विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत
पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं
मात्रुभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं
वडाची झाडं मोठी होऊनही
परत मात्रुभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात
काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे




Posted by Picasa







Posted by Picasa







Posted by Picasa

हसवायच आज तुला पण..
ते तितकसं सोप्प नाही.
वेदनेने हृदय भरून वहातय तुझे..
तीला मिटविणे सोप्पे नाही..
उसवायच आज तुला पण..
ते तितकसं सोप्प नाही.
शेकडो गाठ्यानचे ओझे मनावर.
सगळ्याच सोडविणे सोप्पे नाही.
दाखवायच आज तुला काही पण....
ते तितकस सोप्प नाही.
आलिप्तपणे जगती आहेस तु
माझ्या जगात ओढने सोप्पे नाही
हुसकवयाच आज तुला काही पण..
ते तितकस सोप्प नाही.
हृदय भरून वहाती आहेस तु.
तुला विसरणे सोप्पे नाही
गीत १८-०४-२००९