लग्न झाल्यानंतर साधारणपणे १०-१५ दिवसांनी "स्वयंपाक" हा मुद्दा किती महत्वाचा होता हे तरुणांना कळून चुकते. लग्न ठरवताना सुंदरता, शिक्षण, आणि नोकरी हे तीनच मुद्दे विचारात घेतल्याने हा अनर्थ तरुणांवर ओढवतो. मुलीही "लग्नानंतर स्वयंपाकाच बघू..." असाच विचार करत असाव्यात किंबहुना करतात. खरंतर लग्न झालेल्या ह्या मुलींना बाई किंवा काकू म्हणायला हरकत नाही. पण "बाई" म्हटल्यावर ह्या मुलींना प्रचंड राग येतो. विशेषत: सॉफ्टवेअर मधल्या मुलीला. स्वयंपाक आणि घरकामाची जबाबदारी एकटीच्याच अंगावर येईल का काय असं बहुधा त्यांना वाटत असावं.ह्या फील्डमधल्या मुलींशी ज्यांच लग्न झालेले आहे त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती व्यक्त करावीशी वाटते. स्वयंपाक आणि जॉब अशी दुहेरी भूमिका आपण उत्तमरीतीने पार पाडत आहोत असा ह्या बायकांचा गोड गैरसमज असतो.
स्वयंपाकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वप्रथम लग्न न झालेल्या तरुण वर्गाला माझा सल्ला आहे की लग्न ठरवताना, "स्वयंपाक येतो का?" हा प्रश्न आवर्जून विचारावा. " थोडा-थोडा स्वयंपाक येतो" असे उत्तर मिळाल्यास " थोडा म्हणजे किती??" हे विचारायला विसरू नका. प्रत्येकीची definition वेगळी असते. माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले.
आठवड्याचे सातही दिवस स्वयंपाकाचा कंटाळा असणार्या ह्या बायका तुम्हाला सॉफ्टवेअर मध्येच सापडतील.सदानकदा आजचा स्वयंपाक करायचं कसं चुकवता येईल ह्याच खटाटोपात त्या असतात. " आज बाहेर खायला जायचे का?" हा प्रश्न नवर्याने विचारून होण्याआधी त्या "सही...... कित्ती छान......आलेच हं आवरून...." असे म्हणत क्षणार्धात दिसेनाश्या होतात. एकदा बाहेर जायचं ठरवल्यावर , हुशार आणि शहाण्या नवर्याने ते कधीही कॅन्सल करू नये. अन्यथा भांडण होण्याचे ९९% चान्सेस असतात.शेवटी बाहेरून हॉटेलमधले जेवण मागवावे लागते आणि मगच ह्या बायका शांत होतात हे सांगण्याची गरज नसावी. वीक एन्ड ला बाहेर पडण्याची वेळही ह्या बायका अचूक हेरतात.संध्याकाळीच बाहेर पडायचं म्हणजे नवरा "रात्री बाहेरच जेवू" असे म्हणतो हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. चुकून कधी स्वयंपाक करण्याचा योग आलाच तर, "आपण" आज खिचडी बनवूया का? असे प्रेमाने बोलून नवर्यालाही स्वयंपाक घरात ओढून काम करायला लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. काही नवरेमंडळी ह्याला बळी पडतात. काहीजण "आपण" ह्या शब्दावरून "तू" ह्या शब्दावर नेण्याचा निष्फळ प्रयत्न करतात.
एकटीने स्वयंपाक करणे हा आपल्यावर अन्याय आहे अस ह्यांना नेहमी वाटतं. "दोघे खातो ना?? मग दोघे मिळून स्वयंपाक करू" असा professionalism त्या घरातही आणतात. ह्या बायका स्वयंपाक करताना नवरा बाहेर आरामात TV बघत असेल तर हे त्यांना अजिबात बघवत नाही. स्वयंपाक करताना ह्या आळशी माणसाला कुठलं काम देता येईल ह्याचा विचारच त्या करत असाव्यात. गरज नसलीतरी थोडं का होईना आपल्या नवर्याने काम केलच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो.अश्या बायकांचे नवरे साधारणत: ताट-वाट्या घेणे, कोथिंबीर निवडणे,डायनिंग टेबल पुसणे अशी कामे करतात. IT मधल्या बायकांना उत्तम व चविष्ट भाजी बनवता येते ही संकल्पना निव्वळ अशक्य आहे. बनवलेल्या भाजीचा पहिला प्रयोग त्या आपल्या नवर्यावरच करतात. एवढ्यावरच त्या थांबत नाहीत. वर तोंड करून "कशी झालीय भाजी?" हा प्रश्न विचारायला ते अजिबात विसरत नाहीत. "suggestions " म्हणजे त्यांना अपमानकारक वाटते. त्यांना suggestion देणे म्हणजे नवर्याने वादाला सुरुवात केल्यासारखी असते. भांडण नको म्हणून हे नवरे " भाजी मस्त झालीय..." म्हणत हळूच फ्रीजमधून थोडा सॉस, लोणचे घेताना दिसतात. त्यातूनही हिम्मत करून कुणी suggestion दिलेच तर त्यांची प्रतिक्रिया ठरलेली असते. "झालं? ठेवलास नावं??"....."थोडं कमी जास्त होणारच की रे"......."तू करायचं होतास मग"......"एवढं केलय त्याचं काही नाही..." असा उपकाराचा टोला लगवायलाही ते मागेपुढे बघत नाहीत.
नुकतचं लग्न झालेल्या मुली कंपनीत बसून google वर रेसिपी शोधताना दिसतात. "आपल्याला काहीही बनवता येत नाही" हे नवर्याला इतक्या लवकर कळू नये हा त्यामागचा उद्देश असावा. रेसिपी मिळाली नाही तर आईला,आत्याला,मामीला फोन करून तासभर ह्या बायका रेसिपी विचारण्यात काढतात. "योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" हे मात्र नवर्याने दिसत असूनही म्हणू नये. ह्या बायकांचा "जेवण बनवण्याचा" मूड अशाने केंव्हाही जाऊ शकतो. चौरस आहार सोडून दररोज नवनवीन छोटे छोटे पदार्थ बनविण्यावर ह्यांचा भर असतो. हे भयंकर आणि अयशस्वी प्रयोग करण्यामागचा उद्देश प्रेमापोटी असतो की " उद्यापासून स्वयंपाकाला बाई लावू" हे नवर्याने स्वत:हून म्हणण्यासाठी? हे त्या बायकांनाच माहित...!
ह्या बायका मंडईतल्या गर्दीमध्येही सहज ओळखून येतात. ब्रँडेड जीन्स आणि टी-शर्ट , एका हातात महागडा मोबाईल व दुसर्या हातात पर्स हि त्यांची ओळख. मल्टीप्लेक्स , शॉपिंग मॉल मध्ये बिनधास्त पैसे वाया घालवणार्या ह्या बायका मंडईमध्ये १-२ रुपयासाठी घासाघीस करताना पहावयास मिळतात. "too costly ......ohh.....too much ......" असे उद्गार ऐकल्यास ती शक्यतो सॉफ्टवेअर मधलीच समजावी. इथे bargaining हा त्यांच्यादृष्टीने मूळ मुद्दा नसून " IT मधली असले म्हणून काय झाले? मलाही भाज्यांमधले कळते म्हटलं...." हे जगाला पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मजेची गोष्ट म्हणजे अश्या बायकांना मंडईतले विक्रेतेही ४-५ रुपये आधीच वाढवून सांगतात. एज्युकेटेड बायकांना हे अजूनही कळालेले नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
मित्र हो, हा लेख लिहण्याचा उद्देश हाच की, तुम्ही सॉफ्टवेअरमधल्या मुलीशी लग्न करत असाल तर पुन्हा विचार करा. बोटांवर मोजण्याइतक्या बायकांना स्वयंपाक येत असेलही, पण होणारी बायको त्यांपैकीच आहे का नाही ते तुम्हालाच ठरवावे लागेल. तुम्हाला स्वत:ला चांगला स्वयंपाक येत असल्यास उत्तमच. पण ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा. लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही. चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.
धन्यवाद ,
सुजय कुलकर्णी.
sujayrk@gmail.com
Showing posts with label बोधकथा. Show all posts
Showing posts with label बोधकथा. Show all posts
|
0
comments
]
|
0
comments
]
एकदा लालबहादूर शास्त्रीजी नैनी येथे गेले होते. तेथे सरकारतर्फे एक औद्योगिक नगर वसविण्याचे
प्रयत्न चालू होते. तेथील पूर्वीपासून चालू असलेल्या कारखान्यांचे निरिक्षण करुन टबे बनविणार्या
कारखान्यालाही भेट देण्यासाठी ते तेथे गेले. त्या कारखान्याचे वैशिष्ट्य असं होतं की पॅकींगपर्यंतचे
काम मशीनवर असे. शास्त्रीजींना पूर्ण कारखाना दाखवल्यानंतर वर असलेल्या मोठ्या गच्चीवर
नेण्यात आले. तेथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी मऊ आसनांच्या खुर्च्यांची सोय केली होती.
बसण्यासाठी खाली एक मोठी सतरंजी घालून ठेवली होती. त्यावर सर्व कामगार
बसले होते. शास्त्रीजी तेथे पोहचताच सर्व उपस्थितांनी उभे राहून त्यांना अभिवादन
केले व स्वागतासाठी सर्व पुढे आले.
नंतर खाली बसले व शास्त्रीजींना त्यांच्या आसनाकडे घेऊन जाण्यासाठी कारखान्याचे
पदाधिकारी मागे वळले, तो काय ? त्यांच्यावर आश्चर्यचकित होण्याची वेळ आली.
शास्त्रीजीनी चटकन काही कळायच्या आतच त्यांनी खुर्चीवर बसण्यास नकार दिला व
गंभीरपणे म्हणाले, मी या जनतेचा माणूस आहे. माझी खरी जागा येथेच आहे.
ती खुर्ची नाही !
|
0
comments
]
पांडुरंगरावांना तीन मुली होत्या. सुस्वरुप, गृहकर्तव्यदक्ष अशा त्या मुलीमध्ये एकच व्यंग होते.
त्या तिघीही मुली बोबड्या होत्या. यांचे विवाह कसे होणार, या एकाच चिंतेने पांडुरंगला अस्वस्थ
केले होते. एकदा या तिघींना पाहायला तीन मुले येणार होती. म्हणून पांडुरंगने त्या तिघींना
ताकीद दिलेली होती की, पाहुण्यासमोर कुणीही बोलायचे नाही.
पाहुणे आले. चहा - फराळाचे पदार्थ दिले गेले. त्यांचा आस्वाद घेत वधूपरीक्षा सुरु झाली.
काहीतरी बोलायचे म्हणून त्या मुलांसोबत आलेले गृहस्थ म्हणाले, वा ! पदार्थ फारच छान
झालेत. तुमच्यापैकी कोणी केलेत हे ? यावर थोरली मुलगी लाजत - लाजत म्हणाली,
आईने केये नाईट, आमीट केये.
मुलगी तिच्यावर रागावून म्हणाली, अगो बाबांनी काय शांगिटले ? बोलायचे नाही म्हणून.
यावर मधली म्हणते कशी, ही बोबयी. तू पण बोबयी. पण मीच नाही बोबयी. तिघींच्या
संभाषणावरुन त्यांना बघायला आलेल्या वरमंडळींना त्यांच्या व्यंगाबाबतचे गुपित आपोआपच
समजले आणि त्यांनी ठरवलेले सर्वकाही उघडकीस आले. पांडुरंगाची तर त्रेधातिरपीट उडाली.
वर पक्षाच्या मंडळींनी तर आपोआपच काढता पाय घेतला.
|
0
comments
]
भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक
वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.
टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्या - जाणार्या
वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही
त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः
पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.
तो म्हणाला, सार्या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे
आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ?
तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो.
त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.
त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच
नाहीत का ? सार्या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.
|
0
comments
]
महात्मा गांधी नियमांचे पालन अतिशय काटकोरपणे करत असत. ते प्रत्येक नियम मोठ्या
विचारपूर्वक तयार करत असत. स्वतः ही काटेकारपणे पालन करीत. त्यांच्या आश्रमात
जेवणासाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा घंटा वाजवून सूचना देण्यात येत असे. जो दुसर्या घंटेनंतर
येत असे त्याला दुसर्या पंक्तीत बाहेर उभे राहावे लागत असे. अगदी त्या पंक्तीत जागा रिकामी
असली तरी ! गांधीजी त्यास उशिरा येण्याची गोड शिक्षा संबोधत असत. दुसर्या घंटेनंतर
नियमाप्रमाणे भोजनगृहाचे दरवाजे बंद केले जात असत. मग कोणालाही आत प्रवेश नसे.
एकदा स्वतः गांधीजींना उशीर झाला. दरवाजा बंद करणारे आश्रमवासी गांधीजींना येताना
पाहून घुटमळले. तेवढ्यात महादेव भाईंनी त्यांना सांगितले, काय आपल्याला बापूजींकडून
शिक्षा घ्यायचीय का ? लवकर दरवाजा बंद करा . नियमाप्रमाणे गांधीजीं व्हरांड्यात उभे राहिले.
पालन होत आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्याचवेळी तेथे हरिभाऊ उपाध्याय आले
व बापूजींना उभे पाहून म्हणाले, बापूजी, आज आपणही गुन्हेगारांच्या रांगेत आलात ?
जेवणास उशिरा आल्यामुळे ही गोड शिक्षा तुम्हालाही भोगावी लागत आहे.
|
0
comments
]
पांडुरंग ' मनाची एकाग्रता कशी करावी ' या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी
भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे
गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे
आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट
आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना
विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ?'' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा
आरसा बनवायचा आहे.' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल
का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले.
म्हणाले, मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी
काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?
|
0
comments
]
एका उद्योगपतीने आपल्या कारखान्यात उच्च तंत्रज्ञान घेऊन आलेल्या एका इंजिनीयरची नेमणूक केली.
त्याने आल्यावर महिन्याभरातच सार्या मशिन्स ठाकठीक केल्या. मशिन्सची काळजी कशी घ्यायची
याचेही प्रशिक्षण त्याने कामगारांना दिले. दोन - तीन महिने झाले. त्याला काही कामच नव्हते. तो
मालकाला भेटला. म्हणाला, सर ! मला तुम्ही मला फुकट पगार का देता ? सर्व मशिन्स
व्यवस्थित सुरु आहेत. आता मी नसलो, तरी कारखाना ठिक चालेल. मालक म्हणाले, ते सर्व ठिक
आहे. आज कारखान्यातली यंत्रं व्यवस्थित आहेत पण उद्या यातलं एखादं जरी मशिन बिघडलं, तरी
माझं लाखो रुपयांचं नुकसान होईल. त्यावेळी मी तुला कुठे शोधू ? म्हणूनच उद्या बिघडणार्या
मशिन्सच्या दुरुस्तीसाठी मी तुझी आजच व्यवस्था करुन ठेवली आहे. मी काय मूर्ख आहे, तुला
पैसा फुकट द्यायला
|
0
comments
]
अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतरची घटना. रस्त्याच्या कडेने जात असताना लष्कराची गाडी अडचणीच्या
जागेत अडकली होती. आतील शिपाई उतरुन तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागले.
त्यांच्यावरचा अंमलदार फक्त हुकूम देत होता.
मदत केली असती तर गाडी नक्की निघाली असती पण तो होता साहेब ! फक्त हुकूम
देत उभे राहणेच त्याने पसंत केले. तेवढ्यात तिकडून एक गाडी आली.
गाडीतून एक सज्जन उतरला. त्याने सैनिकांना प्रत्यक्ष हातभार लावला. गाडी अडचणीतून
बाहेर पडली. दुसर्या गाडीतून आलेला तो सज्जन अंमलदार साहेबाला म्हणाला, पुन्हा गरज
पडली तर मला बोलवत जा आणि त्याने आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. आपला पत्ता
असलेले कार्ड बाहेर काढले व त्या अंमलदारला दिले.
त्याने ते सहज म्हणून वाचले. त्याला दरदरुन घाम फुटला. कारण मदतीला आलेला तो
सज्जन अमेरिकेचा सर्वेसर्वा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होता.
|
0
comments
]
चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत.
म्हणूनच सहदेव महाराजांच्या कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव
महाराज तर धर्माची,ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि अशा धार्मिक विषयाशी
संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र
मित्र काहीसे अचंबितच झाले. त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन
यांना विचारलेच,भक्तिमार्गाची प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ?
आपल्या तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?
म्हणाले, ' त्याचे असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे
माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर महाराजांचा दृढ
विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा व्यक्तीचे बोलणे
समजून घ्यायला मला आवडते.
|
0
comments
]
आधुनिक संत म्हणून ज्यांना संबोधण्यात येते ते आचार्य विनोबा भावे यांच्या संदर्भातील एक गोष्ट
अशी की, आपले म्हणणे दुसर्यांना न दुखवता मोठ्या खुबीने आचरणाने पटवून देण्यात त्यांचा
हातखंडा होता. एके दिवशी असाच एक माणूस त्यांच्याकडे आला व पश्चात्तापदग्ध होऊन म्हणाला,
महाराज दारु काही मला सोडायलाच तयार नाही. मला माहिती आहे की ती सवय वाईट आहे.
मला ती सवय सोडायची आहे पण काय करु ? आचार्य शांतपणे म्हणाले, असं कर, तू उद्या
मला याचवेळी येऊन भेट व बाहेरुनच हाक मार. मी मग येऊन सांगेन काय ते ! दुसर्या
दिवशी तो माणूस ठरल्याप्रमाणे आला पण त्याला कळेना की बाहेरुनच का हाक मारायची ?
पण आचार्यांची आज्ञा म्हणून अधिक विचार न करता त्याने बाहेरुनच हाक मारुन स्वतः
आल्याचे सांगितले. तोच आतून आचार्यांचा आवाज आला, होय रे, मी बाहेर येऊ पाहतोय,
पण हा खांबच मला सोडायला तयार नाही. तो माणूस चक्रावून गेला. ही काय भानगड
आहे ? आचार्य माझी गंमत तर करत नाहीत ? असा विचार करुन त्यांनी आत कुतूहलाने
डोकावून पाहिले. तो त्याला हसूच आवरेना. घरातील खांबाला विनोबाजी घट्ट पकडून बसले
होते व तो खांब मला सोडत नाही म्हणून तक्रार करत होते. तो माणूस हात जोडून म्हणाला,
विनोबाजी आपणच खांबावर चढून त्याला धरले आहे व तो खांब सोडत नाही, हे कसे ?
हे ऐकूण स्मितहास्य करत खाली उतरले व त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले,
ज्याप्रमाणे मी या खांबाला धरुन ठेवले होते तसेच तू ही दारुला पकडून ठेवले आहेस.
दारुने तुला नाही पकडले. जेव्हा तू दारु सोडायचे ठरवशील तेव्हा आपोआप दारु पिच्छा सोडेल.
हे ऐकून त्या माणसाचे डोळे उघडले व त्यांनी विनोबाजींच्या पायावर डोके ठेवून दारु सोडण्याचा
निश्चय केला.
|
0
comments
]
आयुर्वेदाचे प्रणेते महर्षी चरक औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यासह रानावनांत, जंगलात च
दर्या डोंगरावरुन हिंडत चालले होते. चालता चालता अचानक त्यांची दृष्टी समोर हिरव्यागार शेतात
उगवलेल्या एका सुंदर फुलाकडे गेली. आजपर्यंत त्यांनी असे आगळेवेगळे अनुपमेय सुंदर फूल कधी
पाहिलेच नव्हते. त्यांना फूल स्वतःजवळ हवेसे वाटू लागले. पण संस्कारामुळे मन तसे करण्यास
धजावत नव्हते. मनात चलबिचल होत होती. त्यांची ही अवस्था शिष्याच्या लक्षात आली. शिष्य
त्यामना विनम्रपणे म्हणाला, गुरुवर्य आपली आज्ञा झाली तर ते फूल मी आपल्या सेवेस
अर्पण करु ?
महर्षी चरक म्हणाले, वत्सा ! त्या फुलाची मला निश्चितच गरज आहे. पण या शेताच्या
मालकाच्या परवानगीशिवाय ते घेणे म्हणजे चोरी करणे ठरेल. महर्षीच्या या उच्च आदर्शवाद
व नैतिकतेपुढे शिष्यांनी मान खाली घातली.
ते पुढे म्हणाले, शिष्यांनो, नैतिक जीवन व राजाज्ञा यात कोणतेच साम्य नाही. जर त्याने
आपल्या प्रजाजनांची संपत्ती स्वच्छंदपणे व मनमानी करुन स्वतःकरता वापरली तर नैतिकतेचा
आदर्श तो काय राहणार ? यानंतर महर्षी आपल्या शिष्यांसह तेथून तीन मैल अंतरावरील त्या
शेतकर्याच्या घरी पायी गेले व त्याची परवानगी घेऊनच त्यांनी ते फूल तोडले.
|
0
comments
]
त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च
न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने
प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार परदेशी जाण्याची
सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न
जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली
व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला
माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून
अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची
हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा,
आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची
आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून
घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती.
ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहर्याने व धाडसाने म्हणाले,
महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय
कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते
व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाही. तेव्हा यासंबंधी
कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे.
त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.
|
0
comments
]
ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली. मानव नावाचा अदभूत प्राणीही निर्माण केला. त्याला तयार करताना मात्र देवाला खूप
त्रास झाला. मानवाच्या निर्मितीनंतर हा त्रास वाढू लागला तेव्हा ईश्वराने सार्या देवतांना बोलाविले व विचारले,
माणसाला तयार करुन मी संकटात सापडलो आहे. मला चोवीस तास हाका ऐकून घ्याव्या लागतात.
सारखं वाटतं की, माणूस सतत माझ्या दाराजवळ उभा राहून तक्रार करत आहे. त्यामुळे मला
शांतपणे झोपही लागत नाही. मी काय करु ? कोठे लपू ? जेथे माणूस येणार नाही अशी जागा सांगा ?
या प्रश्नानंतर ईश्वराला त्या सार्या देवतांनी अनेक जागा सुचविल्या. पण ईश्वराला वाटले काहीही करुन
माणूस तेथे पोहचणारच. म्हणून त्याने त्या सर्व जागा नाकारल्या अखेर एक म्हातारा देव उठला !
त्याने ईश्वराला कानात काहीतरी सांगितले. ईश्वरालाही ते पटले. त्या वृद्ध देवाने सांगितले होते की,
तू माणसाच्या आत हृदयात लपून बैस. ईश्वराने तसे केले आणि तो सुखी झाला.
|
0
comments
]
राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी सार्या शेतकर्यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले.
अन्नही मोफत दिले जाईल, अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की, आता सगळे खूश होऊन जातील,
आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकर्यांच्या रांगेत जाऊन
ते उभे राहिले.त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले. ते शेतकरी आपापसांत कुजबुजत होते.
आपले महाराज शूर आहेत. दानशूरसुद्धा आहेत पण त्यांना व्यवहार समजत नाही.
|
0
comments
]
महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हाक दिली.
महाराज ! न्यूटन विचारात दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज !
आता न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा तो नोकर म्हणाला, महाराज !
बाहेर एक गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न विचारु इच्छितात.
खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला, पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आत आले.
न्यूटनला म्हणाले, क्षमा करा महाराज, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आलोय.
मला शहाणं व्हायचं आहे. मी काय करु ? न्यूटन म्हणाला, मित्रा, शहाणं होऊन तू काय करणार
आहेस ? या प्रश्नावर तो गृहस्थ म्हणाला, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे.
त्याचे उत्तर ऐकून न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकच महामंत्र लक्षात ठेव. मन सैरभैर होऊ देऊ
नकोस.तुला हवं ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी न चळणारं अवधान धारण करायला शिक.
माझ्या यशाचं रहस्य हेच आहे. एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही.
|
0
comments
]
जगदविख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्या प्रयोगशाळेला १९१४ मध्ये आग लागली.
या आगीत त्यांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाची कागदपत्रे, यंत्रसामग्री जळून खाक झाली.
या आगीची वार्ता समजताच त्यांचा मुलगा चार्ल्स एडिसन त्यांना भेटायला,
धावत आला तेव्हा थॉमस एडिसन त्याला म्हणाले, अरे पाहत काय उभा राहिलास ?
चटकन बोलावून आण. असे दृश्य पुन्हा पाहायला मिळणार नाही.
दुसर्या दिवशी आपल्या आशा - आकांक्षांची आणि स्वप्नांची झालेली ती राखरांगोळी पाहताना ते म्हणाले,
सारी सामुग्री नष्ट होण्याचे खूप फायदे झाले. त्यामुळे माझ्या चुकाही जळून खाक झाल्या.
आता मी नव्या जोमाने कामाला सुरुवात करु शकेन. एका अर्थी ही परमेश्वराची कृपाच म्हणायची.
|
0
comments
]
देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला देशमुखांनी भेट दिली. तेव्हा एका खोलीकडे हात करुन डॉक्टर म्हणाले,
साहेब,येथे या खोलीत विमान चालविण्याचे, ते वेगाने पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत.'
देशमुखांनी उत्सुकतेने खिडकीतून आत तर त्यांना तेथे कोणीही दिसेना.
तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले,साहेब,
ते सर्व वेडे खोलीतच आहेत.पलंगाखाली झोपून, आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत,
अशी कल्पना करुन विमान दुरुस्त करत असतील.सामान्य माणसेही असेच कल्पनांचे,
मनोरथांचे विमान पळविण्याच्या आहारी गेलो आहोत.
परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते,तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही.
|
0
comments
]
ही घटना आहे लखनौमधील ! त्यावेळी महाकवी निराला अमीनाबाद पार्कच्या पुढील मोहल्यात राहात होते. एक दिवशी ते असेच चालले
होते. समोर एक टांगेवाला प्रवाशांची वाट पाहत उभा होता. निरालाजींनी त्याला नीट न्याहाळले व विचारले, परवा तूच मला हजरतगंजहून
घेऊन आला होतास ना ? तो म्हणाला, होय हुजूर ! माझ्याकडून काही चूक झाली होती का ? निरालाजी सहज म्हणाले, अजिबात नाही.
परवा माझ्याजवळ फक्त दोन आणेच होते. तूला आणखी पैसे द्यायला गेले दोन दिवस मी तुला शोधत आहे. हे पैसे ठेव तुझ्याजवळ !
पांच रुपयांची नोट पाहून तो टांगेवाला चांगलाच उखडला.
निरालाजी म्हणाले, अरे रागावू नको. मी चांगल्या भावनने हे पैसे तुला देत आहे. परवा तुझा मुलगा फाटक्या तुटक्या वस्त्रात धावत
तुझ्याकडे येऊन एक पैसा मागत होता, पण तोही तू देऊ शकत नव्हतास. ती तुझी असहाय्यता मी विसरु शकलो नाही. म्हणून हे पैसे
ठेवून घे व त्या निरागस मुलाचे मन मोडू नकोस. त्या टांगेवाल्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्याने निरालाजींची क्षमा मागितली.
|
0
comments
]
अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ आला नि म्हणाला, '' स्वामीजी तासन् तास बंद खोलीत
बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही.'' त्यावर स्वामीजी म्हणाले, '' सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव.
आपल्या जवळपास राहणार्या दुःखी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.'' यावर त्या तरुणाने त्यांना, '' एखाद्या
रोग्यासी सेवा करताना मीज आजारी पडलो तर ?'' असा प्रश्न विचारला. विवेकानंद म्हणाले, '' तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की,
प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते. म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच
त्यातील उणिवाही शोधू नयेत.हाच मनःशांती मिळविण्याचा जवळचा मार्ग आहे.
|
0
comments
]
एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला
त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत.
फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला.
त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे
राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट
पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने
त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू
आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो.