हातार्यांची आता वाटच लागणार आहे,
कारण तरुणांच्या मनात 'राज',
'राज' आणि फ़क्त 'राजच' आहे .
-ट्विंकल देशपांडे

Friday, March 20, 2009

आठवणींचे भास्..

नेहमी प्रमाणे डोळे माझे मिटायला तैयार नव्हते,
कितीही समजावले तरी तिलाच शोधत होते....

तिचाच विचार करताना लागला डोळा चुकून,
स्वप्न ते होते की नव्हते दिसे ती इथून तिथून....

मिटलेल्या डोळ्यांपुढे दिसते ती छोटी परी,
नाजुक हात पसरलेले, बोलावताना मला घरी....

डोळे किती निरागस तिचे, ओठांवर मोहक हसू,
समजेना मला माझ्या, डोळ्यात हे का आले आसू?

कठिन परीक्षा आहे तुझी ही,
समजावले मग मीच मनाला,
गवसणी घालण्या आकाशा,
बीज घेते आधी गाडून स्वताला....

ज़मीर १९-मार्च-२००९

Wednesday, March 18, 2009

बरं झालं तू गेलीस ते

तू नाहीस म्हणुन
तुझी आठवण येते
बरं झालं तू गेलीस त

दिवस जातो कसाबसा
रातरी कोण र्ड्ल आसते
बरं झालं तू गेलीस ते

सार्या घटका गोठून गेल्या
भिंतीवर घड़याळ कीट्कीट करते
बरं झालं तू गेलीस ते

का जगु हा प्रश्न आहे
मरण्याचे पण भय संपले
बरं झालं तू गेलीस ते

माझी आई

मायेची गोड गोड
हाक माझी आई
छोटेसे गोल गोल
नाक माझी आई

गुरगुट्टा मऊ ताक
भात माझी आई
केसातून फिरणारा
हात माझी आई

तत्वांचे धारादार
टोक माझी आई
भीती घालवणारा
श्लोक माझी आई

तुषार जोशी,
नागपूर(१७ मार्च २००९, टेरीटाऊन)

Tuesday, March 17, 2009

"सवय"

सवय करुन घे माझ्याशिवाय जगण्याची
काय माहीत उद्या जगात असेन नसेन
आता दिसतोय इथं तुझ्यासमोर
उद्या कदाचीत कुठल्याश्या ता-यात दिसेन
जाईन उडुन कापरासारखा कदाचीत
माझ्यापाठी अस्तित्वाची खुण न उरेल
नको शोधुस कस्तुरीमृगासारखं मला
शोधुन थकशील पण माझा ठाव न लागेल
त्या आठवांच्या ओल्या दवबिंदुंप्रमाणे
कदाचीत माझे अस्तित्व असेल....
क्षणभंगुर..........
कसे सरतील दिवस तुझे
कश्या सरतील राती....
बावरशील ना ग कदाचीत तु.......
जेंव्हा माझा हात नसेल तुझ्या हाती
पण तरीही
तुला फक्त माझ्यासाठीच जगायचयं
मला हरवणा-या त्या नियतीसोबत
तुला लढायचयं
हसायचयं अन जिंकायचयं...
मी असेनच पाहात तुला
कुठल्याश्या ता-यातुन
करीन तेंव्हाही इच्छा पुर्ण तुझी
त्या आभाळाच्या कोंदणीतुन निखळुन.......
ओंकार(ओम)
Date 12-3-09

कविता वाचतो मी

हृदयाने ऐका तुम्ही
कविता वाचतो मी

लिहिलेली कुणीतरी ही
शाईने वेदनेच्या
त्या उत्कट तरल क्षणाला
प्रतिभेच्या प्रेरणेच्या
शब्दांच्या खोल तळाशी
घेऊन बघा जातो मी

कविता वाचतो मी.

क्षण काही विसरून जाऊ
या व्यवहारी जगताचे
क्षण काही होऊन जाऊ
आपण सगळे कवितेचे
कवितेचा सुगंध थोडा
तुम्हाला वाटतो मी

कविता वाचतो मी.

तुषार जोशी, नागपूर

वाट.............

वाटते लिहाविशी

एक कविता छान,

शुभ्र आकाशात जशी

इंद्रधनुची कमान,

निर्मळ झार्यामध्ये

जसे खळाळते पाणी,

माझ्या कवितेची असावी

तशी मधाळ वाणी,

पहिल्या पावसानंतर दरवळतो

जसा मातीचा सुगंध,

कविता लिहिताना

मी व्हावे तैसेची धुंद,

पण काय झालय

मला काही कळतच नाही,

शब्द हल्ली मनामध्ये

फिरकतच नाहीत.

पण कधीतरी होईल

एक सुंदरशी पहाट,

त्या दिवशी बहरेल

ही शब्द्फुलांची बाग़,

त्या पहाटेची बघते

मी आतुरतेने वाट...................

-ट्विंकल देशपांडे.

मन माझ का आस वेड्यासारख वागत

मन माझ का आस वेड्यासारख वागत
तू सोडल त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा फिरत
मन माझ का आस वेड्यासारख वागत
विसरल विसरल म्हणता , म्हणता मध्येच तुला मागत
मन माझ का आस वेड्यासारख वागत
तू तोडलेल्या हृदयाच्या तुकाडयात तुला शोधत
वाहून वाहून सुजलेल्या दोल्यामाधुं तुला बघत
मन माझ का आस वेड्यासारख वागत
बुजलेल्या वाटान वरुण पुन्हा पुन्हा फिरत
काय सांगू तुझ्या आठवनित किती खोल खोल शिरत
आठवून जून सार आज ही हळहळत
मन माझ का आस वेड्यासारख वागत
समजावितो त्याला ही जिन्दगी आहे वेड्या
येथे हे आसेच घडणारच
आगि भोवती फिरणारे पतंग कधी ना कधी
आगीत पड़नारच
तरी ही ते पहिलेच पाढे पंचावन्न करत
मन माझ का आस वेड्यासारख वागत
========================गीत ツ ७/३/०९========================

ही सांज कोवळी ....

ही सांज कोवळी
ये आज जवळी..
अनवाणी आठवांनी
ये कातरवेळी..॥

ही सांज कोवळी
ये आज जवळी..।

गंधमादित, परीमाळीत SS आठव साठव चाले
नयन बोले तुझे नाव, आसव आसव वाहे

मनात तुझिया
कसला हा खेळिया
तू स्वच्छंदी जलपरी
आज साद घातली

ही सांज कोवळी
ये आज जवळी..॥

हिरवाळीतून, जलदानीतून उत्सव उत्सव चाले,
मन माझे अलवार, तुझे जुने गीत गाते..

ये आज धावूनी
नियम मोडूनी
तू स्वामिनी ग माझी
तू मनमोहिनी..

ही सांज कोवळी
ये आज जवळी.. ॥

मी आणि....

सांज वारा कातरवेळ
ज्योतीची तडफ़ड
मनातली घालमेळ
मी उभी इथे शांत
चेह-यावरची रेष ही न हलवता

कुठलास मुखवटा घालुन
डोळ्यांत येनार पाणी
पापण्यांतच जिरवुन
ग़ळ्यातला हुन्दका
असाच गळ्यात दाबुन
मी उभी इथे शांत
चेह-यावरची रेष ही न हलवता

इथे छाटले गेले परच माझे
उडनार तरी कशी??
रक्ताळलेली पाउले
वाट चालनार तरी कशी??
मी उभी इथे शांत
चेह-यावरची रेष ही न हलवता

भविष्य माझं ,माझ्या हातातही नाही
का कुणी वेसण धरलेल???
जीवनाच्या रथाच
का कुणी सारथी नाही??
मी उभी इथे शांत
चेह-यावरची रेष ही न हलवता
स्वाती १४.०३.०९

marathi kavita

रस्ता जरी कठिन असला तरी त्याच्या पर्यंत जन्याशाठी मन अधीर असते
अणि तो भेटताच तो रस्ता फुलांचा गालीच वाटतो
जगण्याला मग एक नविन दिशा मिलते
हसताना मग गालात एक सुन्दर खली पड़ते
अणि त्या खलित त्याचे हसू असते
अणि मग जीवन सुन्दर होते

आसाच आहे मी मनाप्रमाने जगणारा

आसाच आहे मी सरळ चालताना ही धडपड़नारा
कोणी ही एकत नसेल तरी नव काही तरी गुणगुणनारा
आसाच आहे मी मनाप्रमाने जगणारा
वार्याला पकडत पकडत क्षितिज्यासाठी धावणारा
माहित नसते बर्याचदा काय मला मिळवायचय
इतकेच ठाम की देवाला स्मरणात ठेवून जगायच
आसाच आहे मी कट्यांपासून ही फुलांची आस ठेवणारा
आसाच आहे मी मनाप्रमाने जगणारा
बर्याच गोष्टी मी न ठरवता ही करतो
मी करतो म्हणन्यापेक्ष्या माझ्या बाबतीत त्या घडतात

का माहिती क पण कारण नसताना ही आनके नविन नाती जुळतात
वाईट वाटते खुप जेव्हा जुनी नाती तुटतात
तत्वांनसाठी नात्यांच्या त्या रेशीमगाठी सुटतात
आसाच आहे मी क्षणा क्षनाचे गणित करणारा
फेकून घड्य़ाळ मुक्त पाने निसर्गात रमणारा
आसाच आहे मी मनाप्रमाने जगणारा

Saturday, March 14, 2009

व्हॉट्‌स रॉंग विथ यू, मिस्टर राज?(भाग 3)

पण ते ग्लोबलायझेशनचं ?
राज : ग्लोबलायझेशनची भाषा आधी सर्व प्रांतांना शिकवा मग महाराष्ट्राला शिकवा. हीच गोष्ट तुम्ही करुणानिधी, चंद्राबाबू नायडूंना सांगा. त्या दिवशी त्या शिवाजी पार्कवर चंद्राबाबू नायडूंनी इंग्रजीत भाषण केलं. तिथल्या प्रेक्षकातल्या कुणाला कळत होती ती भाषा? चंद्राबाबूंना तेलगू, इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी शिका, हिंदी बोला असं सांगण्याची हिंमत आहे अमरसिंहाची? कुणाचीच! ग्लोबलायझेशन म्हणजे आपली भाषा, आपली संस्कृती मारून टाकणे असा होत नाही. जे इथलं-महाराष्ट्रातलं आहे, तेच ही माणसं नाकारताहेत. मारायला बघताहेत. या यु.पी.-बिहारच्या भैय्यांना माझी विनंती आहे की, हा प्रयोग त्यांनी गुजरात, तामिळनाडू, प.बंगाल, केरळ,कर्नाटकमध्ये करून दाखवावा. काय होतं ते मला येऊन सांगावं...शिवाय इतर कुणाच्याही बाबतीत असं महाराष्ट्रात होत नाही. कारण बाकी प्रांतीय महाराष्ट्रात येऊन असं करत नाहीत. सर्वत्र गरबे होतात, दांडिया होतात का नाही? आपल्याला असं वाटतं का की हे राजकीय ताकद दाखवताहेत म्हणून? शिवाय मला सांगा, महाराष्ट्रात इतर अनेक प्रांतातले नेते राहतात, गुजराती राहतात,तेलगू राहतात, तामिळी राहतात, मारवाडी राहतात, पंजाबी राहतात. आपण कुणी असं बघितलंय की त्यांनी मोबिलाइझ्‌ड होऊन त्यांच्या प्रांतातल्या नेत्यांना बोलावलंय म्हणून...किंवा त्यांच्या प्रांतातल्या नेत्यांना ते विचारताहेत कुणाला मतदान करू म्हणून...? ह्यांनाच का लागतात हयांचे नेते आणायला उत्तर प्रदेश-बिहारमधून इकडे...चीन आपली भाषा संस्कृती टिकवून आपला विकास करतोय. फ्रांस आपली भाषा-संस्कृती टिकवून आपला विकास करतोय. भारतातल्या प्रत्येक राज्याची स्थितीही तीच आहे. उपदेश फक्त्त महाराष्ट्राला?

पण कायदेविषयक आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा विकासावर त्याचा परिणाम होतोच?
राज : कायदा-सुव्यवस्था मुळातून कायमची विस्कटू नये ह्या यु.पी-बिहारवाल्यांमुळे म्हणून रस्त्यावर उतरावं लागलं एखादा दिवस. यातून सर्वांनी धडा घ्यावा. शिवाय कायदा पाळण्याला आंदोलन म्हणत नाहीत. भगतसिंगांपासून ते महात्मा गांधींपर्यंत कुणालाही आंदोलन करायचं झालं, तर कायदा तोडावा लागला. आणि आम्ही कोणता कायदा तोडला? सांगा ना मला. कायदे तोडण्याचे त्यांचे प्रकार आणि पद्धती वेगळ्या असतील. पण कायदेभंग झाला, आंदोलनं झाली की कायद्यातली त्रुटी पण कळते आणि राज्यकर्त्यांना जाग पण येते. (एकदम आठवल्यासारखं) मघाशी ते तुम्ही ग्लोबलायझेशन आणि संकुचितपणाचे दाखले दिलेत ना!

ते वेगवेगळे मुद्दे आहेत...
राज : मी ते एकत्रित घेऊन दाखवतो ना चालेल?

हं.
राज : ग्लोबलायझेशन असलं तरी अमेरिका चिनी माल थांबवतेच ना? तुमचे ग्लोबलाईज्ड अर्थमंत्री पी. चिदंबरम तामिळी वेशातच लोकसभेत येतात ना ? तुमचे ते संरक्षणमंत्री ए. के. अँटनी मल्याळी वेशातच सव्वीस जानेवारीची परेड अटेन्ड करतात ना? फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी भारतात आले की, पंतप्रधान मनमोहनसिंग शिखांना फ्रांसमध्ये पगडी वापरू देत नाहीत त्याची रदबदली करतात ना? ते भारताचे पंतप्रधान आहेत ना? मग? मलेशियात तामिळींना त्रास झाला की करुणानिधी इथून मलेशियाला दोष देतात. मग त्यांच्यासाठी म्हणून भारत सरकार मलेशियाच्या अंतर्गत व्यवहारात पडते ना? ते चालतं ना? इंदिराजींच्या हत्येला कारण ठरलेल्या खलिस्तानी आंदोलनाचा नेता खतरनाक अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचं चित्र पंजाबातल्या दमदमी टाकसाळमध्ये ’संत’ म्हणून लागतं. त्याबद्दल अतिरेकी प्रांतवाद म्हणून कुणी फार आवाज उठवत नाही ना? राजीव गांधींच्या हत्येसारख्या आरोपात गुंतलेल्या जागतिक अतिरेकी संघटनेशी ’एल.टी.टी.ई.’शी - तामिळनाडूतले सर्व राजकीय पक्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध ठेवतात ना? ते केवळ तामिळी संस्कृतीचे घटक आहेत म्हणूनच ना? अशी अनेक उदाहरणं देईन मी. हे सगळे प्रांतवादी नाहीत. यांना राज्यघटनेची दुहाई दिली जात नाही. आवरून घ्यायचं ते फक्त मी. राज ठाकरेने. का? मी महाराष्ट्राचा आहे म्हणून? महाराष्ट्राचे बाकी नेते उत्तरेसमोर ताठ कण्याने उभे न राहता गलितगात्रासारखे उभे राहतात, त्याचं हे फलित आहे. मला उत्तरेची काही पडलेली नाही, मला भैय्यांच्या मतांची काही पडलेली नाही. मला महाराष्ट्राची काळजी आहे. राज्यघटनेच्या आडून वार करू पाहणार्‍या उत्तर प्रदेश-बिहारी भैय्यांची थेरं मी, माझा पक्ष आणि महाराष्ट्रातली सामान्य जनता अजिबात सहन करणारी नाही. यापुढे अजिबात नाही! नाही म्हणजे नाही आणि राज्यघटना एका मराठी माणसाने लिहिलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांचं ऋण हे लोक मानतील की नाही?

यावरून एक प्रश्न. तुम्ही मायावतींच्या सभेच्या वेळी काही बोलला नाहीत ते ?
राज : (क्षणभर थांबून) चांगला प्रश्‍्न! तुम्हाला हे माहिताय का? महाराष्ट्रासंदर्भात. छत्रपती/महात्मा शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-मायावतींनी त्यांच्या नावाची उत्तर प्रदेशात नगरं वसवलीत. शाहू नगर, आंबेडकर नगर वगैरे. आपल्याला इथल्या नेत्यांनी शाहू ,फुले, आंबेडकरांचं नाव सांगत फक्त्त मतं मिळवलीत. महाराष्ट्रातले तीन दिग्गज मराठी समाजसुधारक नेते मायावतींनी उत्तर प्रदेशात नेले. बाकीच्या सर्व भैय्यांनी उत्तर प्रदेशातले सगळे गाळ-टाकाऊ नेते महाराष्ट्रात बोलावून आणले. मायावतींचा आणि महाराष्ट्राचा हा असा ऋणानुबंध आहे. जो महाराष्ट्राचे ऋण मानतो, त्याला मी मानतो. मला व्यक्तिगत काही नको. तुम्ही महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीला माना, ती स्वीकारा. बस. मायावतींनी तिथलं राजकाराण अजून इथे आणलेलं नाही. महाराष्ट्राची सामाजिक संस्कृती काय ते त्यांना कळलं असेल नि त्या ती उत्तर प्रदेशात नेत असतील, तर ती चांगली गोष्ट आहे. त्यांच्यावर कशाला टीका करायची? महाराष्ट्र संस्कृती नष्ट करायच्या मिषाने जे लोक येतात त्यांना आमचा विरोध आहे!

एकेकाळी हेच तर शिवसेना म्हणायची... तुमचं पुढं शिवसेनेसारखंच होणार नाही कशावरून?
राज : शिवसेना पक्षासारखं माझं होणार नाही, कारण माझ्या पक्षाचं नाव पुरेसं स्पष्ट आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राबाहेर मला जायचंच नाही. या एका राज्याचं तर भलं करू दे.. महाराष्ट्राच्या बारा कोटीमध्ये साडेदहा कोटी अजूनही मराठी आहेत. हे विसरून कसं चालेल?

शिवसेना आता एकीकडे मराठी प्रांतवाद खपवून घेणार नाही म्हणतेय तर त्याच वेळी परप्रान्तीयांना पार्सल करू असा लटका विरोध करत्येय. तुमचं मत?
राज : हा शिवसैनिकांनी ठरवायचा मुद्दा आहे. तेच ठरवतील.

त्यांची घुसमट होत असेल का? उत्तर मुंबई छप्पन उपशाखप्रमुख यु.पी.-बिहारचे आहेत. समाजवादी पार्टीच्या ज्या मुन्ना त्रिपाठीने शिवसेनाप्रमुखांवर केसेस घातलेल्या होत्या, त्याला आता शिवसेनेने सन्मान दिला...
राज : मला शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावर बोलायचं नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते काय ते ठरवतील...!

तुम्हाला या प्रकरणात अटक होईल असं वाटतं?
राज : होऊ दे. गांधीजी, नेहरु दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे जेलमध्ये राहिलेत. बाळासाहेब राह्यलेत तुरुंगात. माझ्या अनेक कार्यकर्त्यांना पकडलंय पोलिसांनी...दिल्ली महाराष्ट्रविरोधी आहे, ते मला अटक करतीलच, महाराष्ट्रातल्या मराठी स्वाभिमानाला ठेचणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. मला अटक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. मी माझा निर्णय घेईन.

काय वाटतं?
राज : कशाबद्दल?

तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड आणि त्यांच्यावर पोलिसांची दमनयंत्रणा चालली आहे
त्याबद्दल ?
राज : सरकार समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लाड करतं. त्यांना पकडत नाही. अर्थात ज्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत त्यांनाच पकडतात. पण हे दुर्दैवी आहे. माझे कार्यकर्ते शिकले-सवरलेले आहेत. त्यांना उत्तम करियर्स आहेत. शिवाय जनता उत्स्फूर्तपणे आमच्यामागे आहे. कुणाकुणाला पकडतील हे...! हे का खदखदतंय? उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांबद्दलच का खदखदतंय हे? पारशी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी लोकांबद्दल नाही वाटलं कुणाला हे. ते आक्रमक आहेत असं वाटलं नाही आपल्याला कधी ते? पण माझे कार्यकर्ते महाराष्ट्रासाठी रस्त्यावर उतरले, तर तुम्ही गुंड म्हणताय. गुंड म्हणून दाखवताय...

व्हॉट्‌स रॉंग विथ यू, मिस्टर राज? (भाग 2)

पुन्हा एकदा मूळ विषयाकडे येतो. मराठी विरुद्ध भैय्ये असा आगडोंब का उसळला ?
राज : हे कालचं आणि आजचं नाहीए. तत्कालिक निमित्त सोडून द्या. माझं भाषण वगैरे. (थांबून) त्यातही मी काही वावगं, बेकायदेशीर बोललोच नव्हतो. या हिंदी न्यूज चॅनलच्या गुंडांना माझं आव्हान आहे. माझी अख्खी भाषणं त्यांनी चालवावीत. त्यातला बेकायदेशीर भाग शोधून दाखवावा. चॅलेंज आहे माझं. पण त्यांना माझ्या मूळ म्हणण्यात रस नव्हताच. त्यांना महाराष्ट्र-मुंबई-मराठी संस्कृती या सर्वांवर उत्तरेतल्या गुंडगिरीचा वरवंटा फिरवायचा आहे. मी मध्ये अडथळा नसतो तर... आपले सर्व नेते एकतर या भैय्यांना दबलेत तरी किंवा भागीदारीत त्यांनी महाराष्ट्र विकायचा करार तरी केलाय... मराठी विरुद्ध भैय्ये या आंदोलनाचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने हे बिहारी-उत्तर प्रदेशी पसरताहेत, त्यांचा हेतू शुद्ध नाहीए. सुरुवातीला बिचारा म्हणून येणार, मग फॅमिली येणार, मग गावातली माणसं बोलवत राहणार ... आता तुम्हीच मला सांगा, मुंबई-ठाणे-पुण्यासारख्या शहरात टॅक्सी-रिक्षा ज्या चालतात, तो टॅक्सी-रिक्षवाला कोण आहे ? त्याची आयडेन्टिटी काय आहे ? एका परमिटवर हे लोक चार-चार माणसं घुसवताहेत... ही कशाची लक्षणं आहेत ?

पण अमिताभ बच्चनवरचं-
राज : अमिताभ बच्चनपासून सुरुवात केली कारण मोठ्यांची उदाहरणं दिल्याशिवाय गोष्टी पटत नाहीत. इतक्या मोठया कलावंताला जर आपल्या प्रांताबद्दल प्रेम असेल, तर राज ठाकरे हा छोटा माणूस आहे, त्याला स्वतःच्या प्रांताबद्दल प्रेम वाटलं तर चूक काय ? मध्यंतरी मी त्यांचं एक क्लिपिंग बघितलं एका चॅनलवर... त्यात ते म्हणाले होते, ‘मैं दिल्ली रहा, कलकत्ता रहा, बम्बई रहा (मुंबई नाही!) मगर मेरी पहचान तो ’छोरा गंगाकिनारेवाला’ ही रही है।‘ याचा अर्थ काय होतो ? तुम्हाला या देशाने सुपरस्टार केलंय... उत्तर प्रदेशने नाही केलं... तुमचे चित्रपट पाहायला सर्व देशाने, ज्यात आम्ही पण आलोच... रांगा लावल्या... पण तरीही इतक्या मोठ्या कलावंताला जर आपल्या प्रांताबद्दल प्रेम वाटतं, तर मला नसणार का? का नसणार? एवढाच माझा विषय होता. यापलीकडे काहीच नव्हता...

पण मग बाळासाहेब ठाकरेंनी अमिताभना पाठिंबा देऊन तुमच्यावर अप्रत्यक्ष टीका केलीय ते काय आहे ?
राज : तुम्ही ब्याऐंशी वर्षाचे झालात की कळेल तुम्हाला.

म्हणजे ?
राज : या विषयावर मी नाही बोलणार अजून. पण एक सांगतो की, प्रबोधनकारांचंच मराठी माणसांचं महाराष्ट्राचं प्रेम बाळासाहेबांमध्ये आहे, असं पिढयांमधून आलंय माझ्यात ते. (गप्प बसतात काही क्षण)

जया बच्चन तुम्हाला ओळखत नाहीत म्हणाल्या ?
राज : त्या ’जया अमिताभ बच्चन’ नाही तर अमरसिंहाच्या समाजवादी पक्षाच्या खासदार बोलल्या. ज्यांना माझ्या जमिनी माहीत आहेत; पण मला त्या नाही ओळखणार ! मी जे बोलतोय त्यावर जया बच्चन यांच्याकडे काही उत्तर आहे का? आपल्या मेकअपमनसाठी मराठी पिक्चरमध्ये अमिताभनी तीन मिनिटांचं गाणं केलंय, ते त्यांचे महाराष्ट्रावरचे उपकार मानायचे?

तुमचं उत्तर ?
राज : छे! छे! हा काय कलगीतुरा आहे का? तुम्हा लोकांची ही कामं आहेत... आगी लावण्याची.

पण बर्‍याच मराठी लोकांना जया बच्चनांचं बोलणं संधिसाधुपणाचं वाटलं. आवडलं नाही...
राज : मग त्या लोकांनी जया बच्चन यांच्याशी बोलून घ्यावं ! (हसतात)

पण राज, आजच्या ग्लोबलायझेशनच्या जगात असं तुम्ही संकुचितपणाचं महाराष्ट्रापुरतं कसं बोलू शकता? आणि हिंसक आंदोलन? तलवारींची भाषा?
राज : पहिल्यांदा आपण हिंसकपणाबद्दल बोलू या. या भैय्यांनी इथे येउन मुंबईत, पुण्यात, नाशिकात लाठयाकाठयांची भाषा करायची, आजमगढहून वीस हजार गुंड बोलाविण्याची भाषा करायची आणि मी काय, उत्तर प्रदेश दिन, छटपूजा, लाईचना संमेलन, उत्तरायण साजरं करू? म्हणजे महाराष्ट्राला काय या भैय्यांच्या गोठयात नेऊन बांधायचंय आपण? महाराष्ट्र ही आपली भूमी आहे. इथे येऊन या भैय्यांनी लाठयांची भाषा केली, तर ताबडतोब त्यांना थांबवलं पाहिजे.

पण हे सारं राज्य घटनेच्या विरोधात नाही का? कुणालाही कुठेही देशात जाण्याची...
राज : (तोडत) काय तरी काय बोलताय तुम्ही? अहो, राज्यघटना ही एक व्यवस्था सांगणारी नियमावली आहे. आपण तिचा आदर आणि पालन केलं पाहिजेच. पण तिच्या मूलभूत तत्त्वाचं. राज्यघटनेतले तपशील बदलत असतात. अहो, घटनादुरुस्ती होत नाही का? घटनाकारांनी घटना बनवताना विचारात न घेतलेले नवे प्रश्न आज निर्माण झालेत. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आताची वेगळी आहे. तेव्हा देशाची देशातल्या शहरांची लोकसंख्या काय होती? आता काय आहे? शेवटी राज्यघटना ही देशातल्या जनतेच्या सुख, समाधान, स्वातंत्र्य व विकासासाठी आहे. लोक राज्यघटनेसाठी नाहीत. राज्यघटना लोकांसाठी आहे. आणि हा राग काय माझा एकट्याचा आहे का? शीला दीक्षितही तेच बोलल्या, मध्यंतरी प्रभा राव तेच बोलल्या, आसाममध्ये हेच बोलताहेत, हे जे पत्रकार माझ्या बद्दल गरळ ओकताहेत त्यांनी आसाममध्ये जाऊ न याच गोष्टी कराव्यात...तिथून जिवंत आले तर परत बोलू आपण...शिवाय तुमचा तो कोण अमेरिकन म्हणाला नव्हता का, प्रत्येक पिढीची घटना वेगळी असते म्हणून!

थॉमस र्जेफर्सन.
राज : तेव्हा र्जेफर्सन, आता राज ठाकरे! (हसतात) राज्यघटनेत असं लिहिलंय का की, स्थानिकाचं पोट मारून बाहेरच्या बेकारांना काम द्या म्हणून...आज माझ्याकडे एक असाच पत्रकार आला होता. तो काही वर्षे इथे राहतोय त्याला मराठी सोडाच... हिंदी पण येत नव्हतं... हे इतर प्रांतात चालेल का? इतर प्रांतात सर्व व्यवहार त्यांच्या भाषेत, त्यांच्या पाट्या त्यांच्या भाषेत, इथे मात्र मुंबई महानगरपालिकेत मराठी सोबत हिंदी आणायला बघताहेत. हे सांस्कृतिक आक्रमण आहे. हे मी होऊ देणार नाही. नाही म्हणजे नाही.

व्हॉट्‌स रॉंग विथ यू, मिस्टर राज?

मिस्टर राज ठाकरे व्हॉट्‌स रॉंग विथ यू? असा प्रश्न तुम्हाला सगळे चॅनल्स आणि हिंदी-इंग्रजी पत्रकार विचारताहेत. गेले काही दिवस हाच प्रश्न वेगवेगळया प्रकारे तुमच्या पुढयात येऊन पडतो आहे. तुमचं त्यावरचं उत्तर?
राज : नथिंग इज रॉंग (हसतात). काही रॉंग नाही. चाललंय ते बरं चाललंय. ज्यांना वाटतंय की रॉंग चाललंय त्यांनी आपले कान आणि डोळे तपासून घ्यावेत. हे जे हिंदी भाषिक पत्रकार, हिंदी चॅनल्स माझ्याबद्दल-महाराष्ट्राबद्दल बोलताहेत ते मुळात पत्रकार आहेत का?

पण ते ओरडून ओरडून तुम्हाल गुंड म्हणताहेत...
राज : त्यांच्या ओरड्याने मी थोडाच गुंड ठरतो? आणि ह्यांच्या दादागिरीला दाबणं ही गुंडगिरी असेल, तर ही गुंडगिरी मला मान्य आहे.

पण मख्य प्रश्न बाजूलाच राहिलाय?
राज : तो काय?

हिंदी भाषिक पत्रकार -
राज : (तोडत) हे जे, ज्यांना तुम्ही पत्रकार म्हणताय ते पत्रकारितेचे साधे निकषसुद्धा पाळत नाहीएत.

पण -
राज : (तोडत) माझं पूर्ण करू दे मला आधी. तेच नेमकं करतात ते. पूर्ण बोलूच देत नाहीत आमच्या लोकांना. त्यांच्या अडचणीचा मुद्दा आला की माईक बंद. पुन्हा हेच फिर्यादी आणि हेच न्यायाधीश. म्हणे, ’राज के गुंडो ने हमला किया.’ मुळात पहिली गोष्ट म्हणजे ह्या हिंदी भाषिक पत्रकारांनी पत्रकारिता गुंडाळून ठेवलीय आणि हे स्वतः हिंदी भाषिक प्रांतवादी झालेत, विशेष करून यु.पी. -बिहारवाले. या अ‘‘या प्रकरणामध्ये हे असेच वागताहेत, हे मला शिकवणार वरती ! मी उत्तर प्रदेश, बिहारवर बोललो म्हणून !

पण का असं ? त्यांची काही दुश्मनी आहे का तुमच्याशी ?
राज : होय. आहे. मी महाराष्ट्र, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणसाबद्दल बोलतो ना ... त्यामुळे मी त्यांच्या मध्ये येतो.

पण त्याने काय होतं ?
राज : अहो, काय होतं काय? त्यांना उत्तर प्रदेश-बिहारमध्ये नोकर्‍या का नाही मिळाल्या? इतका पुळका आहे नं, यांना उत्तर प्रदेश-बिहारचा...

त्याचा इथे ....
राज : (तोडत) ऐका. महाराष्ट्र जो काही घडलेला आहे, तो महाराष्ट्रीय, मराठी माणसाच्या शिस्तप्रियतेतून, सहिष्णुतेतून, उदारमतवादीपणातून. मुंबईच्या मोठेपणात मराठी माणसाबरोबर कुणाचा हात असेल, तर तो पारशी समाजाचा, गुजराती माणसाचा, मारवाडी समाजाचा, काही प्रमाणात सरदारजी-पंजाब्यांचा. पण या यु.पी.-बिहारवाल्यांना मुंबईतून वरण,भात, तूप, पोळी पाहिजे आणि वर हे मुंबईत मराठी माणसावर दादागिरी करणार... त्यांचा महाराष्ट्रावर राग आहे याचं कारण यांचा छुपा अजेंडा आहे. मुलायमसिंह आल्यावर घोषणा दिल्या गेल्या... ‘उत्तर प्रदेश तो झॉंकी है, अभी महाराष्ट्र बाकी है ! ‘

पण बिचार्‍या टॅक्सीवाल्यांना, भेळपुरीवाल्यांना धोपटून काय होणार ?
राज : एखाद्या भैय्या टॅक्सीवाल्याला एकटे भेटा तुम्ही. काय अनुभव येतो तुम्हाला ? एखाद्या मच्छीवाल्याला एकेकटे भेटता, तेव्हा काय अनुभव येतो तुम्हाला ? भैय्या पत्रकाराला तर आपणच दिल्ली चालवतो असं वाटत असतं. ही दादागिरी त्यांना मुंबईत चालवायचीय. मी ती चालू देणार नाही. छठपूजा करतात, दादर चौपाटीवर जातात, उत्तर प्रदेश दिन साजरे करतात, तेव्हा हा बिचारा पानवाला, बिचारा टॅक्सीवाला, बिचारा मच्छीवालाच जातो ना ? हा बिचारा नंतर राहत नाही. सिनेमात दाखवतात, त्याप्रमाणे हा भैय्या बोरीबंदर स्टेशनवर उतरतो त्या तेवढयाच दिवशी बिचारा असतो. नंतर त्याला महाराष्ट्रात काम मिळालं की तो बिच्चारा राहत नाही. तो उत्तर प्रदेशचा होतो, बिहारचा होतो. आणि मग त्याची दादागिरी सुरू होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची राजकीय उद्दिष्टे पुरी होऊन देणार नाही.

पण नेमका काय प्रश्न आहे या सगळयांचा ?
राज : असं आहे... चॅनल चालवतात यु.पी.-बिहारमधले भैय्ये पत्रकारच ! त्यांना मी डोळयात सलतोय. पण मी सांगतो की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या उद्दिष्टापासून कणभर दूर हटणार नाही. त्यांनी माझ्या नावाने कितीही ओरड केली तरी हरकत नाही. या महाराष्ट्रातला बारा कोटी मराठी मी एक करून महाराष्ट्र युरोपपेक्षा भव्य-दिव्य करणारच एक दिवस.

पण मराठी माणूस एक कुठाय ? बरेच ’एलिट’ महाराष्ट्रीय तुम्हाला हिंदी भाषिकांच्या आवाजात आवाज मिसळून शिव्याशाप देताहेत. ते म्हणतात, हा स्टंट आहे राज ठाकरेंचा. विजया राजाध्यक्ष पण बोलल्यात तुमच्याविरुद्ध... आता सांगा ?
राज : (क्षणभर विचार करत) अक्खा देश जर (थांबून) केवळ अक्खा देशच नव्हे तर गल्फपासून ते बीबीसीपर्यंत सर्व जण जर या राज ठाकरेच्या स्टंटवर प्रतिक्रिया देत असतील, तर त्या मूळ क्रियेत काहीतरी असणारच ना ? आता विजया राजाध्यक्ष आणि एलिट महाराष्ट्रीयन... हे बघा, मी त्यांच्यासाठी करतच नाहीये. हया लोकांसाठी करतच नाहीए मी हे. ह्यांच्या पोराबाळांसाठी करतोय मी...ह्यांची पोरंबाळंच दुवा देतील मला...ह्यांच्याकडनं मला आशीर्वादाची अपेक्षा पण नाहीए. यांना हा विषयच कळत नाही. आयुष्यभर मराठीत लिहिलंत तुम्ही...पुढे ती पुस्तकं घ्यायला तरी पाहिजे ना कुणीतरी! उद्या ह्यांच्याच मराठी पुस्तकांची पानं फाडून हेच भैय्ये हसत हसत चणे विकतील... तेव्हा काय कराल ?

हे सारं तुमच्यात कशातनं आलं आहे अचानक ?
राज : अचानक नाही...सच्ची तळमळ. मला महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची सच्ची तळमळ आहे. मलाच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतल्या माझ्या प्रत्येक सहकार्‍याच्या मनात ही आग आहे. आम्ही असू कदाचित मूठभर. पण महाराष्ट्र आम्हीच बदलू ! बदलूच बदलू !! तुम्हाला एक दिवस आमच्यासोबत यावंच लागेल.

तुमचे पंधरा-पन्नास लोक उपद्व्याप करत फिरतात असं खुद्द शरद पवार म्हणालेत ?
राज : (राज फक्त्त हसतात) महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत ते.

व्हॉट्‌स रॉंग विथ यू, मिस्टर राज?

राजू परुळेकर : राज ठाकरेंना प्रश्न विचारण्याचा या मुलाखतीमुळे आलेला हा काही माझा पहिलाच प्रसंग नव्हे. या अगोदरही राज ठाकरेंच्या एक-दोन मुलाखती मी घेतलेल्या आहेत. त्यातली एक टेलिव्हिजनसाठीची होती. इतर एक-दोन मुलाखती जाहीर होत्या. अगदी मनातलं लिहायचं झालं तर एक लेखक आणि राजकीय विश्लेषक म्हणून अनेक दिग्गज नेत्यांच्या तिन्ही भाषांत (इंग्रजी,हिंदी,मराठी ) प्रिंट आणि टी.व्ही.साठी मी मुलाखती घेतलेल्या आहेत. परंतु ज्या काही थोडया माणसांच्या मुलाखती घ्यायला मला आवडत नाहीत त्यात राज ठाकरे येतात. याची अनेक कारणं आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंच्या ज्या काही मुलाखती घेतलेल्या आहेत, त्या माझ्या फार यशस्वी मुलाखतींपैकी मी मानत नाही. राज ठाकरे हे मूलतः अंतर्मुख माणूस आहेत. शिवाय मूडीही. त्यामुळे मुलाखत देताना त्यांच्या मनात, समोरच्या माणसाच्या मनात जे चाललेलं आहे ते जाणून घेऊन त्यावर आपल्या मनात जे काय प्रतिक्रियात्मक चाललेलं आहे, ते पाहण्याकडे कल असतो. असं झाल्यामुळे त्यांची मुलाखत सारखी तुटत राहते. ही पक्रिया सांगणं अतिशय गुंतागुंतीचं आणि अवघड आहे. पण ती तशी असते. दुसरं म्हणजे, स्वतः राज ठाकरेंना मुलाखत द्यायला फार खुशी कधीच नसते. ते चक्क थोडेसे नर्व्हसच असतात. त्यामुळे होतं काय की, त्यांच्यासारख्या माणसाच्या अंतर्मनाचा तळ कधीच उलगडत नाही. ती फक्त्त वरवरची प्रक्रिया होऊन बसते. राज यांची मुलाखत घ्यायला माझ्या नाखुशीची कारणं ही अशी. तरीही ’लोकप्रभा’चे संपादक आणि माझे मित्र प्रवीण टोकेकर यांनी ही मुलाखत घ्यायची मलाच गळ घातली. शिवाय ही मुलाखत घेताना प्रसंग, परिस्थिती आणि राज यांच्या आयुष्यातला क्षण इतका महत्त्वाचा होता की, तो क्षण पकडणं हेच कुठच्याही लेखकासाठी कौशल्याचं आणि आव्हानाचं ठरावं. झालं होतं ते असं की, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून महाराष्ट्रात येणारे भैय्यांचे लोंढे आणि अशा लोंढयांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर होणारा विपरीत परिणाम हा मुद्दा घेऊन राज यांनी संघर्ष उभा केला. सुरुवातीला हा संघर्ष शाब्दिक होता. नंतर या सार्‍या संघर्षाला रस्त्यावर उतरवणं राज यांना भाग पडलं या सार्‍यामध्ये मीडियाची भूमिका आश्चर्यकारक होती. विशेषतः हिंदी व इंग्रजी चॅनल्सची. इतक्या वर्षांच्या माध्यमांच्या आणि माध्यमांसंबंधीच्या कामांच्या अनुभवाच्या जोरावर निश्चितपणे मी असं म्हणू शकतो की, हिंदी आणि इंग्रजी चॅनल्सची भूमिका शंभर टक्के पक्षपातीच होती. हिंदी-इंग्रजी चॅनल्सना आजवर महाराष्ट्र ही आपली प्रभुसत्ता वाटत होती. तिलाच आव्हान मिळाल्यासारखं झालेलं दिसत होतं. ज्यामुळे हिंदी भाषिक मालक व पत्रकार चिडून राज ठाकरेंवर प्रहारावर प्रहार करत होते. अमरसिंहांना ’सर’ तर अबू आझमींना ’मिस्टर’ हे संबोधन देताना राज ठाकरेंना ’गुंड’ हे विशेषण वापरत होते. हा त्यांचा द्वेष राज ठाकरेंपुरता मर्यादित नव्हता. किंबहुना त्यांचा तो उद्देशच नव्हता. त्यांना मराठी भाषा, महाराष्ट्र संस्कृतीचा हा मुद्दाच मुळातून ठेचून काढायचा होता हे स्पष्ट दिसत होतं.

आयबीएन 7 चॅनेलवरचा ’मुद्दा’ सारखा कार्यक्रम असो किंवा ’न्यूज 24’ सारख्या नवख्या चॅनलवरचं या बातमीवरचं विश्लेषण असो. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आपण महाराष्ट्रीय आहेत याचा अपराधगंड यावा यासठी या सार्‍यांचे प्रयत्न चालू होते. राज ठाकरे यांचं निमित्त करून सारेच्या सारे हिंदी आणि काही इंग्रजी चॅनल्स महाराष्ट्रद्वेषाचा विखार ओकत होते. पत्रकारितेचे सामान्य संकेतही त्यांनी यासाठी गुंडाळून ठेवलेले आहेत. या सार्‍याचं निमित्तमात्र राज ठाकरे आहेत. याच वेळी मराठी पत्रकार एकतर कुंपणावर होते किंवा त्यांच्या हिंदी-इंग्रजी चॅनलवाल्या बॉसेसशी ’लॉयल दॅन द किंग’ होते. जणू आचार्य अत्रे, सी. डी. देशमुख या महाराष्ट्रात झाले होते यावरचा महाराष्ट्राचा विश्वासच उडावा असं हे वातावरण आहे. मी जेव्हा राज ठाकरेंची मुलाखत घ्यायला गेलो, तेव्हा (ही मुलाखत दोन वेगवेगळया बैठकांमध्ये सिध्द झालेली आहे.) राज ठाकरेंच्या विरोधात जवळजवळ सर्व जण होते. गुरुदास कामतांसारखे कॉंग्रेसी नेते, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंसारखे महानेते, सगळे हिंदी-इंग्रजी चॅनल्स, बहुतेक सगळी वृत्तपत्रं, विजया राजाध्यक्षांसारख्या साहित्यिक... जगच राज ठाकरेंच्या विरोधात होतं म्हणा ना ! त्यातच पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी फक्त्त मराठी चॅनल्स व मराठी वृत्तपत्र प्रतिनिधींना बोलावल्यामुळे यु.पी.-बिहारी पत्रकार-संपादकांची राज ठाकरेंबर आणि महाराष्ट्रावर आग ओकण्याची स्पर्धाच सुरू झाली. वास्तविक मराठीतही ’स्टार माझा’ चॅनल सोडला, तर निष्पक्षपणे राज ठाकरेंचं नेमकं म्हणणं लोकांपर्यंत कुणीच पोहोचवताना दिसत नव्हतं. महाराष्ट्रातल्या एका माणसाभोवती उत्तरेचा द्वेषबिंदू कधीच इतका एकवटला नव्हता मागच्या काही दशकांमध्ये. फक्त मराठी माध्यमांना आमंत्रण दिल्यामुळे भडकलेल्या हिंदी भाषिक पत्रकारांनी (हिंदी-इंग्रजी चॅनल्समधल्या) ’मीडिया एकच’ असल्याचा गिल्ला केला. मीडियामधली फुट सहन न करण्याची घोषणासुद्धा. वास्तविक इंग्रजी, हिंदी भाषिक पत्रकारांना ’मीडिया एक’ असल्याची आठवण पे स्केलपासून ते भाषिक वर्चस्ववादापर्यंत कधीच यापूर्वी झालेली नव्हती. इंग्रजी, हिंदी, मराठी माध्यमांमध्ये काम करणार्‍या पत्रकारांना एकच पे स्केल मिळत नाही. एवढंच नव्हे तर काही लाख खप असणार्‍या मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांवर काही हजार जेमतेम खप असणारे हिंदी-इंग्रजी वृत्तपत्रांचे संपादक भाषिक वर्चस्वाने कशी दादागिरी करतात याचा विसर सोयिस्कररीत्या या हिंदी भाषिक पत्रकारांना पडला! आपल्या ’मीडिया एकच’ मध्ये काम करणार्‍या व अधिक पे स्केल घेणार्‍या हिंदी-इंग्रजी पत्रकारांचे आवाहन मराठी माध्यमातल्या पत्रकारांनी झुगारले. राज ठाकरेंची फक्त निमंत्रितांसाठी’ पत्रकार परिषद यशस्वी झाली. त्या संध्याकाळी त्यांच्याच घरी या मुलाखतीचं दुसरं सीटिंग पार पडलं.
हे सीटिंग चालू असतानाच समोर टी. व्ही. वर उद्धव ठाकरेंचे, ‘परप्रांतीय मजुरांना पार्सलने परत पाठवू’, हे उद्गार झळकले. वास्तविक गेले काही महिने शिवसेना वरवर नीट दिसत असली, तरी आतून पूर्णतः विस्कटलेली आहे. उद्धव ठाकरे काही महिने शिवसेनेचं खेळणं करून आंदोलन-आंदोलन खेळत होते. ’ येता का जाऊ ?’ ’काढू का घालू ?’ किंवा ’घंटा’ या स्वरूपाची नावं या आंदोलनाची असत! राज ठाकरेंमुळे निर्माण झालेल्या वादाने देशभर विक्राळ स्वरूप धारण करण्याअगोदर उद्धव ठाकरेंनी, ‘शिवसेना ही उत्तर भारतीयांसाठी मराठी माणसांनी स्थापन केलेली संघटना आहे.’’ असे शिवसेनेचे स्वरूप केले होते. उत्तर प्रदेश दिन, उत्तरायण, लाईचना संमेलन, अल्हा गीत गायन, बिरहा यांची शिवसेनेने धूम उडवली होती. ‘मराठी प्रांतवाद खपवून घेणार नाही‘, ‘मराठी दूध तर भैय्या साखर‘, ‘सर्वांनी यावे महाराष्ट्रात सुखाने राहावे‘ अशी वचने शिवसेनेतर्फे खुद्द उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, रामदास कदम करत होते (आजही करतात). पण राज ठाकरेंनी महाराष्ट्रवाद ऐरणीवर आणल्यावर उद्धव ठाकरेंनी कडेवर घेतलेल्या भैय्याला चुचकारत मराठी माणसाला डोळा घालण्याचा हा प्रयत्न केला होता! या सार्‍या हलवून सोडणार्‍या घटनाक्रमाचे इतक्या तपशिलाने संदर्भासहित स्पष्टीकरण देण्याचे कारण हेच की, ज्या माणसाची मुलाखत आपण ’जशीच्या तशी’ वाचत आहोत, त्याची मुलाखत कोणत्या काळात आणि कोणत्या पार्श्वभूमीवर घेतली गेलेली आहे हे वाचकांना नीट स्पष्ट व्हावे. दोन्हीही सीटिंग्जच्या वेळेला राज ठाकरेंच्या घरातलं वातावरण नेहमीप्रमाणे शांत, आग्रंही आणि उत्फुल्ळ होतं. राजच्या आई मात्र चेहर्‍यावरची आणि मनातली मुलाबद्दलची चिंता लपवू शकत नव्हत्या. कुणाचाही पाठिंबा नसलेला आपला कर्ता कुलगा आता काय काय आणि कुणाकुणाला अंगावर ओढवून घेणार, याचा ताण त्यांच्या चेहर्‍यावरनं लपत नव्हता. त्याच वेळेला मुलाच्या जिगरबाजपणाचं कौतुकही. आईच ती. तर राज ठाकरे...!

राज नावाचा मित्र (भाग 4)

न विसरण्याजोगा गुण ....

राजने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा त्याच्यासोबत त्याला मानणारे जे आले त्यातले काही परत शिवसेनेत गेले. त्यातल्या काहींनी परत जाण्याची जी कारणं दिली त्यातली कारणं ही, ‘स्टेजवर बसायला मिळालं नाही’ ते ‘मनाजोगतं पद मिळालं नाही’ इथपर्यंत विस्तारलेली होती! खरं तर यांच्यासाठी आणि यांच्यामुळे राजने स्वत:च्या आयुष्यातला सर्वात वादळी निर्णय घेतलेला होता. मी स्वत: याचा साक्षी होतो. त्यातलेच काही जण परत शिवसेनेत गेले. या संबंधातली एक आठवण खूपच मार्मिक आहे. एका समारंभात राजला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलेलं होतं. त्या संयोजकांनी राजचं नाव ‘आणि राज ठाकरे’ असं काही राज्यमंत्री वगैरेनंतर खाली टाकलेलं होतं. खरं तर शेवटी नाव देऊन महत्त्व देण्याचा वेगळा प्रयत्न त्यांच्याकडून होता. पण राजच्या ऑफीस मध्ये यासंबंधीचा फॅक्स आल्यावर त्याच्या अनुयायांत चलबिचल झाली. ते बिथरले. आमच्या पक्ष प्रमुखाचं नाव शेवटी टाकता म्हणजे काय? अशा गोष्टी झाल्या. राजच्या सचिवाने ही गोष्ट माझ्या कानावर घातली. माझ्या कानावर घालण्याचं कारण म्हणजे संयोजक माझ्या ओळखीचे होते. मी म्हटलं, ‘‘मी त्यांना बोलून बघतो.’’ राज समोरच बसलेला होता. नेमकं प्रकरण काय होतं हे त्याला ठाऊक नव्हतं. त्याने चौकशी केली. सचिवाने प्रकरण समजावून सांगितलं. राजने तात्काळ त्याला उडवून लावलं. ‘‘अरे, आपण हा प्रकार सुरू केला, तर तो आपला अमकातमका शिवसेनेत परत गेला त्याच्यात आणि आपल्यात फरक तो काय?’’ स्वत:च्या उद्दिष्टांबाबत आणि मूल्यांबाबत राज फार जागरुक असतो. त्याचं हे उत्तम उदाहरण.

राजकडे शिवसेना आली असती तर...

कधी कधी मी उद्धवच्या बाजूने (म्हणजे त्याच्या बुटात पाय घालून) विचार करतो, तेव्हा मला वाटतं की त्याच्या बाजूने तो एवढ्या स्वयंप्रकाशित भावाचं काय करू शकत होता? त्याच्याकडे पर्यायच कमी होते. त्यात त्याचे सल्लागार अगदीच कमी वकुबाचे होते. उद्धव स्वत: राजकारणात फारच उशिरा आला. म्हणजे माणसाचं घडायचं म्हणून जे वय असतं, ते सरून गेल्यावर. या उलट राज घडायचं वय जायच्या अगोदरच राजकारणात आला. या सार्‍याचा परिणाम म्हणून आपण जे पाहतो ती परिस्थिती आहे. हे सारं सोनिया गांधींच्या बाबतीत कसं चालून गेलं? असा युक्तिवाद यावर केला जातो. पण स्त्रीच्या बाबतीत हे सारे संदर्भ पूर्णत: बदलतात. शिवाय काँग्रेसची रचनाही इतर कुठल्याही साचेबद्ध पक्षाहून पूर्णत: भिन्न आहे. उद्धव वा राजच्या संदर्भात चटकन हे उदाहरण देणं (उद्धवच्या बाजूने) हे पूर्णत: चुकीचं विश्लेषण आहे.


राजचं राजकारणाचं आणि परिस्थितीचं आकलन हे एखाद्या बेरक्या माणसासारखं खोल खोल आहे. त्यामुळे कितीही अडचणीची परिस्थिती असली, तरी राज स्वबळावर तरून वर येऊ शकतो. उद्धवला भोवतालच्या माणसांवर अवलंबून राहायलाच लागणार आहे. एक उदाहरण लिहितो. राजने शिवसेनेशी फारकत घेतल्यावर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. अनेकांना असं वाटलं होतं की, राज ‘राजसेना’ वगैरेसारखं नाव घेऊन शिवसेनेसारखं काहीतरी सुरू करेल. पण राज शांत राहिला. अज्ञातवासात गेला. त्याने खूप चिंतन केलं. एका परीने तपश्र्चर्याच केली आणि मग त्याने नवा पक्ष, नवा ध्वज, नवं धोरण व नवीच संस्कृती जाहीर करायला सुरुवात केली. ज्याचा शिवसेनेशी काय तर भारतातल्या एकंदरीतच राजकीय संस्कृतीशी कमी संबंध होता. एक नवीनच राजकीय संस्कृती प्रसवण्याचा प्रयोग बघून राजचे अनुयायी हडबडले. त्यातल्या बर्‍याच जणांना शिवसेनेपलीकडे काही सुचतही नव्हतं. राजने या सार्‍याची पर्वा केली नाही. आपल्याला जे करायचं आहे, तेच तो करत सुटलेला आहे. चाळीशीमध्ये राजकारणात असं प्रयोगशील काही प्रचंड आत्मविश्वास असल्याशिवाय कुणी करूच शकत नाही. याउलट उद्धव आपण ‘हिंदू की मराठी माणूस की खड्डे पडलेले रस्ते’ यातल्या कशावर बोलावं यावरच चाचपडतोय. राजचे कार्यकर्ते त्याला कधी कधी सांगतात. या अमक्यातमक्या विषयावर आपण ही भूमिका घेतली तर आपण हरू. राज म्हणतो, ‘‘मग हरू की. आपण जिंकायचंय ते आपल्याला राजकारणाचा व्यापार करायचाय म्हणून नव्हे तर लोकांच्या कल्याणाची भूमिका मांडण्याकरिता. ती मांडताना ती लोकांना न कळल्यामुळे आपण हरलो, तर ती परत मांडू. जिंकेपर्यंत मांडू. मग आपणच जिंकू!’’ हे एका वेगळ्याच राजकीय संस्कृतीचं जनन आहे. ते करणारा ‘राज श्रीकांत ठाकरे’ नावाचा एकोणचाळीस वर्षांचा तरुण आहे.

माझ्या मनाशी अनेकदा एक खेळ चाललेला असतो. जर राजकडे शिवसेनेची सूत्रं गेली असती तर काय झालं असतं? म्हणजे तो जर शिवसेनेचा कार्याध्यक्ष झाला असता, तर काय झालं असतं?

उत्तर : काहीच झालं नसतं. राजच्या नैसर्गिक सर्जनशीलतेला आणि ज्ञानगामी प्रयोगशीलतेला शिवसेनेत वावच नव्हता. म्हणजे याचा उद्धव किंवा राजकारणाशी काहीच संबंध नाही. याचं खरं कारण शिवसेनेची मूस पूर्णपणे घडलेली आहे. शिवसेना एकट्या बाळासाहेबांची आहे. त्यांच्या व्यतिरिक्त ती कुणीही घडवू वा बिघडवू शकत नाही. उद्धव नाही, राज नाही किंवा अजून कुणीही नाही. बाळासाहेब आहेत तरच शिवसेना आहे. त्यांच्या पद्धतीची राजकीय संस्कृती तेच निर्माण करू शकतात, चालवू शकतात. राजचंही नेमकं तसंच आहे. त्यामुळे तो शिवसेनेतून बाहेर पडला ही मला इष्टापत्तीच वाटली. त्याचीही उत्क्रांती सुरू झाली अन्‌ त्याच्या प्रयोगशीलतेचीही!

राज : संघर्षाच्या काळात ...

पक्ष स्थापनेनंतर आता जवळजवळ 2 वर्षे उलटली आहेत. राजने ‘मराठी’ च्या मुद्यावरून हाती घेतलेली आंदालने, त्याचे परिणाम आपण पाहतच आहोत. विक्रोळीतल्या एका भाषणामुळे राजने अंगावर वादळ ओढावून घेतलं. गंमत म्हणजे त्या अगोदर त्याचा पक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) हा N.G.O. आहे काय, असा प्रश्न अनेक जण विचारत होते. विक्रोळीतल्या सभेनंतर हाच पक्ष देशभर चर्चेचा विषय झाला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या अविरत संघर्षाचा रस्त्यावरच्या लढायांचा, कोर्टातल्या खटल्यांचा, सत्ताधीशांच्या रोषाचा एक प्रचंड मोठा सिलसिला सुरू झाला. जो आजतागायत सुरू आहे. स्वाभाविकपणे तो पुढेही चालू राहणार हे स्पष्ट आहे. मराठीचा आणि महाराष्ट्र धर्माचा मुद्दा घेऊन राज संघर्षात उतरला. त्यातलं राजकारण हा माझ्या या लेखाचा विषयच नाही. पण लाठीमार्‍या, तडीपार्‍या, कार्यकर्त्यांचे पोलिसांकडून होणारे हाल, स्वत:चं पोलीस संरक्षण (जे 17 वर्षं त्याला होतं) सरकारकडून काढून घेणं या सार्‍याला राज सामोरा जाताना अविचल होता. याच काळात मी त्याच्या एक-दोन मुलाखतीही घेतल्या. त्या घेताना मी त्याचा मित्र नव्हतो. आमच्यात गाय-गवताचं नातं होतं! व्यावसायिक म्हणूनही माझ्या लक्षात हे आलं की, तो जे बोलतो ते त्याचं स्वत:चं आहे. त्याची प्रेरणा (Conviction) त्याच्यामागे उभी आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला झालेली शिक्षा किंवा तडीपारी त्याच्या हृदयात बाणासारखी रुतलेली असते. त्यांना सोडवेपर्यंत तो सतत अस्वस्थ असतो. मला असे अनेक नेते माहीत आहेत, ज्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी असाधारण त्याग केलेला आहे आणि कार्यकर्त्यावर वेळ आली, तेव्हा त्याला त्या नेत्याची भेट तर सोडाच पण फोनवर बोलणंही करायला मिळालेलं नाही. याला राज हा केवढा अपवाद आहे.

नुकतीच त्याला काही महिन्यांच्या अंतराने दोनदा अटक झाली. त्याच्या नावाने दिवशी एखादं वॉरंट देशभरातून कुठून तरी एखादा भैय्या मिळवतोय. पण स्वत:च्या अटकेअगोदर राजला मी शांतपणे चित्र काढताना किंवा आवडलेला अनिमेशनपट मित्रांना समजावून सांगताना बघितलेलं आहे. तेव्हा सामान्य कार्यकर्त्याच्या अटकेनं हवालदिल होणारा हाच का तो राज ठाकरे, असा प्रश्र्न मला पडतो. मीडिया-विशेषत: हिंदी-इंग्रजी मीडिया - राजचं वर्णन जवळजवळ गुंड, हिंसाचारी, दादागिरी करणारा वगैरे वगैरे करत आपले टी.आर.पी. चोवीस तास वाढवत असताना स्वत: राज मात्र शांतपणे हे चॅनल बघत त्यातल्या निवेदकांचं कौतुक किंवा त्यांच्या चुका काढत असतो. स्वत:वर होणारे आरोप खोटे आहेत याविषयी तो खाजगीत अवाक्षर बोलत नाही. किंबहुना त्याची राजकीय भूमिका एकाकी पडलेली असताना, सर्व जगाविरुद्धच विषम असा संघर्ष करताना आपली बाजू मांडण्याकरता माणूस कसा तळतळेल? राजमध्ये या प्रकारच्या तळतळण्याचा मागमूसही नाही. त्याला उत्तर देण्याची घाईही नसते. स्वत:ची तत्त्वं स्वत: जगत असल्याशिवाय असला शाश्वत शांतपणा किंवा असली शाश्वत स्थितप्रज्ञता खूप कठीण आहे. याचा अर्थ राजला संघर्षाच्या काळात चिंता नसतेच असं नाही. आपल्या कार्यकर्त्यांना, पक्षातल्या इतर नेत्यांना आपली भूमिका नीट खोलवर कळली आहे वा नाही या चिंतेने तो नखं खात असतो. कार्यकर्ते सत्तेच्या मागे लागतील आणि मूळ तत्त्वाचा नाश होईल म्हणून तो धास्तावलेला असतो. त्याचे मित्र आणि त्याचे कुटुंबीय त्याची काळजी करत असताना त्याला स्वत:विषयी फारसं काही वाटत नाही. अगदी स्वत:च्या सुरक्षेविषयीही. देशभर त्याच्याविरुद्ध मोहोळ उठले असतानाही त्याची भूमिका तो कार्यकर्त्यांना समजावताना मी पाह्यलंय, ‘‘आपण लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत. प्रेरणेने केलेल्या प्रत्येक कृतीबद्दलच्या त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर दिलंच पाहिजे असं नाही!’’ राज हा संघर्षात अधिक कळतो. कारण ज्या काळात माणूस किंवा नेता घाबरून ओल्या कोंबडीसारखा फड्फडेल अशा काळात राज आतून शांत असतो. त्याला हीच एक गोष्ट नेतेपद प्रदान करते. त्याचा करिश्मा त्याने केलेल्या संघर्षामध्ये नाही. तर त्या संघर्षाच्या वेळी राखलेल्या त्याच्या संयमामध्ये आहे. दुर्दैवाने त्याच्या विरोधकांना आणि शत्रूंना हीच त्याच्याबद्दलची गोष्ट नीट कळलेली नाही. त्यामुळे ते त्याच्या चालींमुळे एकतर गोंधळतात किंवा चकीत होतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, राज माझा इतका सखा मित्र असूनही संघर्षाच्या या काळात मला त्याची बरीच नवीन ओळख झाली असं मलाच वाटतं. तर इतरांची काय कथा?

त्याचं भविष्य माझ्या नजरेतून ....

राज माझा मित्र आहे याचं कारण राजकारण नसून आत्मिक आहे. कित्येकदा आम्ही न बोलता समोरासमोर बसून असतो. प्रत्यक्ष बोलत नसलो तरी बरंच बोलतो. कित्येकदा आम्हाला बोलावंच वाटत नाही इतकं एकमेकांचं मत कळतं. असे आपल्याला आयुष्यात दोन-तीनच मित्र असतात. ते आपलं आयुष्य समृद्ध करतात. आपल्याला समृद्ध करतात. राजच्या राजकारणाशी माझा संबंध आहे की नाही? असा प्रश्न बरेचजण मला करतात. तर तो आहेही अन्‌ नाहीही. राज माणूस म्हणून माझा मित्र आहे. आम्ही एकंदरीत जे बोलतो, शेअर करतो त्यात राजकारण फार तर सात-आठ टक्के असतं. त्यामुळे मित्र म्हणून जर राजने सिनेमा काढला असता, शेती केली असती, दुधाचा व्यवसाय केला असता तरी मी त्यात गुंतून माझी मतं मुक्तपणे मांडलीच असती. घ्यायचं न घ्यायचं त्याच्याकडे. तो राजकारण करतो. त्यामुळे त्याबाबतही माझा दृष्टिकोन आणि सहभाग हाच असतो. असतो आणि नसतोही...

राजकीय विश्लेषक आणि लेखक म्हणून माझी राजच्या पक्षाबाबतची हीच भूमिका आहे. त्याचा पक्ष नवीन आहे. काही क्रांतिकारक चांगलं करावं असं त्याला वाटतं. ते करण्यासाठी त्याला राज्यात अनेक पातळींवर सत्ता हस्तगत करावी लागेल. ती सत्ता मिळाल्यावर माझंही एक काम होईल. आज राजच्या पक्षाला अजून संधी नाही म्हणून टीका करता येत नाही. जर त्याला सत्ता मिळाली, तर मला त्याच्या प्रत्येक चुकीवर टीका करता येईल.

राजवर टीका करण्याची संधी मिळण्याची मी वाट पाहतोय. मी त्याला इतका ओळखतो की, त्याने महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवलेली स्वप्नं खरी करताना छोटी चूक केली, तर माझ्याइतकी टीका त्याच्यावर इतर कुणीही करू शकणार नाही. शर्मिलावहिनी, राजच्या आईंना तेव्हा खूप वाईट वाटेल. पण राजच म्हणालाय,

‘‘आपल्या महाराष्ट्रापेक्षा कुणीही व्यक्ती मोठी नाही!!’’

राज नावाचा मित्र (भाग 3)

राजशी सुरुवातीच्या दोन-तीन भेटींत माझं त्याच्याविषयीचं मत फारसं बदललं नाही. त्या दोन्ही-तिन्ही भेटी या व्यावसायिक स्वरूपाच्याच होत्या. त्याची (मी वर उल्लेखलेली) मुलाखत हीसुद्धा मी घेतलेल्या आणि फार न गाजलेल्या मुलाखतीतील एक होती. या माणसावर नजर ठेवून राहिलं पाहिजे, मग आपल्याला तो आवडो वा न आवडो या व्यवसायातील चतुरपणाने मी राजला लक्षात ठेवलेलं होतं. त्यात एकदा एका समारंभात माझी आणि राजची गाठ पडली. ज्या समारंभात राजने श्रोता असण्याची भूमिका घेतलेली होती. आम्ही काही जण बोलणार होतो. माझी जेव्हा वेळ आली, तेव्हा मी राजच्या तेव्हाच्या पक्षाची (शिवसेना) भूमिका आणि त्यातला भंपकपणा यावर खूप चिरफाड करून बोललो. मला वाटलं राज त्याच्या (माझ्या कल्पनेतल्या) स्वभावाप्रमाणे माझ्यावर भडकेल. त्याचे काहीही करण्याला तयार असणारे अनुयायी कदाचित हॉलमधून उतरल्यावर माझ्यावर तुटूनही पडतील अशी काहीशी चिन्हं मी माझ्या मनाशी रंगवली होती. हौतात्म्यास मी तयार होतो! कार्यक्रम संपल्यावर राज आला आणि म्हणाला, ‘‘कधी भेटूया?’’ त्यानंतर आम्ही बर्‍याचदा भेटलो. राजचा एकच मुद्दा असायचा. काय चुका झाल्या ते तुम्ही विश्लेषक सांगता. त्या सुधारणार कशा ते तुम्हाला सांगता येत नाही. त्यावर माझं उत्तर हेच की, ‘‘ते जर माहीत असतं, तर आम्हीच राजकीय नेते झालो असतो.’’ पण सुरुवातीच्या काळात हे उत्तर मी देत नसे. कारण खाली उभ्या असणार्‍या राजच्या अनुयायांची संख्या लक्षणीय होती. शिवाय प्रत्येक वेळी हौतात्म्याची मनाची तयारी नसायचीच! या संबंधातल्या राजच्या प्रतिमेचा समाजात किती खोल परिणाम झाला होता त्याचं एक उदाहरण देण्याचा मोह इथे मला आवरत नाही. एकदा ‘राष्ट्रवादी’ या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुखपत्राचा एक अंक त्याच्या संपादकांना राजला पोहोचवायचा होता. तो अंक पोहोचवणारे दूत विलास म्हणून मध्यमवयीन गृहस्थ तो अंक पोहोचवायला मी राजच्या घरचा पत्ता देऊनही टाळाटाळ करू लागले. कारण विचारलं तर तेही सांगेनात. शेवटी अगदीच खोदून विचारलं तेव्हा म्हणाले, ‘‘मी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आलो असं कळल्यावर राज ठाकरेंचे अनुयायी माझी चटणीच करून टाकतील!’’

राज : मित्र म्हणून...

राजने एखाद्याला मित्र मानलं की तो स्वत:चं सुख त्याच्याबरोबर वाटून घेतो आणि त्या मित्राची दु:खं आपलीशी करतो. खरं तर त्याच्याबाबतीत मला राहून राहून हेच आश्चर्य वाटतं की, सर्वच राजकीय पक्षांबाबत आणि त्यांच्या नेत्यांबाबत तटस्थता पाळणारा मित्र म्हणून त्याच्यात इतका गुंतत कसा गेलो? वास्तविक अनेक राजकीय नेते खूप चांगले मित्र असतात. परंतु तरीही लेखक आणि राजकीय विश्लेषकांबाबत हे नातं बरंचसं हितसंबंधांवर उभं असतं. मला त्यात प्रचंड अवघडलेपणा येतो. माणूस म्हणून इंटरेस्टिंग असूनही राजकीय नेत्यांशी मैत्री करायला मला त्यामुळे बर्‍याचदा संकोच वाटतो. पण राजच्या बाबतीत मला हा संकोच वाटत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राजने एकदा तुम्हाला मित्र मानलं की, तुमच्याकडून त्याची एवढीच अपेक्षा असते की, तुम्ही या नात्याचं पावित्र्य जपावं. बस्स, आणखी काही नाही. किणी प्रकरणी राज ठाकरेंना जवळजवळ फाशी द्यावे असा निकाल देणारे अनेक समाजवादी पत्रकार ‘बांधव’ राजकडे त्याचे जन्मजन्मांतरीचे आणि कल्पांतापर्यंतचे साथी असल्यासारखे कामं घेऊन आल्याचं मी डोळ्यांनी पाह्यलंय. यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजच्या मनाच्या तळाशीसुद्धा त्यांच्याबद्दल अजिबात निखार नाही. त्यांचं काम त्यांनी केलं, त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं ही त्याची भूमिका. विखाराने विखार वाढतो. तो आपल्या बाजूने कमी केला नाही, तर एकंदरीत जगातला विखार कमी कसा होणार? ही त्याची भूमिका. या बाबतीत तो गांधीजींचा भक्तच आहे. गांधीजींची असंख्य चरित्रं त्याच्याकडे आहेत. त्यांची त्याने पारायणं केलीत. गांधीजींची एक अप्रतिम फोटोबायोग्राफी त्याने मला भेट दिली त्यावर, ‘हे पुस्तक वाचून माणसाने कोणत्या मूल्यांसाठी जगावं ते कळतं’, हे वाक्य लिहून!

राज दिसतो त्यापेक्षा प्रचंड खोल आहे. तो समोरच्याच्या तळाचा वेध घेतो. त्याला जर कुणी गंभीरपणे घेत नसेल, तर तो आपल्या आयुष्यातली मोठीच राजकीय चूक करत आहे. राजने जेव्हा शिवसेना सोडायची असं ठरवलं, तेव्हा तो एका मानसिक द्वंद्वातून जात होता. त्याची सर्वात मोठी समस्या हीच होती की, त्याच्यावर आणि महाराष्ट्रासंबंधीच्या त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणार्‍या त्याच्या असंख्य अनुयायांच्या आयुष्याची जी गळचेपी चाललेली होती त्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हतं. ‘‘आपला महाराष्ट्र हा कुणाहीपेक्षा मोठा आहे.’’ असं तो एकदा म्हणाला. पुढे म्हणाला, ‘‘अगदी बाळासाहेबांपेक्षाही’’. तेव्हाच मी राजचा निर्णय झालेला आहे, याची खूणगाठ बांधली. रात्रीच्या वेळेला सभा असली की, आपला प्रत्येक कार्यकर्ता कशा पद्धतीने जाणार आहे याची खात्री करून घेतल्याशिवाय राज गाडीत बसत नाही. बाहेरगावी जर सभा असेल, तर तो सर्वांना रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून शक्यतोवर प्रवास न करण्याची तंबी देऊनच गाडीत बसतो! त्याचा सूर्यकांत पवार नावाचा कार्यकर्ता असाच व्यक्तिगत कामासाठी रात्री मुंबईहून सातार्‍याला निघाला असताना रस्त्यावर अपघातात गेला. त्याच्या आठवणीने राजच्या डोळ्यांत आजही पाणी येतं. शिवसेनेच्या प्रथम वर्तुळाने राजच्या सर्व कार्यकर्त्यांची केवळ ते राजचे प्रेमी आहेत म्हणून नाकेबंदी केली, तेव्हा राज कळवळतच राहिला. पण बराच काळपर्यंत त्याला बाळासाहेबांपर्यंत या समस्येचा तर्क नेता येत नसे. आजही बाळासाहेबांना कुणी दोष दिला, तर त्याचा कधीही तोल जातो. एकदा मी स्वत:, ‘‘हे सारं बाळासाहेबांना नीट आकलन होत नाही की काय?’’ असं काहीसं उपरोधाने म्हणालो. तेव्हा राजची प्रतिक्रिया थक्क करणारी होती. तो म्हणाला, ‘‘तुझं बोलणं सोपं आहे. कारण तुझ्यासाठी हा विषय हे बोलल्यावर संपतो. पण जर तू बाळासाहेबांच्या जागी असतास, तर तूच काय तर या जगातला कुणीही माणूस वेगळं काहीच करू शकत नव्हता. चूक बाळासाहेबांची नाही. त्यांचं वय आणि त्यांच्या भोवतीची परिस्थितीच अशी आहे की ते विवश आहेत. आपण, निदान मी तरी त्यांना दोष देता कामा नये.’’ शिवसेना सोडण्याअगोदरच्या अनेक रात्री राजने बाळासाहेबांसाठी जागून काढलेल्या आहेत. अशाच एका वेदनामयी रात्री त्याने त्याच्या लहानपणीची एक गोष्ट मला सांगितली. लहान असताना एकदा गरम गरम मटणाचा रस्सा कुणाच्या तरी हातून सांडला. त्यातलं गरम मटण राजच्या अंगावर सांडलं. राज पुरा भाजला होता. नंतर त्याच्या जखमांना तेल लावण्यापासून ते पट्टया रोज बदलत राहण्यापर्यंत सर्व काही बाळासाहेब करत असत. राज पूर्ण बरा होईस्तोवर बाळासाहेबांकडेच झोपत असे. अशा एक नव्हे अनेक आठवणींचे कढ राजला आवरत नसत.

शिवसेना राजने सोडली तेव्हा...

त्याच काळात मी एकदा पुण्याला होतो. कुठच्या तरी समारंभातून बाहेर पडत होतो. राजचा फोन आला. कोणताही संदर्भ न देता राज म्हणाला, ‘‘मला या लोकांनी हे असं करायला लावू नये. मी शक्य तितके प्रयत्न केलेत. माझ्यावर प्रेम करणार्‍यांचा काय दोष? आता त्यांना पराकोटीचा त्रास देताहेत. ठरवलं तर सगळे साफ होतील. पण मला हे करायला न लागलं तर बरं.’’ पण पुढे त्याला ते करायला लागलंच. या संदर्भातली एक आठवण लिहिण्याचा मोह मला आवरत नाही. राजने शिवाजी पार्कवर जी पहिली महासभा घेतली, ती घेण्याआधी खूप दिवस अगोदर एका मध्यरात्री मी आणि तो त्याच्या घराच्या गॅलरीत उभे होतो. राजने मला विचारले, ‘‘सभेच्या वेळी मैदान किती भरेल?’’ मी उत्तर न देता उलट त्यालाच उत्तर विचारलं. तो म्हणाला, ‘‘पूर्णपेक्षाही खूप जास्त.’’ प्रत्यक्ष सभेच्या दुपारी मी त्याच्या घराच्या गॅलरीत पोहोचलो. तोपर्यंत गर्दी जमायला सुरुवात झाली नव्हती. राज येऊन मागे उभा राहिला. हसला आणि म्हणाला, ‘‘काळजी करू नकोस. पूर्ण भरेल.’’ पुढचं वेगळं लिहायला नकोच.

अलीकडेच त्याच्या एका पदाधिकार्‍याने त्याला येत्या निवडणुकीसंबंधात काही काळजीच्या सुरात चार गोष्टी सांगितल्या. तेव्हा राज त्याला म्हणाला, ‘‘काळजी करून नकोस. मी आहे ना!’’ या त्याच्या आत्मविश्वासामागे नेमकं रहस्य काय? असं मी त्याला एकदा विचारलं तर म्हणाला, ‘‘मी समोरच्याला आधी पूर्ण खेळू देतो.’’ हे एक मात्र तो इतर कोणाकडूनही शिकलेला नाही. हे त्याचं स्वत:चंच अस्त्र आहे. त्याचे काही अनुयायी त्याला सोडून शिवसेनेत जातात, तेव्हा तो इतक्या शांतपणे घेतो की मला कधी कधी त्याचीच इच्छा असावी असा दाट संशय येतो. या प्रत्येक प्रसंगात ‘मी ठरवलं तर सगळे साफ होतील’. हा त्याचा निर्वाणीचा आवाज मला पुन्हा पुन्हा ऐकू येतो. भविष्यात काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. पण हा स्वत:वरचा विश्वास आणि निर्वाणीच्या परिस्थितीतही शांत राहण्याचा वकूब राजकडे अव्वल दर्जाचा आहे. तो भावनिक नात्यामध्ये लगेच मेणासारखा मऊ होतो. मित्रांसाठी, सहकार्‍यांसाठी त्याच्या डोळ्यांत चटकन पाणी येतं. शिवाय इतर अनेकांसारखा तो त्या पाण्यावर भागवत नाही. तर सर्व शक्यतांमधून तो त्यांना मदत पोहोचवतो. पण हाच राज संकटाच्या वेळी, कसोटीच्या क्षणांच्या वेळी अविचल आणि दगडासारखा कडक असतो. याला अपवाद एकच. अगदी भावनिक गुंत्यातल्या माणसाने त्याच्यावर वार केला किंवा त्याच्यावर संकट आणलं, तर त्याला नेमकं काय करावं हे कळत नाही. तो विचलीत होतो. दुर्दैवाने हे प्रसंग त्याच्या आयुष्यात अनेकांकडून त्याच्यावर पुन्हा पुन्हा आलेत.

राज सौंदर्याचा आणि संगीत ते चित्रकलेपर्यंतच्या सर्व कलांचा कमालीचा भोक्ता आहे. आम्हाला जोडणारा हा अजून एक धागा. त्याला संगीतातलं, चित्रपटातलं आणि चित्रकलेतलं खूप कळतं. इतकं की, यातल्या कुठल्याही क्षेत्रात तो व्यावसायिक म्हणून सहज स्थिरावू शकला असता. (उद्धवची राजकडून तीच अपेक्षा होती!) गोष्ट कशा रीतीने रचली की, ती सुंदर दिसेल याची राजला अचूक कल्पना असते. मग ते सभास्थान असो की, जेवणाची थाळी. राज ते अधिकाधिक सुंदर करण्याच्या प्रयत्नात असतो. इतर अनेक जण स्वत:च्या शरीरापासून ते अनेक बाबतीत सौंदर्यविरोधी असल्यासारखे वागतात. राज त्याबाबतीतही राजा आहे. एखादी व्यवस्था त्याने ताब्यात घेतली की तो सुंदर करणारच याची खात्री बाळगावी.फोटोबायोग्राफीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ‘गेट वे ऑफ इंडिया’ वर होणार होता, तेव्हा राजने त्याच्या बारीकसारीक तपशिलांची इतक्या बारकाईने तयारी केली होती की, पाहणार्‍यांनी तोंडात बोटं घातली. त्याच्यासोबत सिनेमा पाहताना त्याच्या प्रत्येक तपशिलांची इतक्या बारकाईने चर्चा त्याच्यासोबत करता येते की, त्यात अपार बौद्धिक आनंद मिळतो. तेच संगीताबाबत, पाश्चिमात्य, शास्त्रीय संगीतापासून ते ऑपेराजपर्यंत आणि हिंदी चित्रपटगीतांपासून ते लोकगीतांपर्यंत सर्व प्रकारच्या संगीताचा मोठा संग्रह त्याच्याकडे आहे. मुख्य म्हणजे, उत्तम प्रतीच्या संगीताबद्दल त्याचं ज्ञान परिपूर्ण आहे. तो संगीतच्या अरेंजिंगपासून ते संगीत रचनेपर्यंत सारं अगदी खुबीने करू शकतो. हे फार थोड्या लोकांना ठाऊक आहे. जे संगीत, चित्रपटांबाबत खरं, तेच खाद्यजीवनाबाबतीतही. जगभरचे विविध खाद्यप्रकार कसे उत्क्रांति झाले यापासून ते, ते खाण्याची पक्रिया कशी आहे याचं राजला टेरिफीक ज्ञान आहे. खाण्याच्या प्रक्रियेची संस्कृती मोडून पदार्थ खाल्लेला राजला जाम आवडत नाही. चित्रकार तर तो आहेच. काकांकडून त्याला मिळालेला हा अजून एक वारसा. संगीताचा वारसा राजला आपल्या वडिलांकडून मिळालेला आहे. श्रीकांतजींबद्दल राज अनेक आठवणी सांगतो. त्यातली एक आठवण राजकीय आहे. श्रीकांतजींनी आयुष्यभर बाळासाहेबांना साध्या पदांच्या नेमणुकांबाबतही साधी सूचना केली नाही. शिवसेनेतला कुणीही ‘राज जे काही आहे ते ठाकरे असल्यामुळेच आहे’ असं जेव्हा म्हणू लागला, तेव्हा राजला मोठं आश्चर्य वाटलं. उपरोधाने तो म्हणाला, ‘‘च्यायला, शिवसेना एवढ्या लवकर श्रीकांत ठाकरेंचं योगदान विसरेल असं वाटलं नव्हतं!’’

राज नावाचा मित्र (भाग 2)

समज आणि गैरसमज...

राजची आणि माझी ओळख नव्हती त्या काळात मला राज हा अतिशय उद्धट आणि अतिआक्रमक वाटायचा. त्याची माझी मूळ ओळख उदय तानपाठक नावाच्या आमच्या एका मित्राने करून दिली. तो एका सकाळी मला राजकडे घेऊन गेला. ती भेट सकाळी फार लवकर ठरल्याने माझ्या डोळ्यांवर फार झोप होती. मी एकाच गोष्टीमुळे राजच्या भेटीबाबात प्रतिकूल होतो. त्या भेटीत राजने हिंदुत्वाबाबत आपली मतं मांडल्याचं मला आता स्मरतं. राज तेव्हा मला म्हणाला होता, ‘‘हिंदुत्व वगैरे सगळं ठीक आहे. पण खरं तर महाराष्ट्रात मराठी माणूस, गुजराती आणि मारवाडी-जैन माणूस मिळून महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करायला हवा. शिवाय मराठी माणूस म्हटलं की, खेड-मालेगावचा मुसलमान नाही तर वसईचा ख्रिश्चन तुम्ही कसा वगळणार?’’ मी ते ऐकून चाट पडलो. राजची प्रतिमा तेव्हा प्रतिबाळासाहेब अशी होती. मला वाटलं होतं तो त्या पद्धतीने बोलेल पण ऐकलं ते हे. नंतर अलीकडे एकदा बोलतानासुद्धा तो म्हणाला, ‘‘आपली ज्या प्रकारची तपश्चर्या असते, त्याच प्रकारचं आपण बोलावं. म्हणजे त्यावर आपला विश्वास बसतो आणि लोकांचाही. आमच्या आजोबांची ज्या प्रकारची तपश्चर्या होती, ते त्या प्रकारचं बोलत. बाळासाहेबांची ज्या प्रकारची तपश्चर्या होती, ते त्या प्रकारचं बोलले. मी तेच बोलतो ज्यावर माझा विश्वास आहे. उगाच बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट्‌स ऐकून हिंदुत्वावर बोलण्याने माणसाचा विदूषक होईल. तपश्चर्येशिवायचे इशारे म्हणजे साबणाचे फुगे! मला ते उडवायचे नाहीत.’’ राज विचार करतो तो असा.

पहिल्या भल्या सकाळच्या भेटीनंतर त्याची अन्‌ माझी मैत्री झाली असं नाही. गंमत म्हणजे राजच्या अगोदरपासून माझी आणि उद्धवची ओळख होती. राजच्या संदर्भात जो उद्धव येतो तेवढंच या ठिकाणी लिहिणं अपरिहार्य. उद्धवच्या बाजूने राज आणि राजच्या बाजूने उद्धव जेवढा मला कळला, त्यातून मला जे आकलन झाले ते तसं क्लेशदायक होतं. इथे उद्धव किंवा राजच्या राजकारणाचं मूल्यमापन मी करत नाहीए. दोघांनाही त्यांचं राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी जे जे करावं लागतं, ते करण्याचा व ते करताना डावं-उजवं न पाहण्याची दोघांनाही मुभा आहे. परंतु राजच्या बाबतीत जे झालं ते नि:संदिग्धपणे अन्यायकारक होतं. कारण शिवसेनेमध्ये राजची राजकारणाची समज त्यांच्या पिढीतली सर्वात अव्वल समज होती. त्याच्यामध्ये सर्व काही मंगल करण्याची स्वप्नं होती. त्याच्याकडे त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे तरुण होते. त्याची मागणी ही कामाच्या, जबाबदार्‍यांच्या वाटपाची होती. याचं उत्तर ‘तुझ्यासाठी सर्व महाराष्ट्र खुला आहे’ हे असू शकत नव्हतं. (अर्थात या उत्तराच्या शेवटी त्याने योग्य तो बोध घेतलाच!) वास्तवात जे होत होतं, त्याची सामान्य जनतेला योग्य ती कल्पना नाहीए. मी स्वत: डोळ्यांनी पाहिलेलं एक उदाहरण लिहितो. राज शिवसेनेत प्रचंड लोकप्रिय होता. तो जिथे जात असे, तिथे त्याला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी चोरून-चोरून भेटायला येत असत. मी ‘चोरून चोरून’ असं लिहिलं आहे त्याचं उदाहरण एकदा मला पाहायलाच मिळालं. त्या अगोदर या सार्‍यांना राजला भेटायचं असेल, तर चोरून भेटावं लागतं असं मी ऐकलेलं होतं. पण माझा त्या कथांवर विश्वास नव्हता. पण एकदा पुण्यात राज असताना असेच शिवसेनेचे काही पदाधिकारी त्याला (चोरून) भेटायला येत होते. इतक्यात पुण्याचे संपर्कप्रमुख असलेले रवींद्र मिर्लेकर राजला भेटायला ‘अधिकृत’ पणे येत आहेत अशी बातमी आली. तेव्हा आपापल्या भेटी गुंडाळून तत्कालीन शिवसेना पदाधिकारी मिटिंग आवरून अक्षरश: राजच्या घरातून पळून गेले! त्यांना म्हणे, त्यांच्या नावाची यादी ‘मातोश्री’वर सादर होईल अशी भीती होती! त्या वेळीही त्यांच्यावर राजचं म्हणणं गमतीशीर होतं, तो म्हणायचा, ‘‘पदांवर बेतलं तर उड्या टाकून पळून जाणार्‍यांच्या जीवावर महाराष्ट्राचं राजकारण कसं करणार? उद्या महाराष्ट्रावर संकट आलं, तरीही हे उड्या टाकूनच पळणार. वेळ कोणतीही असली, तरी पाय रोवून उभे राहतील असे पाच लोकसुद्धा महाराष्ट्राचं भलं करतील!’’ गंमत म्हणजे, त्या उड्या टाकण्याच्या प्रसंगात शिवसेनेच्या एकाच पदाधिकार्‍याने उडी टाकली नव्हती. ते म्हणजे शिवसेनेचे तत्कालीन आमदार दीपक पायगुडे! मला वाटतं, आपलं आपलं राजकारण करण्याचा आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आपण मान्य केला, तरीही क्षुद्र आणि स्वार्थी माणसांच्या सल्ल्यावरून राजची जी मानखंडना होत होती ती खचितच समर्थनीय नव्हती. या काळात सुभाष देसाई हे शिवसेनेच्या पहिल्या वर्तुळाचे नाना फडणवीस होते. या काळात राजची जी मानसिक घालमेल होत होती, ती पराकोटीची त्रासदायक होती. आपण काही निर्णायक पाऊल उचललं तर बाळासाहेबांना जो त्रास होईल तो एकीकडे आणि एका कर्तृत्ववान पुरुषाला संघटनेतल्या पाच हजारो मनसबदारांकडून जी मानखंडना करून घ्यावी लागत होती ती दुसरीकडे. या कात्रीत राज सापडला होता. पिंजर्‍यात सापडलेल्या वाघासारखा राज तडफडत असे. मी स्वत: त्याच्यासोबत अशा अनेक संध्याकाळी बोलत काढलेल्या आहेत. ‘पिंजर्‍यामध्ये वाघ सापडे, बायका-पोरे मारिती खडे’ म्हणजे काय, याचे प्रात्यक्षिकच तेव्हा शिवसेनेने उभे केले होते. फरक एवढाच होता की, इथे पिंजरा बाळासाहेबांच्या प्रेमाचा होता. तो नंतर राजने तोडला. पण ते खूप नंतर. अगदी भिंतीला पाठ टेकल्यावर. त्या अगोदर खूप रामायण घडलं. त्यातल्या प्रत्येक नाही, तरी बर्‍याच घटनांचा मी साक्षीदार आहे. एवढं मात्र खरं की, राज त्या काळात खूप प्रतिष्ठेने आणि संयमाने वागला

राज : कल्पनेतला आणि खरा...

हे सगळं घडायच्या आधी मी राजची एक मुलाखत घेतली होती. ती घेत असताना मी राजसोबत कम्फर्टेबल नव्हतो. बहुदा तोही नसावा. मला सतत असं वाटत होतं की, मी जाणीवपूर्वक समोरच्याला अडचणीत आणण्याकडे कल असणारा मुलाखतकार आहे असा त्याचा कुणीतरी समज करून दिला होता. तो सतत प्रश्न कापून उत्तर देण्यावर भर देत बोलत होता. त्याअगोदर किणी प्रकरणामध्ये त्याच्यावर ज्या प्रकारे आरोप करण्यात आले होते, संपूर्ण समाजवादी कंपू कुणाला तरी नष्ट करण्यात नेहमीच आनंद व उत्सव मानतो, तशाच प्रकारे सर्व तयारीनिशी त्या प्रकरणात उतरला होता. त्या समाजवादी आरोपांवर व्यक्तिश: माझा अजिबात विश्वास नव्हता. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणींवर जादू करणार्‍या या तापट आणि आक्रमक नेत्यावर त्या प्रकरणाचा एवढा धुरळा का उडाला याचा शोध घ्यावा असे मला सातत्याने वाटत होते. खूप मागोवा घेतल्यावर हाती जे लागलं ते हेच होतं की, अशा प्रकारच्या षड्‌यंत्रात गोवण्यासाठी व राजची प्रतिमा मलीन करण्याचा कट खूप अगोदरपासून चालू होता. फक्त जोडण्याकरता योग्य ते प्रकरण हाताशी लागत नव्हतं. वास्तविक या प्रकरणाचं जे काही होतं, ते आणि राजच्या वर्तुळाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. तरीही त्या काळात समाजवादी पत्रकारांनी राजला त्याच्या प्रत्यक्ष शत्रूंपेक्षाही मानखंडित केलं. प्रत्यक्ष पुराव्यांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनी हे संपूर्ण प्रकरण आधारहीन असल्याचे निष्कर्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रकारे देऊनही, त्या काळात राजला, त्याच्या कुटुंबीयांना अपरिमित त्रास सोसावा लागला. मला असं वाटतं की, या षड्‌यंत्रात अशा रीतीने फसावं असे काही दोष राजमध्ये आहेत. हे अर्थात मला नंतर कळलं. तो माणसांवर चटकन विश्वास टाकतो. नको इतका विश्वास टाकतो. कुणी आपलं वाईट करेल यावर त्याचा विश्वासच नसतो. त्याचं इतक्या जणांनी, इतक्या वेळेला, इतकं वाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कल्पना म्हणून आपण त्या जागी असण्याची मला प्रचंड भीतीच वाटते. तरी हे पचवून राज माणूसवेडा राहिला आहे. एखाद्या किंवा कुणाही माणसावर दुसर्‍या भेटीतच संपूर्ण विश्वास टाकणारा राज हा भारतातला एकमेव राजकीय नेता असावा! याचा अर्थ तो चतुर नाही असं नव्हे, तो प्रसंगी अतिचतुरतेने वागतो. मुख्य म्हणजे तो कोणतीच गोष्ट कधीच विसरत नाही. तुमची एखादी बारीकशी हालचाल, उद्‌गार किंवा युक्तिवाद त्याच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. जेव्हा वेळ येते, तेव्हा तो ते आपल्या पोतडीतून बाहेर काढून त्याचा वापर करतो. अगदी जवळून पाह्यलेलं असल्याने मी हे सांगू शकतो की, याबाबतीत त्याची तुलना शरद पवारांशीच करावी लागेल. फक्त्त फरक एकच. पवारसाहेबांनी छोट्या माणसांची नावं आणि मोठ्या माणसांची कामं लक्षात ठेवली असं इतिहास सांगतो. राज नेमकं उलटं करतो. अनेक छोट्या माणसांच्या कसल्या कसल्या कामांसाठी राजने कुणाकुणाला फोन केल्याचं मी पाह्यलंय. शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी राजकडे माणसं उभी असतात आणि राज स्वत: फोन करून नंतर काम झाल्याची खात्री करून घेतोय हे दृश्य मी दरवर्षी पाहत आलोय. गंमत म्हणजे इतर सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि नेत्यांची मुलं त्यांच्याच पक्षाची सत्ता राज्यात आणि देशात असताना यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी राजकडे येतात आणि ती कामं करून घेतात. इथे नावं लिहिणं किंवा त्यांची कामं संयुक्तिक नसल्याने मी ती लिहीत नाही. नाहीतर ती यादी आणि कामं वाचून बर्‍याच जणांना चक्कर आली असती.

Tuesday, March 10, 2009

राज नावाचा मित्र (भाग 1)

(मा. राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा लेख.)

राजू परुळेकर
- राजकीय विश्लेषक व लेख़क

माझी पहिली ओळख...

राजला खाजगीत अगदी जवळचे मित्र आणि नातेवाईक राजा म्हणतात. हे त्याला एकदम फिट्‌ट बसणारं नाव आहे. जर त्याचं स्वभावानुसार नाव ठरवायचं झालं, तर ते राजाच असायला हवं. याची अगदी अनेक कारणं आहेत. पण त्यातलं अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे तो कधीही कुणाचंही वाईट चिंतीत नाही. अगदी शत्रूचंही. मला त्याच्या या गुणाचं फार आश्चर्य वाटतं. राजा माझा परममित्र असण्याचं हे एक सर्वांत महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. कारण राजला भेटेस्तोवर मला शत्रूबाबत विषारी भावना माझ्या मनात येत नाही ही माझी दुर्बलता वाटत असे. पण राजला भेटल्यावर माझ्या मनातली भावना न्यूनगंडासारखी होती, ती माझ्या शक्तिस्थानासारखी वाटू लागली.

राजमध्ये प्रचंड करिष्मा आहे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. पण हा राजचा करिष्मा किंवा राजची ती जादू योगायोगाने किंवा अपघाताने आलेली गोष्ट नाही. राज वयाच्या तेवीसाव्या वर्षापासूनच राजकारणात आहे. तेव्हापासून त्याने कण-कण करून माणसं जोडलेली आहेत. त्यांची काळजी केलेली आहे. आजही राज जेव्हा बाहेर कुठेही किंवा दौर्‍यावर जातो, तेव्हा बरोबरच्या माणसांची आधी काळजी घेतो. त्यांची सोय नीट होते आहे की नाही यावर त्याचं अगदी बारीक लक्ष असतं. राज आक्रमक राजकारण करतो किंवा त्याची वक्तृत्वकला तडफदार आहे म्हणून केवळ जादू पसरत नाही, तर सोबतच्या माणसांची तो पराकोटीची काळजी घेतो. जनतेला असा नेता आवडला तर नवल काय? व्यवसायामुळे म्हणा किंवा कामाच्या प्रकारामुळे देशातले अनेक सामाजिक आणि राजकीय नेते मी पाहिले. बहुतेकांना आपल्या बायका-मुलांपलीकडे कुणी माणसं आपल्यासोबत असतात आणि त्यांची काळजी आपणच वाहायला हवी याची जाणीवच नसते. राज या सार्‍यांपेक्षा अगदी वेगळा आहे.

नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा मालवणमध्ये पोटनिवडणूक लागली. त्या निवडणुकीसाठी संपूर्ण शिवसेना कोकणात उतरली. त्या वेळी राजचा मुक्काम कणकवलीच्या हॉटेल शर्मिलामध्ये होता. तिथे परिस्थिती अशी होती की माणसं भरपूर होती आणि रुम्स कमी होत्या. राणेंनी मतदारसंघातील सर्व हॉटेल्स आधीच बुक करून ठेवल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भलतीच पंचाईत झालेली होती. अशा वेळी राज हॉटेलमध्ये आपल्या खोलीत जास्तीत जास्त जणांना सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील होता. त्या वेळेला शिवसेनेचे अनेक बडे नेते आपली हॉटेलमधली सोय कशी अधिक 'फुलप्रूफ' होईल ते पाहण्यात मग्न होते. आता शिवसेनेचे नेते असलेले आणि महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते रामदास कदम हे शर्मिला हॉटेलमधल्या आमच्या शेजारच्याच रूममध्ये राहत होते. इतर अनेक नवे कार्यकर्ते येऊन आपल्या राहण्याच्या सोयीवर आक्रमण करू पाहताहेत हे पाहिल्यावर रामदास कदम हे ‘मानापमाना’ चा खेळ सुरू करून बॅगा घेऊन निघाले होते. ‘‘तुमच्या निवडणुका तुम्ही लढवा. मी चाललो खेडला’’, असे बाणेदार उद्‌गार काढून ते निघाले. तेव्हा ज्येष्ठ - कनिष्ठतेचा वाद बाजूला सारून राज स्वत: समजूत काढून कदमांना परत घेऊन आला. शिवसेनेच्या इतिहासातल्या सारगर्भ दिवसात मी निवडणूक क्षेत्रात राजसोबत होतो. त्या क्षणी सभोवतालच्या परिस्थितीचं अचूक राजकीय आकलन त्याच्याएवढं दुसर्‍या कोणत्याच शिवसेना नेत्याला नव्हतं. त्या काळात राजने शिवसेना सोडण्याचं ठरवलेलं होतं अशा वावड्या नंतर उडवण्यात आल्या. खरं तर त्या काळात राजने कमालीचा संयम पाळला होता. जो पाळणं हे कमालीचं कठीण होतं. एक तर संपूर्ण निवडणूक मोहिमेची आखणी ही राजला वगळून करण्यात आलेली होती. दुसरं म्हणजे, त्याला राणेंशी लढवून एकंदरीत महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवावा अशी पुढच्या काळासाठीची संकल्पना शिवसेनेत आकारत होती. राजला हे कळत होतं. तो प्रचंड अस्वस्थ होता. गंमत म्हणजे त्याची ही अस्वस्थता राजकीय असुरक्षिततेतून आलेली नव्हती, तर त्याला त्रास होत होता तो भावनिक. संपूर्ण शिवसेना आणि शिवसेना नेते हे कमालीच्या राजकीय असुरक्षिततेने भेदरलेले होते.

राजला त्याबाबतीत मात्र कधीच काही असुरक्षितता नव्हती. त्याचा स्वत:च्या नेतृत्व क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. पण त्या काळात त्याची भावनिक आंदोलनं ही त्याच्या जवळच्यांना प्रचंड अस्वस्थ करत होती. तेव्हा आणि त्यानंतरच्या अनेक रात्री राजने जागून काढलेल्या आहेत. त्याच्या मनात विचार फक्तं बाळासाहेबांचाच असे. He loves me, He loves me not... असं काहीसं त्याच्या मनाशी चाललेलं असे. बाळासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम नाहीए... अशा मानसिक आंदोलनात त्याने इतक्या शक्यतांचा विचार केला होता की मला नाही वाटत की, त्याच्या राजकीय आणि व्यक्तिगत शत्रूंनी बाळासाहेबांसंबंधी त्याच्या एक लक्षांश विचार केला असेल. अगदी निष्पक्षपणे, नीरक्षीरविवेक ठेवून आणि ईश्वराला स्मरून जर मी लिहायचं ठरवलं, तर मी बाळासाहेबांसोबतच्या आणि शिवसेनेच्या नेतृत्वातल्या पहिल्या वर्तुळातल्या प्रत्येक माणसाला त्या काळात अगदी जवळून पाह्यलंय. मी नि:संदिग्धपणे असं म्हणेन की, बाळासाहेबांवर राजइतकं निस्सीम आणि इतकं परिपक्व प्रेम इतर कुणीही केलेलं नाही. मुख्य म्हणजे त्याच्याइतके बाळासाहेब कुणाला नीट कळलेच नाहीत. त्यांचं सामर्थ्य आणि त्यांच्या चुकांसहित राजने त्यांना समजावून घेतलं आणि निरपेक्षपणे त्यांच्यावर प्रेम केलंय.

Thursday, March 5, 2009

प्रेम हे एकीवरच

करायाच असत ,

स्त्यानारायनाच्या प्रसदा सारख

प्रत्येकीला वाटायाच नसत . .

प्रेमात शब्दांचे

अर्थ शोधायचे नसतात ,

एकमेकांच्या मनातले

भाव फक्त ओळखायचे असतात . . .

मनातला भाव

शबदत आणू नकोस

त्याच शब्दाणी पुन्हा

मनावर घाव घालू नकोस....

मुके असले तरी भाव
शब्द असले तरी घाव
भाव च मनी असु दे
नको तो घाव

छ्ळने

जगण्याचे छ्ळने मला
मरताना कळ्ले होते
मरतानाही त्याने मला
छ्ळने सोडले नव्हते

प्रतिबिंब च ते

आरशयात काय नी पाण्यात काय?

रूप तुझे ते

समोर काय नी हृदयात काय?

अंदाज़ माझे जगण्याचे

कधीच चुकले नव्हते ,

मारताना मला कळले

मला जगण्याने छ्ळले होते . . .

आरसा

तिला ती आवडते म्हणुन
मी तिचा आरसा बनलो
आता तिचे प्रतिबिंब माज्यात होते
माज्यात असेल तरी तिचेच होते

श्रावणातल्या मेघा जरा थांब

माहेराच्या माझ्या मैत्रिणी ला सांग

मी खूप सुखात आहे

दुखा: तू जरा लांबच थांब

मनातील भाव जणू,

आज मुके मुकेसे झाले होते.

अंदाज़ जरी चुकले जगण्याचे माझे,

मरणाशी हे कसे गीत मी गुंफिले होते

शब्दांच्या पलीकडे जाताना,
शब्दाणी मला एकदा हटकले.
मग निशब्द बनूणी आसवात,
तेच शब्द आठवण बनून भटकले
.आरश्यात रूप तुझे
जसे मनातील भाव माझे
असून मी ही नसे मी
दिसे जसे स्वप्न तुझे

एकंतात अश्रू गाळताना,

अश्रूना माझ्यावर हसे आले.

मग दिसला चेहरा मला माझा,

आसवांचे जसे आरसे झाले.

कळो वा न कळो

शब्द मला काही सांगो वा न सांगो
तो नेहमी सांगायचा
मला कळो वा न कळो
एकांतात अश्रु मात्र गाळायचा
ते अर्थ आजवर
मला उमगले नाही.
निशब्द बनून राहताना,
मला कधी कोणी कवळले नाही
प्रेमाचा विषय आला की
मी नेहमीच निशब्द होतो ,
तिच्या अबोल प्रश्नांना
निशब्द उत्तरे देतो . . .
शब्दाणा शोधणे,
मला कधी जमलेच नाही.
शब्द शब्द जगता मी,
निशब्द कसा झालो कळलेच नाही.

तू नुसते अश्रु जपून ठेवलेस..

तुज्या बंद मुठीत

जर माज्या मनात पाहिले असतेस

दिसले असते हजारो मोती शिम्पल्यांच्या कुशीत

तू जाताना म्हणाली होतीस ना?

तू जाताना म्हणाली होतीस ना? की आपण नक्की परत भेटू .
हसत हसत नाही जमलेच,
तर झुरत झुरत भेटू

कशाला शोधतोस मला,

पहा मी तुझ्या शब्दा शब्दात आहे.

कशाला अश्रत ढाळतोस स्वतला,

पहा मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे

एकट्याच्या गर्दीत

एकट्याच्या गर्दीत
मी तुलच शोधत असतो
पुन्हा डोळे मिटून
मी तुलच पाहत असतो. .

मुली लग्न का करतात............ . .....?

1) एकातरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी........
2) गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणून......
3) जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणूक म्हणून.........
4) पुरूष किती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी............ .....
5) आई-बापावर दया करण्यासाठी.......
6) मैत्रिणीने केले मग मी का नको ...........?
7) नवीन-नवीन डिज़ाइनची मंगळसूत्रे घालवयास मिळावी म्हणून..........
8) नवराच्या जिवावर मुलांची हौस भागवता यावी म्हणून............ ......
9) मुक्त होण्यासाठी लग्नच केले नाही तर मुक्ती कोनापासून मिळविणार............ ....
10) आपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी............ . .
11) लग्नानंतर मुली उजळतात म्हणे............ फअरनेस क्रीम फासून फासून थकल्यावर शेवटचा एक जालिंम उपाय

चारोळी

एकटी स्वप्न माझी ,
मी स्वप्नातही एकटा.
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा.

दूसरी मुलगी शोधतो आहे..............

एक वर्षभर माझ्यावर केलेल्या प्रेमावर,
आभार तुझे मानतो आहे,
तुझ्या नंतर मी आता,
दूसरी मुलगी शोधतो आहे..........

तू सुद्धा आता,
दूसरा कुणी शोधला असशील,
रोज रोज त्याला,
माझ्यासारखा पिलला असशील.......

तुला माहित आहे,
प्रेमासाठी किती STRUGGLE करावा लागतो,
एक मुलीला पटवायला,
किती घाम गालावा लागतो..........

तुला लिहलेल्या प्रेम पत्रांची,
आजही आठवां ताजी आहे,
पुढचे प्रेम करायला,
माला त्यांची गरज आहे.........

आपल्या प्रेमापायी तुला दिलेले,
सर्व GIFT सुद्धा हवे आहे,
अर्ध्या किमतीत सुद्धा त्यांना,
विकत घ्यायला मी तयार आहे..........

तुझ्यावर केलेला सर्व खर्च,
आजही माझ्याकडे तयार आहे,
CHEQUE घ्यायचा की CASH घ्यायची,
यावर विचार सुरु आहे............

अरे हो..............
तुझातर माझ्यावर,
कोणताही खर्च नसेल,
कारन पर्स नेहमी घरी विसरने,
तुझे आजही सुटले नसेल........

तुझ्याकडे मी दिलेला,
माझा फोटो मला हवा आहे,
मुलीना IMPRESS करायला,
तोच तर एक दुवा आहे...........

तुझ्याकडून मिलालेल्या सर्वच वस्तुंचा,
माझ्या पुढच्या प्रेमावर मी वर्षाव करील,
तुला जसे PROPOSE केले होते,
तसेच मी तिला पण करीन............

म्हणुन मला माझे,
सर्व तू परत कर,
मला अजुन एक मुलगी पटवायला,
माझ्यासाठी प्रार्थना कर........

तुझे प्रेम संपल्यावर,
दुसरे प्रेम शोधतो आहे,
तुझ्या नंतर मी आता,
दूसरी मुलगी शोधतो आहे,
तुझ्या नंतर मी आता,
दूसरी मुलगी शोधतो आहे.............

मन कधी फ़सत,मन कधी रुसत..

मन कधी फ़सत,मन कधी रुसत...
कुनाला हे कळत,कुणी उगाचच हसत..
हसताना मनात बरंच काही असतं...
सांगायला मात्र काही जमत नसत...
समजुन घ्यावं असं खुप वाटतं....
समजतय त्याला हेही कळत....
शब्दांच्या शोधात मन हरवत...
न बोलताच मग डोळ्यांना समजत..
गालावरच्या खळीत उत्तर मिळतं....
पापन्यांखाली ते हळुच लपतं
मन कधी फ़सत, मन कधी रुसत..

सोन्याची पैठणी

सोन्याची पैठणी तिला चांदीचा काठ,

सोन्याची पैठणी तिला चांदीचा काठ,

दुसरीकडे बघाल ना, माझ्याशी आहे गाठ....

खोक्यावर खोका टी. वी. चा खोका ...............

खोक्यावर खोका टी. वी. चा खोका ...............

मी त्याची पांढरी मांजर आणि बंड्या मज्हा बोका ............

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा...

लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...

बिडित बीडी ऊंट बीडी, बिडित बीडी ऊंट बीडी

...... राव ओढतात बीडी, आणि मी लावते काडी

दरवाज्यामधे ठेवले हंडे ७, त्यावर ठेवली परात, ****** पादले दारात, वास आला घरात.

गल्लीतल्या चिखलात लाल कमळ उमलले ,

गणपतराव त्यात पडले त्यांना चौघानी उचलले

या आधुनिक युगातील युवाकांचा विचार

ना आम्ही लग्न करणार,
ना आमच्या मुलाना करू देणार.

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव

**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

चार आण्याची आणली कोंबडी, बारा आण्याचा मसाला,

मी अजून लहान आहे, लग्नाची घाई कशाला.

अल्नगदि वर पलंग्दी पलान्ग्दी वर घोंगडी .............. रावांची बहिण आहे लंगडी

प्रचंड झोपेमुले डोळे लागले मिटू.......

प्रचंड झोपेमुले डोळे लागले मिटू.......
.......... राव म्हणतात आता स्वप्नात भेटू
गाय चराते वनात आणि बैल चरतो रानात ... .......सारखा मुर्ख नवरा मिळणार नाही आख्या हिन्दुस्तानात

गप्पा-गोष्टिंचा सीजन सुरु असता.... साईट वरी ऑरकुट,

त्यामुळे, तुम्ची-आमची मैत्री झाली.... बघा कशी अटूट!

पेड़ से गिरा बन्दर

.............. मेरे दिल के अन्दर

कॉम्प्युटरला असते फ्लॉपी डिस्क;

______ लग्न करून मी घेतली मोठी रिस्क..

गाडीत गाडी डेक्कन क्वीन;
_______ आहे माझी ब्युटीक्वीन.

कालच चित्रपट पाहिला त्याचे नाव सायको;

xxx नाव घेते xxx बायकॊ.

उखाणे जबरदस्त बाप

सिंधुदुर्ग माझा जिल्हा सोनाली माझे गाव
झनक्यात पदर घेते प्रिया तिचे नाव

हिंदिचि चिंदि ...............

पहिलि बार पोहनेको गया तो क्या हुआ मालुम ?
पहेले पानी मे शिरा फिर पोहा
बादमे डुबा.
===========================================
घाई करो भैयाजी बस छुट जायेगा
तो पंचायत हो जायेगी.
=============================================
सरबत मे लिंबु पिळा क्या?
=============================================
इतना महाग कैसे रे तेरे यहॉं ? वो कोपरे का भय्या तो स्वस्त देता है !!=============================================
कांदा काट के , चिर के मस्त ऑमलेट बनानेका , और उपरसे थोडि कोथिंबिर भुरभुरानेका.
==============================================
अरे बाबा गाडि सावलिमे लगा...
=============================================
ए भाय , मेदुवडा शेप्रेट लाना, सांबारमे डुबाके मत लाना..
=============================================
खाओ पेट भर खाओ , लाजो मत..
=============================================
धावते धावते गिऱ्या तो खडकन हात का हाड मोड़्या.

Vinod

एकदा एक जण दुर्बीण लावून आकाश निरीक्षण करत असतो..
संता तिथून जात असताना एक तारा निखळतो...
आणि मग सन्ता ओरडतो... " ओये क्या निशाना है, यार ..."

संता- बंता

एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते " तुझा पोपट झालाय , चल फूट इथून "
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
"मी आलोच नव्हतो "

अमन...

जगातला सुंदरतम शब्द..
यात कुठल्याच अक्षराला..
ना ऊकाराचे शेपूट..
ना वेलांटीचा मुकुट.
ना कान्याची कुबडी..
ना मात्रेची बुगडी.

ना कुठे खळबळ..
ना कुठे वळवळ.

कसा... शांत..
शांत..शांत.

निव्वळ,
निखळ,
नितळ..
निळ्या तळ्यातली.. हिरवी शांती.

खर तर याला शब्द म्हणावं..
असं सुद्धा नाही वाटत...
स्तब्ध तळ्यात दगड टाकावा..
तसं वाटतं!

जिथं मन संपतं...
जिथं शब्द संपतात..
जिथं सारं संपतं..

ती अवस्था...

अ म न

Quote of the day

Don't go around saying the world owes you a living; the world owes you nothing; it was here first.

---

Mark Twain [Samuel Langhornne Clemens] (1835-1910)

Interesting quotes -

Interesting quotes -



Minds are like parachutes. They only function when they are open.

---

Sir James Dewar, Scientist (1877-1925)

Marathi Books - Black Hole CH-27 अजून एक खडा

जाकोब 'C' लेव्हलच्या खडकाळ गुहेत एका विहिरीशेजारी एका खडकावर बसला होता. त्याच्या बाजुला कागदपत्रांचा एक पुडका पडलेला होता आणि काही कागद पसरलेले होते. जाकोबच्या हातात एक खडकाचा तुकडा होता ज्याच्याकडे तो काळजीपुर्वक न्याहाळून पाहत होता. तो आता त्याच्या हातातल्या खडकाच्या तुकड्याला दुसऱ्या एका खडकाच्या तुकड्याने तोडायला लागला. जेव्हा तो एक खडकाचा तुकडा दुसऱ्या खडकाच्या तुकड्यावर आदळत होता तेव्हा त्यातून ठिणग्या निघत होत्या. बराच वेळ एकाग्रतेने तो ते खडकांचे तुकडे एकमेकांवर आदळत होता. अचानक तो भानावर आला तर कावरा बावरा होवून स्टेलाला आजुबाजुला बघून शोधू लागला. जेव्हा ती त्याला दिसली तेव्हा कुठे त्याच्या जिवात जिव आला.

स्टेला 'C2'विहिरीच्या काठावर उभी होती. ती विहीर जाकोब जिथे आपलं काम करीत होता तिथून जवळच होती पण मधे एक मोठा खडक आडवा होता. ती मधे मधे तिच्या हातातले कागद उकलून त्याचा संदर्भ घेत होती. तेवढ्यात तिला विहीरीच्या काठावर काहीतरी चिटकलेले दिसले. तिने जवळ जावून लक्ष देवून बघितले तर ते कपड्याचे धागे होते.

तेवढ्यात तिला मागून जाकोबचा आवाज आला, '' हे... काय करीत आहेस?''

'' काही नाही '' स्टेला म्हणाली.

' हे बघ... आताच काम करता करता माझी टूलकिट या विहिरीत पडली आहे... प्लीज ती मला आणून देतेस का?'' जाकोबने विचारले.

'' हं आलेच '' ती म्हणाली.

स्टेला जेव्हा त्याच्याजवळ आली तेव्हा जाकोब तिला म्हणाला, '' टूलकीट तर तू बघितलीच आहेना ... तो एक छोटा लाल रंगाचा बॉक्स आहे''

'' हो... मला माहित आहे '' स्टेला म्हणाली आणि 'C3' विहिरीच्या काठावर गेली, ज्यात जाकोबची टूलकीट पडली होती. दोन पावले मागे येवून तिने पटकन त्या विहिरीत उडी मारली. आता तिला ब्लॅकहोलमधे उडी मारण्याची चांगलीच सवय झालेली दिसत होती.

जाकोबला गुहेत दुरवर एका जागी जमिनीवर काहीतरी चमकतांना दिसलं. जाकोब आपल्या हातातला खडक बाजूला ठेवत तिथून उठला. आणि हळू हळू त्या चमकणाऱ्या वस्तूकडे जावू लागला. त्या वस्तूच्या जवळ जाताच त्याने त्या वस्तूवर आपल्या टॉर्चचा झोत टाकला. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य तरळलं होतं. त्याच्या पुढ्यात जमिनीवर पडलेला तो एक पारदर्शक खडा होता ... अगदी त्याच्या मनगटावर बांधला होता तसाच. त्याने तो खडा उचलून घेतला. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य अजुन खुललं होतं. त्याने तो खडा आपल्या मनगटावर बांधलेल्या खड्याच्या जवळ नेवून त्यांची एकमेकांशी तुलना केली.

'' माय गॉड! ... काय सुंदर खडा आहे!'' जणू तो स्वत:शीच बोलला.

'' आत्ता पर्यंत तु एकटाच होता ... बघ तुझ्यासाठी एक नवा सोबती आला आहे..'' तो जणू त्याच्या मनगटावर बांधलेल्या खड्याशी बोलत होता.

तेवढ्यात जाकोबच्या पाठीमागुन एक हात येवून जाकोबच्या खांद्यावर विसावला. दचकून जाकोबने दोन्ही खडे पाठीमागे लपवून वळून बघितले.

'' हे घे मी तुझी टूलकीट आणली आहे'' ती स्टेला होती.

स्टेलाला समोर पाहून जाकोबने सुटकेचा सुस्कारा सोडला.

'' ओह ... थॅंक यू... मला वाटलं... तू खरोखरंच मला भिती घातलीस...'' जाकोब म्हणाला.

स्टेलाने त्याची टूलकीट त्याला दिली.

'' हे बघ मला अजुन एक खडा सापडलाय'' जाकोबने आपली खडा असलेली मुठ स्टेलासमोर उघडली.

स्टेलाने तो खडा उचलून आपल्या हातात घेतला आणि ती त्याच्याकडे अगदी जवळून निरखून बघू लागली.

'' खरंच किती गोड खडा आहे हा!'' स्टेला म्हणाली.

स्टेलाने त्या खड्याला आपल्या मुठीत बंद केलं आणि 'C2'विहिरीकडे जात जाकोबला म्हणाली,

'' माझ्याजवळ थोडा वेळ राहू दे ''

'' थोडा वेळ नाही... नेहमीसाठीच असू दे ... तुझ्या मनगटावर बांध बघ त्याला'' जाकोब म्हणाला.

स्टेला जाता जाता थांबली आणि अत्यानंदाने म्हणाली, '' ओह.. थॅंक यू .. थॅंक यू सो मच''

जाकोब तिच्याकडे पाहून गोड हसला.

स्टेलाने त्या खड्याकडे मुठ उघडून पुन्हा एकदा पाहाले आणि ती त्या विहिरीकडे चालू लागली. जाकोब लोभसपणे तिला जातांना पाहत होता.

'' ऐक'' जाकोब म्हणाला.

स्टेला थांबून पुन्हा त्याच्याकडे वळून पाहू लागली.

'' काळजी घे... ज्या ब्लॅकहोलमध्ये तू पुर्वी कधी गेली नाहीस अश्या ब्लॅकहोलमध्ये जावू नकोस...'' जाकोब तिला एखाद्या आपल्या माणसाप्रमाणे सुचना देवू लागला.

'' हो...ठिक आहे '' स्टेलाने प्रतिउत्तर दिले.

क्रमश:...

Wednesday, March 4, 2009

Interesting quotes -

Interesting quotes -



Minds are like parachutes. They only function when they are open.



---

Sir James Dewar, Scientist (1877-1925)

Novels Collection - Black Hole CH-26 वेगवेगळी विश्व

पोलिस स्टेशनमध्ये पोलिस ऑफीसर ब्रॅट आणि त्याचा सहकारी समोरा समोर बसले होते. ब्रॅट अस्वस्थ दिसत होता. तो त्याच्या सहकाऱ्याच्या पुढ्यात टेबलवर एक फोटो टाकत त्याच्या खुर्चीवरुन उठला.

'' त्या गुन्ह्याचे शिल्पकार ... हे दोघंजणं आहेत ...'' ब्रॅट म्हणाला.

त्याच्या सहकाऱ्याने तो फोटो न्याहाळून पाहाला. तो स्टेलाचा आणि जाकोबचा कॉफी हाऊसमध्ये कॉफी घेत असतांनाचा फोटो होता.

'' मला शंका होतीच... पण आता खात्री झाली आहे... '' फोटोत जाकोबवर बोट ठेवीत ब्रॅट म्हणाला, '' की या माणसाचाच गिब्सनच्या गायब होण्यामागे हात आहे ''

'' तुम्ही असं कसं... म्हणजे एवढ्या खात्रीने असं कसं म्हणू शकता?'' त्याच्या सहकाऱ्याने विचारले.

ब्रॅटने अस्वस्थतेने त्याच्या टेबलभोवती एक चक्कर मारली आणि मग आपल्या रिकाम्या चेअरच्या मागे चेअरवर रेलून हात ठेवून उभा राहत तो म्हणाला, '' कारण.. त्यांची जवळीक जरा जास्तच वाढतांना दिसत आहे... सिझन नसतांना एखादं फुलाचं झाड बहरावं तसं त्यांचं प्रेम जरा जास्तच बहरतांना दिसत आहे... '' ब्रॅट कडवटपणे म्हणाला.

तिकडे ब्रॅट आणि त्याच्या सहकाऱ्यात चर्चा चालली होती, त्याच वेळी इकडे जाकोब आणि स्टेला गिब्सनचा शोध घेण्यासाठी ब्लॅकहोलमधून त्या खडकाच्या गुहेत पुन्हा शिरले होते. आपआपल्या टॉर्चच्या प्रकाशात ते सोबत सोबत समोर चालले होते.

'' तुला माहित आहे?... गिब्सन या सगळ्या भानगडीत का पडला?'' जाकोबने विचारले.

स्टेलाने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत विचारले, '' कां पडला?''

'' ज्या वैज्ञानिकाने ही छोटी छोटी विश्व तयार केलीत, त्याचा ठाम विश्वास होता की ... जर का असे कृत्रीम विश्व तयार करता येत असतील तर नक्कीच या ब्रम्हांडात अशी खरीखूरी वेगवेगळी विश्व अस्तित्वात असली पाहिजेत... आणि जर आपण जसे या कृत्रीम विश्वात प्रवेश करु शकतो आणि बाहेरही पडू शकतो तसेच आपण खऱ्याखूऱ्या विश्वांमधे सुध्दा प्रवेश करुन बाहेर पडण्याचा काहीतरी रस्ता असला पाहिजे...'' जाकोबने तिला सविस्तर समजावून सांगितले.

'' तो त्यात यशस्वी झाला होता?'' स्टेलाने उत्सुकतेने विचारले.

'' नाही... असं वाटतं की तो शास्रज्ञ यशस्वी होण्याच्या आधीच गायब झाला... आणि गिब्सन त्याचं अपूर्ण राहीलेलं स्वप्न पुर्ण करण्याच्या प्रयत्नाला लागला'' जाकोब म्हणाला.

'' बापरे... म्हणजे गिब्सनही तर नाही ना त्या वैज्ञानिकासारखा गायब झाला?'' स्टेलाच्या चेहऱ्यावर काळजी आणि भिती दिसत होती.

जाकोबच्या चेहऱ्यावर या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे याचा संभ्रम दिसत होता.

क्रमश:...

Famous proverbs -

Famous proverbs -



Act in the valley so that you need not fear those who stand on the hill. -



--

Danish proverb

Inspiring quotes -

Inspiring quotes -


The only difference between your abilities and others is the ability to put yourself in their shoes and actually try.

---

Leonardo Ruiz

Marathi Kadambari - Black Hole CH-25 लग्न

आज चर्चमध्ये सगळी सुझान आणि डॅनियलच्या लग्नाची गडबड चालली होती. सुझान नवरीच्या शुभ्र पेहरावात अजुनच खुलून दिसत होती. डॅनियलही त्याच्या कोऱ्या करकरीत सुट - बुटात उमदा दिसत होता. जेव्हा चर्चच्या प्रिस्टने त्यांच्या लग्नाच्या सोहळयाला सुरवात केली दोघांचेही चेहरे भावी आयुष्याच्या स्वप्नाने जणू चमकत होते. त्यांचे मित्र, नातेवाईक आणि हितचिंतक जे चर्चमध्ये जमले होते, त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता. त्या गर्दीतच एका जागी जाकोब स्टेलाच्या शेजारी उभा राहाला होता आणि तो समोर चाललेला लग्नसोहळा पाहत होता. त्याच गर्दीत एका कोपऱ्यात पोलिस ऑफीसर ब्रॅट उभा होता आणि तो स्टेला आणि जाकोबच्या हालचाली बारकाईने टिपत होता.

शेवटी प्रिस्टने लग्न सोहळा संपवून त्यांचं लग्न लागल्याचं जाहिर केलं. सुझान आणि डॅनियलने एकमेकांना किस केलं. समोर जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या सदीच्छा आणि आनंद व्यक्त केला.

रात्री सुझान आणि डॅनियलच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी जोरात सुरु होती. पार्टीत एका कोपऱ्यात स्टेला आणि जाकोब काहीतरी चर्चा करीत होते. तेवढ्यात सुझानचं लक्ष त्यांच्याकडे गेलं

सुझानला पोलीस ऑफीसर ब्रॅटचे शब्द आठवले, '' एक्ट्रा मॅरायटल अफेअर''

ब्रॅटला आलेली शंका खरी तर नाही...

तिच्या मनात डोकावून गेलं. वाकडं तोंड करुन हळू आवाजात ती त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या डॅनियलला म्हणाली,

'' या माणसाला इथे कुणी बोलावलं?''

'' नाही ... मी तर नाही बोलावलं'' डॅनियलने खांदे उचकावीत पटकन उत्तर दिलं.

डॅनियल तिच्याकडे एक टक पाहत गमतीने म्हणाला, '' तुला माहीत आहे... मधमाशी ही नेहमी मधाच्या शोधात असते''

'' डॅनियल प्लीज ... माझा मुड खराब नको करुस... ही वेळ अश्या फालतू गमती करण्याची नव्हे'' ती वर वर तर म्हणाली पण तिची स्टेला आणि जाकोबबद्दलची शंका आता दृढ होत चालली होती.

रिसेप्शन पार्टी आता ऐन रंगात आली होती. लोक छोटे छोटे समुह करुन, हातात मद्याचे ग्लासेस घेवून गप्पा करीत होते. लॉनमध्ये मधेच कुण्या एखाद्या गृपमधून जोरात हसण्याचा आवाज येत होता. पोलिस ऑफीसर ब्रॅट संधी साधून स्टेला आणि जाकोबच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या समुहात सामिल झाला.

'' हाय .. मिसेस फर्नांडीस...'' ब्रॅटने स्टेलाला अभिवादन केले.

'' हॅलो...'' स्टेलाने आपल्या गंभीर चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करीत प्रतिउत्तर दिले.

'' मी आपल्याला डिस्टर्ब तर करीत नाही?'' तिच्या डोळ्यात पाहत तो खोचकपणे म्हणाला.

'' ओह.. नाही ... बिलकुल नाही'' स्टेला म्हणाली.

स्टेलाने जाकोबला त्याची ओळख करुन दिली,

''जाकोब... मि. ब्रॅट''

दोघांनीही हस्तांदोलन केले.

'' नाईस टू मिट यू'' जाकोब म्हणाला.

'' यू टू'' ब्रॅट त्याचा हात जरा वाजवीपेक्षा जास्त जोराने दाबत म्हणाला.

'' हे पोलीस ऑफीसर आहेत आणि गिब्सनच्या केसवर काम करीत आहेत... आणि हा जाकोब ... गिब्सनचा मित्र'' स्टेलाने दोघांची एकमेकांना थोडक्यात माहिती सांगितली.

'' आपण आधी कधी भेटलो?'' ब्रॅटने जाकोबकडे निरखुन पाहत विचारले.

'' नाही ... मला नाही वाटत... म्हणजे मला तर आठवत नाही '' जाकोब आपल्या स्मरणशक्तीवर जोर देत म्हणाला.

तेवढ्यात सुझान तिथे त्यांच्या मधे घुसली.

'' सुझान आज तु फार सुंदर दिसते आहेस'' ब्रॅटने तिची तारीफ केली.

'' थॅंक यू'' सुझान लाजून म्हणाली.

तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखे करुन ब्रॅटने सुझानला म्हटले, ''सुझान ऍक्चूअली...''

आणि तिला गृपपासून बाजुला घेत गृपला म्हटले, '' ऍक्सूज अस प्लीज''

ब्रॅट सुझानला गृपपासून दूर बाजुला घेवून गेला.

सुझान आणि ब्रॅटची एका कोपऱ्यात काहीतरी कुजबुज चालली होती. तेवढ्यात डॅनियल तिथे आला.

'' आय होप... मी तुम्हाला डिस्टर्ब करीत नाही आहे'' डॅनियल म्हणाला.

'' नाही ... नाही ..'' ब्रॅट म्हणाला.

'' काय आहे ?'' सुझानने विचारले
डॅनियलने कुणीतरी पाठविलेला एक फुलांचा गुच्छ सुझानसमोर धरला. सुझानने तो घेवून त्यात खोसलेले कार्ड बाहेर काढले. त्या कार्डवर लिहिलेलं होतं, '' कॉग्रॅच्यूलेशन्स ऍन्ड हार्टली बेस्ट विशेस... फ्रॉम गिब्सन ... टू माय लव्हली सिस्टर ...'

बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. फक्त एकमेकांकडे आश्चर्याने बघत राहाले.
क्रमश:...





















Marathi Novel - Black Hole Ch-24 कॉफी हाऊस

संध्याकाळची वेळ होती, सुझान आणि डॅनियल हातात हात गुंफून फुटपाथवर चालत होते.

एका कॉफी शॉपकडे पाहून डॅनियल म्हणाला, '' चल कॉफी घेवूया''

'' थकलास ... इतक्या लवकर .. ही तर सुरवात आहे डियर ... अजुन तर फार मोठा पल्ला गाठायचा आहे..'' सुझान त्याला चिडवित म्हणाली.

'' चालत राहाणंच जिवन नव्हे... जिवनात चालता चालता मधे मधे काही मैलाचे दगडही येत असतात... त्या मैलांच्या दगडांवर थांबने आणि मागे वळून आतापर्यंत आपण किती समोर पोहोचलो आहोत हे जाणण्यातही एक आनंद असतो...'' डॅनियल अगदी फिलॉसॉफीकल होवून बोलत होता.

'' असं म्हणतोस.. तर चल थोडी थोडी कॉफी घेवूया आणि पुन्हा ताजेतवाने होवून पुढचं मार्गक्रमण करुया...'' सुझान गालातल्या गालात हसत म्हणाली.

ते दोघेही कॉफी हावूसमध्ये शिरुन एका कोपऱ्यात एकमेकांच्या समोर बसले.

सुझानने एक कागद आपल्या पर्समधून काढला आणि त्यावर ती काहीतरी मोजत बसली.

' मला वाटते तुही तुझ्या मित्रांची यादी तयार केली असावी'' सुझान तिच्याजवळच्या कागदावर काहीतरी आकडेमोड करीत म्हणाली.

'' कशासाठी? '' डॅनियलने निरागसपणे विचारले.

सुझान एकदम तिची कागदावर चाललेली आकडेमोड थांबवून त्याच्याकडे रागाने पाहात म्हणाली, '' कशासाठी म्हणजे?... लग्नाच्या पत्रीका वाटण्यासाठी ... डॅनियल खरच तु किती अबसेन्ट माईंडेड आहेस.. आता कृपा करुन हे विचारु नकोस की कुणाचं लग्न?''

डॅनियल गोरामोरा झाला होता. पण तसं न दाखविता त्याने कॅफेत इकडे तिकडे पाहत वेटरला बोलावले. वेटर येवून अदबिने त्याच्याजवळ उभा राहाला.

'' दोन ब्लॅक कॉफीज प्लीज''

त्याने ऑर्डर दिली तशी वेटर तिथून निघून गेला.

सुझान पुन्हा आपल्या कामात मग्न झाली आणि डॅनियल कॅफेमधे इकडे तिकडे पाहू लागला. त्यांच्यापासून बरंच दूर, एकदम विरुध्द कोपऱ्यात, डॅनियलचं लक्ष आकर्षीलं गेलं.

'' सुझी'' डॅनियलने तिकडे पाहत सुझानला आवाज दिला.

सुझानने त्याच्यावर एक ओझरती नजर टाकली आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाली.

'' सुझी ... तिकडे कोपऱ्यात तर बघ'' डॅनियलने पुन्हा तिला हटकले.

सुझानने डॅनियलने निर्देशित केलेल्या कोपऱ्यात बघितले. त्या कोपऱ्यात जाकोब आणि स्टेला गहन विचारात आणि चर्चेत डूबलेले एकमेकांसमोर बसले होते. त्यांच्या समोर टेबलवर काही कागदही पसरलेले होते.

त्यांना पाहताच सुझानच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती एकदम उठून उभी राहाली. आधीच जाकोब तिला एकदा समुद्र किनाऱ्यावर त्यांच्यावर वॉच ठेवतांना आढळला होता. तेव्हापासून तिच्या मनात जाकोबबद्दल एक तिव्र तिटकारा होता. आणि आता स्टेलाचं जाकोबसोबत असं कॅफेमध्ये येणं सुझानला बिलकुल आवडलेलं नव्हतं.

'' चल ... लवकर चल इथून ... आपण दुसरीकडे कुठेतरी जावूया'' सुझान बाहेर दाराकडे जात म्हणाली.

डॅनियलही तिच्या मागे मागे मुकाट्याने चालायला लागला.

क्रमश:...

चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

- विंदा करंदीकर

Famous proverb -

Take the world as it is, not as it ought to be.

---

German Proverb, Sayings of German Origin

Great Quotes-

Great Quotes-

It is a wise person that adapts themselves to all contingencies; it's the fool who always struggles like a swimmer against the current.

---

Annonymous

Marathi Books - Black Hole CH-23 बाहेर पडण्याचा मार्ग

जाकोब आणि स्टेला अजुनही 'A' लेव्हलच्या ब्लॅकहोलमध्ये होते.

'' चल आता परत जावूया'' जाकोब स्टेलाला म्हणाला.

जाकोब रस्ता बदलून एकीकडे चालू लागला आणि स्टेलाही रस्ता बदलून त्याच्या सोबत सोबत चालू लागली. जाकोबने चालता चालता आपल्या खिशातला 'तो' टेनिस बॉल बाहेर काढला. त्या बॉलवर काढलेलं मानवी कवटीचं चित्र स्टेलासमोर धरीत तो म्हणाला,

'' बघ हा बॉल आता आपल्याला बाहेर पडायचा रस्ता दाखवेल''

जॉकोबने तो बॉल खडकांच्या उतारावर दोन खडक एकाला एक लागुन तयार झालेल्या खाचेत ठेवला. तो बॉल उतार असल्यामुळे त्या खाचेत खाली घरंगळायला लागला. जाकोब त्या बॉलचा पाठलाग करायला लागला आणि स्टेलाही त्याच्या मागे धावू लागली.

'' आपण जर या बॉलचा पाठलाग केला तरच आपण बाहेर जावू शकू'' जाकोब गमतीने म्हणाला.

शेवटी तो बॉल घरंगळत जावून त्या गुहेतील एका विहिरीत पडला.

'' हिच ती विहिर आहे जिच्यात आपल्याला बाहेर पडण्यासाठी उडी मारावी लागणार आहे'' जाकोब म्हणाला.

जाकोबने स्टेलाचा हात पकडला आणि दोघांनीही त्या विहिरीत उडी मारली. आता स्टेला उडी मारण्यात पटाईत झाली असं दिसत होतं.

जाकोब आणि स्टेला आता त्या वाड्याच्या समोर विहिरीच्या शेजारी जमिनीवर पडले. दोघंही वर आकाशाकडे पाहत उठून उभे राहाले. इतका वेळ आत ब्लॅकहोलमध्ये त्यांना चारही बाजुला खडकाव्यतिरीक्त काहीही दिसलं नव्हतं. आता वर आकाश आणि आजुबाजुला मोकळं मैदान आणि झाडी पाहून त्यांना हायसं वाटलं. जाकोब तिथेच आजुबाजुला जमिनीवर टॉर्चच्या प्रकाशात काहीतरी शोधू लागला.

'' काय शोधतोस?'' स्टेलाने विचारले.

तेवढ्यात जाकोबला टॉर्चच्या उजेडात तो जे शोधत होता ते दिसलं असावं. कारण खाली वाकुन त्याने काहीतरी जमिनीवरुन उचललं. तो 'तो' टेनिस बॉल होता, ज्याच्यावर मानवी कवटीचं चित्र काढलेलं होतं.

आता दोघंही सोबत सोबत रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या आपल्या कारकडे चालू लागले.

'' तर मग... आपण कसे गिब्सनला शोधणार आहोत?'' स्टेला मुळ मुद्यावर आली.

'' त्याचाच तर आपल्याला आता विचार करावा लागणार आहे'' जाकोब आपल्याच धुंदीच चालत म्हणाला.

स्टेला त्याच्यासोबत चालत असतांना आश्चर्याने त्याच्याकडे पहायला लागली. तिला त्याच्या बेफिकीरपणाचं आश्चर्य वाटत होतं.

'' पण एक गोष्ट मला अस्वस्थ करतेय'' स्टेला म्हणाली.

'' कोणती?'' जाकोबने विचारले.

'' तो सडलेला आणि प्राण्यांनी कुरतडलेला माणूस त्या गुहेत जिवंत राहू शकला नाही ... तर गिब्सन जर त्या गुहेत अडकला असेल तर तो कसा काय जिवंत राहू शकतो?'' स्टेलाने जसे स्वत:लाच विचारले.

जाकोब काहीच बोलला नाही. कारण त्याच्याजवळ त्याचे काहीच उत्तर नव्हते.

क्रमश:...

Famous thoughts-

Adaptability is not imitation. It means power of resistance and assimilation.


---

Mahatma Gandhi

Marathi literature - Black Hole CH-22 वेळेचं मोजमाप

जाकोबने स्टेलाच्या घड्याळाचा आणि त्याच्या घड्याळाचा टाईम जुळवून बरोबर 7 असा केला आणि स्टेलाची घड्याळ तिथेच 'A3'असं ज्या खडकावर कोरलं होतं त्यावर ठेवून दिली. नंतर स्टेलाकडे वळत तो म्हणाला, '' चल आता माझ्याबरोबर या ब्लॅकहोलमध्ये उडी टाक''

जाकोब तिला तिचा हात धरुन त्या विहिरीकडे नेवू लागला तसा स्टेलाने आपला हात सोडवून घेतला.

'' काळजी करु नकोस ... ही उडीही आधीच्या उडीसारखीच आहे...'' जाकोब तिला हिम्मत देण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

शेवटी जाकोबने स्टेलाला याही ब्लॅकहोलमध्ये उडी मारण्यास तयार केलं आणि दोघांनीही 'A3'ब्लॅकहोलमध्ये उडी मारली. स्टेलाच्या किंकाळीचा आवाज सुरवातीला हळू हळू कमी झाला आणि मग अचानक बंद झाला.

जाकोब आणि स्टेला दोघंही एका दुसऱ्या खडकाळ गुहेत जमिनीवर खाली पडले. हळू हळू ते उठून उभे राहाले. स्टेलाने या गुहेत काहीतरी वेगळे असेल या आशेने आपल्या टॉर्चच्या प्रकाशात आजुबाजुला बघितले. जाकोबने उठल्याबरोबर आपल्या टॉर्चचा प्रकाश एका बाजुला टाकला. तिथे एक विहिर होती आणि त्या विहिरीच्या शेजारीच एक खडक होता. त्या खडकावर 'Exit' असं कोरलेलं होतं.

'' इथे फक्त एकच विहिर?'' स्टेलाने विचारले.

'' नाही अजुन एक आहे तिकडे... B1... का बरं? '' जाकोबने विचारले.

'' नाही ... असंच विचारलं'' स्टेला म्हणाली.

'' तुला विहिरीत उड्या मारण्याची चांगलीच मजा येत आहे असं दिसतं...'' जाकोब तिला चिडवित म्हणाला.

दोघंही एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात गोड हसले. जाकोब तर मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे तिच्या सौंदर्याने मोहून जावून तिच्याकडे एकटक पाहत होता. तिने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली.

जाकोब स्टेलाला ज्या विहिरीच्या बाजुला खडकावर 'Exit' असं कोरलेलं होतं तिथे घेवून गेला.

'' ही 'Exit' विहिर आहे, जिच्यातून आपल्याला 'A' लेव्हलला परत जायचं आहे ''

जाकोब आणि स्टेला आता 'Exit'विहिरीच्या अगदी काठावर उडी मारण्याच्या पावित्र्यात उभे होते.

'' असं होवू शकतं का की गिब्सन असाच एखाद्या ब्लॅकहोलमध्ये अडकला असेल?'' स्टेलाने विचारले.

'' हो... होवू शकतं'' जाकोब अगदी सहजतेने म्हणाला.

'' तर मग आपण सगळ्या लेव्हल्सच्या सर्व ब्लॅकहोलमध्ये गिब्सनचा शोध घेतला तर?'' स्टेलाने विचारले.

'' हं... बरोबर आहे तुझं... या परिस्थितीत कुणीही हाच विचार करेल... पण ते जेवढं वाटतं तेवढं सोप काम नाही आहे... ते फार जोखिमीचं काम आहे...''

स्टेला पुढे काही विचारण्याच्या आधीच जाकोबने तिचा हात आपल्या हातात घेवून 'Exit'विहिरीत उडीसुध्दा मारली.

जाकोब आणि स्टेला आता लेव्हल 'A' च्या गुहेत जमिनीवर खाली पडलेले होते. ते एकमेकांकडे बघत, गालातल्या गालात हसत उठून उभे राहाले. उठून उभा राहाल्याबरोबर जाकोब त्या 'A3'असं कोरलेल्या खडकावर ठेवलेल्या स्टेलाच्या घड्याळाजवळ गेला. जाकोबने ते घड्याळ उचललं आणि आपल्या घड्याळाशी जुळवीण्यासाठी जवळ धरीत म्हणाला,

'' बघ तुझ्या घड्याळात 7.15 वाजले आहेत तर माझ्या घड्याळात 8.15 वाजले आहेत...''

'' अरे खरंच की ... पण असं कसं?'' स्टेला त्या घड्याळाकडे बघत आश्चर्याने म्हणाली.

'' या ब्लॅकहोलच्या वेळेचं मोजमाप हे इथल्या मोजमापापेक्षा पुर्णपणे वेगळं आहे... इथले 15 मिनिट म्हणजे या ब्लॅकहोलमधील वेळेच्या 1 तासाबरोबर आहे... '' जाकोब स्पष्टीकरण देत होता.

'' बापरे... खरंच की ...किती अदभूत... अशाने तर माणूस त्याच्या एका जिवनात कितीतरी आयुष्ये जगु शकेल...'' स्टेलाला सगळं कसं विस्मयजनक वाटत होतं.

'' तुला किती आयुष्ये जगावीशी वाटतात?'' जाकोबने विचारले

'' गिब्सनशिवाय कितीही आयुष्ये जगली तरी त्याला गिब्सनसोबत जगलेल्या एका जिवनाची सर येणार नाही'' स्टेला गंभीर होवून म्हणाली.

जाकोबने तिच्याकडे प्रेमाने बघत तिची घड्याळ परत केली.

क्रमश:...