Showing posts with label हास्यरंग hasyarang. Show all posts
Showing posts with label हास्यरंग hasyarang. Show all posts

पोलीस : काय हो, तुम्हाला धडक देणार्‍या त्या कारचा नंबर बघितला का किंवा तुम्ही कार मधल्या कोणाला बघितल का ?

नाही, पण मला खात्री आहे कार चालवणारी माझी सासू होती.

पोलीस : तुम्हाला असं का वाटतय ?

मी माझ्या सासूच्या हसण्याचा आवाज चांगला ओळखतो

एका खानावळीवर पाटी होती खानावळ "घरची आठवण "

एक दिवशी मेम्बर ओरडला " मालक. भात कच्चा व पोळी करपलेली आहे
मालक म्हणाला उगीच नाही नाव घरची आठवण ठेवले


राघुरावांकडचा नळ अचानक गळायला लागला.

त्यांनी प्लंबरला फोन करून लगेच यायला सांगीतले त्यावेळेस सकाळचे ११ वाजले होते.

प्लंबर यायला दुपारचे ५ वाजले. त्याच्याकडे राघुराव फारच वैतागुन बघत होते.

प्लंबर म्हणाला,"काय झाले."

"काही नाही. घरात पाणी साठले आहे, तुझी वाट बघता बघता मी पोहणे शिकून घेतले.", राघुराव म्हणाले.

सांता एके दिवशी सुट्टी बघून आपल्या कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळायला घराच्या अंगणात बसला.

त्याच्या मित्राने समोरुन जाताना सांता कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळत असल्याचे बघितले व तो त्यांचा डाव बघायला तेथे थांबला.

"सांता, माझ्या पहाण्यातला हा सर्वात हुशार कुत्रा आहे.", मित्र म्हणाला.

सांता, " नाही रे, पाच डांवां मधले तो फक्त दोनच डाव जिंकलाय."

रजनीकांत जेव्हा पुश-अप्स काढतो...


तेव्हा तो स्वत:ला वर ढकलत नाही.... जमिनीला खाली ढकलतो!!!

झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?

पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.

झंप्या : म्हणजे?

पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.

झंप्या : हात्तिच्या...एवढंच ना.

पंप्या : हो रे...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.

कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!

चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते...

कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..

बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!

एक गृहस्थ आपल्या ४ वर्षाच्या मुलाला डॉक्टर कड़े घेउन गेला
गृहस्थ - डॉक्टर, माझ्या मुलाने चावी गिळली हो ...
डॉक्टर - त्याने चावी गिळून किती वेळ झाला?
गृहस्थ - दहा दिवस झाले असतील.
डॉक्टर - काय ? ... दहा दिवस ... इतक्या दिवसानी तुम्ही त्याला माझ्याकडे आणताय ?
गृहस्थ - इतके दिवस आमच्याकडे duplicate चावी होतीना ... पण ती आजच हरवली बघा.

एक बाई देवाघरी गेल्या.
घरुन अंत्ययात्रा सुरु झाली. काही अंतर गेल्यावर खांदा देणार्‍या एकाला ठेच लागली व तो पडला तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली.
तिरडी खाली पडताच बाई उठुन बसल्या व चांगल्या दहा वर्षे जगल्या. दहा वर्षांनी परत बाईंची अंत्ययात्रा सुरु झाली.

थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणार्‍यांना सांगू लागला," बघुन चाला हं. बघा नाहीतर मागल्या सारखी कोणाला परत ठेच लागेल."

एक अभियंता, एक गणितज्ञ व एक भौतिक शास्त्रातला तज्ञ एका खांबाजवळ उभे होते. त्यांना प्रश्न पडला होता कि या खांबाची ऊंची कशी मोजायची, असे कोणते सूत्र या खांबाची अचूक ऊंची काढून देईल ?
तितक्यात एक मराठीचा प्राध्यापक तेथे आला.
मराठीचा प्राध्यापक," काय झाल ? सर्वच काळजीत दिसताय ?"
अभियंता,"आम्ही या खांबाची ऊंची मोजण्या साठी एक सूत्र तयार करतोय. या सूत्राने याची अचूक लांबी मोजता येणार."
प्राध्यापक," त्यात काय एक्दम सोप आहे ते. मी तुम्हाला ती मोजुन दाखवतो."
मराठीच्या प्राध्यापकाने तो खांब तेथून काढला, जमिनीवर आडवा ठेवला, एक पट्टी आणली व मोजून सांगीतले १८ फूट व खांब परत जागेवर नेऊन ऊभा केला.



गणितज्ञ : अरे आम्हाला याची ऊंची मोजायची होती, याने तर खांबाची लांबी सांगितली !

शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक : बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस . तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.
असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?



बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.

बांता सांताला : तुझा खोकला कसा आहे ?

सांता : खोकला थांबला पण अजुनही श्वास घेताना त्रास होत आहे.

बांता : काळजी नको करु, एक दिवस श्वासही थांबेल.

सांता प्रवेशद्वारा जवळ बसुन परिक्षा द्यायला परवानगी का मागत होता ?

डोकं खाजवा.

कारण ती प्रवेश परिक्षा होती !

सांता पोलीसला फोनवर : हॅलो, पोलीस स्टेशन.हं बोला काय झाले ?
सांता : मला फोनवर धमक्या येताहेत.
कोण धमक्या देताहेत ? कोण आहेत ते ?
सांता : मला टेलिफोनवाले धमकी देताहेत.
काय ?
सांता : मला म्हणताहेत की, "बिल नही भरा तो काट देंगे.

कमलाकर (घाईघाईने) : साहेब ! अहो साहेब ! कॄपया माझी तक्रार लिहून घ्या. माझी बायको हरवली आहे.

साहेब : अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे पोलीस स्टेशन नाहीये. हे पोस्ट ऑफिस आहे.

कमलाकर : अस्स होय ! काय आहे, आनंदाच्या भरात मला काही सुचतच नाहीये ! कुणाला सांगू अन कुणाला नाही ?

एकदा स्वर्गाच्या दारात प्रवेश घेणार्‍यांची रांग लागली होती.

बायकांना अर्थातच स्वर्गात सरळ प्रवेश होता व पुरुषांना रांगेत उभे राहुन परिक्षा दिल्यावर प्रवेश मिळायचा.

पुरुषांची रांग दोन प्रकारची होती.

एका रांगेत असे पुरुष होते जे जिवंतपणी त्यांच्या बायकोच्या धाकात होते तर दुसर्‍या रांगेत जे आपल्या बायकोच्या धाकात नव्हते.
धाकात असणार्‍यांची संख्या प्रचंड होती तर धाकात नसणार्‍या लोकांच्या रांगेत फक्त एकच माणूस ऊभा होता.
सर्व जण त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते व त्याच कौतुकही करत होते.
शेवटी एकाने त्याला त्याच्या हिमतीच कौतुक करत यातील गुपीत विचारले.
तेंव्हा तो म्हणाला, " अरे गुपीत काही नाही, माझ्या बायकोने सांगीतल म्हणुन मी येथे उभा आहे."

बायकोविषयी ओठातलं आणि मनातलं...

ओठातलं : माझी बायको जेव्हा नटते तेव्हा तिला पाहिलं तर कोणीही खल्लास होईल.
मनातलं : आणि ती जे जेवण करते. ते खाल्लं तरी कोणीही खल्लास होईल.
.....................................
ओठातलं : माझी बायको आणि मी वीस वर्षं अत्यंत आनंदात घालवली.
मनातलं : आणि त्यानंतर आमची भेट झाली.
...........................................
मनातलं : लग्नाशिवाय माणूस अपूर्ण असतो.
ओठातलं : आणि लग्नानंतर तो संपतो.

डॉक्टर : तुमचा आणि तुमच्या बायकोचा रक्तगट एकच दिसतोय. रुग्ण : हो, का नाही, गेली २५ वर्षे माझ रक्त पितेय !

सांता डॉक्टरला : डॉक्टर सर्व अंगावर दुखते आहे.
डॉक्टर : कुठे दुखते आहे ?
सांता : (सांता एका बोटाने दाखवतो) हे बघा, डाव्या पायाला हात लावला तर दुखते.
डॉक्टर : आणि ?
सांता : हे बघा, उजव्या पायाला हात लावला तरिही दुखते.
डॉक्टर : आणि ?
सांता : कानाला हात लावला तरिही दुखते.
डॉक्टर : आणि ?
सांता : कपाळाला हात लावला तरिही दुखते.
डॉक्टर : तुम्हाला काही झालेले नाही, तुमचे बोट दुखावलेले आहे

सांता दादर स्टेशनवर पोलिसांना हव्या असलेल्या गुन्हेगाराचा फोटो बर्‍याचवेळापासुन निरखून बघत होता. जवळच्याच एका पोलिसाला संशय आला कि हा त्या अट्टल गुन्हेगाराला ओळखत असेल, म्हणुन तो पोलिस सांताजवळ जावून विचारतो की सांता ईतकावेळ त्या फोटोकडे कां बघत आहे.
सांता पोलिसाला : मी इतक्यावेळचा विचार करतो आहे कि तुम्ही फोटो काढतांनाच त्याला का पकडले नाही.