तू नाहीस म्हणुन
तुझी आठवण येते
बरं झालं तू गेलीस त
े
दिवस जातो कसाबसा
रातरी कोण र्ड्ल आसते
बरं झालं तू गेलीस ते
सार्या घटका गोठून गेल्या
भिंतीवर घड़याळ कीट्कीट करते
बरं झालं तू गेलीस ते
का जगु हा प्रश्न आहे
मरण्याचे पण भय संपले
बरं झालं तू गेलीस ते
मायेची गोड गोड
हाक माझी आई
छोटेसे गोल गोल
नाक माझी आई
गुरगुट्टा मऊ ताक
भात माझी आई
केसातून फिरणारा
हात माझी आई
तत्वांचे धारादार
टोक माझी आई
भीती घालवणारा
श्लोक माझी आई
तुषार जोशी,
नागपूर(१७ मार्च २००९, टेरीटाऊन)
सवय करुन घे माझ्याशिवाय जगण्याची
काय माहीत उद्या जगात असेन नसेन
आता दिसतोय इथं तुझ्यासमोर
उद्या कदाचीत कुठल्याश्या ता-यात दिसेन
जाईन उडुन कापरासारखा कदाचीत
माझ्यापाठी अस्तित्वाची खुण न उरेल
नको शोधुस कस्तुरीमृगासारखं मला
शोधुन थकशील पण माझा ठाव न लागेल
त्या आठवांच्या ओल्या दवबिंदुंप्रमाणे
कदाचीत माझे अस्तित्व असेल....
क्षणभंगुर..........
कसे सरतील दिवस तुझे
कश्या सरतील राती....
बावरशील ना ग कदाचीत तु.......
जेंव्हा माझा हात नसेल तुझ्या हाती
पण तरीही
तुला फक्त माझ्यासाठीच जगायचयं
मला हरवणा-या त्या नियतीसोबत
तुला लढायचयं
हसायचयं अन जिंकायचयं...
मी असेनच पाहात तुला
कुठल्याश्या ता-यातुन
करीन तेंव्हाही इच्छा पुर्ण तुझी
त्या आभाळाच्या कोंदणीतुन निखळुन.......
ओंकार(ओम)
Date 12-3-09
हृदयाने ऐका तुम्ही
कविता वाचतो मी
लिहिलेली कुणीतरी ही
शाईने वेदनेच्या
त्या उत्कट तरल क्षणाला
प्रतिभेच्या प्रेरणेच्या
शब्दांच्या खोल तळाशी
घेऊन बघा जातो मी
कविता वाचतो मी.
क्षण काही विसरून जाऊ
या व्यवहारी जगताचे
क्षण काही होऊन जाऊ
आपण सगळे कवितेचे
कवितेचा सुगंध थोडा
तुम्हाला वाटतो मी
कविता वाचतो मी.
तुषार जोशी, नागपूर
वाटते लिहाविशी
एक कविता छान,
शुभ्र आकाशात जशी
इंद्रधनुची कमान,
निर्मळ झार्यामध्ये
जसे खळाळते पाणी,
माझ्या कवितेची असावी
तशी मधाळ वाणी,
पहिल्या पावसानंतर दरवळतो
जसा मातीचा सुगंध,
कविता लिहिताना
मी व्हावे तैसेची धुंद,
पण काय झालय
मला काही कळतच नाही,
शब्द हल्ली मनामध्ये
फिरकतच नाहीत.
पण कधीतरी होईल
एक सुंदरशी पहाट,
त्या दिवशी बहरेल
ही शब्द्फुलांची बाग़,
त्या पहाटेची बघते
मी आतुरतेने वाट...................
-ट्विंकल देशपांडे.