सखे,
अगं ऐक ना
अगं तो..तो....
ऐन चैत्रात बंडाचा लाल झेंडा उभारत होता
म्हणून, त्याला म्हटलं
काय हे ?
एवढा काय पेटतोस ?
तर
इतका चिडला..
इतका चिडला..
आषाढापर्यंत धगधगतच राहिला
रस्ताभर ठिणग्या
मी जाणच बंद केलं त्याच्या गल्लीतनं..
४ महिने वागून घेतलं मनासारखं त्यानं
आणि
आणि आता म्हणे..
चक्क
" शांती , शांती " म्हणत हिरवी शाल पांघरुन बसणार आहे वर्षभर
सोंगाड्याच आहे नुसता..
- स्वप्ना
आज
सहजच वाटलं
तुझ्या छायेखाली यावं
नाही रे,घडलं काहीच नाही
बस्स..
अगदी सहजच
भरल्या आभाळाची
काळी नजर
मला लागण्याआधी
तुझ्या धगधगत्या निखार्यांत जळून जाईल
नक्कीच....
.म्हणून आले..
- स्वप्ना
चैत्र अग्निशिखा पेटवून जातो
अबोलीस गुलमोहर उजवून जातो
लज्जा हिरवी गळते अलवार
लालबुंद तो कटाक्ष चेतवून जातो
रक्तवर्णी पाकळ्या टोचती तनुस
स्पर्श उष्णसा फुलवून जातो
दिन बेभानसे पेटता फुलांनी
रात ठिणग्यांनी सजवून जातो
रात ठिणग्यांनी सजवून जातो
निखारे तो मेघांनी विझवून जातो
भले नाकार सत्य तू स्वप्ना
गुलमोहर तुज सुलगवून जातो
- स्वप्ना
गुल्लू
कट्टी फू..
अज्जिबात अज्जिबात
बोलणार नाही
मी तुझ्याशी
ज्जा
नाही येणार तुझ्यापाशी
ज्जा
जळत रहा तू एकटाच
हुं....
तुझ्याखाली
उभं असतांना
’ त्याने ’ माझा हात काय धरला.
टुप्पदिशी
मोठ्ठ्या शेंगेने
त्याला प्रसाद दिलास
डोक्यावर..
आणि खिदळलास
हिरव्या हिरव्या पानांआडुन
लाल लाल दात दाखवत..
जळकुटा कुठला..
- स्वप्ना
वाटतं,
मैना व्हावं..
बागडावं
गाणी गात तुझ्या फांद्याफांद्यांवर
गोंजारावं
तुझ्या अग्निफुलांना चोचीनं अलवार
अन
छेडावं तुझ्या राकट देहाला
नाजूक पंखांच्या फडफडीने
अन
पेटवावी
तहान
आगीत....
- स्वप्ना
त्या वळणावर
रस्त्याच्या दुतर्फा
तू उभा असतोस
माझी वाट पहात..
अन
तिथे पोहचण्याआधीच
मीही तिथेच पोहचलेली असते
तुझ्या अनावर ओढीने..
वार्याच्या झुळका
तुझ्या पाकळ्या माझ्यावर उधळत येतात
अन त्या वळणावर पोहचतांना
माझी हळवी स्पंदनं कोलमडतात
तुझे निखारे माझ्या वाटेवर
पसरवून तू मात्र निवांत उभा असतोस
" मला तुडव वा भिडव " म्हणत..
खाली पडलेलं एकेक फुल
पायदळी तुडण्यापासून वाचवत
मी ते वळण पार करते
टुपकन कुठल्याशा फांदीवरली
एक मोठ्ठी शेंग
माझ्या पुढ्यात दाणकन आदळून
मला घाबरवते..
पण मी मात्र तुझे निखारे चुकवत
त्या वळणाला सहज पार करते..
वळून पाहतांना..
तुला मनात बंदिस्त करते
नि ओढणीत अडकलेल्या तुझ्या पाकळ्या
अलवार पर्समधल्या वहीत निजवते..
- स्वप्ना
लांबलेला पाऊस
रानाची उजाड कूस
आणि
गुलमोहराचा आटता बहर !
सपासप चाबुक फिरवलाय ' त्याने ' यंदा..
विचार करत करतच
शेवाळलेल्या कंपाउंडच्या भिंतीनं
माझी पावलं तुझ्या दिशेने निघतात
तर
गलबलून माझं स्वागत करायला तू
पुढे झेपावलेला
माझ्या लक्षात येते
तुझी भोळीशी धडपड
विरळसे धगधगते
तुझे निखारे
माझ्या नजरेत आणण्यासाठीची..
माझ्या खांद्यावर झुलणार्या
तुझ्या मऊशार पानांचा हिरवा स्पर्श
जणू माझी समजूत काढतो
बहर येतो अन जातो..हेच अंतिम सत्य..
तुला टेकून मी पहुडते
उन्हं कलत असतात
तू डोलत असतो
कुठूनशी एक चोरटी जलधार बरसून जाते
तुझ्या ओल्या खोडावरुन हात फिरवत फिरवत
मी आजूबाजूस बघते
तर
तुझा शेजारी निलगिरी टक लावून बसलेला
अन शेवगा तर बावराच..शिट्टी मारत बसलेला
अन गुलाब तर..
तुझ्याकडे येतांनाच त्याने मला ओरखडलेले..
रागाने मी मनातल्या मनात xx
तू खदखदून हसतो
मीही हसते
परत कधी रे ?
उत्तर माहित असलेला प्रश्न ओठांवर येतो..
इवल्याशा पानांना सोबत घेऊन
तुझ्या कुशीतून अलगद एक फुल माझ्या ओंजळीत पडतं..
आणि मला उमगतं
झाडावरच्या अग्निपाखरांनी नवीन घर शोधलंय..
माझं मन....
- स्वप्ना
रणरणत्या दुपारी
गुलमोहराखाली
मी उभी असते
लोकांना वाटतं..
सावलीसाठी
..
झाडावरुन तरंगत
अलगद
माझ्यावर
विसावणार्या
अग्निफुलांच्या आगीत
जळायचं माझं वेड
त्यांना कळेल ?
- स्वप्ना
नक्कीच तू
तूच
दुसरं कोण येणार आहे माझ्या खोलीत रात्रीचं ?
हे बघ
हे बघ मला तुझे ठसे सापडलेत
लाल नारिंगी
सार्या खोलीभर
पाकळ्याच पाकळ्या विखुरल्यात
रात्री खिडकी उघडीच राहिली होती वाटतं....
- स्वप्ना
माझ्या मैत्रिणी हसतात मला
म्हणतात,
काय पाहिलंस त्या वेड्यात ?
तू अशी शांत शीतल
तो असा जहाल भडक
कशी त्याच्या मोहात पडलीस ?
हिरवाईतलं तुझं ’ पेटणं ’ आठवते
अन मी मनोमन हसते..
मैत्रिणींना....
- स्वप्ना
गुलमोहरा ,
आठवतं तुला ?
जेव्हा ' त्याने '..
तुला माझ्या ओंजळीत भरलं होतं..
मी विचारात पडले होते
की ,
मला चेतवणारी आग
तुझी
की
' त्याची ' ?
स्वप्ना
त्या वळणावर
रस्त्याच्या दुतर्फा
तू उभा असतोस
माझी वाट पहात..
अन
तिथे पोहचण्याआधीच
मीही तिथेच पोहचलेली असते
तुझ्या अनावर ओढीने..
वार्याच्या झुळका
तुझ्या पाकळ्या माझ्यावर उधळत येतात
अन त्या वळणावर पोहचतांना
माझी हळवी स्पंदनं कोलमडतात
तुझे निखारे माझ्या वाटेवर
पसरवून तू मात्र निवांत उभा असतोस
" मला तुडव वा भिडव " म्हणत..
खाली पडलेलं एकेक फुल
पायदळी तुडण्यापासून वाचवत
मी ते वळण पार करते
टुपकन कुठल्याशा फांदीवरली
एक मोठ्ठी शेंग
माझ्या पुढ्यात दाणकन आदळून
मला घाबरवते..
पण मी मात्र तुझे निखारे चुकवत
त्या वळणाला सहज पार करते..
वळून पाहतांना..
तुला मनात बंदिस्त करते
नि ओढणीत अडकलेल्या तुझ्या पाकळ्या
अलवार पर्समधल्या वहीत निजवते..
- स्वप्ना
येणारा
प्रत्येक दिन
प्रत्येक रात
पाकळ्या पाकळ्यांनी फुलत जाणारी
आग
ठिणगी ठिणगीने वाढत जाणारी
वर्षभराचे शांत हिरवे वस्त्र
एक
एक
करुन
उतरवत
आदिम आगीने फुलत
बंड करुन उठतो
गुलमोहर
बहरतो
गुलमोहर..
- स्वप्ना
सखे,
अगं ऐक ना
अगं तो..तो....
ऐन चैत्रात बंडाचा लाल झेंडा उभारत होता
म्हणून, त्याला म्हटलं
काय हे ?
एवढा काय पेटतोस ?
तर
इतका चिडला..
इतका चिडला..
आषाढापर्यंत धगधगतच राहिला
रस्ताभर ठिणग्या
मी जाणच बंद केलं त्याच्या गल्लीतनं..
४ महिने वागून घेतलं मनासारखं त्यानं
आणि
आणि आता म्हणे..
चक्क
" शांती , शांती " म्हणत हिरवी शाल पांघरुन बसणार आहे वर्षभर
सोंगाड्याच आहे नुसता..
- स्वप्ना
तसं सकाळीही तू पेटलेलाच असतो
आता आग म्हणजे आगच ना !
पण कोवळी उन्हं जाणती होतात
अन तू धगधगायला लागतो..
जाणून असते मी
म्हणून
त्या रस्त्याने दुपारची निघतही नाही..
खिडकीतूनच डोकावते
तुला पाहते
एकटक
पाहता पाहता डोळ्यांत पाणी जमा होते
ऊर धपापते
पण नजर तुझ्यावरुन हटत नाही
तुझी हिरवी मंद सळसळ
लाल नारिंगी तळमळ
माझ्यावर गारुड करतात
खळकन पापणीआड लपलेला थेंब गालावरुन ओघळतो
मी भानावर येते
खिडकी लावते
हं , आता लक्ष विचलित होणार नाही..
तितक्यात,
इकडे कम्प्युटरवर गुलमोहराचा स्क्रीनसेव्हर चालू होतो....
- स्वप्ना
गुलमोहरा ,
आठवतं तुला ?
जेव्हा ' त्याने '..
तुला माझ्या ओंजळीत भरलं होतं..
मी विचारात पडले होते
की ,
मला चेतवणारी आग
तुझी
की
' त्याची ' ?
- स्वप्ना
कित्तीदा मी स्वप्नात पाहिलं होतं
हिरव्यागार टेकडीवरचं ते गुलमोहराचं झाड
अन
झाडाखाली निवांत पहुडलेली मी..
आज....
पायाखाली चक्क लुशलुशीत हिरवळ
अन समोर अग्निशिखा
कित्ती
साधीशी इच्छा
साधसं स्वप्नं
पण ते पूर्ण होण्यासाठी
मला ' जळावं ' लागलं....
- स्वप्ना
चैत्रातली एक झुंजूमुंजू
रविकिरणांनी नाहणारी हिरवाई
किलबिलते पक्षी
गुणगुणती हवा
नदीत उतरते प्यासे मेघ
अन हे आरसपानी सौंदर्य
डोळ्यांनी पिणारी मी
नदीकिनारी..
सवयीने
नजर स्थिरावली
इवलीशी हिरवी-पोपटी पानं ल्यालेल्या गुलमोहरावर
अन
अचानक कळलं त्याचं गुपित
एका फांदीवर लपलेलं
लालभडक तांबडी रंगातून उलगडणारं
काय आहे ते ?
पक्षी ?
नाही..
ही तर..
ही तर..आगीची नक्षी..
गुलमोहर......गुलमोहर फुलतोय.......
माझ्या ओठांवर फुललेलं स्मित
तनमनात भिनत गेलं
अन उठवत फिरलं
शेकडो लहरी
बैचैनीच्या..
पडली ठिणगी
त्या लाल तांबड्या फुलांची
माझ्या रोमारोमांत
आता ही आग शमणार नाही
पेटवत जाईल सारं रान
नाही वाचणार मीही
सारे दिन,सार्या राती
उठतील ठिणग्याच ठिणग्या
पानापानांवर
झाडाच्या अन वहीच्याही..
हा जन्म गुलमोहराचा
जन्म..
माझ्यातल्या आगीचा..
- स्वप्ना
प्रस्तावना :
गुलमोहर..माझं आवडतं झाड.
माझ्यासाठी ते निव्वळ एक झाडच नाही तर माझ्याशी संवाद साधणारं एक मोहक अस्तित्व आहे.
माझ्या प्रिय गुलमोहरावर मी लिहलेल्या काही कविता ह्या थ्रेडवर मी पोस्ट करणार आहे.