पुर्वरंग
त्या रात्री जपानी खाणावळ म्हणजे काय ते मी प्रथम पाहिले. जपानी भाषेत तसल्या खाणावळींना रियोकान म्हणतात. एका टुमदार लाकडी घरात आम्ही शिरलो. दारातच पाचसहा बायका आमच्या स्वागताला उभ्या होत्या. त्यांनी कमरेत वाकूनवाकून आमचे जपानी स्वागत केले. त्यांच्यापैकी एकीने चटकन पुढे होऊन माझ्या बुटांचे बंद सोडवले आणी सपाता दिल्या. मग दुसरीने त्या लाकडी घरातल्या भुलभुलैयासारख्या ओसऱ्यांमधून एका चौकटीपुढे उभे केले. तिसरीने चौकट सरकवली. आत जपानी दिवाणखाणा होता. सुंदर ततामी पसरलेल्या. मध्यावरच एक काळाभोर लाकडी चौरंग मांडला होता. बसायला भोवताली पातळ उशा होत्या. कोपऱ्यात तोकोनोमा. तिथे सुंदर पुष्परचना. आम्ही चटयांवर मांड्या घालून बसलो. त्या खाणावळीणबाईंनी माझा कोट काढला. इतक्यात बांबूच्या, होडीच्या आकाराच्या छोट्या छोट्या ट्रेजमधून सुगंधीत पाण्याने भिजलेले टुवाल घेऊन एक बाई आली. तिने माझे तोंड पुसण्यापूर्वी मीच चटकन तोंड पुसून टाकले. आणि दिवसभर चालून अंग आंबले होते म्हणून बसल्या बसल्या जरासे हातपाय ताणले. लगेच त्या जपानी दासीने माझे खांदे चेपायला सुरूवात केली. आमचे कुटुंब जरासे चपापले. मीही नाही म्हटले तरी गोरामोराच झालो. (माझ्या अंगभूत वर्णाला जितके गोरेमोरे होता येईल तितकाच!) काय बोलावे ते कळेना. एकीलाही जपानीखेरीज दुसरी भाषा येत असेल तर शपथ! त्या खाणावळीत उत्तम चिनी जेवण मिळत होते, याची खात्री करूनच तिथे गेलो होतो. पण हे आतिथ्य कसे आवरावे ते कळेना.

त्या बाया मधूनच पाय चेपायच्या. सिगरेट काढीपर्यंत काडी पेटवून धरायच्या. द्वारकाधीशाच्या अंतःपुरात सुदामदेवाचे त्या बायांनी कसे हाल केले असतील ह्याची कल्पना आली. तरी सुदामदेव तिथे एकटाच गेला होता. मी ह्या स्त्रिराज्यात सहकुटुंब सापडलो होतो. हळूहळू खाद्यपदार्थ आले. साकेचे पेले भरले. जेवणातल्या तीनचार कोर्सेसनंतर एका परिचारीकेने हळूच समोरची ती चौकटीचौकटीची भिंत सरकवली आणि पुढले दृश्य पाहून माझा घास हातातच राहिला. पुन्हा एकदा सौंदर्याचा अनपेक्षित धक्का देण्याचा जपानी स्वभावाचा प्रत्यय आला. समोर एक चिमुकले दगडी उद्यान होते. त्यातून एक चिमणा झरा खळखळत होता. पलीकडून पुलासारखी गॅलरी गेली होती. बहालावर ओळीने जपानी आकाशकंदिलासारखे दिवे टांगले होते. त्यांच्या मंद प्रकाशात तो झरा चमकत होता. आणि सतारीचा झाला वाजावा तसा स्वर चालला होता. पलिकडून कुठूनतरी सामिसेनवर गीत वाजत होते. (सुदैवाने कोणी गात मात्र नव्हते.) चौरंगावर चिनी सुरस सुरसुधा रांधियली होती. त्या दृश्याला स्वरांची आणि जपानीणबाई बाई लडिवाळपणा करीत होत्या. क्योटोतल्या त्या जपानी खाणावळीतली रात्र बोरकरांच्या जपानी रमलाच्या रात्रीची याद `जंबिया मधाचा मारि काळजात!' रियोकान सोडताना त्या दासीने पुन्हा बूटाचे बंद बांधले. आणि सगळ्याजणींचा ताफा रांगेत उभा राहून दहा दहा वेळा वाकून म्हणाला "सायोना~~रा------सायोना~~रा---!" छे! जपानी बायकांचा सायोनारा छातीचे ठोके थांबवतो!

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला उद्दा- १२ जून रोजी सहा वर्ष पूर्ण होत आहेत. योगायोगानं त्यांचं लग्नही याच तारखेला झालं होतं, चोपन्न वर्षाच्या सहजीवनानंतर त्यांची कायमची ताटातूट झाली, तिही याच दिवशी. सुनीताबाईंनी त्यांच्या लग्नाची सांगितलेली ही चित्तरकथा....

साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात `ओरिएंट हायस्कूल' नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधत असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता. असाच भाईने( पु,ल. देशपांडे) त्या शाळॆत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही काळाने मीही! भाई वरच्या वर्गाना शिकवत असे आणि मी खालच्या वर्गाना.(तिथेच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता.)

शिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग `आपण लग्न करूया.' असा भाईचा आग्रह सुरू झाला... वाढतच राहिला.

लग्न हे मला कृत्रिम बंधन वाटे. स्मजा- उद्दा आपलं पटेनासं झालं, तर लग्नात `शुभ मंगल सावधान' म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करणारा तो कायदेतज्ज्ञ हे आपली भांडणं मिटवायला येणार आहेत का? मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय? माझं ताठ मन वाकायला तयार नव्ह्तं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी `माझ्यासाठी तू इतकंच कर. लग्नविधीला फक्त `हो' म्हण. मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे,' या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी! खरं तर तत्पूर्वी एकदा भाईचं लग्न झालेलं होतं. या गुणी मुलाला आपली लाडकी केल देऊन मोठ्या थाटामाटात कर्जतच्या दिवाडकर लोकांनी त्याला जावई करून घेतला होता. पण लग्नानंतर १५-२० दिवसांतच ती मुलगी तापाने आजारी पडली आणि डॉक्टरी उपचारांचाही उपयोग न होऊन बिचारी मृत्यू पावली.

माझ्या आईने लेकीसाठी काही स्थळं हेरून ठेवली होती. एक तर तिला या बिजवराशी मी लग्न करणं मुळीच पसंत नव्हतं. शिवाय परजातीतला जावई हेही खटकत होतं. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मी आमच्या गावी रत्नागिरीला आले. `भाईने टपाल घेऊन येणाऱ्या बसने यावे, ती गाडी आधी पोस्टात येते, तिथे टपालाच्या थैल्या टाकून मग गावात गाडीतळावर जाते. पोस्टाच्या कंपाऊंडला लागूनच आमचा वाडा आहे, मी त्याला उतरून घेऊन आमच्या घरी आणिने,' असे मी भाईला सांगितले होते. प्रत्यक्षात भाई एकटाच न येता त्याचा भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा हरकाम्या बाळू तेंडुलकर यांच्यासह आला. मी आप्पा-आईशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी उभवतांना वाकून नमस्कार केले आणि पुढल्या १०-१५ मिनिटांतच भाईने सर्वांना हसवून आपलेसे करून घेतले. `हसवण्याचा माझा धंदा' या नावे पुढच्या काळात भाई रंगभूमीवर एक कार्यक्रम करत असे. माझ अनुभव मात्र सांगतो- हसवणं हा त्याचा धंदा नव्हता, त्याचा तो धर्मच होता.

पुढल्या ४-५ दिवसांत लग्न रजिस्टर करायचं होतं. त्यावेळी भरायचा छापिल फॉर्म आठ आण्याला मिळे, तेवढाही खर्च इतर कुणावर पडु नये म्हणून मी तो फॉर्मही विकत आणून वाचून ठेवला होता आणि आप्पांनाही दाखवला होता.

आमचे आप्पा- म्हणजे माझे वडील हे स्वत: रत्नागिरीतले नामवंत वकिल तर होतेच, पण संत प्रवृत्तीचा माणूस म्हणूनही त्यांचा लौकिक होता. भाई रत्नागिरीला आल्यावर दोन-तीन दिवसांतच लग्न रजिस्टर करून टाकावे, असे आई-आप्पांना मनातून वाटत होते. त्याप्रमाणे आप्पांनी कोर्टातून परतताना आपल्या वकील स्नेह्यांना `मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल?" असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे, वगैरे सांगितले. त्यावर, `मग आत्ताच जाऊ या की!' म्हणून ते आप्पांबरोबरच निघाले.

रत्नागिरीचे मुख्य ऑफिस आमच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये होते. तसेच घरासमोरच जिल्हा न्यायालय होते. दुपारी आप्प घरी परतत तेव्हा दुपारचा चहा होत असे. त्या सुमाराला आमच्या वाड्याला फाटकाची खिटी वाजली की आप्पा आले, असे आम्ही खूशाल मानत असू. आईने चहाला आधण ठेवले होते. खिटी वाजली म्हणून मी सहज तिकडे पाहिले, तर आप्पांच्या सोबत आणखी तीन-चारजण येताना दिसले. मी आईला ते सांगतच तिने आधणात आणखी चार-पाच कप पाणी वाढवले.

हे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आले आहेत आणि पुढच्या दहा-पंधरा मिनीटांत आमचे लग्न होणार आहे, याची घरच्या आम्हाला कुणालाच पूर्वकल्पना नव्हती. उन्हाळयाचे दिवस. वधू घरच्याच साध्या, खादीच्या सुती साडीतच होती आणि नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर साधा, बिनबाह्यांचा बनियन घालून, चहाची वाट पाहत, गप्पा मारत ऊर्फ सर्वांना हसवत बसलेले. आप्पांनी आल्या आल्या मला हाक मारली. जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली आणि त्या फॉर्मवर आम्हा उभयतांना त्या साक्षीदारांसमोर सह्या करायला सांगितले. आमच्या आणि साक्षीदारांच्याही सह्या झाल्या आणि लग्न `समारंभ' संपला. नेहमीच्या दुपारच्या चहाबरोबरच लग्नही झाले आणि माझ्या लक्षात आले की, आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून `कु. सुनीता ठाकूर' हिचे नाव `सौ. सुनीता देशपांडे' करण्याचे काम फक्त आठ आण्यात आणि दोन-चार मिनीटांत उरकले.

एका योगायोगाचे मात्र मला नवल वाटते. आमच्या या लग्नाच्या दिवसाची तारीख होती १२ जून, आणी त्यानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी १२ जूनलाच भाईचा मृत्यू झाला. आठ आण्यात आणि दोन-तीन मिनिटांत जोडलेलं ते लग्नबंधन तुटलं. पण त्या चोपन्न वर्षाचं एकत्र जीवन खूप रंगीबेरंगी आणि एकूण विचार करता खूप संपन्नही जगलो खरं!

-- सुनीता देशपांडे

आहे मनोहर तरी...
प्रकाशक :- श्री. पु. भागवत, मौज प्रकाशन गृह,पुणे
------------------------------------------------------------------------------------------------
पान नं. 1

हे आत्मचरित्र नाही.

आठवणींच्या प्रदेशातली ही स्वेर भटकंती. पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर ,कुठूही. दिशाहीन. पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत केलेली.

आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली माणसे यात नाहीत. म्हणजे त्यांना मी विसरले असे नव्हे. पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकेच. आणि जी भेटली, तीही त्या त्यासंदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचेही हे संपूर्ण चित्र नव्हे.

पाण्यात ओढस लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येत असतात. ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ (की खोड?) टागोरांनाही होती असे त्यांनी म्हटलेय. मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा ?

प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच. स्वतःचे ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहते. पुढे कधीतरी प्रौढवयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणारे स्वतःचे प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि ते वहीतले चित्र यांचे काहीतरी नातेजाणवते का ?

अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख.आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या चार-पाच वर्षात अधून मधून वेळ मिळेल तसे, थोडेथोडे तुकडया तुकडयांनी केलेले हे लिखाण. कोणतीही योजना न आखता केलेले. त्यामुळे सुरूवातीचा मूडही अधूनमधून बदलणे स्वाभाविकच आहे.

एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही.

कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रूपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळी च रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र.
----------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 2

पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यांतलं एखादं वेल्हाळ पाखरू गात माझ्या झाडावर उतरतं.

चोहूकडून नातवंडं येऊन बिलगतात आणि `गोष्ट सांग' म्हणून चिवचिवाट करतात....हे सगळं किती लोभसवाणं आहे ! मग माझ्याच पापण्यांत पुन्हा पुन्हा हे असं धुकं कांजमा होतंय ? `आहे मनोहर तरी गमते उदास ' अशी ही मनाची अवस्था असताना या

पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू ?
एक होता राजा आणि एक होती..
(एक कोण होती ?)
... आणि एक होती परी की एक होती म्हातारी ?की...
(दुसरं कुणी नव्हतंच ?) फक्त...
एक होती परी आणि ती झाली म्हातारी ?........

सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी.सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच.

सध्या असा एक मूड आहे की ज्याला `आताशा मी नसतेंच इथे' मूड म्हणता येईल.म्हणजे कुणाला भेटू नये, कुणी येऊन डिस्टर्ब करू नये, एकटेच बसावे, स्वतःतच राहावे,असा. पडून किंवा बसून राहावे.- डोळे उघडे किंवा मिटलेले, कसेही. पण सभोवारचे काहीच न पाहता, त्यात अगर या इथे न राहता. सारा कल्पनेचा किंवा विचारांचा खेळखेळत, त्याच जगाशी एकरूप होत, तिथली सुखदुःखे भोगत.अशा वेळी डोळ्यांना दुसरचं जग दिसत राहतं. कानांची स्थिती Sir Thomas Browneच्या शब्दांतल्या नाईल नदीसारखी होते.`and Nilus heareth strange voices' अशी. धूसर स्वप्नं पडत राहतात, विरत राहतात. `मी झालेंय निळं गाणं- निळ्या नदीत वाहणारं- निर्मात्याबरोबरच' ती हीच अवस्था का ? पद््माबाईना विचारायला हवं.

आयुष्याच्या सुरूवातीला, जिथून आयुष्य फुलायला लागते अशा वळणावर एक, आणि शेवटी शेवटी, म्हणजे जिथून आयुष्य उतरणीला लागले अशा वळणावर एक, असे दोन जबरदस्त मित्र मला लाभले. दोघेही अगदी भिन्न प्रकृतीचे,प्रवृत्तीचे. मीही तीच राहिले नव्हते. पार बदलून गेले होते. मधल्या काळात तिसऱ्याच एकाच्या सहवासात स्वतःला पूर्ण विसरून, चक्रावून - अगदी पायाला चाके लावून- त्याचा संसार केला. तोही जबरदस्त होता म्हणून मी या बंधनात अडकले की... तो अगदीच मूल होता म्हणून त्याचेच खेळणे
------------------------------------------------------------------------------------------------
पान नं. 3

करून मनसोक्त खेळत राहिले ? की दोन्ही ?

आजा पाहावे तिथे सगळी स्वच्छ निराशाच दिसतेय. आकाशदेखील कुठे निळे नाही.सगळीकडे एकच राखी रंग, अगदी निर्मळ किंवा विशुध्द कारूण्याची राखी रंगच्छाटा.Grayof the purest melanchol. झाडे देखील स्तब्ध, विचारमग्न उभी आहेत. आईच्या डोळ्यांत गलबल दिसली तर कडेवरचं मूल कसं बावरून तिला नुसतं बिलगून राहतं तशी पानांची सळसळही पूर्णपणे विराम पावली आहे. माझ्या मनात कसले विचार येताहेत त्याच्याशी याबाहेरच्या जगाचे इतके जवळचे नाते असेल? कोण जाणे. पण कदाचित साऱ्यासजीव-निर्जीव सृष्टीशी माझे अज्ञात नातेही शेवटी त्याच मूलतत्त्वांतून-पंचमहाभूतांतून - सारी सृष्टी निर्माण झाली ना ? मग सारे काही अदृष्ट धाग्यांनी जोडलेलेनसेलच कशावरून ? समोरच्या खिडकीच्या लोखंडी गजांचे माझ्या रक्तातल्या लोहाशी नाते असेलही. समोर कोण राहतो ? त्याची-माझी ओळख नाही, त्याचे नाव मला माहीत नाही.अरे वेडया, आम्हा बाहेरच्या लोकांपासून संरक्षण मिळावे म्हणून खिडकीच्या झरोक्यात तू उभे केलेल हे लोखंडी पहारेकरी आमच्याही नात्यातलेच आहेत हे कसे विसरलास ? हा विचार आला आणि सगळे काही मूर्खपणाचेच वाटायला लागले. मूर्खपणाचे की भीतिदायक ?की आशादायक ?

मूड्स तरी किती अस्थिर असतात ! येतात, जातात. पण मुक्कामाला आले की कधीतरी हेपाहुणे जाणार आहेत हे भानच नाहीसे होते, आणि आपण त्यांच्यात अगदी बुडून जातो.

प्रचंड वेगाने स्वतःभोवती आणि आपल्या जन्मदात्या भोवती फिरणारी ही पृथ्वी अशीच,या मूड्ससारखीच, पाय रोवायला आधारभूत आणि स्थिर वाटते. या वेगाचे आणि तिच्याही हतबलतेचे ज्ञान झाले की भीतीने आपले पाय डळमळू लागतात. अज्ञानात खरेच सुख आहेहे आपला अनुभव हरक्षणी सांगत असतो, तरीही आपण ज्ञानाच्या मागे धावतो आणि आपल्या मुलाबाळांनाही ज्ञानी करण्यासाठी धडपडतो. हा शहाणपणा म्हणायचा की वेडेपणा ?

माझ्या लहानपणी आमच्या घरात बालदत्तोत्रेयाच्या चित्राची एक फ्रेम होती. रंगीत पाटावर मांडी घालून बसलेल्या वर्ष-दीड वर्षांच्या बालकासारख्या गोड चेहऱ्याच्या हसतमुखदत्तात्रेयाचं ते चित्र मला खूप आवडायचं. आईने मग ती फ्रेम मलाच दिली. तिच्या देवांजवळच भिंतीवर, माझा हात पोचेल इतक्या उंचीवर खिळा मारून घेऊन त्यावर मी ती टांगली. रोज बागेतून निवडून निवडून फुले आणायची आणि त्यांचा हार करायचा. आंघोळ झाल्याबरोबर त्या फ्रेमची काच पुसून त्या देवाला पुन्हा गंध लावायचं आणि तो फुलांचा हार घालायचा. मग हात जोडून डोळे मिटून मी प्रार्थनाकरीत असे. ही प्रार्थना निश्चित
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 4

कोणती होती, त्यातून मी त्या देवाशी कोणता संवाद साधत होते, यांतले काहीच आता आठवत नाही. पुढे कधीतरी मी नास्तिक होत गेले आणि पक्की नास्तिक झाल्यावर त्याचा अभिमानही बाळगू लागले. आजही मी नास्तिकच आहे, अगदी पक्कीच. पण आज वाटते,नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोषट असली तरी त्यात मनःस्थिती मात्र नसते आस्तिक्य हे बिनबुडाचे असते खरे, पण त्या अज्ञानात सुख नक्कीच असते. इथे सुखाचा अर्थस्थेर्य,आधार, शांती, असाही असेल. त्यामुळे मला माझ्या नास्तिक्याचा अभिमान असलातरी आस्तिकांचा हेवा वाटतो. आणि दुर्देवाची गोष्ट अशी की आस्तिक माणूस हा विचारान्ती पुढे नास्तिक होऊ शकतो,, पण खरा नास्तिक हा आस्तिक कधीच होऊ शकत नाही.
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 5

आप्पांना जाऊन आता सात वर्षे होऊन गेली. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षाच्या आतच आईही गेली. जन्माला आलेलं प्रत्येकजण असं जातच असतं. शिवाय त्यांची वयेही झाली होती. हे सगळे खरे असले तरी अशा व्यवहारी दृष्टिकोनातून मला आप्पा-आईकडे पाहता येत नाही. मी स्वतः नको तितकी व्यवहारी आहे तरीही. त्यांनी मला जन्म दिला, माझे पालनपोषण केले. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापर्यंत मी त्यांच्याच छत्राखाली वाढले. त्यानंतर मी स्वंतत्र जीवनक्रम स्वीकारला, तरी शेवटपर्यंत आमचे संबंध कुठेही दुरावले नव्हते. उलट माझे वय वाढत गेले तशी प्रेमाची किंमत मला अधिकाधिक जाणवू लागली आणि त्यांच्या मृत्यूमुळे पोरकेपण आले.

पण यात नवल ते काय ? आई-वडील गेले की मुले मोठी असली तरी पोरकी होतातच.मग हळूहळू दुःख कमी कमी होत जाते आणि पुढे सोईस्कर विसरही पडायला लागतो. अधून मधून आठवणी तेवढया शिल्लक राहतात. बऱ्या,वाईट, दोन्हीही माझ्या बाबतीत ही नेसर्गिक वाटचाल आहेच. पण आणखीही काही घडतेय. ते निश्चित काय ते निरखण्याचा का हा प्रयत्न आहे ?

आप्पांना मृत्यू मोठा छान आला. वयोमानाप्रमाणे ते थकत चालले होते, शरीरदुबळे होत होते, स्मृतीही अंधूक होत चाललीय का अशी अधून मधून शंका येई. पण समाधानी वृत्ती आणि प्रेमळपणा जराही कमी झाला नव्हता. निवृत्तीतला आनंद मनसोक्त घेत आणि परावर्तित करीत त्यांचे वय वाढत होते. त्यामुळे त्यांनी आपल्यातून कधी जाऊच नये असेच त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांना वाटे. त्यांचा शेवटचा आजारही आला तसाच झटकन त्यांना घेऊन गेला. अवघ्या बारा तासांत सकाळी एकरा-साडेअकराला त्यांना हार्ट-अँटॅक आला. लगेच उपचार सुरू झाले,आणि पुण्या-मुंबईला मुलांना फोन गेले. रात्री आठनंतर एकेक गाडी येऊन पोचली आणि सगळी मुले त्यांना भेटली. आम्ही दोघे सर्वात शेवटी दहा वाजता येऊन पोचलो. सलाइन,ऑक्सिजन वगेरे लावलेल्या अवस्थेत ते डोळे मिटून पलंगावर पडले होते. भोवतीला सगळे आप्तस्वकीय. मी त्यांच्या कानाशी जाऊन म्हणाले,""आप्पा मी आलेय. कसं वाटतंय तुम्हाला ?""

त्यांनी मोकळा असलेला हात माझ्या पाठीवरून फिरवत क्षीण आवाजात म्हटलं,"
"किती ग माझ्यासाठी माझ्या बाळांना त्रास झाला !"
------------------------------------------------------------------------------------------------

"पान नं. 6"

"आप्पा, मला ओळखलंत ?"""
"माझे भाई नाही आले ?"
"म्हणजे त्यांनी बरोबर ओळखले होते. मग त्यांनी माझ्याकडे थोडे पाणी मागितले. डॉक्टर सकाळी आप्पांना अँटॅक आला म्हणता क्षणी आले होते ते आता घरी जायला निघाले. मी दारापर्यंत त्यांच्याबरोबर जात त्यांना म्हटले,"
"आप्पांचं सर्व काही फार छान झालंय. त्यांना सुखानं जाऊ दे. आता उगाच त्यांना नाकातोंडात नळ्या घालून जगवत ठेवू नका."

"डॉक्टर मला म्हणाले,""त्यांना आलेले अँटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती.असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळ राहतीलसे" "आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पांनी प्राण सोडला.

बिचाऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती,वाचा,भान सगळे जात चालले; आणि नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पेसा,मनुष्यबळ,काही कमी नव्हते.पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते, आणि तेच नशिबी आले. ती आजारी पडताच आम्ही मुंबईला आणले. तिथे सगळी मुले,नातवंडे,लेकी,सुना-सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होतो.कामे वाटून घेऊन करत होतो. तिऱ्हाइताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान !कुणी कमी पडू देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुध्दीने,नाइलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करीत होती, अद्याप करतेय.

समजा, तिच्या ऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी औषधोपचार,सेवाशुश्रूषा,नवससायास करत राहिली असती.

तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षांच्या काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वतःचे औषधपाणी स्वतःच करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती अंथरूणात आराम करतेय आणि दुसरं कुणी तिची सेवाशुश्रूषा करतंय असं दृश्यप्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला नमानवणारी. आणि दुर्देवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्या सेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही.

आई गेली. मुलेबाळे,नातवंडे लेकीसुना,अगदी भरले घर होते, तरी तिच्या शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग आता यानंतर त्याबद्दल लिहून मी दुःख उकरून काढतेय का ? हे दुःख नव्हे; हा
----------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 7

वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलटसुलट विचारांचा, भावनांचा गुंता आहे.तो सोडवता आला तर पाहावा, त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावायासाठी हा सलारा खटाटोप.

या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत,दोन-तीन दिवस,

दोन-तीन दिवस असे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन. उरलेल्या वेळात माझ्या स्वतःच्या व्यापातच गुंतले होते, घर-संसार,प्रुफे,नव्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोठाय व्यवहाराची कामे आणि त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगेरेवगेरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतहीसतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोनछोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कविता वाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन आमंत्रितांसाठीचे वगेरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमांत काही अडथळा तर येणार नाही ? ऐनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही आमची अडचणही होऊन बसली होती, आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक यातना होत. आपण स्वतः किती स्वार्थी,कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. स्वतःचीच जेव्हा जाऊन राहत असे तेव्हा ?

हॉस्पिटलमधे मी आईच्या उशाशी बसले होते. माझी थोरली वहिनी आपल्या छोटया नातींना घेऊन आली होती. तासभर त्या छोटया मुलींनी खूप करमणूक केली.मोठया गोड पोरी. सगळ्यांना कौतुक. आईच्या शेजारी त्यांना पाहताना एकदममन कुठल्या कुठे गेले. वाटले, ही पलीकडे झोपलेली म्हातारी, माझी आई,हीहीएकेकाळी अशीच छोटी,चुणचुणीत,गोड होती असेल. तिचेही तिच्या आईवडिलांनी असेच कौतुक केले होते असेल...

फार बेचेन झाले. करूणेनं मन भरून आलं, डोळ्यांवाटे वाहू लागलं. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या या फेऱ्यात सुरूवातीच्या टोकाला कुठेतरी त्या छोटया पोरी आहेत,मध्याच्याही पुष्कळ पुढे कुठेतरी मी आह आणि अगदी शेवटच्या टोकाला आई आहे.आईची जागा काही काळाने मी घेणार, त्या वेळी ? त्या वेळी माझ्या वाटयाला आलेल्या फेऱ्याच्या सुरूवातीला कुणी,मधे कुणी,कुठेच कुणी आपले असे दिसेना.किंबहुना, तो फेराच नाहीसा झाला होता, फक्त शेवटच्या टोकाला मी लोंबकळत होते.खरे तर आपली ही अवस्था इतर कुणालाही क्लेश देत नाही, असा क्लेश होऊ शकेल असे लागेबांधे गुंतलेले आपल्याला कुणीही नाही; चला- खऱ्या अर्थाने आपण मुक्तआहो. आपल्यामुळे इतर कुणालाही दुःख नाही, ही केवढी आनंदाची घटना आहे !मग मला आनंद न होता हे असं तिसरचं काही कां होतंय ?

रात्र झाली आहे. नुकतेच डॉक्टर तपासून गेले. शरीराबरोबरच आईचं मनही
-----------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 8

अस्थिर होऊ लागलं आहे. स्मृती फार अंधूक होत चालली आहे आणि असंबध्दता वाढते आहे. वाचाही अस्पष्ट आणि असमर्थ होऊ लागली आहे. असे आणखी किती दिवस जाणार ? हे म्हणजे संपूर्ण परावलंबित्व. नेमकी तिला नको असलेली अवस्था. तिने आयुष्यभर अनेकांसाठी अनेक कष्ट उपसले. पण कुणाही पुढे मदतीसाठी याचना केली नाही. आपल्याला मरण कसे नको ? तर नेमके असे, असेच ती म्हणाली असती निश्चित. मी म्हणे लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची स्वतःची,चुलत दिराची,मामेसासूची,बरीच मुले माणसे घरात होती. सेपाकपाणी,आले गेले,सर्वांचा अभ्यास करून घेणे,सणवार,एवढया मोठया घरसंसारात त्याकाळाच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार,जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील ! माझ्यापुरते तरी कृतज्ञतेच्या भावनेनेमी तिच्यासाठी काही करायला नको का ? आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार ?आता तिच्यासाठी करण्यासाठी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे या परावलंबित्वातून तिची सुटका. पण हे कोण कसे करणार ?मर्सी किलिंगबद्दल अद्याप तरी नुसती चर्चाच चालूआहे. चर्चेत मला रस नाही;तिला तर कधीच नव्हता. याक्षणी मी तिच्यासाठी काहीकरणे, अगदी पुढला मागला कसलाही विचार न करता काही करणे म्हणजे...

सगळीकडे सामसूम आहे. प्रत्यक्ष मुलगीच खोलीत तिच्याजवळ असल्यामुळे हॉस्पिटलच्या नर्सिससुध्दा निर्धास्त आहेत. आम्ही, म्हणजे मी, बेल वाजवल्या शिवाय कुणीही खोलीत येणार नाही. आई शांत पडली आह. डोळा लागला आहे. हीच वेळ आहे. मोठया निश्चयाने मी जवळ गेले. म्हातारपणाने आणि आजाराने आवळचिवळ झालेली तिची एवढीशी मान. माझ्या हातांत पुरेशी शक्ती निश्चित आहे. आईसाठी काही करण्याची ही अखेरची संधी आहे. बंडखोर,क्रांतिकारी वगेरेमाझी एकेकाळची विशेषणे कालप्रवाहात कधीच वाहून गेली. आताच्या कुणालाही त्यातले काहीही माहीत नसेल. पण ती बंडखोरी अद्याप मेलेली नाही हे मी स्वतः जाणते ना ? माझ्या सामर्थ्याचा पुरेपूर अंदाज मला स्वतःला आहे ना ? मग ? मग अडतेय कुठे ? भीती ? ती तर कधीच नव्हती, नाही. कुठे जीव गुंतलाय का, की ज्यासाठी जगायला पाहिजे, अविचारी बनून चालणार नाही ? एकेकाळी असे खूपकाही होते. अगदी परवा परवा पर्यंतही असे थोडे शिल्लक असल्याचे अधूनमधून जाणवे. पण आता- या क्षणी तरी असा कुठलाही पाश नाही. माझे हात मुळीच थरथरत नाहीत. गादीचा कोपरा खूप जोरात दाबून पाहिला, आणि पलंगाचा कठडाही. हातांतपुरेसा जोर आहे. मग अडतेय कुठे ? मध्यमवर्गीय दुबळेपणा ? मी असे कृत्रिम वर्ग मानत नाही. मी त्या अर्थाने मध्यमवर्गीय वगेरे मुळीच नाही. भरपूर कष्ट मी आवडीने करते. कोणतेही आवश्यक काम करण्यात मला कमीपणा कधीच वाटलेला नाही. नाइलाजास्तव कष्ट करणाऱ्या माझ्या परिचयातल्या `कष्टकरी' वर्गातल्या अनेकव्यक्तींपेक्षा माझ्या वेयक्तिक गरजा फार कमी आहे. ते असो, पण माझ्यात असला
-----------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 9

कसला दुबळेपणा नक्की नाही. या क्षणी तरी नाही. माझ्या डोळ्यांदेखत अन्याय होत असेल तर तो समूळ निपटायला मी मागलापुढला विचार करणार नाही. मी पूर्वीचीच आहे; पिंड तोच आहे.

संतापाच्या भरात कुणालाही मारणं ही गोष्ट मुळीच कठीण नाही. कोणताही प्राणी हे करू शकतो. शांत डोक्याने, विचारपूर्वक शत्रूला मारणे हे चारचौघांचे काम नसेल,पण तेही फार कठीण काम आहे असे मला वाटत नाही. आपण ज्यांना क्रांतिकारी म्हणतो, त्यांतल्या अनेकांनी तेच केलेय. वेळी प्रसंगी मीही ते करू शकले असते. पणजिथे आपला जीव जडला आहे अशा, निरपराध, विश्वासाने झोपलेल्या व्यक्तीचा प्रेमापोटी गळा दाबण्याची अलौकिक शक्ती माझ्या हातांत नाही. या क्षणी मला ती शक्ती हवी होती, पण त्या बाबतीतला माझा दुबळेपणा फक्त जाणवला. आवंढा गिळता येईनासा झाला. खूप गरम अश्रू वाहू लागले. इतके असहाय दुःख यापूर्वीकधी झाल्याचं स्मरणात नाही. आईची ती मान आणि माझे ते हात यांच्यात दुबळेपणाची एकच चढाओढ लागून राहिली आहे. आई गेल्याला आता इतके दिवस लोटले तरी ही जीवघेणी चढाओढ डोक्यातून मिटतच नाही.

याच आईने आम्हा मुला-नातवंडांची आणि आप्तेष्टांची अनेक आजारपणं काढली. जाग्रणं केली, काळजी वाहिली, मर मर मरून आम्हांला तऱ्हतऱ्हा करून खाऊपिऊ घातलं. अभ्यास करून घेतला. मुलं मोठी झाली तशी पांगत गेली. मग आई आम्हां सगळ्यांना या ना त्या कारणाने कोकणात आपल्याकडे बोलवत राहिली,आमच्या वाटेकडे डोळे लावून बसू लागली. आंबे,नारळ,बोरे,शेवग्याच्या शेंगा,तऱ्हेतऱ्हेची फुलझाडे- जे जे तिच्या मेहनतीतून ती फळाला आणी ते ते आम्हांसर्वांना ती कुणा ना कुणाबरोबर पाठवत राही. मग नारळ पाठवताना ती पोचवण्यासाठी त्याला किती त्रास होत असेल याची ती विचार करत नसे. तिची असली कामे करणाऱ्या मंडळीनाही कधी तक्रार केली नाही. कारण या नाही त्या तऱ्हेने ती त्यांच्या उपकाराची परतफेड करत असावी. पण असल्या भेटी स्वीकारताना आमची,निदान माझी तरी, फार पंचाईत होई. मी नेहमीप्रमाणे काहीतरी कामात असे. कधीकामासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत असे. कधी घरात तिसरेच कुणी काही महत्त्वाच्या कामासाठी आलेले असे. अशा वेळी आईने पाठवलेले आंबे,पोहे,किंवा असलेच काही घेऊन कुणीतरी येई. आईचे काम केल्याची आणि विशेषतः पु.ल.देशपांडेयांच्या घरी जाऊन आल्याची धन्यता त्याच्या चेहऱ्यावर दिसे. माझा मात्र चेहरा ओशाळा होई. आईचा राग येई. या वस्तू इथे मिळत नाहीत का ?मग उगाचइतक्या दुरून त्या कुणाबरोबर तरी पाठवायच्या कशाला ?आणून पोचवायचा त्यांनाही त्रास आणि आता त्यांचे आदरातिथ्य करत बसायचा मलाही त्रास. मग त्यांच्याशी काहीतरी बोलावे लागे. चहापाणी विचारावे लागे. एरवी मी दिवसभर
-----------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 10

बडबडत असते. रोजचा कित्येकदा आणि कित्येक कप चहा करते. पण हा कपभरचहा आणि ही इकडली तिकडली चौकशीची चार-सहा वाक्ये मला जड वाटत.

या वस्तू इथे मिळत नाहीत का? आम्ही कामात असतो हे हिला कळत नाही का ?पुण्या-मुंबईसारख्या शहरात, अगदी एखादा पु.ल.देशपांडे किंवा डॉ. ठाकूर असला तरी, त्याचं घर शोधून काढून या भेटी पोचवायच्या म्हणजे काय ताप असतोहे कितीदा सांगूनही हिला कळत कसं नाही ? आणि वर त्या भेटीबरोबर पत्रही असे.यांतली ही पिशवी या नातवाला पोचव, ती त्या नात जावयाला पोचव-म्हणजे आम्हांला काय दुसरे धंदेच नाहीत का ? असल्या आईची मग मला लाज वाटे. आणि
ओशाळ्या सुरातच तिचं हे मला न पटणारं वागणं कसं चूक आहे हे न राहवून मीत्या पाहुण्यांना बोलूनही दाखवीत असे. मला कळू लागल्यापासून जवळजवळ तीस एक वर्ष आईचं हे वागणं माझ्या काटेकोर व्यवहारी दृष्टिकोनात कधी बसलं नाही आणि त्यामुळे ते मला कधी मनापासून रूचलंही नाही. पण आई आईच राहिली आणि त्यानंतर मात्र पुढे पुढे आपलेच काहीतरी चुकतेय असे मला वाटू लागले. आता आई नाही. माझ्यावर तसे ओशाळे होण्याचा प्रसंग तर आता कधीच येणार नाही. ती पाठवी त्या वस्तू, मला हव्या तेव्हा मी आणू शकेन. ते सगळे काही इथेही मिळते.मात्र तिने लावलेल्या आणि वाढवलेल्या झाडांचे आंबे, नारळ, शेवग्याच्या शेंगा, बोरे,रामफळे,फणसाच्या कुयऱ्या- इथल्या बाजारात विकायला येत नाहीत. इथे मिळणाऱ्या या व्सतू कदाचित अधिक चांगल्या प्रतीच्याही असतील. जिभेला त्याअधिक चांगल्या लागतील. पण आत कुठेतरी पिंडाला तृप्त करण्याचं सामार्थ्य त्यांनानक्कीच नाही. कारण त्यांना आईच्या हाताचा स्पर्श नसेल.

हा पिंड म्हणजे काय ? आई-आप्पांनी मला जन्म दिला. माझं अस्तित्व हे त्यांच्यामुळे. पण जन्म दिला म्हणजे काही उपकार केले असे मी मानत नाही. तोत्यांच्याही आनंदाचा भाग होता. त्यांनी,विशेषतः आईने, आम्हां मुलांचे पालपोषण केले. पण हाही तिच्या आनंदाचाच भाग म्हणायचा. स्वतःच्याच मुलांचे केले ना ?मी तिच्याच पोटची. पण तिच्या पोटची म्हणूनच तिच्यातले अनेक गुण दोषही अपरिहार्य माझ्यातही आले आहेत. गुणांपेक्षा दोषच अधिक. तिच्याच सारखी मीफार मोठयाने बोलते. तिच्या मोठयाने बोलण्याचा आम्हांला कधी त्रास झाला नाही,कारण लहान पणापासूनच आम्हांला त्याची सवयच झाली होती. मला वाटते. शहराबाहेरराहणारी माणसे जरा मोठयानेच बोलतात का ? कोण जाणे. पण तसे म्हणावे तरमाझी इतर भावंडे माझ्याइतकी मोठयाने बोलत नाहीत. मी मात्र फार मोठयाने बोलते. याची जाणीवही मला सतत होत असते. कारण भाईला त्याचा फार त्रास होतोहे मला कळते. पण तरीही, अनेकदा ठरवूनही मी माझी ही सवय बदलू शकले नाही.हा पिडांचाच धर्म ना ?
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 11

तिच्यातला माझ्यात उतरलेला दुसरा दोष म्हणजे ती तोंडावर कुणाचे कौतुक करू शकत नसे. ही बाई एके काळी शिक्षिका होती. लग्न झाल्यावर पहिली तीन मुले होईपर्यंत तिने हे काम करून जी काही आर्थिक कमाई केली त्याचाही हातभार तिच्या संसाराच्या पायाला लागला. वक्तृत्वात तिला बक्षिसे मिळाली होती. घोडयावर बसावं उत्तम घोडेस्वार व्हावं, ही तिची अपुरी राहिलेली इच्छा मी पुरी करावी असे तिलाफार वाटे. त्या दृष्टीने तिने प्रयत्नही केले. मला अनेकदा सांगून पाहिले. मला घोडाहा प्राणी फार म्हणजे फार आवडतो. घोडयावर बसायलाही माझी ना नव्हती. पण त्याबद्दल आईला होती तितकी ओढ मला नव्हती. तिचे स्वप्न होते, तसे माझेत्याबद्दल नव्हते. मलाही तशी हौस असती तर तिने रत्नागिरीसारख्या ठिकाणी एखादा घोडापाळलाही असता कदाचित, कुणी सांगावे ! पण हीच बाई पुढे वाढत्या संसारात अशीकाही बुडून गेली, की वेळीप्रसंगी एखादी पोथी आणि तिला येणारी पत्रे यापलीकडेतिचे वाचन राहिले नाही. अधूनमधून आप्तेष्टांना पत्रे लिहिणे आमि संसारातलेहिशेब-ठिशेब यापलीकडे लेखन गेले नाही. नाही म्हणायला तिच्या मृत्यूनंतर, परवा परवा तिच्या कपाटात दोन-चार वह्या सापडल्या. त्यांत तिने डायरीवजा थोडे लिहिलेले आहे. मी ते वाचल्यावर हसावे का रडावे कळेना. सगळ्या लिहिण्यात सूरएकच. आप्पांबद्दलची तक्रार. आणि खरे सांगायचे तर तिने लिहिलेल्यात काहीही अतिशयोक्ती नाही. म्हणजे आमचे आप्पा वाईट होते का? मुळीच नाही. त्यांच्यासारखा सज्जन गृहस्थ शोधून सापडणे कठीण. पण सज्जनपणा,चांगुलपणा,दातृत्व,आदरातिथ्य वगेरे गुण प्रसंगी उपद्रवीच असतात. मला वाटते, दुर्गुणांप्रमाणेचसद्् गुणांचेही माणसाला व्यसन लागते. आणि व्यसनाधीन माणसाच्या बायकोची परवड व्हायची ती होतेच. दुर्गुणी माणसाच्या बायकोबद्दल इतरांना सहानुभूती तरी वाटत असते. पण सद््गुणी नवऱ्याच्या बायकोला सक्तीने आनंदी मुखवटा वापरावा लागतो. आणि सदेव हसतमुख राहण्याच्या सक्तीसारखी दुसरी महाभंयकर शिक्षा नसेल. हे झाले जनरल. प्रत्यक्ष आमच्या घरातलं सांगायाचं झालं तर दुसऱ्याला त्रासहोईल असं जाणूनबुजून आप्पांनी कधीही काही केलं नाही. अगदी स्वप्नात देखील नसावं. आप्पा संतच होते. पण जुन्या काळच्या संतांच्या बायका निरक्षर होत्या,आत्मचरित्रे लिहित नव्हत्या हे आपल्या संस्कृतीचे सौंदर्य टिकवायला किती उपकार कठरले ! आईने ह्या वह्या कधी लिहिल्या कोण जाणे. पण त्यात तिने आप्पांना दोष मुळीच दिलेला नाही. नवरा हा असाच असतो असं ती गृहीतच धरत होती. आप्पांचा मोठेपणा तिला कळत होता आणि तो टिकावा म्हणून आपल्या परीने ती आनंदाने कष्ट उपसत होती. पण शेवटी तीही माणूसच. कधी थकू शकते, स्वतः आजारी पडू शकते. याचं भान ठेवून, तिच्या अडचणी लक्षात घेऊन, मग आप्पांनी त्यावर आपली गृहस्थी बेतली असती तर आपलं मन मोकळं करायला तिला ह्या वह्यांचा आधार घ्यावा लागला नसता. तशी आप्पांची जीवनमूल्ये बावनकशी होती. त्यामुळेच ते संत म्हणा किंवा फार थोर म्हणा असे होते, निर्भेळ माणूस नव्हते. ह्या माणसांच्या जगात खरी स्वच्छ
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 12

माणसेच सापडत नाहीत. आणि संत म्हटले किंवा फार थोर लोक म्हटले, की मग`लोकापवादो बलवान मतो मे' आले आणि पत्नीच्या नशिबी वनवासही आलाच.

आम्हांला आई दिसली ती दिवसरात्र काही ना काही कामातच असलेली. तिने आम्हांला तरतऱ्हा खाऊपिऊ करून घातले, शिकवले, आमची आजारपणे काढली;पण कधीही प्रेमाने जवळ घेऊन मुका घेतल्याचे आठवत नाही, की तोंडभर कौतुक केल्याचेही आठवत नाही. या गोष्टींना तिला वेळ नव्हता म्हणणे सर्वस्वी खरे नव्हे.मनात असते तर त्यात अशक्य काहीच नव्हते. तिचा तो स्वभावच नव्हता असेच म्हणावे लागेल. तिला आमचे दोषच दिसायचे आणि ते घालवण्यासाठी जिवाचे रान करण्यात ती धन्यता मानायची. इतरांनी आम्हांला नावे ठेवू नयेत या साठीही हीधडपड असेल. पण कौतुक करून घेण्याची भूक इतकी मोठी असते, की आईच्या रोजच्या आमच्यासाठी होणाऱ्या काबाडकष्टांपेक्षा वर्ष-सहा महिन्यांनी पाठीवरूनप्रेमाने फिरणारा आप्पांचा हात आम्हांला अधिक मोलाचा वाटे.

समिधाच सख्या या, त्यांत कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?
जात्याच रूक्ष या, एकच त्यां आकांक्षा
तव आंतरअग्नी क्षणभर तरि फुलवावा !

या कुसुमाग्रजांच्या ओळी कविता म्हणून माझ्याप्रमाणे इतरांनाही आवडतच असणार. कितीतरी संसारी बायकांना त्यांत ओळखीचा चेहरा दिसल्याचने त्यांचा आधारही वाटत असणार. कवितेच्या बाबतीत हे सर्व ठीक असते. पण प्रत्यक्षात,`जात्याच रूक्ष' असे काहीही कुणालाही आवडणार नाही. अगदी त्या समिधांनाही स्वतःतल्या या गुणाचा तापच होत असेल.

आई मधला हा दोष माझ्यात सहीसही उतरला आहे. तिला स्वतःतल्या त्या दोषाची जाणीव नव्हती. ते तिला कर्तव्यच वाटे. त्यामुळे त्या बाबतीत ती सुखी होती. मला हादोष सतत जाणवत असतो. पण त्यातून सुटका नाही. एखादे पुस्तक वाचले,नाटकपाहिले, गाणे किंवा व्याख्यान ऐकले, आणि ते खूप आवडले, तरी त्यात एवढेसे काहीन्यून राहिले असेल तर ते नजरेतून सहसा सुटत नाही, विसरता येत नाही; त्या गोष्टीला चांगले म्हणून गुणगान करताना ती अधिक चांगली व्हावी या हेतूने का होईना. पण ते न्यून ही सांगितल्यावाचून राहवत नाही. हाही पिंडाचाच भाग.

आईमधला स्पष्टवक्तेपणाही असाच माझ्यात आलेला आहे. हा गुण म्हणायचा की दोष ? स्पष्टवक्तेपणा हा तसा पाहिला तर गुणांच्या यादीतच सापडतो. पण प्रत्यक्षात मात्र तो ज्याच्या अंगी असतो तो माणूस फारसा कुणाला आवडत नाही हाच अनुभव येतो. कुणीतरी दुसऱ्या कुणाच्यातरी बाबतीत स्पष्टवक्ता असणे सर्वांना मानवते. व्यासपीठावरून भाषण करताना तर हा गुण प्रकर्षाने जाणवतो. सर्व श्रोत्यांकडून
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 13

पसंतीच्या टाळ्या मिळतात. पण प्रत्यक्षात दोन व्यक्तींत एक स्पष्टवक्ती असणे म्हणजेदुसरीचा दोष न घाबरता सांगणे असाच प्रकार होतो. मग तो फटकळपणा ठरतो.कुणालाही सहसा न आवडणारा. एकाच नाण्याच्या या दोन बाजू. छाप आणि काटा.स्पष्टवक्तेपणा हा त्या सामान्य व्यक्तीच्या नशिबी काटाच होऊन येतो. सार्वजनिकपुढाऱ्याच्या नशिबी मात्र तो छाप होतो. आम्ही सामान्य माणसे. तेव्हा पिंडातूनआलेल्या

या स्पष्टवक्तेपणाच्या दोषामुळे आम्हांला मात्र मिळणे किंवा कुणाचे प्रेममिळणे फार फार कठीण. इतर लोक आम्हांला सदेव टाळतच असतात. फारच खरेबोलताता ते `तुमची भीती वाटते ' असे स्पष्ट सांगतात, इतकेच.

या स्पष्टवक्तेपणाप्रमाणेच कामसू वृत्तीही गुण आणि दोष यांच्या सरहद्दीवरचवास्तव्याला असते. सतत काही ना काही काम करत राहण्यातच धन्यता वाटणारीमाणसे चांगली की वाईट ? एके काळी मी `चांगली' असेच उत्तर दिले असते. त्यालाथोर थोर आदर्श व्यक्चींच्या वचनांचा आणि वर्तनाचा आधारही दिला असता. पणआता मात्र `निश्चितच वाईट' असेच म्हणेन. आता पाय जमिनीला लागले आहेत.आता थोरामोठयांचा ऐकीव आदर्श जीवनाचा आधार वाटत नाही. स्वतःचे अनुभववेगळेच सत्य सांगून जातात.

आमचे आप्पा आणि आई दोघेही सतत काही ना काही काम करत असायचे.त्यामुळे या बाबतीत त्यांचा एकमेकांना त्रास झाला नाही. त्यांचा हा गुण आम्हांबहुतेक भावंडात उतरलाय. लहानपणी हे ठीक असते. पण पुढे बायको जर आळशीमिळाली तर तिला अशा कामसू नवऱ्याचा जाचच होईल. हे झाले माझ्या भावांच्याबाबतीत. पण मुलींचा फक्त नवऱ्याशीच नव्हे, तर सासरच्या सगळ्याच घराशी संबंधयेतो. अशी वेळी तिथली माणसे जर आळशी किंवा जरूर तरच हातपाय हलवणारीअसतील तर तिच्यावर कामाचा खूपच भार पडतो. म्हणजे या कामसू व्यक्तीला श्रमअधिक होतात. त्यातून, आपण आहोत म्हणून हे सगळं निभवलं जातंय असाअंहकारीही स्पर्श करायला लागतो. शिवाय, या दोन परस्परविरोधी प्रवृत्ती एकाचघरात एकत्र नांदायच्या म्हटले की संघर्ष अटळच होऊन बसतो. पांढरपेशा समाजातअसले संघर्ष चारचौघांना कळणे ही लाजिरवाणी गोष्ट वाटते आणि मग मनाचा फारकोंडमारा होतो. घरात काय आणि समाजात काय, कामसू माणसांचे प्रमाण एकूणकमीच असते. त्यामुळे जी अशी सतत काम करणारी माणसे असतात त्यांना इतरलोक आळशी आणि ऐतखाऊ वाटतात आणि वेताग येत असतो. इतरांना तर याकामसू लोकांचा सदेव तापच होत असतो. शेवटी सारखे काम तरी कशाला करतराहायचे ? शाळेत असताना वाचलेली `लोटसईटर्स 'ही कविता मला या संदर्भातनेहमी आठवत राहते. ते तत्त्वज्ञान कुठेतरी आत अंतरात्म्याला आवडलेल असते.आणि आपण न थकता सतत काम करू शकतो हा आपला मोठेपणा न वाटता,आळशी नाही ही उणीव वाटत राहते. असो.
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 14

आईचा हात फार सढळ होता. तिथे हिशेबी वृत्ती नव्हती.मनाचे मूलभूत औदार्यआणि परंपरागत रीतिरिवाजांच्या बंधनातून पत्करलेली विशिष्ट जीवनपध्दती यांतूनकधीकधी मजेदार प्रसंग निर्माण होत. सहज गंमत म्हणून आठवतो तो एक सांगते.आमच्या लहानपणी कोकणात आम्हांला घरात सुपे, रोवळ्या,हारे वगेरे गोष्टीलागायच्या. त्या काळी बालद्या हा प्रकार फारसा वापरात नव्हता. मोरीत बसूनधुवायला दगडी डोणी असत आणि धुतलेल्या कपडयांचे पिळे ठेवायला हारे असत.धान्य पाखडायला सुपं लागत आणि सांदूळ धुवायला रोवळ्या. त्या काळी या वस्तूविणून विकायला महारणी यायच्या. आणची एक ठरलेली महारीण होती आणिवर्षांतून दोन-तीनदा ती आमच्याकडे या वस्तू विकायला आणी.माझ्या आठवणीततरी वर्षानुवर्षे हीच बाई या वस्तू घेऊन येई. ती आली की तिचा माल ती उलट-सुलटकरून दाखवी. आईला पसंत पडला की तो एका बाजूला ठेवी. मग काय काय घ्यायचेते ठरले, की भावात घासाघीस चाले, आणि शेवटी सौदा पटला की मग त्या वस्तूंवरपाणी टाकून तो माल आई घरात घेई. महारणीला शिवणे ही गोष्ट अब्रह्मण्यम् होती.तिने केलेल्या वस्तूंनादेखील त्यांवर पाणी टाकल्याखेरीज आम्ही हात लावायचा नसे.तिच्या आणि आमच्या सामाजिक स्थानातला हा फरक आई कसोशीने पाळत असे.त्यात काही चूक अगर अन्याय आहे असे तिला कधीही वाटले नाही. उलट, हे असेचअसायला हवे यावर तिची इतकी श्रध्दा होती, आणि आम्हांलाही या बाबतीत तिचाअसा काही धाक होता, की वेगळा काही आचार-विचार तिथे त्या काळी संभवतचनव्हता. केक मेलांवरून पायपीट करून भर उन्हाची आमच्या दारी येणारी हीमहारीण मग तिथे चांगली तास-दोन तास रेंगाळत असे. आई मग तिला जेवण देई.चहापाणी देई. चहाबरोबर काहीही खायला दिले की ती ते लगेच मुलांसाठी न्यायलाम्हणून मोटलीत बांधू लागे आणि मग आई तिला रागवे."
"दिलंय ते निमूटपणे खा.उन्हातान्हातून आलीस ते पाय काय मुलांचे नाय भाजले. आणि मुलांची आठवणमलाही आहे. आण्हांलाही देवाच्या दयेनी भरपूर मुलंबाळं आहेत. हे घे मुलांसाठी. पणतुला दिलंय ते तू खा."
" असा संवाद दर वेळी चाले. तिच्या मुलांची आणि घरच्यासर्वांची नावे आईला माहीत होती. आणि आमची सर्वांची तिला. मग हा कुठे असतोआणि तो हल्ली काय करतो वगेरे एकमेकींच्या चौकश्या चालत. सुखदुःखाच्या गोष्टीचालत. जाताना ती तांदूळ,पोहे,लोणचे,कसली कसली औषधे, जुने कपडे, कायकाय घेऊन जाई. या वस्तू देताना आईच्या मनात कोणताही हिशेब नसे. पण तिचामाल विकत घेताना मात्र घासाघीस ही व्हायचीच.

एकदा अशीच ती महारीण मागल्या दारी येऊन बसली आणि तिने नेहमीप्रमाणेआईला हाक मारली. मग अगदी नेहमीच्याच पध्दतीने खरेदी वगेरे झाली. पाणीटाकून माल उचलत असताना आईचे लक्ष तिच्या सुजलेल्या पायाकडे गेले.आईनेचौकशी केली तेव्हा कळले, की रानात कसलातरी मोठठा काटा लागून तिची पोटरी
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 15

थोडी फाटली होती आणि आता त्यात पू पण झाला होता. पाय सुजला तर होताच,पण ठणकल्याने दोन-तीन दिवस झोपही आली नव्हती. आईने `पाहू' म्हणून तिचापाय पकडला. मग गरम पाणी, पोटॅशियम परमॅगनेट,कापूस,बँडेज म्हणून जुन्याधोतराच्या पटटया वगेरे वस्तू आणि जखमेवरचा हमखास इलाज असे ते `शेटटीचंमलम' आणायला आण्हांला सांगून आईने सगळा पू पिळून काढला आणि यथासांगऔषधपाणी करून तिचा पाय बांधून दिला. हे करत असताना ती बाई मोठमोठयानेओरडत,रडत होती आणि त्याच्याही वर आवाज काढून,या वयाला आणिबाईमाणसाला असं ओरडणं शोभत नाही, सहन करता येत नाही तर बायकांच्याजन्माला आलीस कशाला, वगेरे व्याख्यान आई तिला देत होती,. शेवटी एकदाचे तेड्रेसिंग संपले. पुवाने भरलेले कापसाचे बोळे वगेरे एका कागदात गुंडाळून,`रानातटाकून दे' म्हणून आईने तिच्याकडे दिले. मग आई तिच्या टोपल्यांवर पाणी टाकी तसे.आम्ही आईच्या डोक्यावर कळशी ओतली आणि आंघोळ करून आई घरात आली.एका छोटया डबीत आणखी थोडे मलम घालून आईने तिला ते पुन्हा एकदोनदालावायला म्हणून दिले. झाल्या प्रकारात काही अंतर्गत विसंगती आहे असे त्या काळीतिला, आईला अगर आम्हालांही कुणाला वाटले नाही.

पुढे वय थोडे वाढल्यावर आणि शिक्षणाने थोडे ज्ञान आल्यावर आईच्या यासोवळ्या-ओवळ्याचा मला फार राग येऊ लागला. आज मात्र हा प्रसंग आटवला, कीआईचा कर्मठपणा आणि सह्दयता दोन्ही एकाच वेळी हातात हात घालून उभीअसल्यासारखी दिसतात. या नेहमीच्या, ओळखीच्या, सर्व संबंधित गोरगरिबांबद्दलतिच्या पोटात अमाप माया होती. या बाबतीतले तिचे रागलोभ सगळे वेयक्तिक होते.आमचे सार्वजनिक असतात. वाटते, मी आईच्या जागी असते तर त्या महारणीकडचामाल घेताना तिला अस्पृश्य मानून त्यावर पाणी नक्कीच टाकलं नसतं. पणत्याचबरोबर बहुधा तिच्या पायाकडे सोयीस्कर दुर्लक्षही केले असते कदाचित. फार तर"
"एखाद्या डॉक्टरला दाखव. वेळेवर औषधपाणी केलं नाहीस तर पाय तोडावालागेल"
" असा कोरडा सल्ला दिला असता. कुणी सांगावे !

गेल्या पंधरा-वीस वर्षात मी जेव्हा जेव्हा रत्नागिरीला गेले, तेव्हा तेव्हा सुंदराबाईम्हणून एक बाई न चुकता भेटायला यायची. मलाच नव्हे, आम्हां मुलांपेकी कुणीहीरत्नागिरीला गेले तरी ती भेटायला येऊन जायचीच. आम्ही दोन-तीन दिवसांसाठीगेलो तरी तिला कसा सुगावा लागे कळत नसे. एखादी वेडी भिकारीण अशी ती दिसे.केस पिंजारलेले, काहीशी गलिच्छ. एकटी असली तरी ती सारखी बडबडत असायची.तिच्यात असं काहीतरी होतं की मला ती कधीच आवडली नाही. आईच्या पोटातमात्र तिच्याबद्दल अपरंपार दया असे. आमच्याकडून पेसे किंवा एखादी वस्तू हातावरपडेल या आशेने ती येई. पण येताना कधी रिकाम्या हाताने येत नसे. कुठल्यातरीदुकानातून विकत घेतलेली गलिच्छ कागदात बांधलेली एखादी खाण्याची वस्तू ती
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 16

घेऊन येई. चिवडा, लाडू फुटाणे, किंवा असलेच काहीतरी. ते ती आम्हांलादेई आणि खाण्याचा आग्रह करी. आम्हीही तिला भरघोस काही द्यावे अशी आईचीअपेक्षा असे. तिला उचलून काही द्यायला आमची ना नसे, पण तिने फार वेळरेंगाळून आम्हांला त्रास देणे, तिने आणलेले आम्हांला खायला लावणे, याला आमचाविरोध असे. एके काळी आपण कसे खूप श्रीमंत होतो, मग नवरा मेल्यावरआपल्याला इतरांनी कसे लुटले, मग आपल्या डोक्यावर त्याचा परिणाम कसा झाला,त्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनीही आपले घरदार धुऊन नेऊन आपल्याला भिकेलाकसे लावले वगेरे आपली कहाणी तिने आईला सांगितली होती; आणि त्यावर आईचापूर्ण विश्वास होता. आता ही कहाणी खरी असू शकेल, तशी खोटीही असू शकेल.आणि काहीही असले तरी त्याचा आम्हांला कां त्रास? पण आईला वाटे प्रसंग,कुणावर कसा येईल सांगता येत नाही, तेव्हा आम्ही त्या सुंदराबाईशी फारसहानुभूतीने वागावे."

"ती तर अर्धवट वेडीच आहे. तिला काय कळतं ?पण आम्ही शहाणी आहोतना ? मग थोडं सहन केलं तर काय बिघडतं ? इतक्या लांबून पायपीट करत तुम्हांलाडोळे भरून पाहायला येते. एके काळची घरंदाज बाई. आता भिकारी झाली,वेडीझाली, तरी रीतिरिवाज रक्तात आहेत. कुणाला भेटायला जायचं तर रिकाम्या हातानेनाही जाणार. तिच्याकडे पेसे कुठले ? पण कसंतरी करून काहीतरी प्रेमाने आणले, तरतुम्हांला तिच्या समाधानासाठी थोडं तोंडात टाकायला काय होतं ? स्वच्छतेची थोतांडमला नका सांगू !हॉटेलात खाता-जेवता , तिथे सेपाकघरात काय चालतं ते पाहता काकधी ? पण तिकडे ठणकावून पेसे घेतात तेव्हा तुम्ही निमूटपणे नोटा काढून द्याला. इथेही प्रेमानं काही आणते तर तिची किंमत नाही. आईला आई म्हणता हे तरी माझंनशीब !"
" - इथपर्यंत आईची मजल जायची. त्या सुंदराबाईबद्दल आईला इतकाउमाळा कां ते मला कधीच कळले नाही. मला तर ढोंगी वाटायची. पण आईचादृष्टिकोन काही बाबतीत हा असा फार उदार होता. कदाचित नेमित्तिक भेटीलायेणाऱ्या आम्हां मुलांपेक्षा, नित्याच्या या गोतावळ्याचा आईला अधिक आधार तरवाटू लागला नसेल ? कोण जाणे !

अशीच एकदा आप्पांना बरं नाही म्हणून मी रत्नीगिरीला त्यांना भेटायला गेलेहोते. आप्पा, आई दोघेही थकलेले, तेव्हा सेपाकाला एक पोरगी आणि वरकामालाचोवीस तास घरी राहणारी एक बाई अशी दोन बायका कामाला आहेत हे मलाठाऊक होते. मी तीन-चार दिवसांसाठी येणार हे कळवले होते. मी संध्याकाळी जाऊनपोचले आणि दुसरे दिवशी सकाळीच वरकामाला असलेल्या बाईने आपली पाळी सुरूझाल्याचे सांगितले. म्हणजे आता पुरे तीन दिवस ही नुसती बसून राहणार. आईचे याबाबतीत कडक सोवळे असे. त्याचा फायदा घेऊन महिन्यातून दोनदादेखील `पाळी'चेनिमित्त सांगून कुणी बसून खाल्ले तरी तिला चाले. अशा वेळी त्या दूर बसतात याचेचतिला कौतुक. आम्ही कुणीही आपापल्या घरी विटाळ पाळत नाही ही गोष्ट तिलामुळीच आवडत नसे. त्यामुळे आमच्या घरी कधी राहायला येणेही तिला मनापासूनपसंत नसे. तिच्या या वागण्याचा फायदा कामवाल्या बाया चांगलाच घेत. मी घरीआल्यावर आप्पा-आईना आवडेल असं काहीतरी करून खाऊपिऊ घालणार, तरहाताखाली मदतीला कुणी नाहीच, आणि त्यात सेपाकाला येणाऱ्या पोरीनेही "
"पोटदुखते आहे,"
" असा निरोप पाठवला. मी वेतागून म्हटले,"
" आजच नेमकं हिचं पोटकसं दुखायला लागलं ?"
" तर आई म्हणाली,"
"तिचे दिवस भरत आले आहेत, तीलवकर बाळंत होणार असेल."
" मला त्या दोघीचा, आईच्या सोवळ्या-ओवळ्याच्याकल्पनेचा आणि माझ्या नशिबाचाही भयंकर राग आला. मी कधी नव्हे ती माहेरीआले तरी तिथेही मला क्षणाची विश्रान्ती नाही, याचे आईला वाईट वाटले. पण तिनेत्याबद्दल त्या दोघीनांही दोष न देता, स्वतःचे वय झाल्यने आणि ढोपरे फार दुखतअसल्याने आपल्याच्याने आता होत नाही, नाहीतर आपणच कसे वेगळे केले असतेहेच ऐकवले.

तिसरे दिवशी माझा सगळा सेपाक करून झाल्यावर सेपाकीणी आली. मीम्हटले.""यायचंच तर लौकर का नाही आलीस? आता सगळा सेपाक झालाय; तूजा."" तर आईने तिला जेवूनच जायला सांगितले. कारणे दोन. एक तर ती रोजसेपाक केल्यावर जेवूनच घरी जायची.,मग आज उपाशी पोटी कसे पाठवायचे ? आणिदुसरे, त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे ती गरोदर आहे आणि पहिलटकरीण आहे.तिला काही खावेप्यावे वाटत असले तरी तिला कोण करून घालणार ? मी इतकाचांगला सेपाक केलाय, तर दोन घास खाऊन तिचा आत्मा तृप्त झाला तर परमेश्वरमला आशीर्वादच देईल. मला स्वतःला मात्र राब राब राबून मिळणाऱ्या परमेश्वराच्यात्या आशीर्वादापेक्षा दोन घटका विश्रान्ती आणि आप्पांच्या प्रकृतीकडे अधिक लक्षदेता आलं आसतं तर ते अधिक मोलाचं होतं. पण आईचे सगळे तर्कशास्त्रच उलटेहोते. त्यामुळे तिचे मझे कधई पटलेच नाही

आज आई नाही. आता मागे वळून पाहताना असे अनेक प्रसंग आठवले, कीत्यामागच्या तिच्या मनाचा मोठेपणा दिसतो आणि स्वत:ची लाज वाटते. आईचंऔदार्य माझ्या बहिणीत आलंय. माझ्यात आप्पांची निवृत्ती थोडीबहुत आली असावी,पण आईचं हे औदार्य मात्र जरासुध्दा आलं नाही

मला वाटते, औदार्यामागे विचार, सद््सद््विवेकबुध्दी नसते. कुणालाही पटकनकाही देण्यातला निर्भेळ आनंद तेवढा असतो. या आनंदाचा छंद लागला, की औदार्यहा त्या व्यक्तीचा अविभाज्य घटक बनतो. हा फार मोठा गुणच मानला पाहिजे.कारण त्यातून स्वतःला सुख लाभतेच, पण दुसऱ्यालाही लाभच होतो, आनंद मिळतो.शिवाय, त्यात समाजविघातक असे काहीही नाही. औदार्यामुळे स्वभावाचे काही कोपरेघासून जाऊन जीवनाचा पोत छान तलम बनत असावा.

माझी आई किंवा तिच्यातला हा गुण मोठया प्रमाणावर लाभलेली माझी बहीण याकुणालाही, काहीही पटकन उचलून देताना मी अनेकदा अनुभवलंय. माझ्या हातून
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 18

मात्र असं सहसा घडत नाही. एखादी वस्तू किंवा पेसे मागायला दारी आलेल्याला मीसहज `नाही' म्हणून घालवून देऊ शकते. मग ती मागणी कितीही शुल्लक असो किंवामागणारी व्यक्ती कितीही थोर असो. भिकाऱ्याला द्यायलातर पाच-दहा पेशांचेनाणेदेखील माझ्या हातून कधी सुटत नाही. त्यामुळे मी फार चिक्कू आहे असाकुणाचाही समज होणे स्वाभाविक आहे. पण अगदी खरं सांगायचं तर मला त्याचेसोयरसुतक जरासुध्दा नाही. मी तशी रेशमाच्या किडयाच्या जातीची, स्वतःभोवतीछोटासा कोष विणून त्यात राहणारी व्यक्ती आहे. माझ्या या बंदिस्त जगात ज्यांनास्थान आहे असी मोजकीच माणसं आहेत. तिथे त्यांच्या मनाचे आणि मतांचे फारमोल आहे. त्या बाहेरील जगाला माझ्याहिशेबी काही महत्व नसावे. मला सर्वार्थाने नओळखणाऱ्या अनेकांना हे विधान चुकीचे किंवा अतिशयोक्त वाटेल. पण तसे नाही.मला योग्य वाटेल तिथे कितीही आणि काहीही देताना आणि पुढल्या क्षणी तेविसरूनही जाताना मला मी पाहिले आहे. पण त्या क्षणी तिथे `इदं न मम' हीनिःसंगतेची भावनाच प्रबळ असावी. औदार्याचा लवलेशही नसावा. म्हणून मलावाटते, या बाबतीत मी कदाचित आप्पाची मुलगी शोभेन.

आमचे आप्पा हे निष्णात फौजदार वकील होते. तर्कशुध्द विचार करत निर्णयालायेण्याची, उलटसुलट विचार करून शंका काढण्याची त्यांना चांगलीच सवय होती.बुध्दिबळ आणि ब्रिज हे त्यांचे आवडते खेळ होते. या दोन खेळांचा आणि तर्कशुध्दविचारसरणीचा परस्परसंबंध असेल का ?

या तिन्ही गोष्टी मलाही खूप आवडायच्या. त्यांतल्या बुध्दिबळ आणि ब्रिज याखेळांशी पुढे माझा काहीच संबंध राहिला नाही. पण विचारांचा खेळ मला अजूनहीआवडतो. तो कुठेही,केव्हाही, स्वतःशीच खेळता येतो.

आप्पांना वाटे, मी वकील व्हावे, बॅरिस्टर व्हावे. बॅ.सीता आजगावकर ही त्यांचीबहीण.(सख्खी नव्हे,त्यांना सख्खे भावंड वगेरे नव्हतेच. ही दूरची, बहुधामावसबहीण असावी. ) ही माझ्या समजुतीप्रमाणे महाराष्ट्रातील पहिली स्त्री बॅरिस्टर. तीशंकरशेट स्कॉलरही होती. आप्पांना साहजिकच तिचा फार अभिमान होता. मीही असंकाही व्हावं असं त्यांना फार वाटे. पण या बाबतीतही मी त्यांची निराशाच केली.नाही म्हणायला माझा थोरला भाऊ वकील आमि पुढे जज्ज झाला. पण त्यालावकिलीत फारसा रस नव्हता. थोरल्या मुलाने वडिलांचा व्यवसाय घ्यावा या त्याकाळच्या धोरणामुळे त्याला वकील करण्याच आले होते इतकेच. पण मी कदाचितबऱ्यापेकी वकील होऊ शकले असते असे आता वाटते.

आमचे आप्पा गेले त्यापूर्वी दहाच दिवस आधी आम्ही कोल्हापूरला काहीकामानिमित्त गेलो होतो. तिथून जवळच रत्नागिरीला आप्पा-आईना भेटायला म्हणूनएका दिवसासाठी जाऊन आलो. आम्ही घरी जाऊन पोचल्यावर तासाभराने आप्पांनी
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 19

माझ्या हाती एक पत्र दिले. ते एक प्रकारचे इच्छापत्रच होते. त्यांच्या पेशाअडक्याचेआणि जमीजुमल्याचे पुढे काय करायचे याबद्दलचे इच्छापत्र त्यांनी रीतसर करूनठेवलेच होते. या पत्रात त्यापेकी काही नव्हते. स्वतःच्या मृत्यूनंतर आपले डोळेनेत्रपेढीला आणि शरीर मेडिकल कॉलेजला द्यावे अशी इच्छा त्यात सविस्तर लिहिलेलीहोती. इतके मुलगे,सुना,जावई,दुसरी मुलगी वगेरे इतरही असताना, कुटुंबात इतकेडॉक्टर्स असताना, हे पत्र मलाच कां लिहिले, असे मी विचारले तेव्हा ""यावरून याबाबतीत तुझ्यावर माझा सर्वात अधिक विश्वास आहे असंच नाही का सिध्द होत ?""असा त्यांनी प्रतिप्रश्न केला. मग मी त्यांना दोनतीन गोष्टी समजावून सांगितल्या :एक तर डोळे हे माणसाच्या मृत्यूनंतर तासाभरात काढले तरच त्यांचा उपयोग करतायेतो, असे मला वाटते. आणि रत्नागिरीत नेत्रपेढी नसल्याने ते शक्य होणार नाही.बाकीच्या शरीराचा उपयोग हा केवळ हा केवळ डिसेक्शनसाठी मेडिकल कॉलेजला तेवढाहोणार. तिथे मग गरीब-श्रीमंत, मूर्ख-विचारवंत, सर्वांच्या शरीराचे अवयवअभ्यासाच्या दृष्टीने सारखेच. पुण्या-मुंबईसारख्या मोठया शहरांत. जिथे मेडिकलकॉलेजे आहेत तिथे, रोज अनेक बेवारशी मृत देह फुकट मिळू शकतात. असेअसताना उगाच खर्च करून आपला देह तिथे नेऊन देणे हा वेडेपणाच नाही का ?तेव्हा हा हटट त्यांनी सोडावा. पण त्यांच्या इच्छेला मान देण्यासाठी मी माझे डोळेआणि शरीर मृत्यूनंतर असे देऊन टाकण्याची व्यवस्था नक्की करीन. आम्ही शहरातराहतो. आम्हांला मृत्यूही शहरातच येईल असे धरून चालू, तेव्हा हे सहज शक्यहोईल. मी तुम्हांला असं वचन दिलंय हे सर्वांच्या कानावर घालून ठेवते म्हणजे झालं.

त्यांना माझे म्हणणे तितकेसे रूचलेले दिसले नाही. पण त्यावर ते काही बोललेनाहीत. हा मृत्यूचा विचार मात्र त्यांना तरीही सोडत नव्हता. कारण त्यानंतर थोडयावेळाने पुन्हा तोच विषय काढून ते म्हणाले.

""विनोबांनी, सावरकरांनी प्रायोपवेशन केल्याचं वाचलं. मला वाटतं. आपणहीआता तेच करावं. आणखी किती जगायचं आणि कशासाठी ? आता या बाबतीत तरकाही अडचण नाही ना ? पण तुझ्या आईला ते पटत नाही. तुम्ही माझ्यासाठीइतकं करा. तिची समजूत घाला आणि मला सहकार्य द्या.""

आई तिथेच बसली होती. ती भडकून म्हणाली,""मी असलं काही ऐकून घेणारनाही. त्यांना आता या वयात दुसरा काही धंदा नाही. उगाच काहीतरी विचार करतबसतात आणि म्हातारचळ लागल्यासारखे वेडंवाकडं सांगत बसतात. पण तुला तरीकाही अक्कल हवी की नको ? तू ऐकून कसं घेतेस असलं अभद्र ?""

खरे तर हा अप्रिय विषय आम्हांला कुणालाच नको होता. पण आप्पांच्या डोक्याततो ठाण मांडून बसला होता, तेव्हा त्यांच्या डोक्यातून तो काढून टाकणे भाग होते.मग मी त्यांना म्हटले,""आप्पा, मला तुमचं म्हणणं पटत. मीही तुमच्याच विचाराचीआहे. पण प्रायोपवेशन वाटतं तितकं सोपं नाही. त्याला इतरांचा विरोध चालू शकतनाही. समजा, तुम्ही प्रायोपवेशन सुरू केलं आणि काही काळानं तुमची शुध्द गेली
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 20

आणि त्यानंतर तुम्हांला जगवण्याचे प्रयत्न इतरांनी केले तर सगळंच फुकट नाही काजाणार ? आणि आईच खुद्द तसं करील याची मला खात्री वाटते. तुम्ही विचार करूशकता. तुमची समजूत घालणं सोपं आहे. आईला असलं काही पटवणं कुणाला तरीशक्य आहे का ? तेव्हा तुम्ही असा विचार करा- गेली साठ-पासष्ट वर्ष आईनंवाढलेल्या अन्नावरच पोरालेलं हे तुमचं शरीर त्यावर अधिक हक्क कुणाचा ? तुमचाकी तिचा ? मग त्या शरीराची विल्हेवाट होईना का तिच्या मनाजोगी ? आपण याहाडामांसाला फार महत्व देऊयाच नको. मला तर वाटतं, जिवंतपणीच स्वतःच्याशरीराकडे निर्मम भावनेनं पाहता आलं तर किती सुखाचं होईल ! तुम्ही मृत्यूचाविचारच डोक्यातून काढून टाका बरं. त्याला यायचं तेव्हा येऊ द्या. इतकी घाईकशाला ? तुम्ही आम्हांला सगळ्यांना आणखी खूप हवे आहात. आमच्या एकत्रितइच्छाशक्तीपुढे तुमचा एकटयाचा काय निभाव लागणार ?"

मी तो विषय एकदाचा संपवून टाकायचा वेडयावाकडया भाषेत प्रयत्न करत होतेलहानपणी अधूनमधून कोर्टात एखादा फार महत्त्वाचा दावा चालू असला, की आप्पातो ऐकायला आम्हांला यायला सांगायचे. जिल्हा-न्यायलय आमच्या घरासमोरचचपराश्यापर्यंत सगळी माणसे आम्हांला ओळखत. आमचे घर, कोर्ट, पोस्ट, ऑफिस,युरोपियन क्लब (आता तिथे गोगटे कॉलेज झालंय.) या इमारती एकाच परिसरात,थोडया गावाबाहेर होत्या. नवीन न्यायाधीश आले की प्रथम त्यांचा आमच्या गराशीपरिचय होई. पी.एम.लाड, गुंडील,वॉटरफील्ड, डी. आरा. प्रधान- तिथेबदलून आलेल्या बहुतेक न्यायाधीशांचे आमच्या घरी खूप जाणेयेणे असे. त्यांचे-आमचे त्या वेळी जोडले गेलेले कौटुंबिक संबंध पुढेही वर्षानुवर्षे-अद्यापही-तुटलेलेनाहीत. या पार्श्वभूमीवर,लहानपणी त्या कोर्टात आप्पा चालवीत असलेले काहीखटले बाकावर बसून मी ऐकलेले आहेत, तो काळ या क्षणी मला(आणि बहुधाआप्पांनाही) आठवला. शेवटी आप्पा मला हसून म्हणाले,""तू वकील फार चांगलीझाली असतीस !""

त्यानंतर दहाच दिवसांनी आप्पा गेले, `आपण आता जावं' या प्रबळ इच्छेच्यापोटीच हे शक्य झालं असेल का ? अगदी शांत,निरामय असा हा मृत्यू. मी बरेचमृत्यू खूप जवळून पाहिले आहेत. मृत्यूनंतर काही वेळाने अनेक मृतदेहांच्या नाकातूनवगेरे एक प्रकारचा द्रव बाहेर पडतो. आप्पांच्या बाबतीत असले काहीही झाले नाही.मृत्यूनंतरही दहा-बारा तास ते त्याच अवस्थेत, अगदी स्वच्छ, शांत झोपल्यासारखेपलंगावरच होते.

मृत्यूचं दुःख हे असतंच. आणि दुःखात मला वाटतं माणसांची मनं थोडी विशाला,क्षमाशील किंवा अधिक उदार होत असावीत. आपण भेदभाव विसरू पाहतो,एकमेकांच्या मदतीला धावतो, मृतदेहाला तर पवित्र मानून नमस्कारदेखील करतो. मगहा मृतदेह स्वच्छ असला काय किंवा दुर्देवाने गलिच्छ झालेला असला काय. हे खरं
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 21

असलं तरी आप्पांचा मृतदेह शेवटपर्यंत स्वच्छ राहिला या गोष्टीचेही कुठेतरी मलासमाधान होते. आपला मृत्यूही असाच असावा ही इच्छा तर असेलच; पण त्यांचीचमुलगी असल्यामुळे तो असाच असण्याची शक्यता असल्याचे तर हे समाधान नसेल ?

थोडे बहुत कळायला लागेपर्यंतची माझ्या वयाची पहिली आठदहा वर्षे वजा केलीतर त्यानंतर आईच्या मृत्यूपर्यंत साधारणतः पंचेचाळीस-पन्नास वर्षे आई मलालाभली. माझ्या सासूबाईशी माझी ओळख झाल्यालाही आता जवळपास तेवढाच काळलोटला आहे. साधारणतः एकाच वयाच्या,सारख्याच मध्यमवर्गीय सुशिक्षित आणिसुसंस्कृत घरांत वाढलेल्या,आपापले संसार निष्ठेने केलेल्या या दोन बायका. भाईचेवडील फार लौकर गेले. त्यामुळे मी त्यांना पाहिलेले नाही. पण भाईकडून त्यांच्याबद्दलजे काही ऐकले, त्यावरून तेही आमच्या आप्पांसारखेच एक देवमाणूस होते. म्हणजेया दोघींनी ज्यांच्या बरोबर संसार केले तेही वृत्तीने सारखेच होते म्हणायला हरकतनाही. पण मुळातच या दोघींचे पिंडधर्म अनेक बाबतींत वेगळे होते. त्यामुळे त्यांच्याशीसंबंधित असलेली माझी सुखदुःखंदेखील अगदी वेगवेगळ्या जातीची आहेत.

माझीही त्या दोघींशी वागण्याची तऱ्हा एकच नसे. आईशी हक्काने फटकूनवागणारी मी, सासूशी संबंध आला की चार वेळा विचार करत असे. देण्याघेण्याच्याबाबतीत `अं:! आपलीच आहे !' अशी आईला गृहीत धरणारी मी, सासूच्या बाबतीतशक्य ते उपचार पाळत असे. थोडक्यात, आईच्या बाबतीत आतडयाचा धागागुंतल्यामुळे तिला मी माझ्यातच पाहत असे आणि अनेकदा हक्काने दुर्लक्षीत असे, तरसासूच्या बाबतीत कर्तव्य, सुसंस्कृतता, भाईला बरे वाटावे ही इच्छा, आणि वळणलावले नाही असा आईला कुणी दोष देऊ नये हा कटाक्ष, वगेरे गोष्टींची फळी पक्कीठेवून झुकते माप घालण्याकडे माझा कल असे.

माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीला झाला आणि माझ्या आईचा शिवरात्रीला.हे दोन्ही सणांचे दिवस; त्यामुळे सहज लक्षात राहण्यासारखे. पण माझ्या आईचाजन्मदिवस शिवरात्रीचा, ही गोष्ट मी लग्न होऊन सासरी आले तरी मला माहीतनव्हती. आमच्या लहानपणी वाढदिवस वगेरे प्रकार नव्हतेच. आमच्या घरीच नव्हेतर त्या काळातल्या माझ्या माहितीतल्या इतर घरांतही कधी कुणाचा वाढदिवससाजरा झाल्याचे आठवत नाही. पण माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीच्या दिवशीझाला हे मला आमच्या लग्नाच्या आधीच कळले. त्यांच्याकडूनच. सहज बोलताबोलता. मग मी ते लक्षात ठेवले आणि त्यानंतर त्यांचा प्रत्येक वाढदिवस आठवणीने
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 22

माझ्या परीने मी साजरा करीत आले. सतत पस्तीस-छत्तीस वर्षे, नेमाने. आता हळूहळूमीच ती प्रथा मोडून टाकली. म्हणजे आठवण येत नाही म्हणून नव्हे. आठवण येते,मी फोनवर त्यांच्याशी त्याबद्दल मुद्दाम बोलतेही; पण पहिल्यासारखा वाढदिवस साजराकरणे सोडून दिले. त्यांना बेसनाचे लाडू खूप आवडत. घरी केलेल्या साजूक तुपातबेसन खमंग भाजून आणि बेदाणा,बदाम वगेरे घालून मी खास त्यांच्यासाठी लाडूकरत असे. त्या दिवशी त्यांना जितकी वर्षे पुरी होत तितके लाडू आणि शिवाय साडीवगेरे. एकदा कधीतरी आईशी बोलताना मी याचा उल्लेख केला, तेव्हा ती म्हणाली,""वा, त्यांचा जन्म गणपतीच्या दिवशी का ? माझा शिवरात्रीला."" तेव्हा मलाआईचाही वाढदिवस असू शकतो हे इतक्या वर्षांनी प्रथमच जाणवले., आणि ही गोष्टइतक्या उशिरा कळली याचे हसूच आले. पण त्यानंतरही कधी मी आईचा वाढदिवसखास लक्षात ठेवला नाही आणि सासूबाईंचा वाढदिवस विसरू दिला नाही.भाईलाही स्वतःच्या वाढदिवसाबद्दल उत्साह असे आणि मीही त्या दिवशी त्याच्याआवडीचा खास असा सेपाक करत असे.

असे या मायलेकांचे पंचवीस-तीस वाढदिवस झाले, पण माझी जन्मतारीख कोणतीहे विचारण्याचं माझ्या सासूबाईंना कधी सुचलं नाही आणि भाईला ती तारीख मुद्दामलक्षात ठेवावी असं कधी वाटलं नाही. मला मात्र इतरांच्या जन्मतारखा लक्षातठेवायच्या आणि त्या त्या दिवशी प्रत्यक्ष, फोनवर किंवा पत्राने सदिच्छा द्यायच्या असाछंदच लागला आणि हळूहळू तो वाढतच गेला. मग त्यांतल्या काहींनी माझीजन्मतारीख काढण्याचा आणि उलट मलाही सदिच्छा पाठवण्याचा उद्योग सुरू केलाआणि त्यामुळे मग मला भंयकर संकोचल्यासारखं व्हायला लागलं. मनुष्यस्वभाव तरीकसा मजेदार असतो ! माझा वाढदिवस भाईच्या लक्षात नसतो याचे मला मनापासूनवाईट वाटे. आताशा आताशा तो मुद्दाम ती तारीख लक्षात ठेवतो, आणि आपल्यालक्षात आहे हे मला त्या दिवशी सकाळी किंवा आधल्या दिवशीही सांगून टाकतो.मला वाईट वाटू नये म्हणून; स्वतःच्या आनंदासाठी नव्हे. कारण त्या शुभेच्छा देऊनहोताच त्याने `हुश्श' केल्याचे मला जाणवते. मग माझाच मला खूप राग येतो.आपणच कुठेतरी कधीतरी बोललो असणार, याला माझा वाढदिवस कधीच आठवतनसल्याचे. या विचाराने मला स्वतःशीच फार लाज वाटते. माझा वाढदिवस कुणाच्याध्यानामनी नव्हता ते किती चांगले होते ! त्यात कसला तरी गूढ आनंद मला त्यादिवशी लाभायचा. माझ्या हाताने आता तो मी गमावून बसले. आणि कमावले काय ?वर्षांतून एक-दोन कसेसेच दिवस, की ज्या दिवशी फोन वाजला की धडाधडायलालागतं. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर नसतील ? यांच्याशी आता काय आणिकसं बोलू ? मला औपचारिक बोलणं आवडत नाही हे ठीक आहे. पण करं सांगायचं तर वेळप्रसंगी तसं बोलावं लागतं हे कळत असूनही मला औपचारिक बोलताच येतनाही. म्हणजे नक्की काय होतं ? मला रंगभूमीवर अशी एखादी भूमिका वढवायलामिळाली असती की असं औपचारिक बोलण्याचा जिचा स्वभावच आहे, तर मी काय
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 23

केलं असतं ? ती भूमिका नाकारली असती ? सांगता येत नाही. ती भूमिका तशीमहत्त्वाची असती तर मी ती स्वीकारलीही असती आणि बहुधा चांगली वठवलीहीअसती. मग हा रंगभूमीवरचा अभिनय प्रत्यक्ष जीवनात क्वचित्प्रंसगी आवश्यकअसला तर कां करू नये ? आवश्यक असतानादेखील तो करू नये असे मला मुळीचवाटत नाही. पण मला मात्र तो तसा करता येत नाही हेच तर दुर्देव आहे. पराभवआहे. अशा हजारो रंगीबेरंगी पराभवांची मालिका म्हणजेच आपले आयुष्य का ? ""

माझ्या माहेरचे आणि सासरचे वळण अनेक बाबतींत वेगळे होते. आमच्याआप्पांना चहा फार आवडे. काम करताना त्यांना मधूनमधून थोडाथोडा चहा लागतअसे. अशा वेळी साहजिकच त्यांच्याबरोबर त्या वेळी जी कुणी माणसे असत त्यासर्वांसाठी आई चहा करीत असे. आप्पांच्या वकील मित्रमंडळीत, त्यांच्याकडेशिकायला येणाऱ्या तरूण वकील मंडळीत आणि आप्पांच्या पक्षकारांतही बरेचलोक धर्माने मुसलमान होते. आमच्या पलीकडे बरीच मुसलमान कुटुंबे राहतहोती. अद्याप आहेत. या सर्व मंडळीचे आणि आईचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. पणचहा देताना मात्र, तोच चहा पण मुसलमानांसाठी आई वेगळ्या कपबश्या वापरतअसे. खरे तर सहज ओळखू याव्यात म्हणून, पण प्रत्यक्षात त्यांनाखास सन्मानितवाटावे म्हणून, आईने या कपबश्या जरा अधिक किंमतीच्या आणि फुलांची नक्षीअसलेल्या अशा घेतल्या होत्या. चहा देताना मोठया चतुराईने ती त्या त्या माणसापुढेतो तो कप ठेवी. पण आप्पांचे एकदोन मुसलमान वकील मित्र तिच्याहूनही चतुर होते.ह्या पाहुणचाराचे वेशिष्टय लौकरच त्यांच्या ध्यनात आले आणि मग आईने टेबलावरचहा आणून ठेवला की त्यांतला कधी हा तर कधी तो वकील नेमका आप्पांच्या पुढचाकप आपण घेई आणि आपल्या पुढयातला कप आप्पांच्या पुढे ठेवी. आई मगघाईघाईने त्यांना सांगे ""त्यांचा (म्हणजे आप्पांचा) चहा नका तुम्ही घेऊ. ते सारखाचहा पितात. मग पित्ताचा त्रास होतो. म्हणून मी त्यांना अर्धाच कप चहा दिलाय.त्यांना तोच घेऊ दे. तितकाच पुरे. तुम्ही तुमचा घ्याकपभर."" त्यावर तेही हसूनसांगत की त्यांनाही सारखा सारखा चहा घेऊन त्रास होतो, तेव्हा अर्धा कप चहाहवा होता. आणि हे सांगत असतानाच आप्पांच्या कपातून ते तो चहा पिऊही लागत.आप्पाही मग समोर आलेल्या त्या फुलांच्या कपातला अर्धा चहा पीत आणि उरलेलाअर्धा आईकडे देत तिला सांगत,""हा तू घे. फक्कड झालाय. पण मी अर्धा कपचघेतला. बाकीचा तुला ठेवलाय. घे."" मग आम्ही रिकाम्या कपबश्या धुवायला आतआणल्या की."" हा पण कप मेल्यांनी बाटवला.!"" म्हणत आई तो आप्पांचा कपही`मुसलमानांच्याकपा'त ठेवी. लौकरच घरात असे `मुसलमानांचे कप'च फार झाले,तेव्हा आईने तिचे हे सोवळे मनातल्या मनात गंगेला वाहिले आणि मग सगळे कपनिधर्मी झाले. आमच्या घरातली ही कपबश्यांची, भांडयाकुंडयांची,पंक्तींची वगेरेवर्णव्यवस्था अशी हळूहळू कोलमडून पडली आणि `ह्या नव्या पिढीला विधिनिषेधच
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 24

राहिला नाही, तिथे मी तरी एकटी किती पुरी पडणार ?' अशा विषादाने आई खिन्नझाली. आप्पाही अर्थातच त्या नव्या पिढीतच होते.

माझ्या सासरी सोवळ्या-ओवळ्याचा प्रकार किंवा असला भेदभाव नव्हता. पाळीच्यावेळी तीन दिवस दूर बसणे हा प्रकारही माहेरच्यासारखा सासरी नव्हता. त्यामुळे खूपमोकळे वाटे. मात्र गुरूवारी माझ्या सासूबाईंना कांदा-लसूणच वर्ज्य होती असे नव्हे,तर त्या दिवशी त्यांचेही सोवळे-ओवळे असे. सकाळची पहिली चहा-कॉफीही गुरूवारीप्रथम आंघोळ करून, मग भरलेल्या पाण्याचीच करावी लागे. पाळी चालू असले तरत्या सुनेच्या हातचे अन्न त्यांना गुरूवारी चालत नसे. ""गुरूवारमध्येच असं काय खासअसतं ? तुमचा जर असल्या गोष्टींच्यावर विश्वास नाही तर गुरूवारी तरी तुम्ही त्याकां करता ?"" असे मी सासूबाईंना विचारत असे; पण त्यांच्याकडे त्यावर काहीच उत्तरनसे. त्या गप्प बसत. किंवा ""एक वार तरी करावंसकेलं तर काय बिघडलं? तुझीआई पण सोवळं-ओवळ मानतेच."" असले काहीतरी उत्तर देत. माझ्या आईची मात्रया बाबतीतली विचारसरणी पक्की होती.तिला वाटे, पिढयानपिढया आपले पूर्वजजीवनाची जी मळलेली वाट तुडवट आले तोच ही भवनदी पार करायचा निश्चितआणि खात्रीचा मार्ग आहे. त्या वाटेवरून प्रवास करण्यातच आपलं भलं आहे. त्यापूर्वजांच्या पुण्याईने आणि आशीर्वादानेच आपल्याला शरीरा-मनाची ही शक्ती-बुध्दीलाभली, त्यांचा अवमान करणे हे पाप आहे. या निष्ठा मूर्खासारख्या, बिनबुडाच्याहोत्या; पण त्यांना चिकटून राहण्यात कष्ट अधिक होते तरीही ते उपसण्याची ताकदआईमध्ये खूप होती. कुटुंबातल्या आणि भोवतालच्या इतरांचाच विचार आई प्रथमकरीत असे, पण तो पक्कया आखीव अशी तिच्या दृष्टिकोनातून. भाई किंवा त्याच्याआई यांना इतरांचा विचार कधी सुचतच नाही. हे एकेकाचे प्रकृतिधर्म किवां पिंडधर्मअसतात. त्याला त्या त्या व्यक्तीचा इलाजच नसावा.

सर्वसाधारण घरामध्ये बायकांचे राज्य असते. त्यामुळे स्वतःचे घर असावे,तेघर, त्यातल्या सोयी, तिथले सामानसुमान,भांडीकुंडी, मांडणी वगेरे वगेरे कशीअसावी, याबद्दलही विशेषतः बायकांना स्वतःची मते, हौशी असतात. दुर्देवाने याबाबतीत मी बायको म्हणून नालायकच निपजले. असली कोणतीच शहरी हौस मलानाही. निवडच करायची झाली तर शहराबाहेर,छोटंसं, खूप मोठठाली झाडंआजूबाजूला असलेलं, एक गाय आणि एक कुत्रा यांची सोबत असलेलं, नदीकाठचंघर मी निवडलं असंत. पण भाई हा पक्का शहरी माणूस असल्याने तसे घर आपल्यानशिबात नाही हे मी चटकन मान्य करून मोकळी झाले. मग शहरातच राहायचे तरबेताचे असे आणि स्वच्छ घर असले की झाले. ते असेल तसे मी भागवून घेत असे.एक स्वच्छता सोडली तर माझ्या इतर गरजा फारच कमी होत्या. अमकीच भांडीकुंडीवगेरे मला लागत नसत. त्यामुळे अशा वस्तू निवडून मी कधी जमा केल्या नाहीत.पण घरातल्या प्रत्येक चीजवस्तूशी माझी वेयक्तिक ओळख आहे. सुरूवातीच्या काळात
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 25

जुन्या कपडयांवर वगेरे घेतलेली आणि पुढे वेळीप्रसंगी कुणीकुणी दिलेली जी काहीभांडीकुंडी माझ्या घरात जमली आहेत त्यांच्यावर माझा माणसांसारखा जीव जडलाआहे. त्यांतल्या एखाद्या भांडयाला पोचा आला तर चारपाच दिवस माझी झोप उडतेआणि त्यानंतर वर्षाननुवर्षे ते भांडे वापरताना त्या पोच्यावरून माझा हात न चुकताफिरतो, ते भांडे कुरवाळल्यासारखा.

भाईला मात्र गाडीसारखी घराचीही हौस होती.मग आम्ही सांताक्रूझला मोठठं घरघेतलं. तिथल्या त्या मोठाल्या हॉलमध्ये अनेकांची गाणी झाली.या कार्यक्रमांनामित्रमंडळींप्रमाणेच घरचे लोकही साहजिकच असत. माझ्या सासूबाईंनाही गाण्याचीखूपआवड. त्या बाबतीत माझी आई म्हणजे दुसरं टोकं होतं. मुलांना झोपवण्यासाठीयापेक्षा अधिक गाण्यांची मानवजातीला गरजच नाही, असे तिचे मत होते असावे.आम्ही गाणं शिकावं असं तिला वाटे. आपला जावई गाणारा आहे याचाही तिलाअभिमान होता; पण याचा अर्थ तिला संगीताच्या क्षेत्रात काही रस होता असा मात्रमुळीच नव्हे. याउलट, माझ्या सासूबाईना दिवसभर रेडिओ लावून बसा म्हटले तरीती शिक्षा वाटत नाही. त्यांना गाण्यातले डावेउजवे काही कळते अशातला भाग नाही,पण गाणे ऐकायला मनापासून आवडते हे मात्र खरे. तर सांताक्रूझच्या घरी त्या पाचवर्शांत झालेल्या प्रत्येक गाण्याला त्या हजर असतच. मग मध्यंतरात कॉफी होई. तीतयार करून कप भरणे वगेरे सर्व मी केलेल असे. पण ट्रे भरभरून पाहुण्यांना कॉफीनेऊन देणे, रिकामे कप गोळा करून सेपाकघरात आणून ठेवणे वगेरे कामांनामित्रमंडळीपेकी काही स्वयंसेवक पुढे येत. असल्या कामात भाई स्वतः, त्याचे भाऊअगर त्याच्या आई कधीही स्वतःहून भाग घ्यायला येत नसत. पण माझ्या सासूबाईंनाकुणीतरी कॉफी नेऊन दिली, की त्या मलाही चारचारदा ""तूही घे ना ग"" असाआग्रह करत. आपण घरातली माणसे, पाहुण्यांना आधी द्यावे, मग आपण घ्यावे,असा विचार भाईप्रणाणेच त्यांनाही चुकूनही सुचत नसे .""आधी तू घे बघू. मग संपेल."" असेमनापासून सांगत. कारण मीही त्यांची होते, इतर पाहुणे मंडळीसारखी परकी नव्हते.

हे `आपलं' आणि `परकं' ह्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात.माझी आई आणि सासूबाई या दोघींच्या तर अगदी दोन टोकांच्या होत्या. रक्ताचेनाते हे माझी आई अपरिहार्यपणे मानतच आली. पण अगदी मनाच्या गाभ्यात तिलालेकीसुना काय आणि शोजारपाजारच्या बायकांपासून कामवाल्यांपर्यंत इतर जणी काय,एका विशिष्ट पातळीवर सगळ्या सारख्याच होत्या. देवधर्म,सोवळेओवळे,रीतिरिवाज, नीति-अनीतीच्या कल्पना वगेरे बाबतींतल्या आईच्या निष्ठा पाळणाऱ्यात्या तिला स्वकीय वाटत आणि धुडकावणाऱ्या त्या परक्या वाटत. अशा अनेकबाबतीतं माझ्यासारख्या मुलीला तिने जन्माला घातले यात पूर्वजन्मीचे तिचे
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 26

कोणतेतरी पाप गुंतले असावे अशी तिची भावना असावी. तसे तिने कधी बोलूनदाखवले नाही. पण माझ्या अशा एखाद्या कृतीनंतर तिला जे दुःख आणि वेदना होतत्यावरून मला हे जाणवे. पण या बाबतीत मीही तिच्याइतकी हट्टी होते. तिला दुःखहोते म्हणून आपण पडते घ्यावे, असे तिच्या हयातील मला कधीही वाटले नाही.

आम्ही परदेशप्रवासाला निघालो तर आमचा प्रवास सुखरूप पार पडो म्हणून तीसत्यनारायण बोलून गेली. आम्ही परत आल्यावर जोडप्याने बसून तो पुजावा अशीतिची इच्छा. कारण तो नवस बोलताना म्हणे तिची धारणा तशीच होती. भाईचाहीअसल्या गोष्टीवर विश्वास नाही. पण तिची चेष्टा करत का होईना, भाई पूजेलाबसला आणि कथा सांगणाऱ्या भटजींचीही अधूनमधून खिल्ली उडवत त्याने ती पूजायथासांग पार पाडली. मी मात्र त्याच्याबरोबर बसले नाही. माझा असल्या गोष्टींवरविश्वास नाही हे माहीत असताना आईने या नवसात मुळात मला गोवावेच कां ?आणि विश्वास नसताना केलेली असली खोटी पूजा तिच्या त्या देवाला तरी मानवेलकी ? तरीही आईला सत्यनारायण करायचाच असेल आणि भाई त्याला तयारअसेल तर त्याने माझ्याऐवजी सुपारी लावून पूजेला बसावे असे मी सांगितले; आणिशेवटी ती पूजा तशीच पार पडली. मग सेपाक करण्यात, इतर कामांत,,वगेरे मी तिलासर्व मदत केली; पण ही मदत आईला होती. त्या देवाशी या गोष्टींचा काहीही संबंधनव्हता. खरे तर आईच्या दृष्टीने घरातला तो एक आनंदाचा प्रसंग. मंगल कार्य. पणत्या दिवशी तिच्या डोळ्याला मधूनमधून पाणी येत होते. माझ्यावर मात्र त्याचाकाडीचाही परिणाम होत नव्हता. ती वाकली होती; मी ताठ होते.

पुढे एकदा बऱ्याच वर्षानंतर त्या प्रसंगाची कशावरून तरी आठवण निघाली आणिमाझ्या त्या हटटी स्वभावाचा निषेध करताना ""कुठे फेडणार आहात ही पापं कोणजाणे !"" असे ती पटकन बोलून गेली आणि तिच्या डोळ्यांना पुन्हा पाणी आले.त्यावर मी म्हटले.

""मी केवळ पूजेला बसले नाही म्हणून जर मी तुला पापी वाटत होते, तर मगप्रसादाच्या शिऱ्यापासून कितीतरी सेपाकात वगेरे मी त्या दिवशी तुला मदत केली तीमाझ्या हातची कशी चालली ग ?""

तीही माझीच आई. म्हणाली,""कुठे चालली ?मी तर तुला कशालाही हात लावू दिलानसता. इतके सत्यनारायण मी करते तेव्हा तू थोडीच असतेच मदतीला ? पण विचार केला,त्या देवाला डोळे आहेत. नेवेद्याचा सेपाक.तेवढं तरी पुण्य तुझ्या हातून घडू दे.""

मी कपाळावर हात मारून घेतला. त्या दिवशी अशा रितीने माझ्या पदरी पडलेलेपुण्य पुरेसे नव्हते म्हणून तिने मला सद्बुध्दी लाभावी एवढयासाठी म्हणे आणखी एकसत्यनारायण माहू पूजला होता.

आम्ही- विशेषतः मी- जाणूनबुजून स्वतःचं असं अकल्यमआम करते आणि त्याचीभरपाई करण्यासाठी तिला असे आता या वयात न पेलणारे कष्ट पडतात. माझ्या
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 27

पोटी तिच्याबद्दल दयामायाच नाही असे पुढेपुढे तिचे ठाम मत बनत गेले होतेअसणार. पण हा गेरसमज दूर करायचा उपाय तरी कोमता ? तिच्या समाधानासाठीमी देवपूजा करणे ? म्हणजे माझा स्वासच मती मागत होती. आई आणि मुलगी हेआतडयाचे नाते आम्हां दोघींत निश्चितच होते. पण देवाने आम्हां दोघींची स्थाने हीअशी दोन ध्रुवांवर रोवून ते आतडे तुटेपर्यंत ताणले होते खरे.

माझ्या सासूबाई अश्रध्द मुळीच नव्हत्या. पण त्यांच्या श्रध्दा,देव, धर्म त्यांच्यापुरतेसगळे काही होते. ते त्यांनी कुणावरही कधी असे लादले नाही. खावे,प्यावे,द्यावे,घ्यावे, चार घटका आयुष्य लाभलेय तर ते आनदात घालवावे, अशा वृत्तीचा हा भागहोता. अस्तित्ववादी विचारसरणी वगेरेतून निर्माण झालेली ही तात्त्विक भूमिकानव्हती; तो रक्तदोष( रक्तगुण म्हणू या हवे तर) होता. त्यामुळे लेकी-सुनांशी आणिमुलांनातवंडांशी त्यांचे खटके उडत ते ऐहिक पातळीवरच्या त्यांच्या अपेक्षाभंगातूनकिंवा त्यांच्या मागण्या आणि आमच्याकडून होणारा पुरवठा यांतल्या तफावतीतूनउद्भवत. सुनाकाय, जावई काय, त्यांच्या नातयात आलेली सगळी माणसे ही त्यांनीत्यांची मानली. मग ती कशीही वागली तरी त्यांना चालत. मी ऋण काढून सण केलाअसता तरीही त्यांना विषाद वाटला नसता. फक्त त्या सणात त्यांनाही प्रेमानेसहभागी करून घ्यावे, इतकेच, आपल्या इतरांपासूनच्या अपेक्षा या अशा छोटयाअसोत की मोठया असोत, तपशिलावर बेतलेल्या असोत की त्त्वावर, त्या पुऱ्याहोण्यात नाना तऱ्हेच्या अडचणी असू शकतात आणि हे लक्षात न आल्यानेच आपणदुःखी होतो. माझ्या सासऱ्यांच्या अकाली निधनामुळे बराच काळ त्यांना आर्थिकओढाताण सहन करावी लागली हे खरे. पण परिस्थिती सुधारली तरीही त्यांनामनाजोगे सुख कधीच लाभले नाही. शत्रूच्याही वाटयाला येऊ नयेत इतके आप्त-स्वकीयांचे मृत्यू त्यांच्या वाटयाला आले. पण निवृत्ती मात्र त्यांच्यापासून सदेवदूरच राहिली. त्यामुळे बाकी सर्व काही असूनही दुर्देवाने त्या असुखीच राहिल्या. कुणीकितीही दिले, त्यांना बरे वाटावे, खूष करावे म्हणून कितीही धडपडले, तरी त्यातूनत्यांना मिळणारे समाधान हे फक्त क्षणिक असे. वृत्तीतच कुठेतरी अतृप्तीचा आणितक्रारीचा सूर घुमताना ऐकू येत असे. अजूनही येतो.

म्हणजे मग मृत्यू काय करतो ? त्याचा प्रभाव, त्याची टांगती तलवार वगेरेला खरेचकाही अर्थ आहे का ? की त्याच्या बाबतीतही `अतिपरिचयात् अवज्ञा' हेच तत्त्व लागूपडते ? मला वाटते, अनेकांच्या बाबतींत, त्या क्षणी त्याचा घाव जाणवतो, इतकेच. बाकीइतकी लौकर बरी होणारी एवढी मोठी जखम दुसरी कोणतीही नसेल. स्वतःच्यास्वभावातून निर्माण होणारे सव मात्र संवेदनाशील माणसांना जन्मभर टोचचत राहतात.

मी सासूबाईंशीबी अधूनमधून वाद घालत आले. त्यांच्या अधिक्षेप न करता त्यांचीचेष्टा करत आले. पण आमचे भांडण असे कधी झाल्याचे आठवत नाही.

पारल्याच्या आमच्या त्या छोटयाशा बेठका घराला वरती एकच खोली होतीय ती
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 28

भाईच्या वडिलांनी खास त्याच्यासाठीच बांधली होती. आमच्या लग्नानंतर अर्थातचतीच आमची खोली झाली. आणचे कुणीही पाहुणे,दोस्तमंडळी आली तरी ती मगआमच्या खोलीतच आमच्याबरोबर राहत. घरच्या इतरांना परकी अशी नानाजोग, जे. पी. नाईक, भय्या वगेरे मंडळी मुक्कामाला आली तरी ती त्या वरच्याखोलीत आमच्याबरोबर असत. अशा एखाद्या वेळी भाई कामानिमित्त बाहेरगावीगेलेला असला आणि मी एकटीच असले तरी माझ्या सासूबाईंनी या पाहुण्यांच्यावास्तव्याला कधी हरकत घेतली नाही. माणसाच्या सभ्यतेवर, सुसंस्कृतपणावर त्यांचाविश्वास होता. त्यांच्या तुलनेने माझी आई या बाबतीत फार कर्मठ, सोवळ्याविचारांची होती. असे प्रसंगक्वचित एकदोनदाच आले असतील, पण त्या वेळीमाझ्या सासूबाईंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला फार मोलाचा होता. याबाबतीत आईपेक्षा त्यांचे पारडे जड होते. आणि ही गोष्ट मी त्यांच्या माझ्यासंबंधातल्या कोणत्याही संदर्भात विसरूच शकत नाही. त्यांच्या वागण्यातून आम्हांसगळ्यांना अनेकदा मनस्ताप होत आला आहे. त्या त्या वेळी त्यांचा फार रागहीयेतो. पण मग मला दयाही येतो. स्वतःपलीकडे दुसऱ्या कुणावर तरी जीव तोडून प्रेमकरण्यातला आनंद त्यांच्या ललाटी लिहिलाच गेला नाही, त्यामुळे जमेची बाजू खूपअसूनही त्यांची ओटी फारशी कधी भरली नाही खरी.

गेल्या काही वर्षांपासून माझ्या अंतर्मनात सुरू असलेली एक प्रक्रिया आप्पा-आीच्यामृत्यूनंतर जरा तीव्र झाली आहे. मनाच्या खेळात मृत्यूच्या विचाराभोवती पिंगा घालणंजरा जास्तच व्हायला लागलंय. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही आपल्या हाती नाहीत. पणया दोहोंना जोडणारा प्रवास तरी ? तोही आपल्या हाती नाही ? अनुकूल किंवाप्रतिकूल परिस्थितीची ताकद आणि आपले आईबाप आणि पूर्वज यांच्या वारशातूनलाभलेल्या पिंडाची ताकद या दोन ताकदींची गुंतागुंत. त्यात खर्ची पडणाऱ्या शक्तीतूननिर्माण होणारी सुखदुःखे सगळेच परस्वाधीन. त्यातला अहंकारी `मी' हा तरी मुळातमनाजोगा असावा ! तो `मी' म्हणजेच पिंड ना ? आई-बाप, पूर्वज या साखळीतले काहीदुवे आणि त्यांत आपल्या निर्मितीमुळे पडलेला आणखी एक वळसा. हे सगळं मोठंविचित्रच आहे.

मी मृत्यूचा विचार करते,म्हणजे नक्की काय करते ? माझ्या डोळ्यांपुढे दोनतीनप्रसंग पटकन येऊन जातात. मी खूप लहान होते, धामापूरला आजीकडे होते.पावसाळ्याचे दिवस. खूप रान वाढलेले. त्या काळी त्या भागात संडास ही गोष्टचनव्हती.
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 29

शेतात कुठेतरी जायचं. मी जाऊन बराच वेळ झाला म्हणून आजी शोधायलाआली. माझ्या बोलण्याचा आवाज ऐकू आला म्हणून ती त्या दिशेला आली.माझ्यासमोर जवळच काही अंतरावर एक नाग वेटोळं घालून, फणा काढून ऐकत (?)होता, आणि मी त्याच्याशी गप्पा मारत होते.- त्याला काहीतरी सांगत होते. मला हीसवयच होती. कावळा,चिमणी, मुंग्या, तांदळातल्या किडी, हालती पाने-फुले, झाडेयांच्याशी बोलताना पाहून""अशांनी एक दिवशी वेड लागेल !""असे आईहीम्हणायची. धामापूरच्या त्या वेळच्या आमच्या घरात भिंतीवर एक खूप मोठठे नागोबाचेचित्र रंगवलेले असे. दरवर्षी नागपंचीमीच्या आधी ती भिंत सारवून नवा नागोबारंगवला जाई. आणि नागपंचमीला त्याची यथासांग पूजा होई. ती एक संरक्षक देवताचमानली जाई. खरा नागदेखील कधीमधी दिसे. पण तरी त्याला मारायचे नसे. आजीत्याला राखणदार म्हणे. मी ज्याच्याशी बोलत होते तो इतरत्र कुठेही दिसला असतातरी आजीने हात जोडून त्याला ""राखणदारा,भलं कर बाबा सर्वांच"" असेच म्हटलेअसते. पण तो रक्षणकर्ता असला तरी शेवटी विषारी जनावरच ते. त्याच्यापासूनकिती दूर राहायचे याची अक्कल माणसाला हवी. त्या वयात मला ती निश्चितचनव्हती. भिंतीवरचा नाग तर चोवीस तास घरातच असे. त्याला मी हातदेखील लावतअसे. त्याच्या फणेवर गंध-पुष्पे लावली जात. हात जोडून नवस बोलले जात. त्यामुळेअसेल कदाचित, पण या खऱ्या नागाचे मला जरादेखील भय वाटले नव्हते. आणिम्हणूनच मी त्याच्याशी बोलत बसले होते असेन.त्याला संरक्षक देवता मानणारीआजी मात्र भलतीच घाबरली आणि मला मागच्या मागे बकोटीला धरून उचलूनधावत घरी आली. मग मला देवाच्या पायावर घालणे, भिंतीवरच्या नागोबापुढेस्वतःचे आणि माझे नाक,डोके घासणे वगेरे बरेच काही आजीने केले. मला नसमजणारे बरेच समजावूनही सांगितले. त्याचले काहीच आता आठवत नाही. पणमृत्यूचा विचार आला की हा प्रसंग न चुकता आठवतो.

दुसरा प्रसंग खूप मोठया वयातला आहे. आम्ही दिल्लीला होतो. साठ सालचीगोष्ट असावी. संध्याकाळ झाली होती. भाई ऑफिसमधून घरी येऊन टेबलावर`अपूर्वाई' या प्रवासवर्णनातला पुढला भाग लिहित होता आणि मी समोरच बसूनपूर्वीच्या भागाची `किर्लोस्कर' ला पाठवण्यासाठी प्रेसकॉपी करत होते. आभाळ भरूनआले होते. खोलीत दिवा, पंखा लावून आमचे काम चालले होते. अचानक गडगडाटसुरू झाला. ती मेघगर्जना तर होतीच, पण पृथ्वीच्या पोटातूनही काही विचित्र आवाजयेताहेत असा भास झाला आणि सगळं थरथरायला लागलं. आम्ही दोघंहीएकमेकांकडे पाहून ""धरणीकंप! असे म्हणत जागचे उठलो. आम्ही वरच्यामजल्यावर राहत होतो. पंडारा रोडला, मधे मोठे मोकळे मेदान आणि भोवताली हीसरकारी घरे होती. धरणीकंप झाला की इमारती कोसळतात, तेव्हा घर सोडून शक्यतितक्या लौकर उघडया जागी जाणे आवश्यक असते, हे आम्हां दोघांनाही माहीतहोते. भाई धावत खाली उतरून मेदानात गेला. जाता जाता त्याने आमच्याकडे
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 30

कामाला असलेला पोरगा भेदरून रडायला लागला होता त्यालाही खाली नेले.भोवतालच्या सर्व घरांतली बहुतेक सगळी माणसे धावत मेदानात गोळा झाली होती.मी मात्र प्रथम दिवा आणि पंखा बंद केला. टेबलावरचे कागद उडू नयेत म्हणूनत्यावर पेपरवेट ठेवले. भाईने पेन उघडेच टाकले होते ते नीट बंद करून खणातटाकले. खाली उतरताना घराला कुलूप घातले. मी खाली जाऊन पोचेपर्यंत धरणीकंपकधीच थांबला होता. त्यानंतर पुढले काही दिवस माझी ही वर्तणूक हा आमच्यामित्रमंडळीत चेष्टेचा विषय होता. या गोष्टीलाही आता कितीतरी वर्षे झाली. पण मृत्यूचाविचार म्हटला की हाही प्रसंग न चुकता डोळ्यांपुढे जसाच्या तसा लख्ख उभा राहतो.

तिसरा प्रसंग मात्र अगदी याच्या उलट आहे. मला वाटते, शेहेचाळीस सालच्याऑक्टोबरातलीच गोष्ट असावी. दिल्लीजवळ ओखल्याला डॉ. झाकीर हुसेन यांचीजामिया मिल्लिया इस्लामिया ही संस्था. भय्या (मीर असगर अली )हा तिथला विद्यार्थी.त्या संस्थेचा रौप्यमहोत्सव होता. त्या निमित्ताने प्रथम ओखल्याला, मग मीरतलाकॉग्रेसचे सेशन होणार होते तिथे, आणि परतताना उत्तर हिंदुस्थानातली प्रसिध्द स्थळेपाहायला, असा दौरा आखून भय्याबरोबर भाई आणि मी जायचे नक्की केले होते.आयत्या वेळी भाईचा बेत रजा न मिळाल्याने रद्द झाला आणि भय्या आणि मीदोघेच दिल्लीला आणि तिथून ओखल्याला गेलो. माझी उतरायची व्यवस्था प्रो. आगाअश्रफ यांच्या घरी होती. अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल असा सुंदर सभारंभ पहिल्यादिवशी पार पडला. गांधी,नेहरू,आझाद,जिना वल्लभभाई, राजाजी, सरोजिनीनायडू-- नाव घेण्यासारखा त्या काळचा देशातला प्रत्येक राजकीय पुढारी त्या प्रचंडस्टेजवर बसला होता. अनेकांची भाषणे झाली. सभारंभानंतर जवळपासचे म्हणजेदिल्लीहून वगेरे आलेले पाहुणे परत गेले. जेवणे, गप्पा होऊन आम्ही झोपलो.मध्यरात्री प्रचंड आरडाओरडा ऐकू आला आणि मी जागी झाले. घरातले इतरहीलोक उठले होते. फाळणीपूर्वीचा तो काळ. ठिकठिकाणी मधूनमधून जातीय दंगेउसळत होते. त्या रात्री ओखल्याच्या शेजारच्या गावातून हिंदुंचा प्रचंड जमाव हातांतपलिते घेऊन मुसलमानांचे हे विद्यापीठ जाळायला हल्ला करून येत होता.`हर हरमहादेव' च्या घोषणा ऐकू येत होत्या. प्रो. अश्रफ माझ्याजवळ आले आणि म्हणाले,""घाबरू नको. काही होणार नाही. ते लोक खूप दूर आहेत. पोलिसांची गस्त चालू आहे.""

हे जरी खरं होतं तरी मी भेदरून थरथरत होते. हा प्रसंग आठवला म्हणजे नचुकता मला माझी भयंकर लाज वाटते. मी मृत्यूला घाबरले म्हणून नव्हे. ती प्रतिक्रियानेसर्गिकच होती. त्यात कमीपणा मानायचे काय कारण ! पण मला शरम वाटते तीत्या क्षणी माझ्या डोक्यात क्षणभर का होईना, पण येऊन गेलेल्या एका विचाराची.मला वाचले, मुसलमानांना मारायला आलेले हे हिंदू. मी त्यांच्यातलीच आहे, हिंदूआहे हे त्यांना कळणार नाही आणि मला निष्कारण मरावे लागणार.

मी त्यांच्यातलीच आहे' म्हणजे काय ? मी धर्म मानत होते का ? त्या काळीभय्याइतका जवळचा मला दुसरा कुणीही मित्र नव्हता. घरदार, नातीगोती, कोणतीही
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 31
बंधने न मानणारी मी, सुंदर जीवनमूल्यांना जिवापाड जपणारी मी, क्षणभर काहोईना पण त्या अविचारी जमावाला `आपला मानते ? प्रसंग आलाच असता तरप्रो. आगा अश्रफ आणि त्यांच्या घरातल्या इतरांनीही त्यांच्या घरच्या माझ्यासारख्यापाहुणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा केली असती, हे त्या क्षणीही मलाकळत होते. त्यांचा तो धर्मच होता. त्या क्षणी त्या मुसलमानांतला माणूस जागा झालाहोता आणि माझ्यातला हिंदू डोकं वर काढू पाहत होता. हल्ला करून येणाऱ्यांचा लोंढापरतून सगळे स्थिरस्थावर होण्यात अर्धाएक तास तरी गेला असेल. तो महाभयंकरविचाराचा क्षण कधीच मागे गेला होता. प्रत्यक्ष प्रसंग आलाच असता तर स्वतःवर सूडकाढण्यासाठी मी कदाचित सर्वांत अधिक धेर्य आणि माणुसकी दाखवली असती. इतरकुणाला काहीही कळले नाही; पण मला मात्र माझं एक वेगळंच दर्शन झालं होतं.
या वृत्ती एरवी कुठे असतात ? प्रसंगी केवढी उसळी मारून ज्वालामुखीतूनविध्वसंक लाव्हा अचानक उफाळून यावा तशा येतात ! या एवढयाशा जीवात असंकाय काय एकवटलेलं असतं आणि संस्कार करून न घेता स्वतंत्र अस्तित्व बाळगतअसतं ? आपल्यालाच आपण अद्याप ओळखलेले नाही.
भीती ही शारीरिक असते की मानसिक ? माझ्या असे लक्षात आलेय, की इतरांच्यादृष्टीने अत्यंत क्षुल्लक वाटणाऱ्या काही प्रसंगी मी शारीरिक आणि मानसिक दोन्हीदृष्टींनी अगदी अळुमाळू होऊन भेदरून लागते आणि जिथे सर्वसामान्यांचेधेर्य खचते तिथे मी अगदी सहजतेने वावरू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तरअगदी जवळच्या व्यक्तीचादेखील आजार, अगर मृत्यू, अपघात, ऑपरेशन, वेडा,राजकीय लढयातील दंडुकेशाही किंवा गोळीबार, आग, युध्द, असल्या गोष्टींचे अगरनेसर्गिक आपत्तींचे मला कधीच भय वाटलेले नाही. पण दारू पिऊन झिंगलेला माणूस,चोरी, मारामारी, दंगे, अगदी चित्रपटातले बॉक्सिंग किंवा कुस्तीचे दृश्य, असल्या गोष्टीमी पाहू शकत नाही. मला कसेतरीच व्हायला लागते. मळमळायला लागले, थरथरायलालागते, आपल्याला भोवळ येईलसे वाटू लागते. मी क्राइम-स्टोरीज वाचू शकते, म्हणजेवाचताना ती दृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतातच ना ? पण त्या वेळी असे काही होत नाही.प्रत्यक्षात मात्र अशा वेळी माझी मी राहतच नाही. म्हणजे निश्चित काय ?मला वाटते, माझ्यातले जिवाला अतिशय घाबरणारे, दुबळे, नेसर्गिक अस्तित्वअशा वेळी जागृत होऊन माझ्या संस्कारित अस्तित्वावर मात करते. म्हणजेच मलावाटते माणसाला दोन पिंड असावेत. एक आई-बाप आणि पूर्वज यांच्यापासूनलाभलेला आणि पुढे आपल्या वंशजांचे आपण पूर्वजच होणार या अर्थाने आपल्यास्वतःच्या आयुष्यातल्या नव्या अनुभवाने थोडा बदलेला असा संस्कारित पिंड; आणिदुसरा आदिमायेकडून (इथे मूळ शब्द `आदिमाया' नसून `आदिमाय' असा असायलाहवा ) लाभलेला, कोणतीही संस्कार करून घ्यायला राजी नसलेला मुळ पिंड. ---वाटले तरअसे म्हणून या, की भूगोलावर आधारलेले जिवंत शरीर म्हणजे हा मूळ पिंड आणि
------------------------------------------------------------------------------------------------

पान नं. 32

इतिहासावर आधारलेले मन हा संकरित पिंड. म्हणजे मग हे द्वेत झाले. आजचेवेद्यकशास्त्र हे शरीर आणि मन यांचे अद्वेत मानण्याकडे झुकत असताना हाद्वेतविचार योग्य आहे का ? अचूक आहे का ? मलाही शंका आहे, पण त्याबरोबरच हा विचारही आहेच.

आता वय उताराला लागलंय. स्वतःच्या प्रकृतीची मी कधीच काळजी केलेलीनाही. तेव्हा मला काय वाटतं याची काळजी न करता आता प्रकृतीने मला इंगादाखवायचं ठरवलं तर मला तक्रार करण्याचा अधिकार नाही. आपल्याला शेवटचाआजार कधी येईल आणि कोणत्या स्वरूपाचा येईल हे जरी अनिश्चित असलं आणिआपल्या हाती नसलं तरी त्या वेळी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचं आपल्याशी जेवर्तन राहील ते बरंचसं आपलं आयुष्यभर त्यांच्याशी जे वर्तन राहिलं त्यावरचअवलंबून असणार.त्यामुळे या बाबतीत कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवण्याचामला अधिकार नाही. मी मला वाटले तसेच वागत आले, इतरांना काय वाटेल याचाविचार कधीच केला नाही. म्हणजे मी माझ्यासाठीच जगले, इतरांसाठी नाही. मग मीमरताना इतरांनी स्वतःच्या आयुष्यातला काही वेळ आणि काही शक्ती माझ्यासाठी कांखर्च करावी ?

म्हणजे मग हा प्रश्न सोडवायचा एकमेव उपाय म्हणजे आत्महत्या का ?

स्वतःच्या विचारानेच जगणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींनी खरं तर एकटं राहावं,एकटं जगावं, एकटं मरावं. हा विचार आला की मला न चुकता फक्त माझ्या आजीचीआठवण येते. तिचा- माझा सहवास माझ्या लहानपणी घडला तेवढाच. पण आम्हां दोघींचाएकमेकींवर इतका जीव होती, की आयुष्यातला अत्यंत सुखाचा काळ कुठला या प्रश्नाला,लहानपणी धामापूरला होते तो, किंवा धामापूरच्या आजीच्या सहवासात गेला तो, इतकेचउत्तर मी देऊ शकेन. या आजीचे मला दिसलेले रूप फार सुखद आहे आणि तिच्यापूर्वायुष्याची वाडवडिलांकडून कानावर आलेली कहाणी विलक्षण आहे.

तसे आम्हां दोघींचे रक्ताचे नात नव्हते. ती माझी सावत्र आजी. आम्ही ठाकूरधामापूरचे. माझे पणजोबा खूप श्रीमंतही होते आणि मोठे व्युत्पन्नही होते. त्यांच्याघोडयाच्या नाला म्हणे चांदीच्या असत. त्या काळातल्या श्रीमंत जहागीरदारांना साजेसेते रूबाबात राहिले असणार, आपल्या लहरीप्रमाणे मनमाना कारभार केला असणार.त्या मोठया कुटुंबात आणि गावात त्यांचा दरारा फारच होता. धामापूर हे मालवणपासून बारा मेलांवर आहे. मालवणहून नेहरूपाराला नदीपाशी येणारा रस्ता धामापूरला जातो.

--------------------------------------------सपुंर्ण-----------------------------------------------------

पुर्वरंग
शिवाजी महाराज आणि लोकमान्य यांच्या स्मरणाने आजही गदगद्णारे लोक आम्ही.मायदेशहून येणाऱ्या पत्रांची आणि वर्तमान पत्रांची वाट बघत इथली मराठी माणसे एकमेकांना धरून आहेत. मी ह्या परदेशच्या प्रवासात एकूण हेच पहात आलो. दूर देशी जावे, अफाट पैसा मिळवावा, त्या त्या देशांच्या संस्कृतीशी समरस व्हावे-- तिथले लोक निशागारात जातात म्हणून आपणही जावे, त्यांनी बॉलडान्स केला कि आपण करावा,त्यांच्या बायकांची वेषभूषा - केशभूषा आपण स्विकारावी, असली स्वत्व सोडायला लावणारी समरसता आपल्या मराठी मंडळींत बरीच कमी- मराही बायकांना मोकळेपणाने मद्यपान किंवा धूम्रपान करताना मी क्वचितच पाहिले आहे. साहेबाने आपला आपला क्रॉस जगभर नेला आणि कुठल्याही देशात तो राहिला तरी आपल्या घरात तो क्रॉस लावतो.ख्रिस्ताची तसबीर लावतो. तो फॉरवर्ड! आणि आम्ही आमच्या बजरंगाची किंवा गणरायाची तसबीर लावली तर ते बॅकवर्ड! हे केवळ गुलामीचे पाप.एखादी देवाची तसबीर. एखादे शिवाजी- राणाप्रतापाचे चित्र, एखादे मराठी पुस्तक मायदेशाशी आपले नाते ठेवते. परदेशात गेल्यावर आपल्या मायभूमीची नाळ अजिबात कापून टाकायला नको. परदेशची गोष्टच सोडा, पण इथे देखिल काही मराठी आया इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या आपल्या मुलांचे इंग्रजीतून लाड करताना दिसतात तेव्हा मला संताप येतो. त्या घरी पुन्हा जाऊ नये असे वाटते. जगातल्या कुठल्याही इतर देशातल्या माता आपल्या लेकरांचे परक्यांच्या भाषेतून लाड करीत नाहीत. हे म्हणजे स्वतःचे स्तन्य असताना शेजारणीचे उसणे आणून
पाजण्यासारखे आहे.


आजवर कुठल्याही शींप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला लागल्याला इतकी वर्षे लोटुनदेखील अजूनही उमगले नाही. परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी चांभाराच्या नजीकचाच, फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला. ह्या सदगृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली. प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना. दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेले सुट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही. अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजीइतकेच बिन अस्तराचे होते हा भाग निराळा ! तीसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऎवजी लंडनला आपले सूट अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली. सर्कसवाले शिंपीदेखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या. (अनुभंवाती हे खोटे ठरले.) मी त्याचा सूट घालून पिकॅडीच्या शिंप्याचा दुकानांपुढून अनेक वेळा! मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पाद्री समजून हॅट काढून नमस्कार केला! मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत, (असतील, पण हे सांगण्याची गरज काय होती?) माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला ‘शेप’ कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसे येते, वगैरे फालतू परिक्षणे केली. अनेक वेळा मला ‘ट्रायल’ला बोलावले. इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ‘ट्रायल’ हाच शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर ह्या शिंपीदादाच्या दुकानात कळले. प्रत्येक ‘ट्रायल’ म्हणजे ट्रायलच होती. दर वेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि ‘नो नो, युवर ट्मी ! ओ ---- युवर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राइट...’ असे पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडुने रेघोट्य़ा ओढी !

शेवटी एकदाचा सूट झाला. तो मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो आणि.... ‘तुमचे सगळे डिफेक्टस मी खुबीने झाकले आहेत; आता खूशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा तुम्हाला मरण नाही’--- असा निकाल देऊन जवळजवळ अर्धसहस्त्र रुपयांनी माझा जुना खिसा रिकामा केल्यावर त्याच्या आत्याची शांती झाली आणि एकदाचा मी ‘सुट’लो.
--(अपूर्वाई)

महाराष्ट्र टाईम्स १२ जुन २००८

पुलं गेल्यानंतर आलेल्या त्यांच्या वाढदिवशी सुनीताबाईंनी जागवलेल्या या पुलंच्या आठवणी... ' महाराष्ट्र टाइम्स ' च्या १२ नोव्हेंबर २००च्या अंकातून पुनर्प्रकाशित
...................................

..तुला सार्वजनिक ' आपण ' प्रिय , तर वैयक्तिक ' मी ' ची ताकद ज्याने त्याने आजमावायला हवी हा मा‌‌‍‍झा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे , याचा प्रत्यय मला सतत येत राही , तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून ख़ुप दूर होतो. जणू ' दोन धृवांवर दोघे आपण '. सदैव माणसात रमणारा तू , तर माणसांपेक्षा मानवतेवर जीवसृष्टी वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय.

तूही जर इतर चारचौघांसारख़ाच ' एख़ादा कुणी ' असतास ना , तर मग निर्मितीची , साहित्य-संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती , तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते , हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता. तुझा ' मुल ' पणा. तुझी लबाडीही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा , त्यात तरबेज व्हावं , त्यासाठी मेहनत करावी , हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख़्यानांत , लिख़ाणात , तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या , लोळत पडावं , गाणं ऐकावं , फार तर पुस्तकं वाचावी , चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का ?

कवी ग्रेसच्या ओळी आहेत , ' क्षितीज जसे दिसते , तशी म्हणावी गाणी। देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥ गाय जशी हंबरते , तसेच व्याकुळ व्हावे । बुडता बुडता सांजप्रवाही , अलगद भरुनी यावे ' . तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारीत होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास , तसाच विचारवंही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही होती. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे , त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञताबुध्दीने आपल्या परीने तीच संस्कृती तू जपलीस.

ती तुझी सहज प्रवृत्तीच होती , प्रकृती होती. मराठी ' विश्वकोषा ' त किंवा ' हूज हू ' मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल. तशीच ' विचारवंत ' हे ही विशेषण तुझ्यामागे लावलं जाईल. पण आपण उभयतांच्या जीवनकोशात माझ्यासमोर ठाकलास तो त्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच जसा! प्रज्ञेअभावी नवे , तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात , त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी ? मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी , स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण , मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते ? हक्काची बायकोच ना तुझी !

तुझ्यासाठी मी काय केलं ? तुझ्या तहानभूकेचं वेळापत्रक सांभाळलं , माझ्या परिने नवी-जुनी खेळणी पुरवली , अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले त्यात फ़ारतर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती ? कलावंत ' तू ' होतास. शब्द कळेची गर्भश्रीमंतीही , ' तुला ' लाभली होती. येतांना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दिर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे रहाणार आहे.

तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना ?

थोडीथोडकी नव्हे अखंड ५४ वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की , सहाजिकच चढ उतार आले. पण आज या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत रहाणाऱ्या या आठवणींचा. थकल्याभागल्या मनावर असं अधिपत्य गाजवू नये , एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातून सुटलास. माझ्या मनाच्या एका बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे इतर सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळ पण निर्धास्त जगलास , तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास.

मला तरी आता करण्यासारखं राहिलंच आहे काय ? तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे , पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे , असं थोडंच आहे ? मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे ? या संदर्भात सत्य एकच आहे , ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार.
अशा वेळी काय करावं ?
(मंगेश पाडगांवकरांचं नाव घेऊन)
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालवं इतकंच.

-सुनीता देशपांडे

पुर्वरंग
सात-आठ दिवसांत मी सिंगापुरात रुळु लागलो होतो. मलाय भाषेतल्या काही शब्दांवर तर माझा फारच लोभ जडला. विद्दाधर चेंबुरकर हा पार्लेकर असल्यामुळे त्याच्या अस्सल भाषाप्रभुत्वाविषयी मला शंका नव्हती. परंतु त्याच्या बायकोने टेलिफोनवरुन कुणाला तरी "साला!" म्हणून रिसिव्हर आपटल्यावर मी मात्र जरासा गडबडलो. पण तिच्याही लक्षात माझी अस्वस्थता आली असावी. "मलाय भाषेत ` रॉंग नंबर' असे टेलिफोनवर म्हणायचे असेल तर `साला!' म्हणतात." हे ऎकून त्या भाषेचा यथार्थ शब्दयोजना-सामर्थ्यावर माझे एकदम प्रेम बसले. `ट्रिंग ट्रिंग' ऎसा `खोटा नंबर' फिरल्यावर `हलो हलो' ला `साला' ह्यासारखे समर्पक उत्तरे दुसरे मला तरी सुचत नाही! हे दु:ख टेलिफोनशी घनिष्ठ संबंध असणाऱ्यांनाच कळावे. रात्री बाराएकच्या सुमारास गाढ निद्रेतून जागे करणारी ती क्षुद्र घंटिका! `हॅलो' म्हणून आपण विचारतो आणि पलिकडून कुणीतरी `केम सुखमडल सेठ----' अशी प्रस्तावना करून `न्यूयोर्क कोटन' बद्दल अगम्य भाषेत बोलू लागतो. अशा वेळी `साला!' हा मलाय शब्द काय चपखल बसेल! वा! जगात असे आंतरराष्ट्रीय सुबक शब्द जमवून भाषा बनवली पाहिजे. होय आणि नाही यांना मात्र मलाय `आडा' आणि `तिडा' तितकेसे चांगले वाटत नाहीत. आणि एकदा मला चहात दुध हवे होते असे कुजबुजल्यावर आमच्या मित्राच्या पत्नीने मोलकरणीला `बाबा लागी सुसू' म्हटल्यावर मी दचकलो! पण मलाय भाषेत दुधाला `सुसू' म्हणतात. `बाबा' म्हणजे आण आणि `लागी' म्हणजे काय कोण जाणे!

बाकी ही भाषा फार सोपी आहे. प्रत्ययबित्यय भानगडी कमी! शब्द एकमेकांसमोर ठेवायचे. मलाय भाषेचेचे अधिक सुंदर स्वरुप म्हणजे `बहासा इंडोनेशिया'. संस्कृत शब्दांचा यात खूप भरणा आहे. इंडोनेशिया तर ठायीठायी संस्कृतचे ठसे आहेत. मलायात आणि इंडोनेशियात मुख्य धर्म इस्लाम, पण ह्या इंडोनेशियातल्या इस्लामी बंधूंवर प्राचीन भारतीय संस्कृतीचा छाप टिकून आहे. अर्थात काही शब्द भलतेच घोटाळ्यात टाकतात. मलायमध्ये मोठ्या बहिणीला `काका' म्हणतात. पण `काकी' म्हणजे पाय! डुकराला `बाबी' म्हणतात! छातीला `दादा' म्हणतात, पण पाठीला वहिनी म्हणत नाहीत! डोळ्याला `माता' पण `मातामाता' असे दोनदा म्हटले की पोलीस! आजीला `नेने' पण आजोबा लेले नव्हेत! अनेकवचने करणे फार सोपे. तोच शब्द दोनदा उच्चारायचा! `मुका' म्हणजे चेहरा आणि `मुकामुका' म्हणजे चेहरे. चेहरा आणि मुका यांचे अद्वैत मानणारे हे लोक थोरच. पण खरा मुका घेण्याला मात्र `चिओंब' म्हणून चुंबण्याच्या जवळ जातात. छातीला `दादा' म्हणणारे बहाद्दर हदयाला `चिंता' म्हणतात आणि प्रेयसीला चिंतातुर न म्हणता `चिंता मानिस' म्हणतात. `मानीस' म्हणजे गोड! आणि `पडास' म्हणजे तिखट! बाकी मलाय स्त्रिया क्वचीत मानिस चिंता करायला लावतातही. एखाद्या सुस्तनीची दादागिरी कां चालते हे मलायात गेल्यावर अधिक कळते.

"फ/ह सवणूक"
‘‘जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपणा सा–यांची ‘फसवणूक’ एकदा कळली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणा‍–या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं ? ’’
------------------------------------------------------------------------------------------------
" तुझे आहे तुजपाशी"
जगात वेदना जितकी सुंदर बोलते, तेवढं सुख नाही बोलत. सुख माणसाला मुकं करतं, वेदनेच्या पोटी सुंदर बोलणं येतं,नाही ?
--------------------------------------------------------------------------------------------------

"एक शून्य मी"
झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे, कुणाचीच नाही! मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!
------------------------------------------------------------------------------------------------
मोठेपणा याचा अर्थ लक्षात ठेवला पाहीजे. समाजात मोठेपणा असाच मिळत असतो, कि ज्या वेळेला लोकांना त्याचं आपण अनुकरण करावं असं वाटतं, त्या वेळेला लोकांनी त्या मोठेपणाला दिलेली ही एक मानवंदना असते.
------------------------------------------------------------------------------------------------
पु.ल. देशपांडे एकदा म्हणाले होते की , ' माणसाच्या शरीराचा कोणता तरी एक कोपरा नेहमीच दुखत असतो. फक्त त्या वेदना तीव्र नसल्याने माणसाला ते जाणवत नाही. पण ज्या दिवशी त्या वेदना जाणवणार नाहीत तेव्हा तो माणूस मेलेला असेल.
--------------------------------------------------------------------------------------------------

जीवन त्यांना कळलें हो

'मी एस्एम् ' ही एस . एम . जोशी यांची आत्मकथा आहे . यंदा 12 नोव्हेंबरला त्यांच्या वयाला 80 वर्षे पूर्ण झाली . त्या निमित्ताने त्यांच्या मित्रांनी त्यांना आपल्या जीवनाची कहाणी सांगायला लावले आहे . त्यांनी ती टेपरेकॉर्डला सांगितली आणि आता ती ग्रंथरूपाने वाचकांच्या पुढे येत आहे .



अकृत्रिमता हे एसेमच्या स्वभावाचे सर्वांत मोठे वेशिष्टय आहे आणि त्यांची कथाही

त्यांच्या स्वभावासारख्याच कमालीच्या सहजभावाने प्रकटली आहे . पुस्तकाच्या सुरूवातीलाच

त्यांनी म्हटलेय की "" माझ्यातला ` मी ' कधी जन्माला आला असे जर कोणी विचारले तर ते

सांगणे फार कठीण आहे . "" मला तर हे वाक्य वाचताना वाटले की ते कठीण नाही , तर अशक्य

आहे . त्यांच्या जीवनाला ` मी ' पणाचा स्पर्शच झाला नाही . बोरकरांची एक कविता आहे :

` जीवन त्यांना कळले हो , मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणानें गळलें हो . ' इतके ` मी ' पण

गळलेली आणखी दोनच माणसे मला पाहायला मिळाली : एक सेनापती बापट आणि दुसरे

सानेगुरूजी . आपली काया , वाचा आणि मन समाजपुरूषाला अर्पण केलेल्या एसेमना पेशाची

श्रीमंती मिरवण्याची कधी संधीच लाभली नाही . पण सर्वसंगपरित्याग करूनही त्या त्यागाच्या

दिंडयांपताकाही कधी खांद्यावर मिरवल्या नाहीत . पुष्कळदा साधेपणाही फार चतुराईने

मिरवला जातो . गांधीवर त्यांची परमश्रध्दा असूनही त्यांना पंचा नेसून हिंडावे असे कधी वाटले

नाही . त्याबरोबर परीटघडीतले बिनसुरकुतीचे गोंडसपणही मानवले नाही . पर्वतीच्या हरिजन

मंदिरप्रवेशाच्या सत्याग्रहात सनातनी धर्मरक्षकांनी त्यांचे खादीचे धोतर खेचून लज्जारक्षण

अवघड केले . तेव्हापासून त्यांनी नाडीचा लेंगा वापरायला सुरूवात केल्याची कथा त्यांनी ह्या

पुस्तकात सांगितली आहे . हा त्यांचा वेश मी गेली बावन्न - त्रेपन्न वर्षे पाहतोय . अर्थात मी

एसेमना प्रथम केव्हा पाहिले ह्या घटनेला काडीचेही सार्वजनिक महत्व नसले तरी माझ्या

मनात मात्र त्यांच्या त्या पहिल्या दर्शनाचे चित्र आजही , त्या घटनेला अर्धशतक लोटून गेले

तरी ताजे आहे .



एकोणीसशे एकतीसच्या म . गांधीच्या सत्याग्रहाची छावणी पार्ल्यात होती . आज त्या

जागी सिगारेट बनवायचा कारखाना आहे . एकतीस साली भारतातील सर्व लहानसहान

देशभक्तांची ती काशी होती . चळवळीच्या त्या वातावरणात पार्ल्यात घरोघरी चरखे किंवा



पान नं . 103

टकळ्या फिरत होत्या , प्रभातफेऱ्या निघत होत्या , तुरूंगात जायला सत्याग्रही सिद््ध होत होते .

आम्हा शाळकरी मुलांसाठी वानरसेनाही निघाली होती . जरीच्या किंवा वेलबुट्टीच्या टोप्या

जाऊन डोक्यावर गांधी टोप्या चढल्या होत्या . छावणीत येणाऱ्या थोर देशभक्तांची पार्ल्याच्या

टिळकमंदिरात व्याख्याने व्हायची . त्यांच्या सभांना जायला आम्हांला घरातूनही उत्तेजन होते

आणि शाळेतूनही होते .



अशा ह्या भारून गेल्यासारख्या वातावरणाच्या काळात एका रविवारी सकाळी

टिळकमंदिरात एसेम जोशी नावाचा पुण्यातला तरूण देशभक्त भाषण करणार असल्याचे

कळले . कॉग्रेसमधल्या तरूणांनी युथ लीग नावाची तरूण देशभक्तांची संघटना स्थापन

केल्याची कुणकुण कानांवर आली होती . युथ आणि लीग ह्या दोन्हीं शब्दांचे स्पेलिंगदेखील

नक्की ठाऊक नव्हते , पण व्याख्यान म्हणून चुकवायचे नाही हा पार्ल्यातल्या पोराथोरांचा बाणा

असल्यामुळे त्या वेळच्या टिळकमंदिराच्या त्या छोटयाशा सभागृहात लवकर जाऊन जागा

धरून बसलो आणि आमच्या पार्ल्यातलेच चिकेरूर नावाचे तरूण देशभक्त एसेमना घेऊन

आत आले . ह्या गोऱ्यापान चेहऱ्याच्या , सडपातळ बांध्याच्या , पांढराशुभ्र खादीचा पायजमा ,

ओपन कॉलरचा पांढरा शर्ट आणि घोंगडीसारख्या जाड खादीच्या कापडाचा कोट घालून

आलेल्या तरूणाच्या नुसत्या देखणेपणानेच आम्ही मुग्ध होऊन गेलो . सभेला मराठी

लोकांइतकेच गुजरातीही श्रोते होते , त्यामुळे असावे , पण एसेम त्या दिवशी हिंदीत बोलले .

त्या काळी पार्ल्याच्या राष्ट्रभाषा - प्रचारिणी सभेच्या छापील हिंदीचा आणि दूधवाल्या भय्याशी

बोलायच्या मराठी गद्याच्या हिंदी अवताराचा फक्त आम्हांला परिचय होता . त्यामुळे

देखणेपणाबरोबर कमालीच्या सहजतेने बोलल्या गेलेल्या त्या हिदींनेही आमची मने जिंकली

होती . एसेमचे ते देखणेपण आणखी एका कारणाने माझ्या मनावर कोरले गेले आहे : आमचे

एक मास्तर दुसऱ्या दिवशी वर्गात म्हणाले , "" डिड ही नॉट लुक लाइक अपोलो ? "" आणि

त्यांनी त्या देखण्या अपोलोची ग्रीक कथा सांगितली होती . तेव्हपासून अगदी त्यांच्या ऐंशिव्या

वर्षांच्या वयातसुध्दा माझ्या डोळ्यांपुढे एसेमचे वाढते वय म्हणजे एरिकमनच्या भाषेत

` एक्स्टेंडेड यूथ - विस्तारित तारूण्य ' आहे असेच वाटत आले आहे .



आयुष्यात बाळपणी नशिबाला आलेली आणि तरूणपणी स्वतः निवडलेली खडतर वाट

तुडवताना एसेमनी मनाचे हे तारूण्य कसे टिकवून ठेवले हे एक कोडे आहे . ह्या ग्रंथात

पाचवीला पुजलेल्या दारिद्रयाशी , परकीय सत्तेशी , पुढे स्वकीय सत्ताधीशांशी , धर्मांधांशी ,

आर्थिक शोषण करणाऱ्यांशी , इतकेच नव्हे तर ज्यांना आपले साथी मानले त्यांनीही निराळा

पवित्रा घेतल्यावर त्यांच्याशी झालेल्या संघर्षांचीच कथा आहे . ह्या चरित्रातले प्रत्येक पर्व हे एक

प्रकारचे युध्दपर्वच आहे . फरक इतकाच की त्यांतले प्रत्येक युध्द काही शाश्वत मूल्यांना न

ठोकरता धर्मयुध्दाचे नियम पाळून लढले जावे हा त्यांचा सतत आग्रह होता आणि तो

तथाकथित राजकीय व्यवहार्यतेत बसत नव्हता . ही सारी युध्दपर्वेच असल्यामुळे त्यांतल्या

नाटयपूर्ण घटना रंगवून सांगण्याचा आणि स्वतःकडे नायकाची भूमिका घेण्याचा कुणालाही

मोह झाला असता . पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो , बेचाळीसची चळवळ असो , की

कामगारचळवळ असो , ह्या साऱ्या युध्दांच्या कथा भडकपणाचा जराही स्पर्श होऊ न देता ,

साधेपणाने , त्या कथांचा ओघ कुठल्याही आडवळणाला न नेता , त्यांनी सांगितल्या आहेत .



एसेमचे हे आत्मकथन म्हणजे न्यायासाठी ते ज्या ज्या लढयात उतरले त्या लढयांचा



पान नं . 104

इतिहास आहे . असल्या लढयात नाटय असते . ते रंगवताना त्या लढयातल्या तत्त्वापेक्षाही

आत्मगौरवाला अधिक महत्व दिले जाते . श्रेय पदरात पाडून घ्यायची घाई सुटते . एसेमनी

मात्र लढयाचे वर्णन करताना मूळ उद्देशाचे भान सुटू दिले नाही . कारण प्रत्यक्ष लढयातही ते

भान त्यांच्या विचारातून सुटत नव्हते . संयुक्त महाराष्ट्र समितीतलाच एक प्रसंग त्यांनी

सांगितला आहे : संयुक्त महाराष्ट्र समितीत अनेक राजकीय पक्ष एकत्र आले होते . त्यांतल्या

काही पक्षांतल्या लोकांना आपण न्यायाच्या प्रतिष्ठापनेच्या साध्यासाठीच हा लढा द्यावा , त्यात

सत्ताग्रहणाचा उद्देश नसावा , ही निखळ ध्येयवादी भूमिका मान्य नव्हती . विशेषतः

कम्युनिस्टांच्या दृष्टीने हा राजकीय लढा होता . आणि राजकीय लढा याचा अर्थ राजसत्ता

बळकावण्यासाठी लढा हे त्यांचे ब्रीद होते . त्यांना संयुक्त महाराष्ट्रातल्या जनतेवर

द्वेभाषिकामुळे होणार असलेल्या अन्यायातून निर्माण झालेला संताप हा राजकीय

भांडवलासारखा वाटत होता . ज्यांना राजकारणात कुटिल नीतीचा अवलंब अपरिहार्य वाटतो

त्यांना एसेमना राजकीय व्यवहारज्ञान नाही असे वाटत होते . राजकीय व्यवहारज्ञान म्हणजे

साधनांच्या शुध्दाशुध्दतेचा विचार न करता , सत्ता पदरात पाडून घेण्याचाच व्यवहार खरा असे

मानणारे तत्वज्ञान . शकुनीची नीती हे उत्तम राजकीय व्यवहारज्ञान . ते एसेमना नसल्याच्या

आरोपावर एसेमनी दिलेले उत्तर राजकीय लढयातही सदेव मूळ उद्देशावरची नजर चळू न

देणाऱ्या वृत्तीचेच द्योतक आहे .



त्यांनी म्हटलेय , "" माझं राजकीय व्यवहारज्ञान तुमच्यापेक्षा अधिक परिपक्व आहे . आपण

ज्या ध्येयासाठी लढतो आहोत ते ध्येय शासकीय सत्ता हस्तगत करणं हे नाही . निदान त्याचा

अग्रक्रम सत्ताप्राप्ती हा नाही . मुख्य उद्दिषट मराठी भाषिकांसाठी संघराज्यात एक घटकराज्य

म्हणून महाराष्ट्राची निर्मिती व्हावी हे आहे . हा लढा सर्व मराठी जनतेचा असून पक्षनिरपेक्ष

आहे . कॉग्रेसने त्याला पक्षीय स्वरूप दिलं आहे इतकंच ! ""



एसेमची ही सत्तानिरपेक्ष भूमिकेवरून राजकीय आंदोलनात उभे राहण्याची वृत्ती

स्वातंत्र्योत्तर काळात कालबाह्य ठरली . स्वातंत्र्यप्राप्तीनंतरर वर्षभरातच राष्ट्रपित्याचा खून झाला .

आणि तीर्थरूप गेल्यावर हाती आलेल्या इस्टेटीवर सर्व चिरंजीवांनी चेनीची चढाओढ

चालवावी तशी अवस्थ सुरू झाली . वर्षातून एकदा त्या बापाचे सरकारी श्राध्द केले की उरलेले

तीनशे चौसष्ट दिवस मनसोक्तपणे सत्तेचा सर्व तऱ्हेने उपभोग घ्यायचा आणि आपापली

खाजगी धन , कधी स्वतः तर कधी स्त्रीपुत्रपौत्रादिकांमार्फत किंवा पुतण्या - मेहुण्यांच्या मदतीने

करायला मोकळे . असल्या वागणुकीला राजकीय व्यवहार्यतेचे मान्यतापत्र मिळालेले आपण

पाहतो आहो . ह्याचा एक अत्यंत निराशाजनक असा परिणाम झाला आहे . तो म्हणजे स्वतःला

राजकीय सत्तेचा मोह नसतानाही कुणी इतरांचे भले करू इच्छितो ह्यावरचाच मुळी समाजाचा

विश्वास उडाला आहे . ह्या परिणतीचा आरंभ सत्ता हाती आल्या काळापासूनच झालेला आहे .

रोज अहिंसा , सत्य - अस्तेयाचे मंत्र म्हणत नित्यनेमाने सूतकताईचे कर्मकांड पार पाडणारे हात

दुपारी मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसले की , अहिंसा , सत्य , अस्तेय विसरून गोळीबाराच्या

हुकुमांवर सह्या करायला लागले . सत्ताग्रहाच्या चळवळीच्या काळात दरिद्रीनारायणाच्या

नावाने वेळीअवेळी गहिवर काढणारे बाळासाहेब खेर मुख्यमंत्री झाल्यावर गरिबांच्या

मोर्च्याला सामोरे येणे हे आपल्या स्थानाला कमीपणा आणणारे आहे असे मानू लागले . मंत्री

झाल्यावरची नबाबी ही सुरूवातीच्या काळात आली . शेवटी मोर्चाचे प्रकरण फारच



पान नं . 105

विकोपाला जायला लागल्याचे दिसल्यावर ते सिंहासनावरून खाली उतरले आणि त्या मोर्च्या -

पुढे येऊन "" पुंडलिका भेटी परब्रम्ह आलेगा "" वगेरे पायघोळ कीर्तन करून गेले . "" पण आजच्या

इतक्या निर्ढावलेपणाने स्मगलरांच्या गळ्यात गळा घालून वागायला काही वर्षे जाऊ द्यावी

लागली . पहिली काही वर्षे ब्रिटिश साम्राज्यशाहीविरूध्द लढताना ह्या लोकांनी ` अ ' वर्गाचा का

होईना पण सोसलेला तुरूंगवास लोकांच्या आठवणीत होता . ते देशभक्तीचे वलय त्यांना

पुष्कळ दिवस पुरले . आजच्यासारखी असल्या नेत्यांची विश्वसनीयता तो वेळपर्यंत संपूर्ण -

पणाने नष्ट झाली नव्हती . पण सत्ता आल्यापासून देशहितापेक्षा पक्षहित मोठे असा

विचार रूजायला लागला होता आणि कॉग्रेसच्याच हाती सत्ता असल्यामुळे इतर पक्षांना शत्रू

मानून नेस्त नाबूत करण्याचा कार्यक्रम जोरात चालला होता . जे कसलाही विधिनिषेध

न मानता सत्तारूढ कॉग्रेस पक्षात गेले त्यांतल्या बहुतेकांचे भरपूर ऐहिक कल्याण झाले . आणि जे

मूल्यामूल्यविवेकाला धरून राहिले त्यांची मात्र सदेव ससेहोलपटच झाली .



स्वातंत्र्यपूर्व काळात एसेमना अनेक वेळा तुरूंगवास घडला तसा स्वातंत्र्य मिळाल्यावरही

घडला . लढयातही न्याय्य - अन्याय्य बाजू न पाहता तो दडपून टाकायचे ब्रिटिशांचे धोरण

आणि स्वकीय राज्यकर्त्यांचे धोरण ह्यांत काहीच फरक नव्हता . मूल्यामूल्यविवेक वगेरे सब झूट

ठरले होते . अशा वातावरणात लौकिकार्थाने जयप्रकाश , सानेगुरूजी , सेनापती बापट , एसेम

ही माणसे अयश्स्वीच ठरली .



एसेमनीच ह्या पुस्तकात एके ठिकाणी म्हटलेय , "" माझं आयुष्य म्हणजे एक धडपडीचा

इतिहास आहे . "" तसे पाहिले तर जगताना धडपड कुणालाच सुटलेली नाही . पण नव्याण्णव

टक्के धडपड ही स्वार्थ्यांच्या पोटी चालू असते . अशी निःस्वार्थी धडपड करणारी एसेमसारखी

माणसे हजारांतुनी एखादा म्हणावे अशी असतात . सानेगुरूजींच्या डोळ्यांपुढे ह्या देशात अशी

हजारो धडपडणारी मुले गरिबांच्या जीवनात आनंद नेऊन पोहोचवतील अशा प्रकारचे स्वप्न

होते . एसेम तसल्या धडपडणाऱ्या मुलाचेच मन घेऊन जगत आले . ते मन त्यांनी कोमेजू दिले

नाही . म्हणूनच राजकारण म्हणजे सदेव आपल्या हाती सत्ता ठेवायला , एक तर गुंड - लाचारांचे

सेन्य जमवणे किंवा कसलाही विधिनिषेध न बाळगता विरोधकांची शक्ती खच्ची करणे असा

अर्थ ह्या शब्दाला प्राप्त होईल असे त्यांच्या स्वप्नातही आले नसेल . देशभक्तीशी काडीमोड

घेतलेले राजकारण म्हणजे स्वार्थासाठी आपल्या हाती सत्ता ठेवण्याचे रात्रंदिवस चालू असणारे

कृष्णकारस्थान यापलीकडे काय असणार ?



आणि अशी परिस्थिती चोहोबाजूंना दिसत असूनही एसेमना निराशेने किंवा वेफल्याने

ग्रासले नाही . नव्हे , त्यांनी ग्रासू दिले नाही . स्वातंत्र्याच्या लढयात केलेला त्याग , पोलिसांच्या

हातून खाल्लेला मार , भूमिगत अवस्थेतले ते जगणे , श्रीमंतांनी हवा पालटायला

महाबळेश्वरला जावे अशा सहजतेने तुरूंगाची हवा खायला जाणे - ह्या त्यागाचे भांडवल

करून स्वतंत्र भारतात त्याची फळे चाखावी असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही .

एखाद्या भाविकाने देवावर श्रध्दा ठेवावी अशा उत्कटतेने त्यांनी माणसे चांगले वागणार या

गोष्टीवरची श्रध्दा टिकवून धरली त्यांचे हे आशावादी तारूण्य ऐंशिव्या वर्षीही तसेच

तजेलदार राहावे याचे विलक्षण आश्चर्य वाटते . पण त्याचे रहस्य त्यांनी अमुकअमुक कार्य

मी करतो आहे या अहंभावनेला जो संपूर्ण छेद दिला आहे , त्यात आहे . त्यामुळे आत्मसमर्थन

किंवा आत्मप्रौढीचा यत्किंचितही स्पर्श ह्या चरित्राला झाला नाही . ही कथा सांगताना आपले



पान नं . 106

सांगणे सुंदर व्हावे यासाठी त्यांना कसल्याही शब्दप्रसाधनांचा वापर करावा लागला नाही .



एसेमची ही आत्मकथा म्हणजे गेल्या साठसत्तर वर्षांतली भारतीय , विशेषतः महाराष्ट्रा -

तल्या सार्वजनिक जीवनाची कहाणी आहे . ती अशी असणे अपरिहार्य होते . कारण एसेम -

सारखी माणसे ही सार्वजनिक मालमत्ता असल्यासारखीच लोकांकडून वापरली जातात . कुठेही

आग लागली की एसेमनी पाण्याचा बंब होऊन तिथे जाणे हे त्यांचे जणू काय कर्तव्य आहे

असेच लोक मानत असतात . त्यांच्या सार्वजनिक सेवेचे स्मरण ठेवायची मात्र कुणी काळजी

घेत नाही . स्वातंत्र्ययुध्दात जिवावर उदार होऊन भाग घेतलेल्या आणि आयुष्याची अधिक वर्षे

तुरूंगातच घालवलेल्या एसेमनी पुण्यात युनियन जॅक खाली जाऊन तिरंगा वर चढवताना

पाहिला तो लोकांच्या गर्दीत उभे राहून आणि मुलाला खांद्यावर बसवून . त्यांना त्या समारंभाचे

साधे आमंत्रणही नव्हते . इंग्रजी राज्यात ज्यांनी साहेबाशी संधान जमवून सगळी सुखे भोगली

होती त्यांच्यापेकी अनेकांनी हॅटी उतरवून गांधी टोप्या चढवल्या आणि कॉग्रेसशी सोयरगत

जमवून सत्तेच्या खुर्च्या लाटल्या . कुणी जातीचा आधार मिळवला , कुणी धर्माचा , कुणी

पेशाचा ; कुणी सत्तधीशांचे स्तुतिपाठक झाले : पण सेनापती बापट किंवा सानेगुरूजी यांचा धर्म

व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात पाळणारी एसेमसारखी माणसे खुर्ची नसूनही सदेव

आशावादी राहून सत्तेच्या विरोधात कार्य करीत राहिली . त्यामुळे आमच्या राजकीय नेतृत्वात

खुर्चीशिवाय जगणारे आणि खुर्चीशिवाय जगू न शकणारे असे दोन ठळक विभाग झाले . खुर्ची

गेल्यावर हवा गेलेल्या बलूनसारखी ही माणसे लोळागोळा होऊन पडायला लागली . ज्यांना

लोकांनी धीर - वीर पुरूष मानले त्यांनी खुर्ची आणि लाल दिव्याची गाडी लाभावी म्हणून

दिल्लीला लाचारीचे जे किळसवाणे दर्शन घडवले , त्यांची ती केविलवाणी धडपड पाहिली की

वाटते , एसेमसारख्यांचे जीवन किती पराकोटीचे यशस्वी आहे .

एसेमइतका त्याग करूनही संतपणाची कसलीही बिरूदे न मिरवता , संतपणाचा विक्षिप्त -

पणातून थाट न दाखवता , अगदी एखाद्या बेताच्या उत्पन्नाच्या गृहस्थासारखे जगले .

चांगल्या कलांचा आनंदाने आस्वाद घेतला . सेवादलातल्या हजारो मुलामुलींना सानेगुरूजींची

` धडपडणारी मुले ' व्हायला प्रवृत्त केले . त्यागाचे ताशे बडवले नाहीत , की संयमी व्रतांचे

तुणतुणे वाजवीत बसले नाहीत . गांधीजींवर अतोनात प्रेम असूनही गांधीवाद्यांच्या कर्मकांडात

न शिरल्यामुळे सार्वजनिक जीवनात शुचितेचा आदर्श पाळूनही मुरारजी देसाई , शंकरराव देव

वगेरे गांधीवाद्यांच्या लेखी सदेव ` संशयित ' च राहिले . त्याची कितीतरी उदाहरणे ह्या कहाणीत

आहेत .



माझ्या वयाच्या बारा - तेराव्या वर्षी मी एसेमना प्रथम पाहिले . त्या वेळी ते सव्वीस - सत्तावीस

वर्षांचे असतील . आता त्यांना ऐशिंव्या वर्षी पाहतोय . केव्हाही भेटले की मला रवींद्रनाथांच्या

ओळी आठवतात . रवींद्रनाथ स्वतःविषयी म्हणाले होते :

"" सबार आमि समानवयसी जे

चूले आमार जतोई धरूक पाक ""

मी सर्वांचाच समवयस्क आहे मग माझे केस किती का पिकलेले असेनात ऐंशिव्या

वर्षी रवींद्रनाथांसारखाच ` मी सर्वांचा समवयस्क आहे ' असे म्हणण्याचा अधिकार एसेमनाच आहे .

वयामुळे , श्रीमंती - गरिबीमुळे , जातीच्या उच्चनीचतेच्या कल्पनांमुळे किंवा अधि -



पान नं . 107

काराच्या स्थानांमुळे माणसामाणसांत अंतर येत असते . ज्यांच्या सहवासात हे अंतर नाहीसे

कधी झाले हे आपल्याला कळतसुध्दा नाही अशी माणसे दुर्मिळ असतात . एसेम अशा अतिशय

दुर्मिळ माणसांतले एक आहेत .



पण हा आपला दुर्मिळ मोठेपणा कुणालाही जाणवू न देण्याची त्यांची वृत्ती असल्यामुळे

हे प्रथमपुरूषी आत्मवृत्त सांगताना त्यांची पंचाईत झालेली आहे . त्यांच्या मनाच्या मोठे -

पणाच्या , साहसाच्या , माणुसकीच्या अशा कितीतरी हकीगती ह्या चरित्रात आलेल्या नाहीत .

त्यामुळे सतत सामाम्यांतला एक होऊन राहणाऱ्या एसेममधले असामान्यत्व दाखवणारे एक

चरित्र त्यांच्या निकटवर्तीयांपेकी कोणीतरी लिहायला हवे . ह्या चरित्रातून आम्हांला लढे

दिसले पण हा लढवय्या अधिक दिसायला हवा होता . याची खंत मनाला लागून राहिली .

एसेमचे संपूर्ण दर्शन पुढल्या पिढ्यांना होत राहायला हवे . '

पान नं . 147



00EF700EF4सखे सोबती गेले पुढती



चादरीखाली झाकलेला देह डोळ्यापुढे दिसत होता . शांत झोप लागल्यासारखा . ह्या

झोपेतून आता जाग नाही हे कळत होते . असल्या झोपेकडे सगळ्यांचा प्रवास असतो , हा

वेदान्तही माहिती होता . घणाघाती घाव पडावा अशी सुन्न झालेली माणसे पायाखालची

जमीन खचल्यासारखी उभी होती . हलली तरी छायांसारखी हलत होती . बांध फोडून बाहेर

हुंदके कानांवर येत होते . सारे काही संपलेले आहे या जाणिवेने देहमन बधिरले होते .



त्या घरात गेल्यावर कधी आतल्या कोचावर बेठक मारून हातातल्या आडकित्याने सुपारी कातरीत

बसलेल्या थाटात , तर कधी आतल्या खोलीतून बाहेर प्रवेश करीत "" या "" अशा मोकळ्या

मनाने स्वागत करणारा तो आवाज आता पुन्हा कानी पडणे नाही हे समजत होते . आतल्या

खोलीतून बाहेरच्या दिवाणखान्यात तो मृत देह उचलून आणताना , असाही एक प्रसंग

आपल्या आयुष्यात येणार आहे असे कधीही वाटले नव्हते . पाचसहा दिवसांपूर्वीच गोष्टी

झाल्या होत्या . माडगूळकरांना आणि विद्याबाईंना आम्ही सांगत होतो , "" तुम्ही जिमखान्यावर

राहायला या . सगळे जुने स्नेहीसोबती तिथेच आसपास राहतात . भेटीसाठी सोप्या होतील .

आता ` पंचवटी ' तली ही जागाही अपुरी पडत असेल . पूर्वीपेक्षा वर्दळही खूपच वाढली आहे .

मोटांरीचा धुरळा , पेट्रोलचे भपकारे . . . अधिक मोकळ्या हवेत या . . . "" आणि त्याआधी ,

आठदहा दिवसांपूर्वीच , गीताचे दान मागायला गेलो होतो . बाबा आमटयांच्या आनंदवना -

तल्या वृक्षारोपण - समारंभासाठी . असा हा गीत मागायला जायचा परिपाठ गेल्या तीस - पस्तीस

वर्षांचा . रिक्त हस्ताने आल्याचे स्मरत नाही . चित्रपटव्यवसायात असताना तर नित्यकर्माचाच

तो एक भाग होता . आताशा नेमित्तिक .



पुण्याला ` बालगंधर्व ' थिएटर उभे राहत होते . गोपाल देऊसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा

करणाऱ्या चार ओळी पाहिजे होत्या . ` पंचवटी ' गाठली . माडगूळकरांना म्हणालो , "" स्वामी ,

चार ओळी हव्या आहेत . . . बालगंधर्वाच्या पोर्ट्रेटपाशी . "" मागणी संपायच्या आत

माडगूळकर म्हणाले , "" असा बालगंधर्व आता न होणे . "" तेवढ्यात कुणीतरी आले . गप्पागोष्टी

सुरू झाल्या . मी समस्यापूर्तीची वाट पाहत होतो . तासाभरात निघायचे होते . त्या श्लोकाला

चाल लावायची होती . उद््घाटन - समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या

होत्या . त्यांत माडगूळकरांचेच ` असे आमचे पुणे ' होतेच . तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे





पान नं . 148

श्लोक घेऊन आला . सुरेख , वळणदार अक्षरात लिहिलेला . बकुळ पंडितला मी चाल सांगितली .

रंगमंदिराच्या उद््घाटनाच्या वेळी रसिकांनी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागारातले दिवे मंदावले .

रंगमंचावर मांडलेल्या बालगंधर्वांच्या ` नारायण श्रीपाद राजहंस ' आणि ` स्वयंवरातली

रूक्मिणी ' अशी दोन दर्शने घडवणाऱ्या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजूला

केले , आणि लगेच माडगूळकरांच्या गीताचे गायन सुरू झाल्यावर रसिकांना कळेना , की त्या

रंगशिल्पाला दाद द्यावी की गीतातल्या शब्दशिल्पाला . प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्या वेळी

त्या ` रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्् ' ह्या अनुभूतीचे पर्युत्सुक झालेल्या रसिकांच्या

खिशांतले शेकडो हातरूमाल अश्रू पुसत होते .



पुणे विद्यार्थीगृहासाठी ` मुक्तांगण ' उभे करताना अशीच ` मुक्तांगणा ' च्या गाण्याची मागणी

घेऊन आलो होतो . ` मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी ' असे मर्ढेकर म्हणून गेले

आहेत . माडगूळकरांच्यापाशी गीते मागताना हे किती खरे होते . आम्हां मागणाऱ्यांचीच ताकद

अपुरी पडली . शेकडो गीते त्यांनी दिली . आणखी शेकडो मिळाली असती . दोन वर्षांपूर्वी

झालेल्या त्या भंयकर आजाराने त्यांच्या शरीरावर आघात केला होता ; - पण गीतप्रतिभेचा झरा मात्र

अखंड वाहत होता .



` मुक्तांगणा ' च्या गाण्याच्या वेळचीच गोष्ट . मी माडगूळकरांना ` मुक्तांगणा ' चा हेतू

सांगितला . वृक्षरोपणाने कार्यारंभाची मुहूर्तपेढ रोवली जाणार होती . त्या कार्याच्या वेळी मला

गीत हवे होते ते माडगूळकरांच्याच प्रतिभेतून फुललेले . गप्पागोष्टी चालल्या असतानाच

माडगूळकरांनी हातातल्या कागदावर दोन ओळी लिहिल्या :



` आनंदसाधकांनो , या रे मिळून सारे !

मुक्तांगणांत या रे , मुक्तांगणांत या रे ! ! '



त्यानंतर मग इकडच्यातिकडच्या गप्पागोष्टी झाल्या . घरी परतल्यानंतर तासाभरातच फोन

वाजला . पलीकडून माडगूळकरांचा आवाज आला : "" घ्या , तुमचं गाणं तयार आहे .

कागद - पेन्सिल घ्या .



` आनंदसाधकांनो , या रे मिळून सारे !

मुक्तांगणांत या रे ! !

वयवंशधर्मभाषा यांना न ठाव कांही

क्रीडांगणीं कलांच्या हा भेदभाव नाही

मनममोकळेपणे घ्या इथले पिऊन वारे

मुक्तांगणांत या रे . . . . . . . ' ""



गीतांच्या जन्मकाळाशी गुंतलेल्या अशा किती आठवणी . डेक्कन जिमखान्याच्या टेनिस

कोर्टाजवळच्या रस्त्यातून जाताना एका विजेच्या खांबापाशी आलो की आठवते : रात्रीचे

चित्रिकरण आटपून चालत चालत आम्ही दोघे येत होतो . पहाट होत होती . रस्त्यातले

दिवे मालवले . त्या खांबापाशी क्षणभर थांबून माडगूळकर उद््गारले ,

"" विझले रत्नदीप नगरांत !

आता जागे व्हा यदुनाथ . . . ""



लकडी पुलाजवळ जिथे टिळक रोड सुरू होतो तिथेच पंतांचा गोट होता . आता तिथे



पान नं . 149

सिमेंटकॉक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत . त्या पंतांच्या गोटात एका दहा गुणिले दहा

क्षेत्रफळाच्या खोलीत आमचा तळ असे . किती गीतांचा आणि पटकथांचा जन्म त्या खोलीत

झाला आहे हे सांगायला आता ती खोलीही उरली नाही . किती चर्चा , किती नकला किती

गाणीबजावणी , किती थट्टामस्करी . . . वाढत्या वयाबरोबर वारंवार आठवणारी गडकऱ्यांची

एकच ओळ : ` कृष्णाकाठी कुंडल आतां पहिले उरलें नाही . ' साहित्यकलांच्या नव्या निर्मितीत

बेहोश होण्याऱ्यांची तिथे मेफिल जमायची . मला वाटते , यापूर्वी मी कुठेसे म्हटले आहे तेच पुन्हा

म्हणतो : ` स्वरवेल थरथरे फूल उमललें ओठीं . . . ' हे माडगूळकरांच्या गीतांच्या बाबतीत

सर्वार्थांने खरे आहे . जणू काय लक्ष गीतांची उतरंड त्यांच्या मनात विधात्याने त्यांना जन्माला

घालतानाच रचलेली होती . मागणाऱ्याने मागावे आणि एखाद्या फुलमाळ्याने भरल्या

टोपलीतून फूल काढून दिल्यासारखे माडगूळकरांनी अलगद टपोरे गीत काढून द्यावे .



` संसारीं मी केला तुळशीचा मळा ! करदा सावळा पांडुरंग ' आशा ओळींनी सुरूवात होणारा

त्यांचा एक अभंग आहे . माणसाला अचंब्यात टाकणाऱ्या माडगूळकरांच्या प्रतिभेने वास्तविक

आपल्या मळ्यात नाना प्रकारच्या फुलांची बाग फुलवली होती . ही केवळ चतुर कारागिरी

नव्हतीं ; त्यांना नुसतेच एक गीतकार म्हणून कमी लेखणाऱ्यांना नाना प्रकारच्या भाववृतींशी

समसर होणारे माडगूळकर ठाऊक नव्हते . गेल्या जवळजवळ तीन तपांच्या सहवासात मला

अनेक प्रकारचे माडगूळकर पाहायला मिळालेले आहेत . प्रौढांच्या मेळाव्यात बसलेले

माडगूळकर त्यात एखादे पोर आले की एका क्षणात किती देखणा पोरकटपणा करू शकत !

एखाद्या ग्रामीण पटकथेतले संवाद लिहिताना त्यांचा तो माणदेशी शेतकऱ्याचा अवतार

पाहण्यासारखा असे . ते शीघ्रकवी होते तितकेच शीघ्रकोपीही होते . आणि त्या कोपाचा अवसर

उतरल्यावर विलक्षण मवाळही होऊन जात . ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या ओळीवर निरूपण

करताना त्यांच्यातला रसाळ पुराणिक दिसायला लागे ; आणि ` एक पाय तुमच्या गावांत ! दुसरा

तुरूंगांत किंवा स्वर्गात ! तमा नाहि त्याचि शाहिराला . . . ' असा पवाडा स्फुरायला लागला

की अगिनदास - तुळशीदासांच्या वंशाचा दिवा पेटता असल्याची साक्ष पटे . केवळ साहित्यिकां -

साठी साहित्य आणि कवींसाठी कविता लिहिणारा हा कवी नव्हता . कवितेच्या याचकाची

जातकुळी किंवा हेतू न पाहता , गीतदान हा जणू आपला कुलधर्म आहे आणि त्याला आपण

जागलेच पाहिजे अशा भावनेने त्यांनी कविता लिहिल्या .



हा कवी आपल्या व्यक्तिमत्वात भाववृत्तींच्या इंद्रधनुष्याचे किती खेळ खेळवीत जगत

होता . प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळीत असतानाही चटकन कविता , कथा , कादंबरी , पटकथा

अशा नाना प्रकारच्या निर्मितीच्या कार्यात तन्मय होऊन जात होता . त्यांच्या गीतांना चाली

लावण्याचा योग मला लाभला , ते गीत घडत असताना त्यांचे ध्यान पाहत बसणे हा ते गीत

वाचण्याइतकाच आनंदाचा भाग असे . माडगूळकर उत्तम अभिनेते होते . एखादे कडवे

लिहिताना तो भाव सूक्ष्म रूपाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसे . चित्रपटातला प्रसंग सांगितला की

पटकन पहिली ओळ त्यांच्या मुखातून बाहेर पडायची , आणि पेळूतून सूत निघाल्यासारखे

कवितेच्या ओळींचे सूत्र प्रकट व्हायला लागायचे . यमकप्रासांसाठी अडून राहिलेले मी त्यांना

कधी पाहिले नाही . त्यांची गीते गाताना किंवा वाचताना जर मन कुठल्या एका गुणाने थक्क

होत असेल तर त्यांतल्या प्रसादगुणाने . कविह्दयातून रसिकह्दयापर्यंतची कवितेची वाटचाल

कशी सहज पण म्हणून काही ती नुसतीच सुबोध नसे . अनेक प्रतिमांचा सुंदर मिलाफ तीत



पान नं . 150

असायचा ` दूर कुठे राउळांत दरवळतो पूरिया ' असे एक गाणे त्यांनी लिहिले होते . सुरांच्या

शाहिरांचा त्यांना वरदहस्त लाभला होता . माडगूळकर महाराष्ट्रातल्या घराघरातच नव्हे , तर

झोपडीझोपडीत गेले . ती वाट मराठी मुलखात कविप्रतिभेच्या ह्या त्रेगुण्यात्मक शेलीने घडवली होती

यात शंका नाही .



सर्व अंगानी आणि सर्व गुणांनी त्यांनी मराठी भाषा पचवली होती . त्यांच्या गद्य किंवा पद्य

भाषेला अमराठी वळण ठाऊकच नव्हते . ज्या ग्रामीण वातावरणात ते वाढले तिथल्या पारावर

पवाडा असतो , देवळात पंतवाङ्मयाचा विदग्ध स्वरूपातला शब्दश्रीमंतीचा खजिना मोकळा

करीत कथेकरीबुवा येत असतात , आणि जत्रेच्या रात्री कड्या - ढोलकीच्या साथीत पायांतल्या

घुंगरांशी स्पर्धा करीत श्रृंगारिक शब्दांचेही ता थे तक्् थे चाललेले असते . सुगीच्या दिवसांत

पाखरांच्या थव्यांबरोबर लोकगीते गाणारे भटके कलावंतही भाषेचा एक न्यारा रांगडेपणा

घेऊन येत असतात . सारे गाव ह्या संस्कारांत वाढत असते . माडगूळकरांच्या बालपणी हा

असर अधिक होता . पण तो रस साठवणारे पात्र सर्वांच्याच अंतःकरणात नसते . जीवनातल्या

अनेक अंगांचे नाना प्रकारांनी दर्शन घडवणाऱ्या संत - पंत - शाहीर - लोककलावंत असणाऱ्या

गुरूजींनी ह्या देशात शतकानुशतके ही खुली विद्यापीठे चालवली आहेत . मात्र त्या

विद्यापीठांना माडगूळकरांसारखा एखादाच त्या परंपरेला अधिक समृध्द करणारा विद्यार्थी

लाभतो . आपल्या गीतांना त्यांनी आपल्या आईच्या ओव्यांची दुहिता म्हटले आहे . ह्या ` आई '

शब्दात ग्यानोबा - तुकोबा ही माउलीपदाला पोचलेली मराठी संतमंडळी आहेत इतकेच नव्हे ,

तर ` तुलसी - मीरा - सूर - कबीर ' ही आहेत . म्हणूनच त्यांच्या कवितेतला प्रसाद सर्वांच्यपर्यंत

पोचतो आणि तिचे नाते मानवतेच्या प्रेमाने ओथंबलेल्या प्राचीन आणि सुंदर परंपरांशी

जुळताना आढळते . हे केवळ त्यांच्या अभंग किंवा भक्तिपर रचनेतच होते असे नाही . एका

चित्रपटात त्यांनी एक धनगरी गीत लिहिले आहे :



"" आसुसली माती

पिकवाया मोती

आभाळाच्या हत्ति आता

पाऊस पाड गा

पाऊस पा ड ""



ही कविता लिहून झाली त्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो होतो . सुधीर फडक्यांनी त्या

गीताला सुंदर चाल दिली आहे . "" ध्येसपांडेगुर्जी , ऐका . . . "" म्हणून त्यांनी ते गाणे वाचायला

सुरूवात केली . सुरांचा संबंध नव्हता . छंदातच वाचन चालले होते . आवेश मात्र धनगराचा .

अशा वेळी त्यांच्यातल्या त्या अभिनयगुणाचे आश्यर्य वाटायचे . क्षणार्धात त्या कवितेतल्या

धनगरांतले ते धनगर होऊन गेले . त्या गाण्यातल्या ` पाऊस पाड गा ' मधले ` गा ' हे संबोधन

ऐकल्यावर ` गा ' , ` वा ' , ह्या साऱ्या संबोधनांतले मऱ्हाटीपण डोळ्यांपुढे नाचायला लागले .

त्या एका नेमक्या ठिकाणी पडलेल्या ` गा ' मुळे ` एकनाथ - धाम ' नावाच्या प्रभात रस्त्यावरच्या

घरातली ती चिमुकली खोली माणदोशातला उजाड माळ होऊ नगेली . योग्य ठिकाणी पडलेल्या

नेमक्या शब्दाला मंत्रसामर्थ्य प्राप्त होत असते . मर्ढेकरांच्या ` फलाटदादा ' तल्या ` सांगा वे तुमि



पान नं . 151

फलटदादा ' मधल्या ` वो ' ने जसे त्या रेल्वेच्या फलाटाला मुंडासे बांधून खांद्यावर कांबळे टाकून

उभे केले , तेच ह्या ` गा ' ने केले होते . भाषेचे प्रभुत्व हे शब्दसंग्रहावरून किंवा शब्दांचे नुसतेच

खुळखुळे वाजवण्याच्या करामतीतून जोखायचे नसते . मुळचाचि खरा असणारा झरा हा असा

एखाद्या चिमुकल्या शब्दाने अवचित भेटत असतो .



गीतभावनेशी तादात्म्य पावण्याच्या त्यांच्यामधल्या गुणांच्या असंख्य खुणा त्यांच्या

गीतांतून आढळतात . शब्दयोजनेतले त्यांचे अवधान सुटत नाही . अशी शेकडो गीते त्यांनी

रचली . चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिल्यामुळे आमच्या ` आर्डरी ' ही विचित्र असायच्या

` आर्डरी ' हा त्यांचाच शब्द . कधीकधी चाल सुचलेली असायची .



"" स्वामी , असं वळण हवं . ""



"" फूल्देस्पांडे , तुम्ही बाजा वाजवीत राहावे . ""



मित्रांच्या नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा . मग मधुकर

कुळकर्ण्याला ` पेटीस्वारी ' , राम गबालेला ` रॅम्् ग्लाबल , ' वामनराव कुळकर्ण्यांना ` रावराव ' . .

कुणाला काय , कुणाला काय असे नाव मिळायचे . चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन

त्या चालीचे वजन त्यांच्या ध्यानात येई . मग त्या तालावर झुलायला सुरूवात . बेठकीवर

उगीचच लोळपाटणे , पोटाशी गिरदी धरून त्याच्यावर चिमट्यात अडकवलेल्या कागदाचे

फळकूट पुढ्यात ठेवून सुपारी कातरायला सुरूवात . मग आडकित्याची चिपळी करून

ताल . . . नाना तऱ्हा . एखाद्या अचानक तिथे आलेल्या नवख्याला वाटावे , इथे गीत

आकाराला येते आहे , की नुसताच पोरकटपणा चाललाय ! एखादे दांडगे मूल पाहावे तसे

वाटत असे . त्यांच्यातला नकलावर जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा . खरे तर

मानमरातबाची सारी महावस्त्रे फेकून शेशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे . ह्या

स्वभावगत मूलपणाने त्यांना खूप तारलेले होते . प्रापंचिक जबाबदाऱ्या फार लवकर त्यांच्या

अंगावर पडल्यामुळे विशीतच फार मोठे प्रौढपण त्यांच्यावर लादले गेले होते , त्यातून ही

मूलपणाकडची धाव असायची की काय , ते आता कोणी सांगावे ?



गडकरी गेले त्या वेळी रसिक महाराष्ट्र असाच सुन्न झाला होता म्हणतात . माडगूळकरांना

गडकऱ्यांविषयी अतोनात प्रेम . आम्ही जोडीने केलेल्या प्रवासात गडकऱ्यांच्या कलितांचेच

नव्हे तर , नाटकांतील उताऱ्यांचे पठण हा आमचा आवडता छंद असायचा . हरिभाऊ आपटे ,

नव्हे , तर नाथमाधव , गडकरी , बालकवी , केशवसुत , फडके , खांदेकर , अत्रे ह्या आधुनिक काळातल्या

साहित्यकारांते मार्ग पुसेतु आम्ही ह्या साहित्यांच्या प्रांतात आलो . मी मुंबईत वाढलो आणि

माडकूळकर माडगुळ्यात वाढले , तरी आमच्या साहित्यप्रेमाचे पोषण एकाच पध्दतीने चाललेले

होते . गडकऱ्यांच्या निधनानंतर वर्षभराच्या आतच आमचा जन्म , माडगूळकर माझ्यापेक्षा

फक्त एक महिन्याने मोठे . बालपणातले आमचे इतर वातावरण मात्र निराळे होते . ` त्या तिथे ,

पलिकडे , तिकडे , माझिया प्रियेचे झोपंडे ' ही कविता प्रथम त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मी

म्हणालो होतो , "" महाकवि , तुम्ही लकी ! ( माडगूळकर मात्र स्वतःला ` महाकाय कवी ' म्हणत . )

तुमच्या प्रियेच्या झोपड्याकडे वळताना त्या वळणावर आंब्याचं वाकडं झाड होतं . आम्ही

वाढलो त्या वातावरणातल्या वळणावर जळाऊ लाकडांची वखार ! ""



पण सुदेवाने मी मुंबईत वाढूनही तसा मुंबईकर नव्हतो . शाळकरी वयातल्या माझ्या खूप

सुट्या कोल्हापुराजवळच्याच एका खेड्यात माझ्या आत्याच्या गावी मी घालवल्या . शिवाय



पान नं . 152

माझ्या लहानपणीचे पार्लेही एक खेडेवजाच गाव होते . माझ्या घराच्या मागल्या बाजूला

पावसाळ्यात भातशेती चालायची . ज्याला हल्ली ` प्लॉट््स ' म्हणतात ती सारी भाताची खाचरे

किंवा दोडक्यांचे , पडवळांचे आणि काकड्यांचे मळे होते . फर्लांगभर अंतरावरच्या विहिरीवर

मोट चालायची . आजच्यासारखे चारी बांजूना सिंमेट - कॉक्रीटचे जंगल उभे राहिले नव्हते .

आमच्या शनिवार - रविवारच्या सुट्या आंब्याच्या मोसमात बागवानांच्या नजरा चुकवून केऱ्या

पाडणे , गाभळलेल्या चिंचाच्या शोधात भटकणे , घरामागल्या आज भुईसपाट झालेल्या

टेकडीवर काजू तोडायला जाणे , विहिरीत मनसोक्त पोहणे , असल्या मुंबईकर मुलांच्या

नशिबात नसलेल्या गावंढ्या उद्योगांतच जायच्या . पण आपल्याला आमचे म्हणून

सांगण्यासारखे खेडे नाही याची मात्र मनाला खूप खंत वाटे .



पण मुंबईकर असूनही आमचे कुटुंब तसे घाटीच होते . त्यामुळे माडगूळकरांच्या ग्रामीण

प्रकृतीने मला चटकन आपलेसे करून टाकले . कोल्हापूर भागातली ग्रामीण बोली फार बाळ -

पणापासून माझ्या जिभेवर चढली आहे . एवढेच नव्हे , एकूणच बोलीभाषांतल्या गोडव्याचा

मी आजही भक्त आहे . आजही माणसे वऱ्हाडी , सातारी वगेरे भाषांत बोलत असली तर गाणे

ऐकल्यासारखे मी त्यांचे बोलणे ऐकतो . किंबहुना अडाणीपणा दाखवण्यासाठी त्या बोलीचा

उपयोग केलेला मला रूचत नाही . कोकणी बोलणाऱ्यांशी मी कोकणीतच बोलतो . ह्या बोलींना

लेखीच्या कृत्रिम बंधनात जखडू नये , श्वासाश्वासातूनच त्यांचा व्यवहार चालावा , असे मला

वाटते . माडगूळकरांना केवळ सातारी - कोल्हापुरीच नव्हे , तर त्या भागातल्या निरनिराळ्या

बोलींतल्या सूक्ष्म छटाही अवगत होत्या . शब्दांचे रंगढंग ते क्षणात कंठगत करीत . एक काळ

असा होता की तासन््तास आमचे संभाषण सातारी बोलीतच चाले . कधी कोकणी ढंगात . प्रथम

ज्या बोलीतून सुरूवात व्हायची त्याच बोलीत संवाद चालू .



"" कवा आलायसा म्हमयस्नं ? "" म्हटले की , "" येरवाळीच आलु न्हवं का रातच्या

पाशिंदरनं . ""



"" काय च्या ह्ये जहालं का न्हाई ? "" ह्या थाटात फाजिलपणा सुरू .



` पुढचं पाऊल ' चित्रपटाच्या वेळी आम्ही संवाद लिहित होतो . माडगूळकरांनी एक पार्ट

घ्यायचा , मी दुसरा , प्रभाकर मुझुमदार संवाद टिपून घ्यायचा . आम्ही दोघेही नकलावर

असल्यामुळे सोंगे वठवायला वेळच लागत नसे . त्या चित्रपटाचे शूटिंग हा तर दोनअडीच

महिने त्या स्टुडिओत चाललेला सांस्कृतिक महोत्सवच होता . प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी

आयत्यावेळचे इतके संवाद बोलले जायचे , की शेवटी रेकॉर्डिस्ट शंकरराव दामले म्हणायचे ,

"" रिहर्सलच्या वेळी बोललेलंच येणार आहे की शेवटी गाववाले ? "" त्या वेळी ` काय गाववाले '

हे कुणीही कुणालाही हाक मारण्याचे सार्वजनिक संबोधन होते . गेल्या कित्येक वर्षांत मी

चित्रपटांच्या स्टुडिओत गेलो नाही . ते गाव एके दिवशी सोडले ते सोडलेच . त्यानंतर त्या

दिशेने अनेक आमंत्रणे आली . - पण नाही जावेसे वाटले . आता तिथे काय आहे , मला ठाऊक

नाही . पण पंचवीसेक वर्षांपूर्वी पुण्यातल्या ` प्रभात ' , ` नवयुग ' , ` डेक्कन ' वगेरे स्टुडिओत

चित्रपटनिर्मिती होत होती त्या वेळी स्टूडिओ हे जणी साहित्या - संगीत कलांचे मीलनक्षेत्र होते .



मी आणि माडगूळकर ज्या काळी पुण्यात आलो तो काळ ह्या क्षेत्रात आर्थिक दृष्टीने

मुळीच लाभदायक नव्हता . ` प्रभात ' चा संसार कोलमडला होता . ` नवयुग ' स्टुडिओचेही तेच .

पलीकडे ` डेक्कन ' स्टुडिओ होता . आता त्या ठिकाणी तेलाच्या गिरण्या वगेरे आल्या आहेत .



पान नं . 153

पेशाच्या दृष्टीने ते दिवस ओढगस्तीतेच . निर्मातेमंडळीत तर चित्रपट म्हणजे कलानिर्मितीचे

क्षेत्र मानून धडपडणाऱ्या आमच्यासारख्या येडपटांना पेशात बनवायची चढाओढच लागलेली

होती . दिवसावारी येणाऱ्या एक्स्ट्रांपासून ते लेखक , संगीतदिग्दर्शक , नट वगेरेंना ` बुडपणे ' हा

मुळी नियमच होता . ठरलेले पेसे देणे हा अपवाद . इतके असूनही त्या स्टुडिओची ओढ

जबरदस्त . प्रसिध्दीच्या झगमगाटापेक्षा तिथले वातावरण अधिक आकर्षक असायचे . शिवाय

मराठी चित्रपटात प्रसिध्दीचा तरी कसला कर्माचा झगमगाट ! एक रंगीत पोस्टर करायचे

म्हणजे निर्मात्याने त्यापूर्वी ज्याचे पेसे बुडवले नसतील असा होतकरू पेंटर पकडून त्याला

चान्स द्यायचा ! पण माडगूळकरांच्या सहवासातल्या तिथल्या मेफिलीत लाभणाऱ्या आनंदाला

तोंड नव्हती . मला तर नेहमी वाटते की , माडगूळकरांच्या तोंडून चित्रपटकथा ऐकताना

होणारा आनंद ती पडद्यावर पाहताना मिळाला असे क्वचितच घडले . नाना प्रकारच्या

अनुभवांच्या पुड्या तिथे सोडल्या जायच्या . वादविवाद रंगायचे . नव्या कवितांचे वाचन

चालायचे . सिनेमावाले असलो तरी मनांची पाळेमुळे साहित्यात , अभिजात संगीतात , उत्तम

नाटकांत रूजलेली . तशी सगळीच हुन्नरी मंडळी . आजही डोळ्यांपुढे त्या मेफिली उभ्या

राहतात . राजाभाऊ परांजपे , राम गबाले , वसंत सबनीस , ऑफिसला मारलेली टांग सायकली -

वर टाकून आलेले वसंतराव देशंपाडे , हळूच एखादी कोटी करून आपण त्यातला नव्हेच असा

चेहरा करून बसलेले बाळ चितळे , अप्पा काळे , ग . रा . कामत , गोविंदराव घाणेकर , सुधीर

फडके , बहुगुणी वसंत पवार , अस्सल कोल्हापूरी साज भाषेला चढवून बोलणारे वामनराव

कुलकर्णी , गुपचूप बोलल्यासारखे बोलणारे विष्णुपंत चव्हाण , सातमजली हसणारे काका

मोडक , खास ठेवणीतून टाकल्यासारखे एखादेच मार्मिक वाक्य टोकणारे शंकरराव दामले ,

कथेतल्या कच्च्या दुव्यावर नेमके बोट ठेवणारे राजा ठाकूर . . . .



पुण्यातला चित्रपटव्यवसाय विसकटला . काहींना काळाने ओढून नेले . माणसे पांगली

कायमची हरवली . मेफिली संपल्या . आता तर त्या मेफिलींचा बादशहाच गेला . त्या मेफिलींची

ओढ विलक्षण होती . एक तर आमच्या दरिद्री स्टुडिओतली कॅमेऱ्यापासून ते रेकॉर्डिंग

मशिनपर्यंतची सारी यंत्रसामुग्री चालण्यापेक्षा मोडून पडण्याचच अधिक तत्पर . अशा वेळी सारे

स्थिरस्थावर होईपर्यंत करायचे काय ? अपरात्र झालेली असायची . दरिद्री स्टुडिओचा

दरिद्री कँटीन . तिथून येणारा चहा ही जास्तीत जास्त चेन . पण मेफिलीचा रंग असा गहिरा ,

कडूगोड अनुभवांच्या पोतड्या तुडुंब भरलेल्या . माडगूळकरांनी गावाकडल्या गोष्टी सुरू

कराव्या आणि मेफिलीने त्या अवाक होऊन गोष्टी ऐकाव्या . असेच एकदा ते औंध संस्थानातल्या

गरीब विद्यार्थ्यांच्या छात्रालयातल्या गोष्टी सांगत होते . घटकेत मुलांची बौध्दिक आणि

शारीरिक सुदृढता तपासणारे , त्यांच्या हिताची काळजी करणारे औंधकरमहाराज त्यांनी

डोळ्यांपुढे उभे केले होते .



माडगूळकरांचे माडगूळ्याइतकेच औंधावर प्रेम . त्या चिमूटभर संस्थानात विद्यार्थिदशे -

तल्या माडगूळकरांना फार मोठा सांस्कृतिक धनलाभ झाला होता . तिथे नुसतेच अन्नछत्र

नव्हते ; ज्ञानछत्रही होते . फार मोठ्या अंतःकरणाच्या , त्या वरपांगी करड्या वाटणाऱ्या

राजाच्या हाताची दणकट थाप त्यांच्या पाठीवर पडली होती . ती ऊब त्यांनी आयुष्यभर

जिवापाड जपली होती . किंबहुना सिनेमात नशीब काढायला माडगूळकर आले त्या वेळी



पान नं . 154

त्यांना ` औंझकर ' असेच म्हणत . बेचाळिसच्या सुमाराला त्यांची - माझी पहिली भेट झाली त्या

वेळी औंधकराचे माडगूळकर झाले होते . ` नाट्यनिकेतना ' त वल्लेमामा म्हणून तबलजी होते .

त्यांचे वास्तव्य कोल्हापुरात असे . मी आणि माडगूळकर फिरायला चाललो असताना वाटेत

एकदा वल्लेमामा भेटले . त्यांनी माडगूळकरांना "" कसं काय औधंकर ? "" म्दटल्यावर मी

जरासा चपापलोच . मग मलामाडगूळकरांनी ` औंधकर ' नावाची कथा सांगितली .



औंधकर - काळातले त्यांचे चित्रपटसृष्टीतले अनुभव त्यांनी लिहिले आहेत . काही व्यक्तींचे

आणि स्थळांचे स्मरण त्यांना चटकन भूतकाळात घेऊन जाई . मात्र त्या प्रतिकूल काळाचे

त्यांनी चुकूनसुध्दा गहिवर काढून भांडवल केले नाही . साऱ्या कडू अनुभवांना त्यांनी थट्टेत

घोळून टाकले , आणि वेळोवेळी स्नेहाचा हात पुढे केलेल्या लोकांचे स्मरणही ठेवले . एक मात्र

खरे की , गरिबीच्या काळात भोगाव्या लागलेल्या गोष्टींचा त्यांच्या मनावर कुठेही ओरखडा

होता . ज्या वयात जे लाभायला हवे होते ते न लाभलेल्यांना नंतर कितीही ऐश्वर्य लाभले तरी

कसलेतरी अबोध औदासीन्य मनावर मळभ आणीत असते .



सगळ्याच चांगल्या कलावंतांत किंवा भारतीय विचारवंतांतही कलेच्या आणि

व्यवहाराच्या क्षेत्रांत व्यवहारिक पातळीवरून सर्व तऱ्हेच्या धडपडी , नाना प्रकारच्या

तडजोडी करताना मनाच्या खोल कप्प्यात एक विरक्त दडलेला असतो असे मला वाटते .

माडगूळकरही याला अपवाद नव्हते . कधीकाळी बाळझोपेतून जागे होताना कानांवर पडलेली

एकतारी त्यांच्या मनात सतत वाजत होती . ते काही कुणी षड्रिपू जिंकलेले किंवा सहजपणाने

` मी ' पण गळलेले संत नव्हते . प्रतिभावंत होते . सर्वस्वी मुक्त असा कोणीही नसतो .

माडगूळकांनाही रागलोभद्वेषमत्सर सर्व काही होते . फक्त कुठला रिपू कुठल्या जोमाने उभा

आहे हेच माणसाच्या स्वभावाचे लक्षण शोधताना पाहायचे असते . रामदासांसारखा समर्थ

माणूसदेखील ` अचपळ मन माझें नावरे आवरीतां ' असे असहायपणाने म्हणतो . तुकोबाही

` काय करूं मन अनावर ' म्हणताना भेटतात . पण हे सारे असूनही माणसात एक ` अंतर्यामी '

म्हणून असतोच . माडगूळकरांच्या आणि माझ्या सहवासात आम्ही ऐन उमेदीच्या आणि

हौसेच्या काळात अविदितगतयामा अशा रात्री घालवल्या आहेत . मनाच्या खोल अज्ञात

घळीतल्या अंतर्यामी अशा वेळी बोलत असतो . हा खरे तर आपुला संवाद आपणासी असाच

असतो . त्या संवादातून माडगूळकरांचा एकतारी सूर प्रकट व्हायचा . कदाचित ती खुंटी

पिळणारे हात ज्ञानदेव - एकनाथ - तुकोरामांचे असतील . कुणी त्या क्षणांना तो त्या वेळचा त्यांचा

` मूड ' असेल असेही म्हणून विश्लेषण केल्याचे समाधान मानील . काही का असेना , त्या

` मूड ' मझले माडगूळकरांचे दर्शन खूप परिणामकारक असे .

"" श्रीधर कविचे नजिक नाझरें नदी माणगंगा !

नित्य नांदते खेंडे माझें धरूनि संतगंगा ! ! ""

अशी त्यांची एक कविता आहे . माडगूळकरांचे खेडे संतसंगाला धरून नांदत असायचे की

नाही याला महत्व नाही : माडगूळकरांच्या मनात मात्र संतसंगाला धरून नांदणारा गाव वसला

होता यात शंका नाही . श्रीधर कवीचे त्यांच्या मनात कायमचे अधिष्ठान होते . माणगंगेच्या

तीरी आपला जन्म होण्यात काही योगायोगा असावा , असेही त्यांच्या भाविक वृत्तीला वाटत

असावे . त्यामुळे व्यावहारिक जगात वावणाऱ्या माडगूळकरांची आणि श्रीधर कवीला संगे

` मूड ' मधले माडगूळकरांचे दर्शन खूप परिणामकारक असे .



` श्रीधर कविचें नजिक नदी माणगंगा !

नित्य मांदते खेडें माझे धरूनि संतगंगा ! ! ""



अशीं त्यांची एक कविता आहे . माडगूळरांचे खेडे संतसंगाला धरून नांदत असायेच की

नाही याला महत्व नाही ; माडगूळकरांचे मनात मात्र संतसंगाला धरून नांदणारा गाव वसला

होता यात शंका नाही . ह्या श्रीधर कवीचे त्यांच्या मनात कायमचे अधिष्ठान होते . माणगंगेच्या

तीरी आपला जन्म होण्यात काही योगायोग असावा , असेही त्यांच्या भाविक वृत्तीला वाटत

असावे . त्यामुळे व्यवहारिक जगात वागणाऱ्या माडगूळकरांची आणि श्रीधर कवीला संगे



पान नं . 155

घेऊन वागणाऱ्या माडगूळकांची रस्सीखेचही चाललेली दिसायची . जीवनातल्या श्रेयस आणि

प्रेयस वृत्तींचा हा सनातन झगडा आहे . ह्या रस्सीखेचीतमाणूस कधी प्रेयसाच्या किंवा ऐहिक

लाभाच्या दिशेला ओढला गेला तर त्याला तेवढ्यासाठी बाद ठरवण्याची गरज नाही . माणूस

संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे . पण निर्मितिक्षम कलावंताचे अंतर्मन सतत

कुठे ओढ घेत असते ते त्याच्या कलाकृतीतून प्रकट झाल्यावाचून राहत नाही . कलावंताच्या

निर्मितीची त्याच्या व्यवहारिक आचरणाशी नेहमीच सांगड घालता येत नाही . खरे तर ती

घालण्याचा प्रयत्नही करू नये . कवितेत तारूण्यसुलभ भावनांचा रसरसीत अविष्कार

करणाऱ्या माडगूळकरांना अकाली पोक्तपणा आला होता , नव्हे , परिस्थितीने तो त्यांच्यावर

लादला होता .



चित्रपटाशी माझा संबंध तुटला . भेटीगाठींमध्ये महिन्यामहिन्याचे अंतर पडू लागले . मात्र

` फार दिवस झाले , माडगूळकरांची गाठ पडली नाही . एकदा भेटायला हवं , ' असे सतत

वाटायचे . आणि मग गाठ पडली की मधला न भेटण्याचा काळ हा काठी मारल्यामुळे वेगळ्या

झालेल्या पाण्यासारखा वाटायचा . असाच एकदा खूप दिवसांच्या अंतरानंतर त्यांच्या घरी

गेलो होतो माडगूळकरांच्या मातुःश्रींना ओळख लागली नाही . मग अण्णांनी त्यांना ओळख

पटवून दिली . आई म्हणाल्या , "" हे काय बरं ? अधूनमधून दिसत असावं बाबा ! "" त्यांचे ते

` दिसतं असावं ' मनाला एकदम स्पर्श करून गेले . जिथे या ना त्या कारणाने ऋणानुबंध जुळलेले

असतात तिथे नुसते ` असणे ' याला महत्व नसते ; अशा माणसांनी एकमेकांना ` दिसत

असायला ' हवे . अशा अहेतुक दिसण्याला माणसामाणसांच्या संबंधात फार महत्व असते .

आपली माणसे ` आहेत ' एवढेच गृहित धरून चालत नाही . काळ त्यांना ` न दिसणारी ' केव्हा

करून टाकील ते सांगता येत नाही !



पुन्हा कधीही न दिसण्याच्या महायात्रेला माडगूळकर असे चटकन निघून जातील असा

स्वप्नात , सुध्दा विचार आला नव्हता . चारपाच दिवसांपूर्वीच ह्या आनंदवनातल्या वृक्षारोपणा -

साठी ` कोवळ्या रोपट्या आज तूं पाहुणा ' ह्या त्यांनी लिहिलेल्या गाण्याची चाल मी त्यांना

फोनवरून ऐकवली होती . "" तिथं जायला हवं . "" असे त्यांनी म्हटल्यावर "" चलता का ? बरोबर

जाऊ या "" असे मी त्यांना म्हणालो होतो . बरोबर कुठले जाणे ? ते गाणे बरोबर घेऊन जाताना

त्या संध्याकाळी दर्शन घडले ते चिरनिद्रित माडगूळकरांचे .



चौतीसएक वर्षापूर्वींची अशीच एक संध्याकाळ . ह्याच पुण्यात ` भानुविलास ' हे नाटकाचे

थिएटर असताना आवारात एक लहानसे औटहाऊस होते . ` युध्दाच्या सावल्या ' हे

माडगूळकरांचे नाटक चिंतामणराव कोल्हटकरांनी बसवले होते . त्या औटहाऊसमध्येच

चिंतामणरावांनी माझी आणि माडगूळकरांची गाठ घालून दिली होती . त्याच्या कितीतरी वर्षे

आधी कोल्हापुरातल्या सोळंकुरमास्तरांच्या ` यशवंत संगीत विद्यालया ' त शाळकरी वयाच्या

विद्याबाईकडून ` वद यमुने कुठे असे घनश्याम माझा ' हे गाणे ऐकताना प्रथम माडगूळकर हे

नाव ऐकले होते . त्यानंतर ` ललकारी राया माझा गे मोटेवरी ' , ` नको बघूस येड्यावाणी ग ,

तुझ्या डोळ्यांचं न्यारं पानी ' अशी कितीतरी त्यांची गाणी पुरूषोत्तम सोळंकुरकरांकडून मी

शिकलो होतो . ` भानुविलास , ' मधल्या त्या औटहाऊसमध्ये आम्ही प्रथम भेटलो तेच जुन्या

ओळखीचे मित्र भेटल्यासारखे . पुण्यातल्या अनोळखी रस्त्यांतून हिंडत हिंडत आमच्या गप्पा

चालल्या होत्या . मेफिल सुरू झाली होती - ती गेली इतकी वर्षे चालूच होती . ` पहिल्या





पान नं . 156

पाळण्या ' तला त्यांचा बापाचा अभिनय पाहून माडगूळकर हे कुणीतरी साठीतले गृहस्थ

असावेत असा समज झाला होता . ` ब्रम्हचारी ' त तर त्यांनी लहानसहान कितीतरी भूमिका

केलेल्या आहेत . अनेक वर्षांनी पुन्हा ` ब्रम्हचारी ' पाहताना त्यात निरनिराळ्या सोगांत सजलेले

माडगूळकर शोधून काढीत होतो . . . त्यानंतरच्या काळात आमच्या किती मेफिली रंगल्या

त्याचा हिशेब नाही . जीवनात वाट्याला येणाऱ्या मळ्यांच्या आणि माळांच्या वाटा कितीतरी

वर्षे जोडीने तुडवल्या . कधी दूरदूरच्या बांधांवरून हाका देत तुडवल्या . आता सारे संपले .

आता उरले माडगूळकर नसलेल्या जगात जगणे . त्यांच्याविषयी भूतकालवाचक क्रियापदात

बोलणे . ज्या ओळींनी अंगावर आनंदाचे रोमांच उभे केले त्या ओळीच्या स्मरणाने व्याकुळ

होणे . ज्या थट्टाविनोदांनी पोट धरधरून हसलो त्यांच्या आठवणींनी फुटणाऱ्या हसण्याला

शोकाची चौकट येणे .



आमच्यांत कित्येक बाबतीत मतभिन्नता होती . सुरूवातीच्या काळात कॉलेजचे शिक्षण

झालेल्या स्त्रीपुरूषांच्या एकत्र मेळाव्यात वागताना ते काहीसे परकेपणाने वागत . अशा

समुदायाविषयी त्यांचे काही प्रतिकूल पूर्वग्रह असत . मग त्यांचा धाकटा भाऊ अंबादास याच्या

कॉलेजमधल्या मित्रांबरोबर येणाऱ्या मेत्रिणीही त्यांचा वडीलभावासारखा सहजपणाने मान

राखू लागलेल्या पाहिल्यावर त्यांच्या मतात खूप फरक पडला होता . त्यांची मुले - मुली कॉलेजात

जाऊ लागली . कॉलेजची पायरी न चढलेल्या माडगूळकरांना कॉलेजच्या संमेलनाला अध्यक्ष

होण्याची आग्रहाची निमंत्रणे येऊ लागली . मर्ढेकरांच्या कविता प्रथम प्रसिध्द झाल्या होत्या ,

त्या काळातही त्या कवितेविषयी आमचे खूप वादविवाद व्हायचे . खुद्द मर्ढेकरांनी त्यांची

` जत्रेच्या रात्री ' ही कविता वाचल्यावर त्यांचे मनापासून कौतुक केले होते . पण माणसा -

माणसांच्या जीवनातल्या तारा मतभिन्नतेला ओलांडून जुळून येणाऱ्या असतात . हा नेमका

काय चमत्कार असतो हे कविकुलगुरूंनाही उमगले नाही . म्हणून तर त्या जुळण्यामागल्या

अंतरीच्या हेतूला ` को पि ' म्हणजे ` कसलासा हेतू ' म्हणून त्यांनी हात टेकले . असल्या ह्या

सौहार्दाने जुळलेले आमचे धागे . त्यांत केवळ माडगूळकरांच्या कविताप्रतिभेचे आकर्षण

नव्हते . आणखीही खूप काही होते . नित्य भेटीच्या आवश्यकतेच्या पलिकडले .



महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत . इतर

काहीही देणाऱ्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणाऱ्या माणसाचे उपकार फार मोठे असतात .

` Song has the lognest life ' अशी एक म्हण आहे . एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या

बांधून ठेवते . एवढेच कशाला ? माणसाच्या मनाचे लहानमोठे , रागद्वेष घटकेत घालवून

टाकण्याचे गाण्याइतके दुसऱ्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते . हजारो माणसे एक गाणे जेव्हा

आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते . एक विशाल ह्दय ते गाणे

गात असते . माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली . चित्रपटांना दिली ,

तमाशाच्या फडात , देवळात , शाळेत , तरूणांच्या मेळाव्यात , माजघरात , देवघरात ,

शेतामळ्यांत , विद्वज्जनपरिषदेत . . . त्यांच्या गाण्यांचा संचार नाही कुठे ? माडगूळकरांचे

चिरंजीवित्व त्यांच्या गाण्यांनी सिध्दच झाले आहे .



व्यक्तिशः मला तर माडगूळकरांचे स्मरण करणे म्हणजे माझ्या पंचविशिपासून ते आता

साठीकडे वळलेल्या माझ्याच आयुष्याकडे पुन्हा वळून पाहण्यासारखे वाटते . आम्ही काम

केलेला एकादा जुना चित्रपटच पुन्हा पाहण्यासारखे त्यातली माडगूळकरांची भूमिका आणखी



पान नं . 157

खूप पाहायला मिळणार अशी आशा होती . कवितेच्या त्या जिंवत झऱ्यातून अजून कितीतरी

ओंजळी भरभरून प्यायला मिळणार आहेत अशी खात्री होती . प्राणान्तिक संकटातून ते वाचले

होते . इडापीडा टळली असा भाबड्या मनाला धीर होता . आणि अचानक चित्रपटगृहातल्या

अंधारात ती बाहेर पडायच्या दरवाजावरची ` एक्झिट ' ची लाल अक्षरे पेटावी , आणि ` म्हणजे ?

एवढ्यात संपला चित्रपट ? ' असे म्हणता म्हणता ` समाप्त ' अशी प़डद्यावर पाटी यावी , असेच

काहीसे घडले . त्या अज्ञात ऑपरेटरने कुणाच्या जीवनकथेची ` समाप्त ' ही अक्षरे कुठल्या

रिळाच्या शेवटी लिहिली आहेत हे कुणाला कळले आहे ?



मी चित्रपटव्यवसाय सोडून बेळगावला गेल्यावर माडगूळकर मला म्हणाले होते , "" मित्रा ,

अशी मेफिल अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे . ""



आम्ही आता काय म्हणावे ? आणि कुणाला म्हणावे ?



पान नं . 173 शब्द : - 5127

00EF400EF400EF700EF4स्थानबध्द वुडहाऊस

00EF400EF8स्थानबध्द वुडहाऊस



16 फेब्रुवारी 1975 . च्या सकाळच्या गाडीने पुण्याहून मुंबईला जायला निघालो होतो .

वर्षानुवर्षे वुडहाऊस हा माझा प्रवासातला सोबती आहे . त्याची पुस्तके शिळी व्हायलाच तयार

नाहीत . माझ्या प्रवासी बॅगेत इतर कोणतीही पुस्तके असली तरी वुडहाऊस हवाच . तसा

घेतला . तेवढ्यात दाराच्या फटीतून ` सकाळ ` सरकला . पहिल्या पानावर वुडहाऊसच्या

निधनाची बातमी . एका हातात कधीही न मरणारा वुडहाऊस आणि दुसऱ्या हाता

याण्णवाव्या वर्षी वुडहाऊस मरण पावल्याची बातमी सांगणारा ` सकाळ . ' त्या क्षणी मला

वुडहाऊसच्या एका उद्गाराची आठवण झाली . ` लेओनारा ' ही त्याची अत्यंत लाडकी

एकुलती एक मुलगी वारल्याची बातमी ऐकल्यावर त्रेस्ष्ट वर्षांचा वुडहाऊस उद्गारला होता ,

"" आय थॉट शी वॉज्् इम्मॉर्टल . "" आपली लाडकी लेओनारा आणि तिचा मृत्यून ह्या दोन घटना ,

वुडहाऊच्या स्वप्नातही कधी एकत्र आल्या नव्हत्या . ` मला वाटलं होतं की ती अमर आहे '

ह्या एवढ्या उद्गारात जगात अपत्यवियोगाच्या वेदना भोगाव्या लागलेल्या आईबापांच्या

मनावर बसणाऱ्या पहिल्या निर्घृण घावाला एखाद्या शोक - सूत्रासारखी वाचा फुटली आहे .

वुडहाऊच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर जगातल्या त्याच्या लक्षावधी वाचकांनीही हेच

म्हटले असेल की , ` अरे , आम्हांला लाटलं होतं की तो अमर आहे . ! '



वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर लिहिलेल्या त्याच्या कादंबरीतही वाचकाला खळाळून

हसवायचे तेच सामर्थ्य होते . वुडहाऊसने लिहीत जायचे आणि वाचकांनी हसत हसत

वाचायचे ही थोडीथोडकी नव्हे , सत्तरएक वर्षांची परंपरा होती . त्याच्या लिखानात लेखकाच्या

वाढत्या वयाचा जरासाही संशय यावा असी ओळ नव्हती . कुठे थकवा नव्हता . सत्तरएक

वर्षापूर्वी मांडलेला दंगा चालू होता . वुडहाऊस नसलेल्या जगातही आपल्याला रहावे लागणार

आहे हा विचारच कुणाला शिवत नव्हता .



पेल्हम ग्रेनव्हिल वुडहाऊस नावाचा 15 ऑक्टोबर 1881 रोजी जन्माला आलेला हा

इंग्रज आपल्या लिखानाचा बाज यत्किंचितही न बदलता रोज आपल्या टेबलापाशी बसून कथा -

कादंबऱ्या लिहित होता . पेल्हम ग्रेनव्हिल हे त्याचे नाव जरासे आडवळणीच होते . त्यामुळे

त्याचे आडनावच अधिक लोकप्रिय झाले . ` बारशाच्या वेळी बाप्तिस्मा देणाऱ्या पाद््याचा हे

असले नाव ठेवण्याबद्दल मी रडून - ओरडून निषेध करतोय हे कोणाच्याच लक्षात आले नाही , '





पान नं . 174

ही त्या नावानर स्वतः वुडहाऊसचीच तक्रार आहे . जवळची माणसे त्याला ` प्लम ' म्हणत .

प्लमच्या कथा - कादंबऱ्यांतील वातावरणाचा बदलत्या समाजपरिस्थितीशी सुतराम संबंध

नव्हता . त्याची त्याने दखलही घेतली नाही . आणि नवल असे की , त्याच्या वयाच्या नव्वद -

ब्याण्णवाव्या वर्षी लिहिलेल्या पुस्तकाचा खपही दशलक्षांच्या हिशेबात होत होता . त्याच्या

लिखाणात आधुनिक पाश्चात्य लोकप्रिय कादंबऱ्यांतून आढळणारी कामक्रीडांची वर्णने

नव्हती , खून - दरोडे नव्हते , रक्त फुटेस्तोवरच्या मारामाऱ्या नव्हत्या . होते ते एक जुने

इंग्लंड आणि काळाच्या ओघाबरोबर वाहून गेलेला त्या समाजातला एक स्तर . ते इंग्लंडही

प्लमनने अनेक वर्षांपूर्वी सोडले होते . अमेरिकेत न्यूयॉर्कजवळ येऊन स्थायिक झाला होता .

कुटुंबात तो आणि त्याच्याहून चार वर्षांनी लहान असलेली त्याची प्रेमळ , सुदक्ष सहचारिणी

एथेल , काही कुत्री आणि मांजरे . लेखनावर लक्षावधी डॉलर्श मिळत गेल्यामुळे लॉग

आयलंडवरच्या रेमसेनबर्ग नावाच्या टुमदार उपनगरात राहायला एक सुंदर बंगली . भोवताली

काही एकर बाग . त्यात गर्द वनराई . वनराईतून पळणाऱ्या पायवाटा .



प्लमचे आयुष्य विलक्षण नियमित . सकाळी लवकर उठून बंगल्याच्या पोर्चमध्ये यायचा .

बारा नमस्करांसारखा हातपाय ताणण्याचा एक व्यायाम बारा वेळ करायचा . वयाची नव्वद

वर्षे उलटली तरी प्लमची ही व्यायामद्वादशी चुकली नाही . घरात जाग आलेली नसायची . मग

स्वतःच आपला टोस्ट भाजून घ्यायचा . चहा तयार करायचा . ही न्याहारी शांतपणाने

चालायची . एखादी रहस्यकथा ( बहुधा आगाथा ख्रिस्तीची ) किंवा आवडत्या लेखकाचे पुस्तक

वाचत वाचत न्याहारी संपली , इतर आन्हिके उरकली की स्वारी प्रभातफेरीला निघे . सोबत

घरातली कुत्री हवीतच . कुत्री आणि मांजरे ही प्लमची परम स्नेहातली मंडळी . एकदा हा

सकाळचा फेरफटका झाला , की नवाच्या सुमाराला अभ्यासिकेत शिरायचा . कथा - कादंबऱ्यांचे

धागे जुळवायला सुरूवात . त्या निर्मितीतून असंख्य वाचकांना ह्या माणसाने खुदूखुदू ते

खोःखो पर्यंत सर्व प्रकारांनी हसवले . नुसते हसवलेच नाही , तर ` पी . जी . वुडहाऊस ' हे

व्यसन जडवले . कुणीतरी इंग्रंजीतून पुस्तके वाचणाऱ्यांची ` वुडहाऊस वाचणारे ' आणि

` वुडहाऊस न वाचणारे ' अशी विभागणी केली होती . जेम्स अँगेट ह्या प्रसिध्द पण स्तुतीच्या

बाबतीत महाकंजूष आणि प्रतिकूल टीकेच्या बाबतीत केवळ आसुरी असणाऱ्या टीकाकाराने

` थोडाफार वुडहाऊस आवडणारे असे त्याचे वाचक ह्या जगात संभवतच नाहीत ' असे म्हटले

आहे . वुडहाऊस आवडतो याचा अर्थ तो अथपासून इतीपर्यंत आवडतो . हे आपल्या

बालगंर्धवाच्या गाण्यासारखे आहे . ते संपूर्णच आवडायचे असते . ( सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांना

वुडहाऊसआवडतो आणि त्याची सगळी पुस्तके त्यांच्या फळीवर आहेत हे मी जेव्हा वाचले

त्या वेळी त्यांच्याविषयी मला वाटणारा कोशगत आदर उफाळून आला होता . ) ` व्यसन '

ह्यापलीकडे वुडहाऊसच्या बाबतीत दुसरा शब्द नाही . असल्या व्यसनांनी ज्यांना न बिघडता

राहायचे असेल त्यांनी अवश्य तसे राहावे . अमुकच एका तत्त्वज्ञानात किंवा धर्मात मानवतेचे

कल्याण आहे असा आग्रह धरण्यांनीही ह्या भानगडीत पडू नये . ( ते पडत नसतातच ! )

त्यांच्या हसण्याच्या इंद्रियावर निसर्गानेच एक न उघडणारे झापड बसवलेले असते .

अहंकाराची दुर्गंधी आणि अकारण वेताग घेऊन ही माणसे जगत असतात . त्यांना सतत

कोणीतरी खरा - खोटा ` शत्रू ' हवा असतो . असा ` शत्रू ' चा सार्वजनिक बागुलबुवा उभा करण्यात



पान नं . 175

जे यशस्वी होतात तेच ` हुकूमशहा ' होत असतात . आणि ` विनोद ' तर मित्र जोडत असतो .

म्हणूनच एकछत्री राजवटीत पहिली हत्या होते ती विनोदाची .



वुडहाऊससारख्या माणसाला , नव्हे देवमाणसाला , सत्तीधीशांच्या ह्या वृत्तीचा फार मोठा

ताप सोसावा लागला . त्याची अश्राप वृत्ती आणि निर्मळ विनोदबुध्दी हा त्याच्या आयुष्यात

शाप ठरावा अशी परिस्थिती होऊन गेली . सुसंस्कृत जगाने लाजेने मान खाली घालावी अशीच

ही घटना आहे एक संपूर्ण असत्य , माणसाला तापवलेल्या सळीने दिलेल्या डागासारखे कसे

चिकटून राहते आणि राजकीय प्रचार ह्या नावाखाली चालणाऱ्या बौध्दिक व्यभिचाराचे

अकारण बळी होऊन कसे जगावे लागते ह्याचे हे एक ह्दयभेदक उदाहरण आहे . पण

त्याबरोबरच ह्या साऱ्या मानसिक छळातून , वरवर गमत्या वाटणारा वुडहाऊस आपल्या

विनोदी लेखनाशी इमान ठेवून कसा राहिला त्याची हकीगत ह्या माणसापुढे आदराने नत -

मस्तक व्हायला लावणारी आहे . पण हसवणाऱ्या माणसाला कोणी आदरणीय वगेरे मानत

नसते .



कुठल्याही तत्त्वज्ञानाचा प्रसार किंवा धिक्कार करण्यासाठी वुडहाऊसने लिहिले नाही .

जीवनाच्या सखोल तत्त्वज्ञानाची चिंता केली नाही . त्यानेच म्हटले आहे : "" माझ्यापुढे कुठलेही

मार्गदर्शन करणारे नियम नाहीत . मी आपला जगत जातो . लिहित असलो म्हणजे उगीचच

इकडेतिकडे पाहत बसायला आपल्याला सवड नसते . एकामागून एक पुस्तक लिहिणे हेच माझे

जीवन आहे . "" किती सहजतेने वुडहाऊस हे म्हणून गेला आहे .



1902 साली वुडहाऊसने व्यवासायिक लेखनाच्या क्षेत्रात पहिली एट्रू घेतली . आणि

1940 साल उजाडायच्या आधी बारा नाटके , तीस विनोदी एकांकिका , शेकडो भावगीते ,

दोनशे सत्तावन्न कथा आणि बेचाळीस कादंबऱ्या लिहिल्या . ही काही नुसतीच लेखनकामाठी

नव्हती . त्यांतली जवळजवळ प्रत्येक कृती यशाची नवी पायरी गाठत गेली होती .

कडेखांद्यावरच्या बच्चाला खेळवावे तसे इग्रंजी भाषेला खेळवणाऱ्या वुडहाऊसने स्वतःचे

एक विश्व निर्माण केले होते . त्याची भाषा आणि त्याची ती सृष्टी , इतकी त्यांचीस्वतःची आहे

की त्याच्या साहित्याचे भाषांतर एखाद्या उत्तम कवितेच्या भाषांतरासारखे अशक्यच आहे .

त्याची पात्रे एका विशिष्ट इंग्रजी कालखंडातील आहेत आणि त्या संस्कृतीत इतकी रूजलेली

आणि वाढलेली आहेत की त्या जमिनीतून त्यांना अलग करणे चुकीचेच ठरावे . तरीही

वुडहाऊच्या विनोदात विश्वात्मकता आहे . पृथ्वीच्या पाठीवरल्या इंग्रजी भाषा समजणाऱ्या

संपूर्णपणे निराळ्या संस्कृतीत जगणाऱ्या लोकांना त्याच्या विनोदाने , अफलातून विनोदी

उपमांनी , विनोदी प्रसंगांनी डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसवले .



त्याचा बर्टी वूस्टर आणि जीव्हज्् , आपल्या ` स्मिथ ' या नावाने स्पेलिंग कारण नसताना

` पी ' पासून सुरू करून पहिली ` पी ' अनुच्चारित आहे हे बजावणारा आणि सदेव उसने पेसे

देण्याऱ्यांच्या शोधात असणारा तो स्मिथ , लॉर्ड एम्सवर्थ आणि त्याचा तो बौण्डिग्ज , कॅसल ,

युकरिज , मुलिनर , अंकल फ्रेड , गोल्फ कथांतला तो गोल्फमहर्षी ` वृध्द सदस्य ' , ऑण्ट आगाथा -

सारख्या अनेक आत्या - मावश्या . . . . ही सारी मंडळी आणि त्यांचा हा निर्माता यांनी इंग्रजी

साहित्यात हा गोंधळ मांडिला होता . गोधंळाला अंत नव्हता आणि मृत्यूनेच मालवीपर्यंत ह्या

गोंधळ्याच्या हातची मशाल विझली नव्हती . एका समीक्षकाने त्याच्या ह्या निर्मितीपुढे हात

टेकताना म्हटले आहे : "" वुडहाऊसची प्रतिभा थकायला तयार नाही . पण समीक्षक मात्र नवीन



स्तुतिपर विशेषणे शोधून काढता काढता थकायला लागले आहेत . ""


लेखन हा त्याच्या प्रेमाचा विषय होता . लेखन म्हणजे साक्षात टेबलाशी बसून हाताने केलेले

लेखन . मजकूर सांगून लेखनिकाकडून लिहून घेणे त्याला जमले नाही . एकदा एथेलने त्याला

टेपरेकॉर्डरसारखे यंत्रही आणून देऊन भार हलका करण्याचा प्रयत्न केला होता . वुडहाऊस

म्हणतो : "" मी ` थँक्यू जीव्हज्् ' ह्या कादंबरीचा त्या यत्रांवर मजकूर सांगायला लागलो .

आणि काही वेळाने तो मजकूर ऐकायला लागल्यावर तो माझा मलाच ऐकवेना . भलताच रटाळ

वाटायला लागला होता . आणि माझा आवाजदेखील एखाद्या पाद्रीबाबासारखा आहे याची

मला तोपर्यंत कल्पनाही नव्हती . तो तसला आवाज किंवा ते यंत्र यांपेकी एक कोणीतरी माझी

तंगडी खेचत होते . असो , दुसऱ्या दिवशी मी ते भिकार यंत्र विकून टाकले . ""



समोर बुध्दिबळाचा पट मांडून आपण आपल्यापाशीच खेळत बसावे तसा त्याचा हा

लेखनाचा कार्यक्रम असे . स्वतःच बिकट चाल करायची आणि त्यातून स्वतःच गमतीदार

सोडवणूक करायची . ह्या लेखनाच्या छंदाबद्दल त्यानेच म्हटले आहे : "" लेखनाची एक मजास

आहे . तुम्ही स्वभावतःच लेखक असलात तर तुम्ही पेशासाठी , कीर्तीसाठी किंवा फार कशाला ,

छापून प्रसिध्द व्हावे म्हणून सुध्दा घासूनपुसून लख्ख करायची फार हौस आहे . एकदा कागदावर

उतरून काढले , मग ते कितीही ओबडधोबड का असेना , काहीतरी आपल्या पोतडीत जमा

झाले असे मला वाटते . ए . ए . मिल्न तर म्हणतो की पुस्तके प्रकाशितदेखील करू नये . ती

लिहावीत . त्याची सुंदर अशी एक प्रत छापावी , लेखकाला वाचण्यासाठी . ""



` स्वान्तःसुखाय ' म्हणजे तरी दुसरे काय आहे ? साहित्यनिर्मिती ही खरोखरीच क्रिडा

असावी . त्या खेळाची मजा वाटायला हवी . वुडहाऊस हा साहित्यातला ` खेळाडू ' होता . त्याचे

स्वतःचे मेदान होते . त्याची स्वतःची टीम होती . त्याच्या कथा - कादंबऱ्या म्हणजे ह्या साऱ्या

भिंडूच्या जीवनातला खो - खो , आट्यापाट्या , लंगडी , धावाधावी , लपंडाव - नाना तऱ्हा !

आणि वुडहाऊस हा त्या खेळाची हकीगत सांगणारा विनोदी कॉमेंटेटर . ही त्याची दोस्त -

मंडळी होती . इथे कोणी खलनायक नाहीत . कुणाच्या मनात पाप नाही . इथली हारजीत

खोळातल्यासारखी . इथली फसवाफसवी पत्याच्या डावातल्या फसवाफसवीसारखी . इथले प्रेम ,

त्या प्रेमाच्या आड येणारी माणसे , त्यातून सूर मारून भोज्या गाठणारे नायक , त्यांना ` जेली '

सारखे थरथरायला लावणाऱ्या त्या आत्याबाई , संकटमुक्तीसाठी साक्षात विष्णूसारखा उभा

असलेला तो जीव्हज् . . . हे एक विलक्षण मजेचे नाटक .



नाटकच म्हणायला हवे , कारण त्याच्या पात्रांची घालमेल आणि धावपळ ही एखाद्या रंगमंचावर

चालल्यासारखीच असते . कादंबरीतील पात्रेदेखील नाटकातल्या पात्रांसारखी सदेव

हालती ठेवली पाहिजेत . असे वुडहाऊसचेच मत होते . त्याने त्या पात्रांना सुस्त होऊ दिले नाही .

एक एक प्रसंग म्हणजे एका घसरगुंडीवरून दुसऱ्या घसरगुंडीवर नेण्याचा कार्यक्रम .

वुडहाऊस ह्या नाटकाचा निर्माता , सूत्रधार आणि प्रेक्षकही . आपला नायक नव्या घोटाळ्यात

सापडला की सर्वात त्यालाच आधी आनंद व्हायचा . मग त्याच्यातला सूत्रधार खुषीत येऊन

त्या नायकाच्या फजितीचे गंमतीदार शब्दांत वर्णन करायला टपलेला असायचा . अशी एखादी

नेमकी उपमा निघायची की ती सुचल्यावर मला वाटते , वुडहाऊस स्वतःच गुदगुल्या झाल्यासारखा हसत

असेल . पानापानातून अशा कितीतरी विनोद उपमा . उत्तम कवितेप्रमाणे



पान नं . 177

अजिबात बदलता येणार नाही अशी अचूक शब्दयोजना . एक मात्र निश्चित की वुडहाऊस

हा त्याच्या त्या इंग्रजीतून अनुभवायलला हवा . भाषांतरात त्याच्या शेलीतली लय पकडता येत

नाही . तबल्याच्या तुकड्यात ` धा ' म्हणजे तिथे ` धा ' च हला , ` धिन् चालणार नाही . तसेच

वुडहाऊसच्या विनोदाचे आहे . त्याचा तो जीव्हज्् हा ` बटलर ' आहे . आता ` बटलर ' ह्या

शब्दाचा अर्थ जपानी ` गेशा ' किंवा फार कशाला ` भटजीबुवा ' किंवा ` पिठले ' ह्या शब्दांइतकाच

अ - भाषांतरीय !



इंग्रजी भाषेला हवे तसे खेळायला लावणाऱ्या वुडहासचे कौतुक पंडित - अंपडित

सगळ्यांनाच होते . 1939 साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने वुडहासचला इंग्रजी साहित्याच्या

सेवेबद्दल डी . लिट . ची सन्मानीय पदली दिली . त्यापूर्वी मार्क ट्रवेन ह्या विनोदी लेखकालाच

काय ती सन्माननीय डॉक्टरेट देण्यात आली होती . आपल्याकडल्या विद्यापिठाने मात्र विनोदी

लेखकाला असा गौरवपर डॉक्टरेट देणे ही सामान्यतः एखाद्या याज्ञवल्क्याश्रमाने कुणाला तरी

उत्तम तंदुरी चिकन करतो म्हणून ` शाल आणि श्रीफळ ' देण्याइतकीच अशक्य कोटीतली

गोष्ट आहे .



1939 साली इंग्लडंमध्ये वुडहाऊसच्या विनोदाचा एलढा मोठा गौरव झाला आणि वर्षे

दोन वर्षे लोटली नाहीत तोच युध्दकाळातला राष्ट्रद्रोही म्हणून त्याचा निषेध सुरू झाला .

ज्याच्या वाचकांत रूडयार्ड किप््लिंग , आगाथा ख्रिस्ती , जॉर्ज ऑरवेल , माल््कम मगरिज

यांच्यासारखे इंग्रजी साहित्यातले श्रेष्ठलेखक होते , हिलेर बेलॉकसारख्या इंग्रजी लेखकाने

ज्याचा ` सध्या हयात असलेल्या इंग्रज लेखकांतला निःसंशय सर्वोष्कृट लेखक ' असा बी . बी

सी . वरून गौरव केला होता . त्याच वुडहाऊसची त्याच बी . बी . सी वरून , पंचमस्तंभी ,

देशद्रोही , लॉर्ड हॉहॉ अशी बदनामी सुरू झाली . विशएषतः त्या वेळचे ब्रिटिश प्रचारमंत्री डफ

कूपर यांनी तर खाजगी वेर असल्यासारखा वुडहाऊसच्या चारित्र्यहननाचा प्रचार जारी

ठेवला . पण बर्लिन रेडिओवरून ध्वनिक्षेपित झालेल्या ज्या भाषणांबद्दल त्याला राष्ट्रद्रोही ठरवण्यात आले

होते ती भाषणे काय होती याची चौकशी करायची कुणालाच गरज पडली

नव्हती . म्हणजे एकीकडून वुडहाऊस नाझी जर्मनांच्याबंदीखान्यात हाल भोगत होता आणि

त्याच्या मायदेशात त्याच्याविरूध्द त्याच्या जर्मनधार्जिणेपणाबद्दल गरळ ओकले जात होते . हा

अश्राप माणूस राष्ट्रद्रोह करीलच कसा ? - हा विचारदेखील त्याला दोषी ठरवण्यांच्या

क्षणभरही मनात येऊ नये हे चारित्र्यहननाच्या निरर्गल प्रचाराचे यश म्हणायला हवे .



पण अशा ह्या भयानक अवस्थेत वुडहाऊसने मात्र मनोधेर्याचा कुठलाही आव न आणता

जे लोकविलक्षण मनोधेर्य प्रत्यक्षात आचरून दाखवले ते पाहिल्यावर हा वरपांगी गमत्या

वाटणारा माणूस किती उंच आणि किती खोल होता याची साक्ष पटते . निरनिराळ्या तुरूंगांत

आणि ` स्थानबध्दांच्या कॅम्पस ' मध्ये नेऊन कोंडलेल्या वुडहाऊसची विनोदबुध्दी त्याला क्षण -

भरही सोडून गेली नाही . तो आपल्या स्थानबध्दतेतल्या अनुभवांची विनोदी डायरी चालू होती .

भयानक थंडीत , साठीच्या घरात आलेल्या वुडहाऊसला फरशीवर झोपावे लागत होते . संडास

साफ करायला भाग पाडले जात होते , आणि ` विनोदी लेखन ' ही एवढीच आपल्याला

जमणीरी गोष्ट असे मानणारा प्लम वाचकांना हसवणारी पानांमागून पाने लिहून काढीत

होता . आम्ही ` स्वधर्मा ' च्या लफ्फेबाज गोष्टी करतो ; वुडहाऊस पाळत होता . विनोदी लेखन



पान नं . 178

हा दुसऱ्या स्वभावधर्म होता .



दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी वुडहाऊस फ्रानसमधल्या पारी प्लाजनजीक सुद्रतीरीवरच्या ल

तुके नावाच्या छोट्याशा गावात राहत होता . 1940 च्या मे महिन्यात नाझी जर्मनांनी ल

तुकेचा ताबा घेतला . त्या गावात चितके इंग्रज होते . त्यांना स्वतःच्याच घरात स्थानबध्द करून

ठेवण्यात आले . आठवड्यातून एकदा जर्मन कमांडंटच्या ठाण्यावर जाऊन हजेरी द्यावी

लागत असे . अशी परिस्थिती असूनही त्याच्याविरूध्द अपप्रचार करण्यांनी , वुडहाऊसला

ठोकून दिला होता . नाझी सेनिक बळजबरीने लोकांच्या घरात शिरून त्यांच्या बाथरूमध्ये

आंघोळी करीत , अन्न फस्त करीत , ह्या गोष्टींचा विपर्यास , नाझी सेनिकांना आपल्या बाथ -

रूममध्ये स्नानाची सोच करून देऊन वुडहाऊस त्यांना पार्टीलाही बोलवीत असे , असाही केला

जात होता . वुडहाऊस म्हणतो "" ह्या हरामखोरांना मी , आपली गलिच्छ शरीरे धुवायला

माझ्या बाथरूममध्ये या असे अनमंत्रण देईन काय ? मी त्यांना दम देऊनदेखील पाहिले . कसला

दम आणि कसले काय ! पुन्हा आले ते आणखी सेनिक जमवून घेऊन घुसले . "" फ्रेचांनी

शरणागती लिहून दिली होती . बाहेरच्या जगातल्या बातम्या ऐकण्यावर बंदी . इंग्रजी वर्तमान -

पत्रे येऊ देत नसत . फॅसिस्ट राजवटीत बातम्यांचा ब्लॅकआऊट हे एक प्रभावी तंत्र असते .

आणि गोबेल्ससारख्या अपप्रचारांच्या उस्तादांचा उस्ताद असल्यावर त्याच्या प्रचारात काय

सांगितले जात होते आणि काय लपवले जात होते याची कल्पनाही करणे अशक्य .



वुडहाऊसनित्याप्रमाणे त्या जर्मन कमांडरच्या कचेरीत वीस जुलेला हजेरी लावायला

गेला . पण वातावरण निराळे वाटले . ल तुकेमधल्या परकीय रहिवाशांपेकी साऱ्या पुरूष -

मंडळींना स्थानबध्द करण्याचा हुकूम आला होता . ` गरजेपुरत्या ज्या वस्तू असतील त्या बँगेत

भरा आणि ताबडतोब ठाण्यावर हजर व्हा ' असा हुकूम होता . तिथून त्यांना जर्मनांच्या

कॉन्सेन्ट्रेशन कॅम्पात नेण्यात येणार होते . वुडहाऊसच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे , "" स्थान -

बध्दचेटा पूर्वानुभव नसल्यामुळे बॅगेत कायकाय भरता येते याची कल्पना नव्हती . त्यामुळे

पाईप , तंबाखू , पेन्सिल , वह्या , बूट , दाढीचे सामान , थंडीसाठी म्हणून स्वेटर्स , टेनिसनच्या

कवितांचा संग्रह , सम्रग शेक्सपिअरचा खंड आणि अर्धा पौंड चहाची पत्ती - एवढे सामान

भरले . तेवढ्यात एथेलने त्या बॅगेत एक कोल्ड मटनचॉप आणि चॉकलेटचा एक लहानसा

स्लॅब कोंबला . रत्तलभर लोणी , घ्या म्हणत होती . पण उन्हात लोणी वितळायला लागायची

लहानशी भीती होती . तेव्हा तो बेत रद्द केला . "" एथेलचा निरोप घेऊन वुडहाऊसने घर सोडले .

इथून त्याची वर्षभर चांगली परवड झाली . साठ वर्षेपुढल्या युध्दबंद्यांना केदेत ठेवायचे नाही

ह्या नियमाप्रमाणे तो सुटला . ह्या स्थानबध्दतेतल्या अनुभवावर एका अमेरिकन ब्रॉडकास्टिंग

कंपनीने त्याला भाषणे द्यायला लावली . ते हे ` बर्लिन ब्रॉडकास्टस . ' जर्मनांनी लुच्चेगिरीने

त्याचा दुरूपयोग केला . आणि इंग्रज आपली सारी विनोदबुध्दी गहाण टाकून भडकले .

वास्तविक भडकायला हवे होते जर्मनांनी . पण युध्दकाळात बर्लिन रेडिओवरून वुडहाऊस

बोललाच कसा ? बस ! हे एक कारण घेऊन तो काय बोलला हे ध्यानात न घेता त्याच्यावर

चिखलफेकीचा सरकारी प्रचार सुरू झाला . त्याला फॅसिस्टांचा बगलबच्चा ठरवण्यात आले .





युध्द संपले . जर्मन हरले . सगळ्यांची डोकी जरा थंड झाली . आणि एकोणीसशे चौपन साली

वुडहाऊसने ती भाषणे प्रसिध्द करायला आपला मित्र टाऊनएंड ह्याला परवानगी दिली . ह्या





पान नं . 179

मित्राला वुडहाऊसने आयुष्यभर अतिशय मजेदार पत्रे लिहिली आहेत . टाऊनएंड हा स्वतः

चांगला लेखक . त्याने ती सारी पत्रे जपून ठेवून प्रसिध्द केली . सीअन ओकेसी नावाच्या

लेखकाने वुडहाऊसला इंग्रजी साहित्यातील ` परफॉर्मिंग फ्ली ' - म्हणजे ` खेळ करून दाखव -

# णारी माशी ' - थोडक्यात म्हणजे ` तमासगीर ' म्हटले होते . ह्या पत्रसंग्रहाचे नाव तेच ठेवले

आहे . आपण ` तमासगीर ' आहोत हे वुडहाऊसने स्वतःच मान्य केले आणि न जाणो जे दूषण

म्हणून दिले असेल ते भूषण म्हणून वापरले . ह्या हसवणाऱ्या माणसाला दुसऱ्या कुठल्याही

सन्मामाची अपेक्षा नव्हती . यथेच्छ चिखलफेक झाली होती . पण प्लमच्या कादंबऱ्या प्रसिध्द

होतच होत्या . बर्टी वूस्टर घोळ करीत होता . त्याचा तो प्रज्ञामूर्ती ( आणि स्थितप्रज्ञही ) जीव्हज्

शांतपणे मालकांना त्यातून सोडवून तितक्याच शांतपणे नामानिराळा राहत होता . लोक वाचत

होते . हसत होते .



युध्द संपून पाचसात वर्षे झाल्यानंतरही त्याच्या पुस्तकावर तोंडभर तारीफ असलेल्या

समीक्षेत वुडहाऊसच्या विनोदाला तोड नाही अशी शिफारस होत होती . पण लगेच ` दुसऱ्या

महायुध्दात नाझींनी त्याला पकडून अपर सायलेशियन तुरूंगातून ब्रिटिशांनी जर्मनांना शरण

जावे म्हणून केलेल्या प्रचाराचे दुःस्वप्नासारखे दिवस आणि त्या दुःस्वप्नांसारख्याच आठवणी

आता संपल्या आहेत ' हे शेपूट होतेच .



` असत्यमेव जयते ' चे फार नमुनेदार उदाहरण आहे . प्लमने ही समीक्षा वाचली .

त्यावरची त्याची प्रतिक्रिया त्याच्या विनोदीवृत्तीला साजेशीच आहे . "" बारा वर्षांपूर्वी मी जेव्हा

साठ वर्षांचा चिमखडा होतो त्या वेळी ह्या उल्लेखाने जखम झाली असती . आता सत्तरी

ओलांडल्यावर असल्या घावाच्या जखमा होत नाहीत . आता ह्या घड्याळाची टिकटिक केव्हा

बंद पडेल ते सांगता येत नाही . अशा वेळी कशाचीही खंत बाळगणे येडपटपणाचे वाटते .

` माझ्याविषयी लोक वर्तमानपत्रातून काही का लिहिनात . जोपर्यंत माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये

चूक करीत नाहीत तोपर्यंत मला त्याचे काही वाटत नाही ' - असे कोणातरी म्हणाला होता .

माझी अवस्था त्या माणसासारखी आहे . तात्पर्य , माझ्याविषयीचा हा गेरसमज लोकांच्या

गप्पांच्या अड्ड्यांअड्ड्यांतून चालणार असेल तर ` बर्लिन ब्रॉडकास्ट्स ' प्रसिध्द झाले म्हणूनही

काही बिघडणार नाही . ""



आणि गमतीची गोष्ट अशी , हे बर्लिन - ब्रॉडकास्ट म्हणजे ज्या जर्मानांनीप्लमला स्थान -

बध्दतेते टाकले होते त्यांची यथास्थित टिंगल आहे . उपहास आणि उपरोधाचा ती भाषणे

म्हणजे एक आदर्श आहे . जर्मनांना त्यातली खोच कळण्याइतकी विनोदबुध्दी नव्हती हे

वुडहाऊसचे भाग्य . नाहीतर त्यांनी त्याला केव्हाच फासावर लटकावला असता . पण आश्चर्य

वाटते ते इंग्रजांची विनोदबुध्दी नष्ट झाल्याचे . हिटरलने तेवढ्यापुरता तरी इंग्रजांवर विजय

मिळवला होता , म्हणायला हवे . त्यांचा एक विनोदी लेखक शत्रूच्या मुलखात राहून शत्रूची

यथेच्छ चेषटा करीत होता आणि केवळ शत्रूच्या रेडिओवरून ती भाषणे झाली ह्यावरून तो

शत्रुपक्षाचा प्रचार ठरवण्यात आलसा होता . वुडहाऊसच्या ह्या इंग्रजी भाषणांचे भाषांतर करणे

खरे म्हणजे अशक्य आहे . पण त्यातूनही , ह्या असल्या अवस्थेत त्याने टिकवून धरलेल्या

विनोदबुध्दीचे दर्शन घडते ते अपूर्व आहे . त्या भाषणांची सुरूवातच किती मजेदार आहे .



"" माझ्या ह्या छोटेखानी भाषणात श्रोत्यांना थोडाफार भोटमपणा दिसेल . काहीसा

पाल्हाळही लावल्यासारखं वाटेल - पण ती बाब बर्टी वूस्टरच्या भाषेत सांगायची म्हणजे



पान नं . 180

` ताबडतोब स्पष्टीकरण देता येण्यासारखी ' आहे . मी नुकताच जर्मनांच्या मुलकी तुंरूगा -

# तल्या बंदिस्त कोठड्यांतला एकूणपन्नास आठवड्यांचा मुक्काम आटपून बाहेरच्या

मोकळ्या जगात आलो आहे . त्यामुळं अजनही डोक्याचा तोल पूर्णपणाने सावरलेला नाही .

ह्याच माझ्या डोक्याची कधीही तोल न जाऊ देण्याचा गुणाबद्दल सगळीकडे एकमुखाने

तारीफ व्हायची . ""



इथून पुढच्या पाच भाषणांत प्लमने तुंरूगवासातल्या हालअपेष्टांना विनोदाच्या रंगांतून

रंगवून काढले आहे . जर्मन कमांडंटच्या ठाण्यापासून त्याचे घर तीन किलोमीटर दूर होते . बॅग

गोळा करायला जर्मन अधिकाऱ्यांनी त्याला पाच मिनिटांचा अवधी देऊन लष्करी मोटारीतून

घरापर्यंत नेले . वुडहाऊस म्हणतो ,



"" मोटारीतून नेल्यामुळं मला वाटलं जर्मन मंडळी तशी आपल्यावर खूष असतील . घरी

पोचल्यावर थंड पाण्यानं झक्क शॉवरबाथ घ्यावा , पाईप पेटवून बॅगेत भरायच्या व्सतूंचं

चिंतन वगेरे करावं असा विचार होता . पण माझ्याबरोबर आलेल्या जर्मन सेनिकाने

` लवकर आटपा ' असं गुरकावल्याबरोबर माझ्या उत्साहावर एकदम पाणी पडलं . त्याच्या

मते पाच मिनिटं खूप झाली . असं होतं . शेवटी मिनिटांवर तह झाला . . . माझ्या भावी

चरित्रकारांनी हे नमूद करावं . यापुढील काही दिवस स्थानबध्देत काढावे लागणार

म्हटल्याक्षणी माझ्या मनात पहिला विचार आला , तो आता कंबर कसून एकदा समग्र

शेक्सपिअर वाचून काढावा हा ! गेली चाळीस वर्षे मी समग्र शेक्सपिअर वाचायचा संकल्प

सोडतो आहे . तीन वर्षांपूर्वी मी त्या उद्देशाने ऑक्सफोर्ड आवृत्तीदेखील विकत घेतली

होती . पण हॅम्लेट आणि मॅक्बेथ पचवून हेन्री द एट्थ भाग एक , दोन व तीनमधलं पुरण

पोटात भरणार इतक्यात आगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथेतल्या कशाकडे तरी लक्ष जायचं

आणि ढेपाळायला व्हायचं . ही स्थानबध्दता काही वर्षासाठी होती की आठवड्यांसाठी

याचा काहीच पत्त नव्हता . पण एकूण परिस्थिती मात्र ` समग्र शेक्सपिअर ' कडेच बोट

दाथवत होती . म्हणून बॅगेत घुसला . "" ह्या गडबडीत वुडहाऊस एकच गोष्ट बॅगेत

भरायला विसरला होता . त्याचा पासपोर्ट .



बॅग भरून झाल्यावर प्लमला पुन्हा एकदा त्या जर्मन कमांडरपुढे उभे केले . ( ह्या कमांडरचा

एक डोळा काच बसविलेला होता . त्या डोळ्याची वुडहाऊसला भारी भीती वाटायची , असे

त्याने आपल्या डायरीत लिहिले आहे . ) तिथे भरपूर वेळ ताटकळल्यावर वुडहाऊसची यात्रा

सुरू झाली .



"" ह्या स्थानब्धतेतल्या प्रवासात एक मोठी उणीव असते . आपल्याला कुठे नेण्यात येत

आहे , हे काहीच कळत नाही . म्हणजे आपण शेजारच्या गावात आलो की अर्धा युरोप

पालथा घातला याचा थांगपत्ता लागत नाही . आम्हांला लील नावाच्या शहरातल्या लूस

नावाच्या उपनगराकडं नेलं होतं . सत्तर मेलांचं अंतर . पण वाटेत स्थानबध्दांतले इतर

` संस्थापक सदस्य ' उचलायचे असल्यामुळं एवढं अंतर काटायला सात तास लागले . ""



त्या बसमध्ये ल तुके गावातील जे इतर इंग्रज पकडून कोंबले होते ते सारे त्याच्या परिचयाचे

होते .



"" पुढं काय वाढून ठेवलं आहे हे कोणालाच ठाऊक नव्हतं . स्थानबध्दतेचा आमचा

सगळ्यांचा हा अनुभव . पण प्रत्येक जण आपापलं डोकं चालवून अंदाज लढवीत होता .



पान नं . 181

आमचा आल््जी म्हणजे मनुष्रूपी सूर्यकिरणच ! निराशेचा अंधकार वगेरे त्याला

नामंजूर . आम्हां सगळ्यांची सोय उन्हाळ्याच्या सुटीत राहण्यासाठी बडे लोक एखाद्या

उपवनात प्रासादतुल्य बंगले बांधतात , तसल्या बंगल्या - प्रासादांत होणार , असा त्याचा होरा

होता .



` बंगला ? मी . '

` बरोबर , बंगला . ' आल््जी

` म्हणजे पुढल्या पोर्चमध्ये पिवळ्या फुलांच्या वेलीबिली चढवलेल्या असतात

तसल्या . . . '



` वेलीचं नक्की नाही . असतीलही किंवा नसतीलही . पण प्रासादतुल्य बंगल्यात होणार

हे नक्की . मग आपल्याला पॅरोलवर सोडतील . दिवसभर रानावनातून भटकून यायची

परवानगी मिळेल . मला वाटतं , गळ टाकून मासे धरायलाही देतील . '



घटकाभर बसमधलं वातावरण प्रफुल्लित झालं . मासेमारीची फारशी हौस नसणारे

म्हणाले , ` आम्ही आपले उन्हातून हिंडून येत जाऊ . '

काही वेळाने लक्षात आलं की आल््जीला स्थानबध्दतेतील ओ की ठो ठाऊक नव्हतं .

बंगल्यातच ठेवायचं तर आमचे बंगले काय वार्ट होते ? उगीच आमच्या स्वतःच्या

बंगल्यातून लोकांच्या बंगल्यात एकदम जथाबंद उचलून नेऊन मुक्कामाला ठेवायची काय

गरज होती ? त्यानंतर मात्र आम्ही नक्कीच गारठत चाललो . आशावादाची जागा

अस्वस्थतेंन घेतली आणि लीली गावाला वळण घेऊन बस उभी राहिली तेव्हा आमच्या

उत्साहाच्या पाऱ्यानं शून्याखालचा नवा नीचांक गाठला होता . ती इमारत म्हणजे स्थानिक

तुरूंग किंवा विभागीय कारागृह अशाखेरीज इतर कसलीही असणार नाही हे उघड होतं .



एका फ्रेंच स्थानिक शिपायानं दरवाजे उघडले आणि आम्ही आत घरंगळलो . ""



आता ह्या भाषणाता कसला देशद्रोह आला ? पण ब्रिटिश प्रचारमंत्र्यांना तो दिसला . बर्लिन

रेडिओवरले दहादहा मिनिटांचे असे हे पाच टॉक््स . म्हणजे एकूण पन्नास मिनिटे . माणसाला

स्थानबध्द करून त्याचे स्वातंत्र्य हिरावून घ्याल ; पण त्या हालांचीही थटटा करण्याची त्याची

ताकद कशी हिरावून घेणार ? वुडहाऊसने तुरूंगवासाचे जे वर्णन केले आहे त्यातला उपरोध

तर विलक्षण आहे . वुडहाऊस म्हणतो ,

"" ज्यांनी अजूनही तुरूंगवासाची पहिली शिक्षा भोगली नाही , त्यांना हितासाठी एक

गोष्ट सांगायला हवी . मुख्य म्हणजे , असल्या संस्थेत प्रवेश मिळवणं अवघड नाही .

एखाद्या मोठया हॉटेलात खोली राखून ठेवण्यासारखंच असतं . फरक एवढाच की

दारातल्या स्वागतकक्षात फुलझाडं वगेरे नसतात . स्वत : ची बॅग स्वतःलाच उचलावी

लागते - आणि नोकराला टिप देण्याची भानगड नाही .



लहानपणापासून निष्पाप आयुष्य काढल्यामुळें , तुरूंगाची आतली बाजू फक्त

सिनेमातच काय ती पाहिलेली . तेवढयात माझी नजर स्वागतकक्षात बसलेल्या एका

अधिकाऱ्याच्या नजरेला भिडली आणि मला पश्चात्ताप झाला . आयुष्यात कधीतरी असा

एखादा क्षण येतो , की ज्या वेळी एखाद्या अनोळखी माणसाच्या चेहऱ्याकडे आपली नजर

वळते आणि आपल्याला वाटतं , ` वा - ! - दोस्त भेटला . ' हा क्षण त्यातला नव्हता .

` सेतानाचे बेट ' सारख्या सिनेमातला वाटावा असा तो इसम माझ्याकडे पाहून मिशीला पीळ



पान नं . 182

भरत होता .



पण लेखकाची जात इतक्या आशा सोडत नसते . मनात उगीचच एक पुसट

असा विचार डोकावत होता . आम्हांला पाहुचारासाठी बोलावणारा आमचा हा यजमान

माझं नाव ऐकल्याबरोबर एकदम ` उई उई मॉसिये वोदहाऊस ! . . एंब्रेसाजे - मॉय - मेर्त्र ' -

असं कोहातरी ओरडत उठून उभा राहील . रात्री झोपायला हवा तर माझा पलंग घ्या

म्हणेल . वर , काय सांगू साबेह , तुमचा मी भयंकर चाहता आहे . . . आमच्या पोरीसाठी

स्वाक्षरी देता का ? . . असं काहीतरी म्हणेल .



पण तसलं काही झालं नाही . त्यानं पुन्हा एकदा मिशी पिळली . एका भक्कम

खतावणीत माझं नाव लिहिलं . ` विडहॉर्स ' . आणि ` गुन्हा ' ह्या सदरात ` इंग्लिश ' असं

नोंदवलं . बाजूला हाजिर असलेल्या शिपुर्डयाना ` ह्याला कोठडीत नेऊन टाका ' असा हुकूम

दिला . ती कोठडी मी , आल्जीज बारचा आल्जी ( बंगल्यात ठेवतील म्हणणारा . ) आणि

आमच्या गावातला सालस आणि लोकप्रिय पियानो टयूनर विल्यम कार्मेल ह्या तिघांना

मिळून तिघांना कोंबायचे .



कोठडीचे क्षेत्रफळ बारा गुणिले आठ फूट . सिनेमातल्या कोठडयांना असतात तसले

गजबीज नव्हते . एकच भक्कम लोखंडी दरवाजा . त्यात एक जेवणाची थाळी सरकवायला

झडप . आणि बाहेरच्या पहारेकऱ्याला आतले रहिवाशी शाबूत आहेत की नाहीत ते

पाहण्यासाठी त्या दाराला बाहेरून झाकण लावलेलं भोक . त्या कोठडीत फक्त एक खाट

आणि तिच्यावर अंथरूण होतं . त्या भिंतीच्या वरच्या अंगाला एक खिडकी होती . दुसऱ्या

भिंतीशी एक लहानसं टेबल . त्यालाच साखळीनं बांधलेली तीन - साडेतीन वीत उंचीची

खुर्ची . कोपऱ्यात नळ होता . त्याच्याखाली बशीएवढे वॉश बेसिन . एक लाकडी शेल्फ

आणि भिंतीत एक लाकडी खुंटी .



एकूण सजावट कडकडीत मॉडर्न स्टाइलची . चुना फासलेल्या भिंतीवरची जी काही

चित्रं होती . ती वेळोवेळी त्या कोठडीत नांदलेल्या फ्रेंच केद्यांनी काढली होती हे लक्षात

यायचं . त्यांनी पेन्सिलीने ठसठशीतपणानं काढलेल्या चित्रांवरून त्या फ्रेंच केद्यांच्या

चित्रकलेच्या बाबतीतल्या विचारधारेत कुठं उच्चभ्रूपण वगेरे नव्हता . चारी बाजूला ती

` तसली ' चित्रं असल्यामुळं ` पॅरिसमधील रंगीला रसूल ' सारख्या ग्रंथाच्या पानात आपण

सापडलो आहो असा परिणाम व्हायचा .



आम्हां तिघांत कार्मेल वयाने वडील . त्याला आम्ही खाट दिली . आणि आम्ही

जमिनिवर पसरलो . दगडी फरशीवर शयन करायचा माझा पहिलाच प्रसंग . पण

दिवसभराच्या मुर्दुमकीनं थकून गेल्यामुळं पापण्या मिटायला फार वेळ नाही लागला . झोप

लागण्यापूर्वीचा माझा एकच विचार मला आठवतो : उतारवयात सभ्य माणसावर प्रसंग

गुदरणं हे भयंकर आहे खरं . पण त्यातही लेकाची गंमत होती आणि आपल्या वाटयाला

उद्या काय येणार याची मी उत्सुकतेने वाट पाहत होतो . ""



ह्या बंदिवासांतल्या जेवणाखाण्याच्या हालाचे वर्णनही वुडहाऊस मजेत करतो आणि असे

ते मजेत केल्यामुळेच वुडहाऊस त्या स्थानबध्दतेत फार मजेत राहत होता असा अपप्रचार

करायची संधी त्याच्या विरोधकांना लाभली होती . हे म्हणजे उपास घडलेल्या एखाद्याने



पान नं . 183

` तुरूंगात आम्ही थंडा फराळ केला ' म्हणावे आणि विरोधकांनी त्यांना तुरूंगात कुल्फीमलई

फ्रीजमधले दहीवडे वगेरे देतात असा प्रचार करावा यासारखे झाले . बंदिवासात न्याहारी

म्हणून तिघांना तीन पेले सूप आणि तीन लहान पाव मिळायचे . वुडहाऊस म्हणतो ,



"" सूप ठीक होतं . त्याच्याशी कसंतरी जमवता येत होतं . पहिला घुटका घेतल्यावर जी

चव लागली ती खरोखरीच तशी होती की काय याचा अंदाज घ्यायला दुसरा घुटका

घेईपर्यंत ते संपलं . पण सुरीशिवाय पाव कसा कापायचा ? तुकडयातुकडयांनी कुरतडावा

म्हटलं तर माझ्या कोठडी - बंधूंचे दात त्यांच्या पोरवयातच निकामी झालेले . बरं , त्या

टेबलावर पाव आदळावा म्टलं तर तेही शक्य नव्हतं - टेबलाच्या लाकडाच्या कपच्या

उडायच्या . पण संकटातून वाट निघाल्याशिवाय राहत नाही . माझ्याकडे ` पाव - तोडयाची '

( लाकूडतोडयासारखी ) सार्वजनिक जबाबदारी आली आणि मला वाटतं , मी ते कार्य

समाधानकारक रीतीनं पार पाडलं . कसं का असेना , मी तो पदार्थ विभागू शकलो . त्याची

ट्रिक अशी आहे : मानेचा काटकोन करायचा आणि वरच्या दंतपंक्तीवर हे टणक कार्य

सोपवून द्यायचं . ""



एकदा ते तसले अमृततुल्य सूप उकळणाऱ्या स्वेपाकीबुवांची आणि वुडहाऊसची त्या

बंदिवासात गाठ पडली . वुडहाऊसने डायरीत लिहिलं आहे :



"" आज स्वेपाकीबुवांची गाठ पडली . सूपाबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं . स्थानबध्दांनी

` सूप कमी पडतं ' अशा तक्रारी केल्यामुळं त्यांचा व्यावसायिक अहंकार दुखावला होता .

` मला काय पाणी घालून सूप वाढवता आलं नसतं ? - पण ते माझ्या कलेशी व्यभिचार

केल्यासारखं झालं असतं . ' स्वेपाकीबुवा .



मीम्टलं , ` बरोबर आहे . आमच्या व्यवसायातही तेच आहे . कथा म्हणजे कथा . तिला

फुगवून कादंबरी करा . - स्वादच जाईल . ' ""



ह्या कोठडीतून स्थानबध्दांना ` मोकळी हवा , करमणूक आणि व्यायम ' याच्यासाठी सकाळी

साडेआठ वाजता बाहेर काढीत आणि चारी बाजूंना उंच भिंती आणि आकाशाच्या दिशेला

थोडेफार उघडे असणाऱ्या एका कोंडवाडयात नेऊन अर्धा तास उभे करीत . "" तो कोंडवाडा

कलकत्त्याचं ब्लॅक होल पाहिलेल्या आणि त्याचं अमाप कौतुक वाटणाऱ्या आर्किटेक्टने रचलेला

असावा . "" इति "" वुडहाऊस . कोठडीत भोगाव्या लागणाऱ्या प्रत्येक हालाची त्याने अशी खिल्ली

उडवली आहे . जर्मनांच्या ताब्यातल्या त्या फ्रेंच तुरूंगातल्या कोठडीतल्या घाणीचे वर्णन

करताना वुडहाऊस म्हणतो ,



"" आमच्या 44 नंबरच्या कोठडीतली घाण कशी तगडया , रूंद खांद्याच्या होतकरू

जवानासारखी होती . आम्हांला त्या घाणीचा लळा लागला - अभिमान वाटायला लागला .

इतर घाणीच्या तुलनेने तिची ताकद आणि दर्जा ह्या गुणांच्या श्रेष्ठतेविषयी इतर

केद्यांबरोबर आम्ही पेजा घ्यायला लागलो आणि पहिला जर्मन ऑफिसर जेव्हा आम्चाय

गाभाऱ्यात शिरला आणि त्या घाणीमुळं दाणकन मागं सरकला त्या वेळी तर आम्हांला

आमचा वेयक्तिक सन्मान झाल्यासारखं वाटलं . ""



त्या कोंडवाडयातील ती अर्ध्या तासाची मोकळी हवा वगेरे सोडली तर त्या कोठडीत ह्या

तिघांना दिवसाचे उरलेले साडेतेवीस तास घालवावे लागत . त्याही अनुभवाची वुडहाऊस

विनोदानेच वासलात लावतो :



पान नं . 184

"" समग्र शेक्सपिअरमुळं माझं एक ठीक होतं . पण बारचालवणाऱ्या आल्जीच्या

हाताशी कॉकटेल्स करायला दारू नव्हती आणि कार्मेलजवळ ट्यूनिंग करायला पियानो

नव्हते . बाकी जवळपास पियानो नसणाऱ्या ट्यूनरची अवस्था वेद्यकिय सल्लावरून

शाकाहारावर ठेवलेल्या वाघासारखीच म्हणायला हवी . काही दिवस त्या स्थानबध्दतेत

काढल्यानंतर एक दिवशी कमांडर आला आणि म्हणाला की , ` तुमचे कागदपत्र तपासून

झाल्यावर इथून हलवलं जाणार आहे तेव्हा तयार राहा . '

जे साठीच्या पुढले असतील त्यांची सुटका करून त्यांना घरी पाठवण्यात येणार होतं .

बिल कार्मेल आणि त्यांच्या वयाच्या इतरांनी एका बाजूला रांग धरली . माझ्या वयाला

पावणे एकुणसाठ वर्षे झाल्याच्या जोरावर मीही तिकडे सरकलो . पण मला ` पीछे हटो ' केलं

पावणेएकुणसाठ वगेरे चांगलं आहे , पण जितकं चांगलं असायला हवं तितकं नाही , अशी

मला समज देण्यात आली . ""



दुसऱ्या दिवशी 11 वाजता सूप पाजून सगळ्या स्थानबध्दांना एक व्हॅनमध्ये कोंबले आणि

एका रेल्वेस्टेशनात आणले . वुडहाऊस म्हणतो :

"" एकूण तिथली धांदल आणि गडबड पाहिल्यावर गाडी साडेअकराला सुटणार असाच

एखाद्याने अंदाज केला असता . पण तसं काही नव्हतं . आमचा हा कमांडर गडी भलताच

सावध दिसला . मला वाटतं , कधीतरी त्याची गाडी चुकली असावी . आणि त्या घटनेचा

त्याच्या मनावर खोल परिणाम होऊन त्याच्यात गंड निर्माण झाला असावा . सकाळी

11 - 40 ला त्यानं आम्हांला स्टेशनात पोचवलं आणि गाडी आठ वाजता हलली .

आम्हांला पोचवणारा सार्जंट परतल्यावर त्याचा आणि त्या कमांडरसाहेबाचा जो काही

संवाद झाला असेल त्याची कल्पना करता येईल .

` - काय ? गाडी नीट पकडता आली ना ? ' कमांडर

` होय साहेब . आठ तास वीस मिनिटांनी - ' सार्जंट

` बापरे ! थोडक्यात मिळाली . यापुढे इतक्या कटोकटी जाऊन चालणार नाही '



सकाळी नुसते पेलाभर सूप पाजून स्टेशनात त्या स्थानबध्दांना आठ - आठ तास रखडत

ठेवणाऱ्या दुष्ट कमांडरची वुडहाऊस ह्या थाटात चेष्टा करतो . लूस तुरूंगातून पुन्हा या

मंडळीची उचलबांगडी झाली . वुडहाऊस ह्या थाटात चेष्टा करतो . लूस तुरूंगातून पुन्हा या

मंडळीची उचलबांगडी झाली . वुडहाऊस म्हणतो : "" त्या तुरूंगाचा निरोप घेताना माझ्या

डोळ्यांत अश्रूबिश्रू काही आले नाही . पण वॉर्डरने आमच्या व्हॅनचा दरवाजा बंद करून

` हौ टु ' ने सुरू होणारी अमेरिकेत बरीच रंगारी लोकप्रिय पुस्तके आहेत . ` हो टु विन फ्रेंडस , ' ` हौ

टु बी ए मिलिओनर ' - अशी झटपट रंगारी बनवणारी पुस्तके . वुडहाऊसने आपल्या

भाषणांना ` पूर्वशिक्षण नसूनही फावल्या वेळात स्थानबध्द कसे व्हावे ? ' असे नाव दिले आहे .

लूस तुरूंगानंतरचा ह्या चव्वेचाळीस स्थानबध्दांचा आगगाडीचा प्रवास चक्कगुरे न्यायच्या

डब्यातून झाला . त्या चेंगराचेंगरीचे वर्णन करताना वुडहाऊस म्हणतो :



"" लहान वयात विडया वगेरे ओढायची सवय लागल्यामुळं वाढ खुंटलेल्या घोडयांच्या

शिंगरांतली जेमतेम आठ शिंगरे त्या डब्यात मावतील एवढया जागेत चाळीस माणसं

कोंबली तर ती अवघडणारच . आम्ही पन्नास होतो रात्री जरा पाय ताणावा म्हटलं तर

दुसऱ्या उतारूला लाथ बसायची . त्यालाही असंच काही वाटलं तर आपल्याला . डब्याच्या



पान नं . 185

खालच्या फळ्यांना भोकं होती . त्यांतून बर्फासारखा गार वारा आमच्या तंगडयांशी रूंजी

घालायच्या . वरच्या छतावरून येणारा तसलाच वारा आमच्या डोक्याशी खेळायचा . आम्ही

सर्व जण चाळिशी - पन्नाशीपलिकडले होतो , पण कुणालाही न्युमोनिया झाला नाही . गुडघे

धरणं नाही , पाठ धरणं काही नाही . मला वाटतं , स्थानबध्दांची काळजी घेणारा एक

स्पेशल परमेश्वर असावा . ""



शेवटी ही दिंडी बेल्जममधल्या लीज गावी आली आणि नाझी सेनिकांनी ह्या लोकांना एका

डोंगरी गडावर पिदवत नेले आणि तिथल्या बराकीत बंद केले .



"" तिथंल वातावरण उत्सावाची तयारी होण्यापूर्वी असतं तसं होतं . पार्टीत

पाहुणेमंडळी वेळेच्या आधीच पोहोचल्यावर होईल त्या थाटाचं . सगळा गोंधळ . मुख्यतः

जेवणाचा . एखाद्या विसरभोळ्या कवीवर ही व्यवस्था सोपवली असावी आणि

स्थानबध्दांना जेवण लागतं ही गोष्ट तो विसरला असावा .



` खरंच ! ताटवाटया वगेरे लागतात नाही का ? का हो ? थेट उकलत्या हंडयात तोंड

घालून सूप मटकावता येणं त्यांना जमण्यासारखं नसेल - नाही का ? ' असंही तो म्हणाला

असेल . शेवटी आम्ही डोकी लढवून तो प्रश्न सोडवला . ""



डोकी लढवून प्रश्न सोडवला म्हणजे काय केले ? त्या बराकीच्या मागल्या बाजूला जुन्या

डब्यांचा , बाटल्यांचा , किटल्यांचा आणि मोटारीच्या तेलाच्या डबडयांचा बेल्जियम सोल्जरांनी

टाकून दिलेला ढिगारा साठला होता , तो उपसून ह्या स्थानबध्दांनी आपल्या पेल्यांची सोय केली .

वुडहाऊसच्या वाटयाला "" मोटारीच्या तेलाचं रिकामं डबडं आलं होतं . त्यामुळे माझ्या सूपला

इतरांना न लाभलेली एक चव आली होती . ""



त्या बरकीत प्रचंड घाण होती . स्थानबध्दांनाच ती साफ करावी लागली . तिथले संडास ही

तर खास गोष्ट होती . शिवाय , रोज तीनतीन वेळा यार्डात आठशे स्थानबध्दांची ` गिनती '

करायला तासतास त्यांना उभे करायचे . पाचा - पाचांच्या रांगा धरायला लावायचे . त्या धड

कधी लागायच्या नाहीत . दरवेळी निराळी बेरीज व्हायची . कॉर्पोरेलसाहेब पुन्हा मोजायला

लागायचे .



"" एकूण आम्हांला पाच वेळा मोजून काढावं लागे . स्थानबध्द सॅण्डी यूल , ह्या मोजणी -

परेडच्या वेळी आम्ही पाचांच्या रांगेत सातव्या आणि आठव्या नंबराला उभे होतो तेव्हा

म्हणाला , ` युध्द संपल्यावर , माझ्यापाशी जर भरपूर पेसे साठले तर मी एक जर्मन सोल्जर

विकत घेऊन बागेत उभा करणार आहे आणि दिवसातून सहा वेळा त्याला मोजून

काढणार आहे . '



थोडक्यात म्हणजे तासन््तास ही आठशेएक स्थानबध्द मंडळी उभी आणि कॉर्पोरेल ,

वॉर्डर सार्जंट आपले मोजताहेत . एकदा तर चक्क आठ लोक कमी भरले . मग धावाधाव .

( जर्मन सार्जंटने तेवढयात कुणीतरी रांग सोडली म्हणून जर्मन भाषेतून शिव्या दिल्या . फ्रेंच

दुभाष्याने त्या शिव्यांचे फ्रेंचमधून भाषांतर केले . ) शेवटी सगळ्यांना पुन्हा बराकीत कोंबून

कोठडी बाय कोठडी मोजले , तरीही आठ कमी . सगळे लष्करी अधिकारी चिंतेत . शेवटी

फ्रेंच दुभाष्याला आठवलें . तो म्हणाला , ` साहेब , हॉस्पिटलमधल्या स्थानबध्दांचं काय ? '



अधिकारीगण हॉस्पिटलात धावला . तिथल्या आडव्या झालेल्या स्थानबध्दांची संख्या

आठ भरली . ताळेबंद जमला . ""



पान नं . 186

एकदा स्थानबध्द म्हटला की माणसाचा फक्त ` क्रमांक ' होतो . वुडहाऊस हा एक असामान्य

साहित्यिक होता . कुणाविषयी आकस न ठेवता , कुणालाही माणसांतून उठवण्याचा प्रयत्न न

करता आपल्या निर्मळ विनोदाने त्याने लक्षावधी लोकांना आनंद दिला होता . पण स्थानबध्द

झाल्यावर त्याचाही नुसता केदी नंबर सातशे शहाण्णव झाला .



जर्मन अधिकाऱ्याने त्याला लीजच्या बराकीत संडास साफ करण्याचे काम दिले . रेडिओ -

वरच्या भाषणात त्याने हा अनुभव सांगतानादेखील कुणाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न

केला नाही . तीच विनोदी धाटणी :

"" लीजच्या बराकी साफ करायला आम्हांला फार दिवस लागले . मला कुणाचा अपमान

करायचा नाही ; पण एक सांगतो - तुम्ही जोपर्यंत बेल्जियम सेनिकांनी वापरलेला संडास

साफ करण्यास हातभार लावला नाही , तोपर्यंत मी म्हणेन की तुम्ही काहीच पाहिलेलं नाही .

काही वर्षांनंतर मला जर कुणी येऊन विचारलं की , ` का हो ? ह्या महायुध्दात तुम्ही काय

केलतं ? ' तर मी सांगेन , ` लीजच्या बराकीतले संडास साफ केले . ' आणि मला प्रश्न

विचारणारा माणूस चटकन ` वाटलंच मला . ' असं म्हणणं अशक्य नाही . कारण वारा

अनुकूल असला तर अजूनही माझ्या दिशेने तो परिमळ दरवळतो . कुणीसं म्टलंय ना ,

तुम्ही काचेची फुलदाणी कितीही फोडलीत तरी तिला चिकटलेला गुलाबाचा वास कसा

जाणार ? ""



मला राहून राहून नवल वाटते की , वुडहाऊसच त्या बर्लिन ब्रॉडकास्टमध्ये जर्मनांची सतत

टोपी उडवतोय हे कोणाच्याच लक्षात कसे आले नाही ? आपल्या आवडत्या लेखकाला शत्रूने

असे सक्तीने संडास साफ करायला लावले हे ऐकून चीड यायला हवी होती . पण झाले भलतेच .

बी . बी . सी . वरून विल्यम कॉनर नावाच्या लेखकाने तर ` हिटलरची स्तुती करण्याच्या

कबुलीवर वुडहाऊसने स्वतःची मुक्तता मिळवली ' इथपर्यंत गरळ ओकले . त्याच्या त्या टीकेत

वुडहाऊस काय बोलला याविषयी अक्षरही नव्हते . त्यामुळे लोकांची समजूत , वुडहाऊस

` नाझी प्रचाराची भाषणं करतो आहे ' हीच झाली . बी . बी . च्या गव्हर्निग बॉडीनेदेखील

हे असत्य आहे म्हणून असल्या खोटेपणाला स्थान द्यायचे नाही असे ठरवले . पण प्रचार

# खात्याच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर सक्ती करून कॉनरचा वुडहाऊसविरोधी अपप्रचार चालू

ठेवला .



लीजवरून वुडहाऊस आणि इतर नेहमीचे यशस्वी सातशे नव्याण्णव स्थानबध्द ह्यांची

उचलबांगडी ह्यू नावाच्या एका गडावर असलेल्या कॉन्सेन्ट्रेशन कँपमध्ये झाली . जीवघेणी

थंडी . अंथरूण - पांघरूण नाही . वुडहाऊस म्हणतो : "" प्रेवशद्वारातून शिरल्यावर उजव्या बाजूला

एक देखणा संडास होता . "" ह्या स्थानबध्द शिबिराच्या प्रमुख संचालकांना एकच माहिती होते :

"" कुठलाही स्थानबध्द काहीही करीत असला की , त्याला ते कारयाची मानई करायची . "" पावाचा

तुकडा , कॉफी असावी असा संशय उत्पन्न करणारे एक पेय आणि सुकवलेल्या भाज्या उकळून

केलेले सूप . ह्या उपासमारिचे वर्णनही वुडहाऊस गंमतीतच करतो :



"" ह्या अपुऱ्या आहाराला पूरक अन्न म्हणून आम्ही निरनिराळे प्रयोग सुरू केले .

माझी आगपेटीतल्या काडया चघळण्यावर श्रध्दा जडली . पुढल्या दातांनी चावून चावून

त्याचा लगदा झाला की त्या गिळायच्या . पोट भरत नव्हतं . पण भुकेला आधार म्हणून

वाईट नव्हतं . कधीमधी कँटीन उघडलं तर आम्हांला अर्धा इंच रूंद , अर्धा इंच लांब आणि



पान नं . 187

पाव इंच जाड चीज मिळायचं . ते खाण्याची कृती अशी : शेक्सपिअरचं सुनीत छापलेलं

किंवा टेनिसच्या एखाद्या बऱ्यापेकी कवितेचं पान घ्यावं , त्यात ते गुंडाळावं . . चवीला

आगपेटीतल्या चार काडया टाकाव्या . . . पदार्थ खायला चांगला लागतो . ""



ह्यूच्या किल्ल्यातल्या मुक्कामात भोगाव्या लागणाऱ्या ह्या हालांबद्दल वुडहाऊस असा थटटेने

बोलत होता . तिथून मग उत्तर सायलेशियातल्या टोस्ट नावाच्या गावी नेऊन तिथे त्यांना एका

इमारतीत डांबले . तिथे पूर्वी वेडयांचे इस्पितळ होते . तीन दिवस आणि तीन रात्री एका जागी

बसून आगगाडीचा प्रवास . त्या अवधीत अर्धे सॉसेज , अर्धा पाव आणि थोडे सूप ही मेजवाणी .

पहारा , मागे , पुढे संगिनी घेतलेले नाझी सोल्जर्स उभे . अशा अवस्थेत ह्या पठठयाने चक्क एक

विनोदी कादंबरी लिहिली . इथे वुडहाऊसचा मुक्काम बेचाळीस आठवडे होता . स्थानबध्द

मंडळीत रोज एखादी आशादायक अफवा उठायची . ती कधीही खरी ठरत नसे . पण

वुडहाऊस मात्र ` अँन अँपल ए डे कीप्स द डॉक्टर अवे ' ह्या चालीवर म्हणतो : "" ए रूमर ए

डे कीप्स द डिप्रेशन अवे . ""



रोजची नवी अफवा मनाचा थकवा दूर सारायची . स्थानबध्दांत प्रोफेसर होते , गायकवादक

होते , भाषांपंडित होते , व्याख्याते होते . कधीकधी एकमेकांत मिसळायचे क्षण मिळायचे .

आलिया भोगासी म्हणत सारे जगत होते . त्यांचे मनोधेर्य विलक्षण होते . वुडहाऊस म्हणतो :

"" इतका आनंदी जमाव यापूर्वी मला कधी भेटला नव्हता . त्यांच्यावर माझं भावासरखं प्रेम

जडलं होतं . "" स्थानबध्देत अनुभवलेल्या सगळ्या हालांचे वर्णन विनोदात गुंडाळून

लोकांपर्यंत पोचवणाऱ्या वुडहाऊसच्या ह्या भाषणांचा शेवट मात्र ह््द्य आहे . शेवटपर्यंत त्याची

कल्पना अशी की , भाषणे अमेरिकन कंपनीने अमेरिकेतल्या श्रोत्यांसाठी ध्वनिमुद्रित केली

आहेत . त्याची इंग्लंडमध्ये अशी विपरीत प्रतिक्रिया होत आहे हे त्याच्या श्वप्नातही नव्हते .

बंदिवासात रेडिओ कुठून ऐकणार ? ह्या भाषणांमुळे अमेरिकतेल्या आपल्या शेकडो वाचकांना

आपण जिंवत आहोत आणि स्थानबध्दतेतल्या हालांना पुरून उरलो आहोत हे कळावे ही

इच्छा . म्हणून इंग्रज नागरी स्थानबध्द क्रंमाक 796 ह्या भूमिकेतून तो शेवटी म्हणतो :



"" मी स्थानबध्दतेत असताना अमेरिकतेल्या ज्या दयाळू लोकांनी मलापत्रं पाठवली

त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो . अशा पत्रांचं , विशेषतः मला ज्या प्रकारची पत्रं आली

तशा पत्रांचं स्थानबध्दाला वाटणारं मोल , ज्याला कधी तुरूंगवास घडला नाही त्याला

कळणार नाही . ""



महायुध् संपले . वुडहाऊसवर झालेल्या अन्याबद्दल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये वादविवाद

झाला . संपूर्ण चौकशी झाली . वुडहाऊस निर्दोषी होता हे ठरले . मरणापूर्वी वर्ष - दीड वर्षे आधी

ब्रिटिश राणीने त्याला ` सर पेल्हॅम ' केले . पण बूंद से गयी वह हौद से नहीं आती . त्याला एकच

समाधान होते : ज्या पिढीने आयुष्यात कधी हाडामासाचा बटलर किंवा लॉर्ड पाहिला नाही ,

विसाव्या शतकाच्या आरंभकाळातले इंग्लंड पाहिले नाही , ती नवी पिढीसुध्दा सत्तर

वर्षांपूर्वीच्या त्याच्या वाचकांसारखी लक्षावधींच्या संख्येने त्याची पुस्तके वाचून मनमुराद

हसत होती .



त्र्याण्णव वर्षांचा वुडहाऊस . त्याची एकोणनव्वद वर्षांची बायको एथेल . तिच्याविषयी

विल्यम टाऊनएडला लिहिलेल्या पत्रात वुडहाऊस म्हणतो :



पान नं . 188

"" बायका काय वंडरफुल असतात नाही ? एथेलनं हे सारं कसलीही तक्रार न करता

सहन केलं . किती विलक्षण , सुरेख होतं तिचं वागणं ! गेली तीस वर्षे आपल्या प्रेमातून

आणि कौतुकातून ती मला स्फूर्ती देत आली . त्याचा ह्या काळात तिनं नवा उच्चांक

गाठला . ""



संध्याकाळची वेळ . बंगलीच्या ओसरीवर हे वृध्द जोडपे शरी पीत बसले होते .

` न्यूयॉर्कर ' चा लेखक हर्बर्ट वॉरन विंड पाहुणा म्हणून आला होता . वृध्द एथेल आपला नवरा

टी . व्ही . वर त्याला अजिबात न कळणारा अमेरिकन फूटबॉलचा खेळ पाहत बसतो म्हणून

थटटा करीत होती . आयुष्यभर अमेरिकेत राहिलेला प्लम हा मनाने इंग्रजच राहिला . क्रिकेट

हाच त्याला कळणारा खेळ आणि गोल्फ . त्यातला तर तो उस्ताद होता . पण अमेरिकन

फूटबॉल ? खेळता खेळता खेळाडू एकत्र येऊन गोल कोंडाळे काय करतात , रेटा देऊन बॉल

काय पळवतात , त्यात वुडहाऊसला काही कळत नसे . मग वुडहाऊसला सांगायला लागला ,

"" अग मला अमेरिकन फूटबॉल कळतो असं नाही . पण मजा काय ती ठाऊक आहे तुला ? ते

भिडू धावपळ सुरू करतात , आणि मध्येच एकत्र जमून कोंडाळं करून क्रिडाविषयक चर्चा

करतात . ""



थोडा वेळ स्तब्धता होते . बंगलीपुढच्या हिरवळीकडे आणि काठावरच्या उंच वृक्षांच्या

रांगेकडे दोघेही शांतपणाने पाहतात . मग वुडहाऊस म्हणतो , "" किती छान दिसतात नाही

हिरवळीवर उतरलेली ही संध्याकाळची उन्हं . . . ""



जीवनाच्या संध्याकाळीही त्याच्या मनात तशीच हिरवळ होती . तशीच उन्हे होती . स्थानबध्द

तेतही हाल आणि त्याहूनही त्याच्या लाडक्या इंग्लंडने त्याचा कोणताही अपराध नसताना
केले त्याचे ह्दयशून्य चारित्र्यहनन त्या अंतर्मनातल्या हिरवळीचा हिरवेपणा आणि प्रकाश
नष्ट करू शकले नव्हते . जर्मनीने इतके हाल करूनही "" प्लम , तुला जर्मन लोकांचा तिटकारा येत नाही का ? "" ह्या प्रश्नाला उत्तर देताना प्लम म्हणाला होता , "" गडयांनो , मी असा घाऊक
तिटकारा कधी करीत नाही ."" त्या दिवशी आगगाडीत मी वुडहाऊसचे पुस्तक उघडले . पहिल्या परिच्छेदातच हसू फुटले ,
पण हसता हसता डोळ्यांत पाणी आले ते केवळ हसण्यामुळे आले असे नाही वाटले !