नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।। प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।। समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।। भारत माता की जय ।।
जोगेश्वरी उपनगराच्या मधोमध वसली आहे जोगेश्वरी देवी. महाकाली गुंफेत या देवीचं अतिशय संुदर असं प्राचीन मंदिर आहे. चहुबाजूंनी नवीन बांधकामाचा विळखा पडला असला तरी या मंदिराचं सौदर्यं अबाधित आहे. या मंदिरात प्रवेश करताच क्षणी पावित्र्य आणि मांगल्याने भारलेल्या वास्तूत प्रवेश केल्याचा अनुभव येतो. हजारो वर्षांपूवीर्च्या या गुंफांचं बांधकाम म्हणजे भारतीय भारतीय वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. या गुंफेत जोगेश्वरी महाकाली देवीप्रमाणेच भगवान शंकर आणि श्रीगणेशाचीही मंदिरं आहेत. मंदिराच्या आत प्राचीन कोरीवकाम पाहायला मिळतं. न दुभंगणारी शांतता , प्रसन्न वातावरण अंतर्मुख करतं. भल्या मोठ्या कातळात ही गुंफा खोदलेली असल्यामुळे गुंफेच्या आत बारा महिने गारवा असतो. नवरात्रीच्या काळात या देवळात भक्तगणांची पहाटेपासून रीघ लागलेली असते. सुंदर नक्षीदार भव्य खांबावर तोललेलं हे देऊळ प्रेक्षणीय तर आहेच पण त्याचबरोबर ही देवी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहे अशी श्रद्धा आहे. अशाप्रकारची प्राचीन मंदिरं मुंबईत आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उरली असल्याने जोगेश्वरीच्या या देवळाचं महत्त्व वेगळं आहे. सिमेंटचं जंगल वाढत चाललेलं असताना या मंदिराचं पुरातन सौंदर्यं जपणं मुंबईकरांचं कर्तव्यच आहे.
आपल्या देशात प्रत्येक गाव हा देवीमातेचाच एक अवतार मानला जातो. देवीच्या या अवताराला उत्तरेकडे ' माताजी ' म्हणतात तर दक्षिणेत ' अम्मा '. आपल्याकडे ही देवी येते ' गावदेवी ' होऊन. या देवीच्या मूर्त स्वरुपात म्हणूनच बहुदा फक्त मुखवटा आणि हात दिसतात. अवघे गाव हे तिचे बाकीचे शरीर असते. म्हणूनच गावाला नाव मिळते ते त्या देवीचेच. जसे , चंडीवरून चंडीगड , कालीमातेवरून कोलकाता , श्यामलादेवीवरून शिमला , नैनादेवीवरून नैनीताल आणि ' मुंबादेवी ' वरून मुंबई!
गावाने या ग्रामदेवतेचा योग्य मान राखला नाही की ती ' मरीआई ' चा भयावह अवतार धारण करते. रोगराई आणते , मृत्यूचे तांडव मांडते , दुष्काळाने ग्रासते. ' जरी ' च्या अवतारात ती लहान मुलांना कांजिण्याच्या तापाने ग्रासते. मग देवीचा कोप थांबावा यासाठी गावातील पुरुष क्षमायाचना करतात , स्वत:ला शिक्षा करून घेतात. स्त्रिया देवीला शांत करण्यासाठी दही वाहतात. तिला बांगड्या , फुलांचे हार अशी सौभाग्यलेणी अर्पण करतात. देवी जेव्हा शांत होते तेव्हा तिला ' शितलादेवी ' म्हणतात.
देवीच्या ' जरी-मरी ' अवताराचे पुराणात वर्णन आढळते ते हे असे. पण मुंबईतील प्रमुख ' जरी-मरी ' मंदिरं मात्र या पुराणकथेशी नातं सांगताना दिसत नाहीत.
.................................
जरी मरी माता मंदिर , एस.व्ही. रोड , वांदे पश्चिम
वांद्याला एस.व्ही. रोडवरून लिकिंग रोडकडे जाताना तलावाच्या अगदी समोरच असलेले हे मंदिर सहज लक्ष वेधून घेते. मंदिरावरची ' जरी-मरी माता मंदिर ' पाटी दूरूनच वाचता येईल अशी. मंदिराने १९९६ सालीच त्रिशताब्दी महोत्सव साजरा केला आहे. म्हणजे मंदिर तब्बल ३१० वषेर् येथे उभे असून ' क्षत्रिय मराठा परीट ज्ञाति मंडळा ' च्या ताब्यात आहे. सध्या या मंडळाच्या श्ाी जरीमरी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षस्थानी रमाकांत नारायण पुरारकर आहेत.
ट्रस्टच्या कार्यर्कत्यांनी दिलेल्या माहितीनुसार , तीनशेहून अधिक वर्षांपूवीर् वांद्याच्या या परिसरात परिटांची मोठ्या प्रमाणात वस्ती होती. मंदिराच्या समोर आजही तलाव आहेच. पूवीर् मंदिराच्या मागील भागातही असाच तलाव होता. पण काळाच्या ओघात त्यात भराव घालण्यात येऊन आज तिथे इमारती उभ्या आहेत.
मंदिराची दंतकथा अशी सांगितली जाते की , तेथील एका शिळेवर एक गाय रोज पान्हा सोडायची. तिथेच मग गावकऱ्यांनी ' जरी-मरी ' चे अर्थात ' जगवणाऱ्या-तारणाऱ्या ' मातेचे मंदिर उभारले. ही ' जरी-मरी ' देवी ही वसोर्व्या नजीकच्या मढगावच्या हरबादेवी व हरडादेवी यांची धाकटी बहीण मानली जाते. त्यामुळेच आषाढात हरबादेवीच्या यात्रेनंतर आठ दिवसांनी जरी-मरीची यात्रा असते. नवरात्रातही येथे नऊ दिवस जागरण-भजनकीर्तन , हळदीकुंकु आदी कार्यक्रम चालतात. गाडगेमहाराज पुण्यतिथीलाही येथे कार्यक्रम असतो. मार्गशीर्ष महिन्यात देवीची पालखी निघते. संपूर्ण वांदे परिसरात निघणाऱ्या या मिरवणुकीत दहा हजाराच्या आसपास लोक सहभागी होतात.
' जरी-मरी ' चे हे देवस्थान स्वयंभू व जागृत मानले जात असल्याने मोठ्या संख्येने येथे लोक नवस बोलण्यासाठी वा सुपारीचा कौल लावण्यासाठी येतात. पश्चिम उपनगरांच्या वाटेवर हे मंदिर असल्याने सिंधी , पंजाब्यांचीही इथे मोठी गदीर् दिसते.
जिच्या नावातच ' शितल ' ता आहे , ती ही शितलादेवी! शितलादेवी कोळी बांधवांच्या घरात होणाऱ्या प्रत्येक शुभकार्याची साक्षीदार आहे. नवरा-नवरीला हळद शितलादेवीच्या मंदिरात लागते. मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीच्या पाण्याने गोवर , कांजिण्या झालेल्या मुलाला आंघोळ घातल्यानंतर त्या पुन्हा येत नाहीत , असा समज आहे. येथे शांतादुगेर्चे व त्याचबरोबर खोकलादेवीचेही मंदिर आहे. खोकल्याच्या रुग्णांचे आजार खोकलादेवीच्या कृपाप्रसादाने बरे होतात , असा एक समज आहे. मंदिरात अष्टमीला होमहवनाचा मोठा कार्यक्रम असतो , असे मंडळाचे विश्वस्त कमलेश शेटये यांनी सांगितले.
प्रभावती देवीची बहीण मानल्या जाणाऱ्या जाखादेवीचे मंदिर प्रभादेवीपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथील स्थानिक रहिवासी अनंत विठ्ठल कवळी यांनी जवळपास १०० वर्षांपूवी या देवीचे मंदिर बांधले. ते राहत असलेल्या कवळी वाडीतील एका तळ्यात ही मूतीर् सापडली. काहीशा भग्न अवस्थेत असल्याने वेगळ्या संगमरवरी मूतीर्ची प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली. ही मूतीर् ज्या बंदिस्त चौथऱ्यावर आहे , तेथे मूळ स्वयंभू मूतीर्ही आहे. या देवीचाही पौष पौणिर्मेला सात दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो.
बाराव्या शतकातील बिंबिसार राजाची कुलस्वामिनी असलेल्या प्रभावती देवीचे मूळ मंदिर गुजरातमध्ये होते. मुघलांच्या मूतिर्भंजनापासून देवीला सुरक्षित ठेवण्यासाठी कर्नाटकात आणि तेथून माहीमच्या खाडीत आणून ठेवण्यात आले असे मंदिराचे पुजारी जयवंत जोशी सांगतात. शाम नायक या पाठारे प्रभु जातीतील व्यक्तीने १७१४ मध्ये हे मंदिर बांधले. मंदिरासमोरील विहिरीत नायक यांना ही मूतीर् सापडली. प्रभावतीच्या एका बाजूला चंडिका आणि दुसऱ्या बाजूला कालिका देवीची मूर्ती आहे. संवत्सर १७७१ मध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा करतेवेळी कोरण्यात आलेला मोडी लिपीतील पुरातन शिलालेख मंदिराच्या प्राचीनतेची ग्वाही देतो. पौष पौणिर्मेला सात दिवस चालणारा सप्ताह हा वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव! मंदिर परिसरातील दीपस्तंभ यावेळी प्रज्वलित केला जातो. येथे भरणारी मोठी जत्रा आणि तेथे मिळणारा मालवणी खाजा हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे.
वरळी कोळीवाड्यातील प्रमुख देवस्थान म्हणजे गोलफादेवी! उंच टेकडीवर असलेले हे मंदिर १२ व्या शतकात बिंबराजाने बांधल्याची आख्यायिका आहे. गोलफादेवी , साकबादेवी आणि हरबादेवी अशा तीन मूर्ती मंदिरात आहेत. सौम्य रूप असलेल्या गोलफादेवीचा उल्लेख पुराणांमध्येही आढळतो. पौष शाकंबरी पौणिर्मेला भरणारी देवीची यात्रा , चैत्र शुद्ध अष्टमीचा भवानी उत्पत्ती महोत्सव आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत चालणारा शारदीय नवरात्र हे देवस्थानातील तीन महत्त्वाचे उत्सव! कोळी , भंडारी आणि ईस्ट इंडियन या जमाती देवीच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात. मंदिराचा जीणोर्ध्दार सुरू असून लवकरच ते नव्या वास्तूत दर्शनासाठी खुले होईल असे जीणोर्द्धार समितीचे अध्यक्ष विलास वरळीकर यांनी सांगितले.
एकाच शिळेतून कोरण्यात आलेली तुळजाभवानीची मूर्ती हे वैशिष्ट्य असलेल्या पाचपाखाडीतील तुळजाभवानीच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज शिवेंदराजे भोसले यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. सन १६५८ मध्ये तुळजापूरला भवानीदेवीची घटस्थापना दुपारी सूर्य माथ्यावर बारा वाजता तुळजापूराता केली होती. तोच योग ठाण्यातील प्रती तुळजापूर मंदिरात साधण्यात आला.
या दोन देवळांच्या शेजारीच अंबामातेचं देऊळ आहे. ही देवी ' व्याघ्रेश्वरी ' म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. पूर्वी मध्यरात्री नित्यनेमाने एक वाघ या देवळात येत असे अशी आख्यायिका आहे. इथेही अश्विन महिन्यात विजयादशमीपर्यंत मोठी जत्रा भरते. अष्टमीला इथे मोठा होम केला जातो.
परळगावातून शिवडीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना डोंगर फोडावा लागला होता. तो फोडत असताना ९ ऑक्टोबर १९३१ रोजी १० फुटी शिळा सापडली. हीच शिळा पुढे ' बारादेवी ' या नावाने प्रसिद्ध झाली. वास्तविक ही सहाव्या शतकातली शिवाच्या दुमिर्ळ मूर्तींपैकी एक मूर्ती आहे. यात शिवाच्या एकूण सात प्रतिमा असून त्याभोवती पाच ' गण ' असून ते वाद्य वाजवताना दाखवण्यात आले आहेत. तरीही ग्रामस्थांनी याला ' बारादेवी ' असं नाव दिलं. कालांतराने चंडिका देवीच्या मंदिराच्या बाजूलाच एक मंदिर बनवून त्यात या मूतीर्ची स्थापना करण्यात आली. नवरात्रादरम्यान ' चंडिकादेवी ' च्या देवळात होमहवन व इतर पूजाअर्चा केली जाते. ' बारादेवी ' ची फक्त पूजाच केली जाते.
चंडिकादेवी ही सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञातीची ग्रामदेवता आहे. चंडिकादेवीची स्थापना सुमारे १५० वर्षांपूवीर् करण्यात आली. ब्रिटिशांच्या काळात मुंबईच्या गव्हर्नरचं निवासस्थान याच परिसरात होतं. (आता त्या इमारतीमध्ये हाफकिन इन्स्टिट्युट आहे) गव्हर्नरनेही या देवळाच्या देखभालीसाठी ग्रामस्थांना काही निधी व जमीन देऊ केली. तिथे आज संस्थानचं कार्यालय व धर्मशाळा आहे. या सर्व मालमत्तेला ' श्री चंडिका संस्थान ' असं नाव प्राप्त झालं असं या देवस्थानचे एक विश्वस्त मनोहर नारायण पाटील सांगतात. ' नवसाला पावणारी देवी ' असा चंडिकादेवीचा लौकिक असल्याने चैत्र व अश्विानात उत्सवांदरम्यान इथे भाविकांची रीघ लागते
ग्रँटरोड परिसरातील गावदेवीचं देऊळ २५० वर्षांपूवीर्चं आहे. सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञातिबांधवांची ही उपास्य देवता आहे. गावदेवीचं लीलावती असं दुसरं नाव आहे. १८२१ पर्यंत गावदेवीची ही स्वयंभू मूतीर् अरक्षित राहिली. जुनं मंंदिर १८६५ साली तर सध्याचं मंदिर १९६७ साली बांधण्यात आलं. या देवळात गणपतीच्या मूतीर्च्या एका बाजूला गाढव वाहन असलेली शितलादेवीची मूर्ती आणि दूसऱ्या बाजूला गावदेवीची मूर्ती आहे.
मुंबईचं महालक्ष्मी मंदिर प्रसिध्द आहे. इथे महालक्ष्मी , महाकाली आणि महासरस्वती या तीन रूपांत दुर्गामाता प्रकटली असं सांगितल जातं. १७२० पर्यंत हे देऊळ वरळी गावात होतं , परकी आक्रमणांमुळे अनेक देवळातील मुतीर् सुरक्षित ठिकाणी लपवण्यात किंवा विसजिर्त करण्यात आल्या होत्या , त्याप्रमाणे ही मूर्ती समुदात विसजिर्त करण्यात आली होती. काही काळानंतर एका कोळयाच्या जाळयात ही मूर्ती मिळाली. तर काहीजण सांगतात की , जेव्हा इंग्रजांनी मुंबईच्या सात बेटांना जोडण्याचं ठरवलं तेव्हा या कामाचा ठेका दिलेल्या शिवाजी प्रभू नावाच्या ठेकेदाराला अजब गोष्टीचा सामना करावा लागला. समुदात जेवढा भराव घातला जायचा तेवढा पाण्याखाली जायचा. इंग्रजसुध्दा या गोष्टीने हैराण झाले. तेव्हा त्या ठेकेदाराला दृष्टान्त देऊन देवीने सांगितलं की , ' माझी समुदात विसजिर्त केली गेलेली मूर्ती बाहेर काढा , तुमचं काम सोपं होईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूर्ती बाहेर काढल्यानंतर समुद शांत झाला. मग इंग्रजांनीही देवीचं देऊळ बांधायला जागा दिली.
जिच्या नावे या शहराला मुंबई म्हटलं जातं ती मुंबादेवी! साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी या देवळाची स्थापना आत्ताच्या सी.एस.टी विभागात झाली. इंग्रज सरकारने तिथे स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर समाजसेवक पांडूशेठ सोनार यांच्या प्रयत्नाने १७३७ साली आजचं देऊळ बांधण्यात आलं. मुंबादेवीच्या उजव्या बाजूला अन्नापूर्णा देवीची मूतीर् आहे. प्रामुख्याने कोळी , पाचकळशी समाजातील नवविवाहित जोडपी देवीच्या दर्शनाला येतात. मंुगा या कोळी जातीच्या जमातीवरून या देवीला मंुगादेवी असं म्हणत त्याचाच पुढे अपभ्रंश मुंबादेवी असा झाला. पुराणकथेनुसार मंुबारक या विशालकाय प्राण्याचा संहार करण्यासाठी शंकर आणि विष्णू यांच्या तेजापासून या देवीचा जन्म झाला. मंुबारकाचा संहार केल्यानंतर त्याने देवीची क्षमा मागितली आणि तिचा आशीर्वाद मागितला. तेव्हा देवीने त्याच्या नावारून स्वत:चं मुंबादेवी हे नाव घेतलं.
मुंबादेवीच्या थोडं पुढे २२५ वर्षांपासूनचं महाकालीमातेचं काळबादेवी मंदिर प्रसिध्द आहे. साधारण तीनशे वर्षांपूवीर् रघुनाथ जोशी यांनी आझाद मैदान परिसरात या देवीची प्रतिष्ठापना केली होती. त्यांच्या निधनानंतर ब्रिटिशांनी तिचं स्थान हलवून काळबादेवी परिसरात आणलं. ही महाकालिमाता स्वयंभू आणि जागृत असून तिच्यासोबत महालक्ष्मी व सरस्वतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मांसाहारी नैवेद्य न चालणारी मंुबईतील ही एकमेव देवी. मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अमावस्येला इथे मोठी जत्रा भरते.


