Showing posts with label चारोळी. Show all posts
Showing posts with label चारोळी. Show all posts

सुख दुःखाचे फेरे चुकवण्यासाठी
आपण राहावे जन्म भरचे योगी ,
जगताना फक्त सुखाची अपेक्षा करणारे
आपण सर्वच असतो अगदी वेडे भोगी .......

ईशान .

मी संत नसे, न वैरागी
प्रपंचाचा, एक भोगी..
लुटण्या आनंद सुखाचा
मनुष्य मात्र, न मी योगी..

-- संदेश

सारखच मिळालं सुख
तर मन कठोर होईल का?
आलेच मध्येच दुख
तर त्याला पचवता येईल का?


अभी

फुलाचे उमलणे कसे ,
नेहमीच नित्य नवे असते
तसे तुला माझ्याकडे येण्यास ,
काही न काही कारण हवे असते ...

मोगर्‍याच्या गजरा मला
तूझ्या ओंजळीत टाकायचाय...
नक्कि गंधाळते कोण?
हेच मला पहायचय..

-
मंदार

आजकाल माझे मन सतत ,
तुझेच चित्र साकारते
त्या चित्रात आपले भविष्य,
रेखाटायला मात्र ते अजून नाकारते ........
ईशान

निवडुंग तर नेहमी आशेवर असते..
त्यालाही कधी कधी जास्त पाण्याची गरज असते..
पाण्याविना जगताना तेही मनात रडत असते..
आणि मग तेच पाणी पिऊन आपले पोट भारत असते..
-प्राग..

अंगणातल्या रातराणीला ...
फूलणे तसे नेहमीचे
निवडुंग माझा फुलला आणि ..
सांगून गेला बरेचसे ...

माणुस एकटाच जन्मतो अणि एकटाच मारतो,
कितीही प्रेम केल कुणी तरी बरोबर येत नस्त,
जर अस होत असत तर कसलीच नस्ती खंत,
आणि कधीच नस्ता एकांत. एकांत आणि फ़क्त एकांत.

सुख-दुखाचा खेल जीवनभर चालणार....
सुखा बरोबर दुखही साजरे करा....
व्हा राजे खेलाचे...
दुखालाही नमते करा....

डोळे ते काळे काळे
ना बाण ना ते भाले
झाल्या जखमा कशा
मला मूळी ना कळाले

समस्येचा गाळ पण
ऊन पडल्यावर कडक होतो............
अशाच गाळाची मूर्ती बनवून
एक दर्मिळ मूर्तिकार घडतो............

अभिनंदन

काही गोष्टिंच असच असत
मनात अठवनिंच जाळ असत
त्यात काहींना विसरायच असत
पण विसरण मात्र जमत नसत

आमच्या आयुष्यातून त्यांना जायचच असत
आणि त्यांच्या आठवणीना आम्हाला छळआयाच असत

आठवण येताच ,
डोळे झाले ओले ,
झुळूक वाऱ्याची,
कानी काही बोले |

चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही

प्रेम हे एकीवरच

करायाच असत ,

स्त्यानारायनाच्या प्रसदा सारख

प्रत्येकीला वाटायाच नसत . .

प्रेमात शब्दांचे

अर्थ शोधायचे नसतात ,

एकमेकांच्या मनातले

भाव फक्त ओळखायचे असतात . . .

मनातला भाव

शबदत आणू नकोस

त्याच शब्दाणी पुन्हा

मनावर घाव घालू नकोस....

मुके असले तरी भाव
शब्द असले तरी घाव
भाव च मनी असु दे
नको तो घाव

जगण्याचे छ्ळने मला
मरताना कळ्ले होते
मरतानाही त्याने मला
छ्ळने सोडले नव्हते