Showing posts with label बरं झालं तू गेलीस ते. Show all posts
Showing posts with label बरं झालं तू गेलीस ते. Show all posts

बरं झालं

तुझा विचार होता म्हणून सार केल

घोर अंधारातून तुला बाजूला नेल

माझ काय दुःख वाटेत होत ते

तुझ्या वाटणीच नव्हत

बर झाल तू गेलीस ते....

अजुनही माझ्या श्वासात तु अडकलास

माझ्या गात्रात तुच बरसतोय

पाउस बनुन...

थेम्बथेम्बात तुच हसतोस

अश्रु बनुन...

दुरावा तर नाहीच अजून

तरी म्हणतोस

"बर झाल तू गेलीस ते "


कल्पी जोशी १३/०५/२००९

माझ्या मनी स्वप्नांचे आभाळ सांडलेले

पदरात चन्र्द तिच्या , वांझोटी रात्र गेली !


आक्रंद फोडतो हा छातीतला नगारा

छद्मी ते हासले रे, करपून रात्र गेली !


पालखीत आल्या घरी या जळजळीत लाटा

फुलला तो सूर्य त्यांचा ,पहाटेच रात्र मेली !!


"बर झाल ती गेली "


oceanheal

उपाय नाही म्हणुन मनाला समजावतो

तू परत येणार नाहीस हे स्वतालाच बजावतो

माज्या चूका शोधत राहतो

अन्तरमुख होउन मनाशी म्हणतो

"बर झाल तू गेलीस ते".......


तुझे आपल बर आहे

स्व:ताशीच लपंडाव खेळतोस

वेडा झालास की आठवण येते

आठवण आली की वेडा होतोस



का तू असा स्व:तालाच फसवतोस

बोलायला पुन्हा मोकळाच



"बर झाल तू गेलीस ते "

kadambari

खर सांगू

अग पुरता विखुरलो होतो

नुसताच बावरलो होतो

पडक्या भिंतिना सावरत जगत होतो

तुझ्या आठवणीना अश्रुतुंन पित होतो

जीवनात फक्त दुखच उरले होते

बर झाल तू गेलीस ते !!!



१५/०५/०९

आठवण तुझी आली

वेडा का मी होतो

का वेडाच मी म्हणुन

सतत तुलाच आठवतो

कळतय वाटत कधी कधी

केंव्हा काही कळतच नाही


मनाशी मनाचाच लपंडाव हा

ठोके छातीत गीरक्या मारते


"बर झाल तू गेलीस ते "


oceanheal

अश्रुन्च्या थेम्बा थेम्बात शोधतो तुला

झाडाच्या पानाफुलात होतो तुझाच भास

सुगन्ध मोगर्याचा सान्गतो तुझाच सहवास

निसर्ग तू आणि मी वेगळा नाहीच मुळी

तरीही राहुन राहुन मन म्हणतच राहत

"बर झल तू गेलिस ते "का?



कल्पी जोशी १५/०५/२००९

" बरं झालं तू गेलीस ते ! "



समजले तर मला

अश्रु न सांगता का ते आले



समजले तर मला

विचार का फक्त तुझा



समजले तर मला

आठवण का तुझी



समजले तर मला

भास तुझा असण्याच्या



समजले तर मला

आकांत तुझा नसन्याचा



समजले तर मला

ना राहीलो मीच माझा



समजले तर मला

अबोल बोली समजन्याचा



समजले तर मला

" बरं झालं तू गेलीस ते ! "

Pankaj Rokade

मनाशी म्हनतो खरा.

अन्तर्मुख देखिल होतो

पण आठवण आली की वेडा होतो

आणि पुन्हा ये म्हणायला भाग पाडत

तरीही खर का खोट मन म्हणतच रहात



बर झाल तु गेलीस ते............



कल्पी जोशी ०५/०५/२००९

खरच का बर झाल ? तू गेलीस ते....

नेहमीच म्हणतो जरी

कळ माझी मलाच कळते

उपाय नाहीच आता

"बर झाल तू गेलीस ते"


oceanheal

विसरलास मला हे खर का मानू मी

विसरला असतास तर माझ्या ह्रुदयात



तुझी स्पन्दण नसती ऐकली मी



हे मात्र खर आहे ..तु तीळ तीळ तुटतोय माझ्यासाठी

आणी उगाच कारे आव आणतोस

आणि म्हणतोस,



"बर झाल तु गेलिस ते"!



कल्पी जोशी १५/०५/२००९

तू असताना नि नसताना

जाणणयाचा नि जाणवणयाचा

कळतोय अर्थ आता


दुरावा तुझा कधीच नव्हता

धुमसतोय जसा मी तुझ्यात

अजुनही तू तशीच अंगागात धुमसते


"बर झाल तू गेलीस ते "


,oceanheal

एखाद्या संध्याकाळी कातरवेळी खूप एकाकी वाटत..

तुज्या आठवणित मन भरून जात

अणि वेड मन सतत एकाच प्रश्न विचारत

खरच का बर जाला? तू गेलीस ते....



Anagha

तुज्या आठवानितुन बाहेर येण्यासाठी परत तुलाच आठवतो

तू परत येण्यासाठी लाख लाख प्रार्थना करतो

तरीही का मी मनाला समजावतो की

बरं झालं तू गेलीस ते......


अनघा

हौस आहे म्हणुन का

आठवण तुझी मी काढली ?

येणार नाही तरीही पुन्हा

परत परत वाट तुझी पहिली

पण...

कितीही समजावले मनाला

तरी ही आस उरी का उरते ?

"बर झाल तू गेलीस ते ............"

हौसेने तरी आठवण करत जा
वाट पहायची हेच हाती आहे
येईन ना येईन मी कधी
प्रारब्धात माहीत नाही काय आहे
पण ..
ही मीणमीणती आस ऊरातच ऊरते

" बरं झालं तू गेलीस ते !"

बरं झालं तू गेलीस ते
तुज़्या अठ्वनित जगाता येइल
माजी जाली नाहीस तरी
कधीतरी माजी होतीस
यातच समाधान मनाता येइल...

बरं झालं तू गेलीस ते
तुज़्या अठ्वनित जगाता येइल
माजी जाली नाहीस तरी
कधीतरी माजी होतीस

यातच समाधान मनाता येइल...

केलीस ना पारख माझी
दोनच शब्‍दात..." कापरे भरते "
उत्तर आता उरलंच नाही,
जणु नव्हतेच प्रेमास भरते !

जवळ होतेच तरी का ?
खरंच काही सांभाळलं का ?
समर्पण कळलं होतं का ?
चर्र होते नि कापरे भरते !

बरं झालं मी विरून गेले ते,
बरं झालं, हिरा नाही, काच ठरले ते !!