भल्या पहाटे मला सोडून कुठे तूं गेलीस ?
ढगां मागे लपते, मला दिसत कां नाहीस ?
लहान आहेस कां तूं, ढगां मागे लपायला ?
आमच्यात येना कधी, लपंडाव खेळायला !
म्हणतात " तुला आता नवी आई आणणार "
तूच सांग ना आई मजसी, तूं कधी येणार ?
बाबाला विचारले तर उत्तर देत नाही
तूच सांग ना आई त्याला, मला माहीत नाही
नेहेमी मला सोडून, कुठे कुठे जायचीस
दिले जाऊ नसते , सांगून गेली असतीस ?
बाबा म्हणतो रोज रोज तेच नको विचारू
तूच सांगना आई कसे मी मजला सांवरू ?
सुरेश पेठे२६एप्रिल०९
फुंकून पीतो बियर
टून् झाल्यावर
जीभ सुटे मोकाट
मी आरूढ़ ढगांवर
खेकड्यासारखा वाकडा
टून् झाल्यावर
डावं-उजवं सारं एक
चालतो अधांतर
मला म्हणतात बेवडा
टून् झाल्यावर
सारे पीवट पेताड
खुद्द झोक्यावर
फास्ट रिवाईंड सिनेमा
टून् झाल्यावर
प्रश्न करा काहीही
उत्तर माझ्यावर
उद्धार सा-या जगाचा
टून् झाल्यावर
मीच भाई, सारं काही
एका इशा-यावर
BMW, फेरारी
टून् झाल्यावर
रात्र जाते सुपर फास्ट
चंद्र घोड्यावर
तारवटलेले डोळे
शुद्धीत आल्यावर
मेंदू गोटा २५ किलो
फिरतो गरगरगर.....
....रसप....२४ एप्रिल २००९
आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
मलभ मना वरच दूर करून , प्रेमाचा वर्षाव करणार
आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
भाव माझ्या मनाचे ,न सांगताच जो ओळ खनार
आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
ओंजलित घेउन अश्रु माझे , मोती बनुन बरसणार
आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
बंद कली मनाची ज्याच्या सहवासाने खुलनार
आता मी फ़क्त त्याची
फ़क्त त्याची वाट बघणार
प्रेम करतोय ,करत राहील
जो माझ्या नशिबात असणार
-मिनल २६.४.०९
मैत्री असते कशी
मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की.
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
हो हो मीठासारखी. नसेल तर होईल जीवन अळणी
मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर
काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतिल
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?