तुझे लाजणे असे अवेळी
काय म्हणावे ...
अधांतरी नेत्रांचे भिडणे
काय म्हणावे ...
वारा देखील मंद जाहला
सखी साजणी ...
आसपास तो फक्त केवडा
गातो गाणी ...
अश्याच समयी तुझी शांतता
काय म्हणावे ...
अधांतरी नेत्रांचे भिडणे
काय म्हणावे ...
सांज अताशा निखळत आली
क्षितिजावरुनी ...
लाटांचे बघ फक्त बोलते
हळवे पाणी ...
तरी मनांची लाट कोरडी
काय म्हणावे ...
अधांतरी नेत्रांचे भिडणे
काय म्हणावे ...
संतोष (कवितेतला)
भावना गोठल्या,जागवू मी कशी ?
वेदना दाटल्या,झोपवू मी कशी ?
शब्द झाले मुके, सूर ही पोरके
गीत ओठातुनी, आळवू मी कशी ?
सारले मी तुला,दूर केले कधी
मेळ आता बरे, घालवू मी कशी ?
नीर क्षीरात किती, क्षीर नीरात किती?
सांग कोड़े अता सोडवू मी कशी ?
आठवेना मला, गुंतले मी किती ?
पाय गुंत्यातुनी ,सोडवू मी कशी?
.
...अरविंद
उद्या मी मेल्यावर...
फक्त दोन अश्रु ढ़ाळणार कोणीतरी असाव...
सांत्वन नाही केल जरी कोणी ...
तरी त्याच ते दुख: खर असाव...
उद्या मी मेल्यावर...
सगळ इथेच असणार आहे...
पण माझ्या फोटो कड़े पाहून...
ओठावर हसू आणि डोळ्यात वेदना ठेवणार कोणीतरी असाव....
उद्या मी मेल्यावर
विसरले जरी सगले तरीही....
माझी आठवण ठेवून श्वास घेणार कोणीतरी असाव....
उद्या मी मेल्यावर
माझ्या आठवणीत जागुन रात्र काढणार...
माझ्या फक्त माझ्या कुशीत शिरण्यासाठी तळमळणार कुणीतरी असाव...
काव्या....






