सुख दुःखाचे फेरे चुकवण्यासाठी
आपण राहावे जन्म भरचे योगी ,
जगताना फक्त सुखाची अपेक्षा करणारे
आपण सर्वच असतो अगदी वेडे भोगी .......
ईशान .
मी संत नसे, न वैरागी
प्रपंचाचा, एक भोगी..
लुटण्या आनंद सुखाचा
मनुष्य मात्र, न मी योगी..
-- संदेश
फुलाचे उमलणे कसे ,
नेहमीच नित्य नवे असते
तसे तुला माझ्याकडे येण्यास ,
काही न काही कारण हवे असते ...
मोगर्याच्या गजरा मला
तूझ्या ओंजळीत टाकायचाय...
नक्कि गंधाळते कोण?
हेच मला पहायचय..
-
मंदार
आजकाल माझे मन सतत ,
तुझेच चित्र साकारते
त्या चित्रात आपले भविष्य,
रेखाटायला मात्र ते अजून नाकारते ........
ईशान
निवडुंग तर नेहमी आशेवर असते..
त्यालाही कधी कधी जास्त पाण्याची गरज असते..
पाण्याविना जगताना तेही मनात रडत असते..
आणि मग तेच पाणी पिऊन आपले पोट भारत असते..
-प्राग..
अंगणातल्या रातराणीला ...
फूलणे तसे नेहमीचे
निवडुंग माझा फुलला आणि ..
सांगून गेला बरेचसे ...
माणुस एकटाच जन्मतो अणि एकटाच मारतो,
कितीही प्रेम केल कुणी तरी बरोबर येत नस्त,
जर अस होत असत तर कसलीच नस्ती खंत,
आणि कधीच नस्ता एकांत. एकांत आणि फ़क्त एकांत.
समस्येचा गाळ पण
ऊन पडल्यावर कडक होतो............
अशाच गाळाची मूर्ती बनवून
एक दर्मिळ मूर्तिकार घडतो............
अभिनंदन
काही गोष्टिंच असच असत
मनात अठवनिंच जाळ असत
त्यात काहींना विसरायच असत
पण विसरण मात्र जमत नसत
आमच्या आयुष्यातून त्यांना जायचच असत
आणि त्यांच्या आठवणीना आम्हाला छळआयाच असत