मनातील आठवन
मनातच थबकली
काळजातील कळीने
पापणी मुकेच हबकली || १||
तू गेली तेव्हाच
डोळे आटले होते
पुन्हा जुन्या आठवणीनी
आसवे साठले होते || २||
आसवांची हिम्मत
आता नाही जुनी
डोळ्यांतील आसवांना
कुंठित केले कुणी ? || ३||
का तू सहज
इतकी झाली लाचार
जगात कमी होते का ?
वर तुझे अनाचार ! || ४||
तुझे बेधुंद विचार
अन् थकलेले शरीर
जर परत करत असेल
तुझे पवित्र मन || ५||
फ़क्त एकदाच येउन
मी परतले आहे
माझ्या गोठलेल्या
कानात येउन म्हण ! || ६||
तूला माझे नाही
आता करता येणार
पण तुला वा-यावर सोड़ने
मला तरी नाही जमणार || ७||
मी तुला खात्री देतो
मी तुला जपेल
तुझा कधीही नाही
पण तुझ्यासाठी खपेल || ८||
---------------------------------बाजी दराडे !

अगं अगं बाई
नको करू घाई
जाहिरात तुझी आई
माझे फॅशन बाई ||१||
तू ना एकाची
ना बाप / लेकाची
तू तर सर्वांची
लड़की आहेस ||२||
फॅशन तुझे नाव
नावातच ठाव
तुला खुपच भाव
आलेला आहे ||३||
तुझे नवनवे रूप पाहताच
तरुण नाचायला लागतात ,
म्हाता-यांचे तर विचारायला नको
तरुणांच्या पुढे स्वागताला धावतात ||4||
तुला माझी विनंती
मान घेशील किती
जोड़शील का सर्वांशी
प्रेमळ नाते तू ||५||
----------------------------- बाजी दराडे

परवाच पाऊस येउन गेला,
कुणीतरी आठवण काढते आहे !
असा निरोप देऊन गेला .

त्याचा प्रत्येक थेंब
माझ्या भेटीसाठी तरसलेला
आणि माझ्या सर्वांगावर

शब्द होउन बरसला.
मी त्याला विचारले
पावसाळा नसताना तू का आला ?

तर तो माझ्यावरच ओरडला
तुला माहित नाही का
तो तुझा वेडा प्रिया.

डोळ्यात पकडून ठेवतो मला
मग माझा कोंडमारा होतो
मी क्षणोंक्षणी झुरत राहतो

चल आताच माझ्या बरोबर
आणि मुक्त कर मला.
मी म्हटले तू पण वेडाच आहे

बघ माझ्या डोळ्यात
त्यात तोच आहे
पण मी नाही झुरत,

माहित आहे मला
तो माझाच आहे.
मला काही झाले तर

तो कसा राहिल ?
माझ्या शिवाय माझे
दु:ख तो एकटा कसा वाहील ?

आल्या पाउली परत फिर
माझ्या प्रियाला निरोप दे
सांग मी फ़क्त त्याचीच आहे

फ़क्त शब्द नाही येत ओठावर
पण वेडे मन त्याच्याच वाटेवर
सांग त्याला डोली सजवून आणायला

त्याच्या प्रियेला घ्यायला
मी त्याचीच वाट बघतेय
सांग माझ्या प्रियाला.

तो पण आनंदाने
आल्या पाउली परत गेला
आणि पहाटेचा गारवा होउन

निरोप घेउन आला.
अंगावर रोमांच फुलवून
बसला मिठीत घेउन

आणि दवबिंदू उधळून हसला
म्हणाला तू मला मुक्त केले.
मी रोज येइन तुझ्या भेटीला

आणि तुझ्या प्रियाचा स्पर्श
आणेल माझ्या साथीला
आता तो रोजच येतो

साथीला प्रियाचा निरोप
अन् स्पर्श देऊन जातो,
तो रोजच पहाट गारवा होउन येणार आहे

माझ्या प्रियाचा निरोप देणार आहे.
माझा प्रिया येई पर्यंत
मला दवबिंदूत भिजवनार आहे.
--- ----- ------------------------ बाजी

अंधाराची सुरवात अन् प्रकाशाचा अंत ,
आमवसेच्या अंधाराला , चंद्राचीच खंत ||१ ||
चंद्राचा प्रकाशाला , अंधाराचा आधार ,
सोबतीला असतो , चांदण्यांचा भार || २ ||
नदीकाठी रात्रीला , तारुण्याचा बहार ,
हिरव्या हिरव्या अंगावर , फुलांची चादर || ३ ||
प्राजक्ताचा घमघमाट , अन् रातरानी गोड,
मंद मंद मोग-याला , केवड्याची जोड़ || ४ ||
श्रुंगाराने बहरते , अन् अंघोळ तिला सुचते ,
पहाटभर ओल्याचिंम्ब, अंगाने नाचते || ५ ||
नाचताना तिला पाहून , चंद्र होई अनावर,
सूर्य येताना पाहून , तीही येते भानावर ||६ ||
शृंगार सोडून मागे , ती लाजुन दूर जाते ,
मनवताना चंद्राला , कधी कधी एकाकी रहते || ७ ||

भले हिटलर नसेल आज
पण आहेत त्याच्या खुणा,
जागोजागी , क्षणोंक्षणी
जाणवतात पुन्हा पुन्हा || १ ||
भयाने कोंडटलेले श्वास
अन् रक्ताळलेले भास्
विस्फारलेले डोळे
बघतात मुडदयांची रास || २||
गोळयांचे पाऊस
आणि बेधुंद आग
घोंगावताना मृत्युला ही
रक्ताचाच माग || ३||
सरणावर प्रेत
जळण्याचे विसरते
जवानीचे पोरीच्या
गिधाड लचके तोड़ते || ४||
पिसाळलेल्या लांडग्याला
लावतात मेंढ़यांची वाघर ,
राजाच जाळतोय
स्वत:चेच नगर || ५ ||
स्वस्तात मरणाचा
लिलाव चालूच असतो
फ़क्त नंबर कुणाचा
शोधत आम्ही बसतो || ६ ||
समरभूमीचे पाईक
आज झाले षंड
थिजलेल्या रक्ताने
होइल का बंड ? ||७||
वैदाचे पोर फिरतात
कुत्र्या शिवाय शिकारीला
दारोदार वैदीन मागते
कालच्या शिळया भाकरीला || ८ ||
---------------------------------- बाजी

--------- नेता -------
जिने मला जन्म दिला
तिलाच मारल्या मी लाथा !
ओळखा बघू मी कोण ?
आहो मी आहे तुमचाच नेता ! - १ -
नसतात मला काही
बंधू- भगिनी चे नाते
मी तुमचा नेता अन्
तुम्ही लाचार मतदाते - २ -
सख्खा बाप-भाऊ सुद्धा
मानतो मी वैरी
तुमच्या आई- बहिणीची
इज्जत लुट्न्याची मज्जाच लई न्यारी - ३ -
अंतयात्रेत रडताना मला
भाषणाची लई हौस ,
घरोघरी संडास योजनेतूनसुद्धा
पाडतो मी पैशाचा पाउस - ४ -
मी लाचार !, मी भ्रष्ट्राचारी !
पण माझीच कॉलर टाइट
स्वत:साठी तुम्हीसुद्धा कमवता
मग सांगा मीच का वाईट - ५ -
माझ्याकडेच उद्योग धंदे खुप
आणि काळया पैश्याचाही छंद,
रक्त जाळताना तुमचे
मिळतो मला आसुरी आनंद - ६ -
माझ्याकडे सत्तापदे
नका शिरू वाकडयात
मला जर नडाल तर
याद राखा! तुमची माझ्याशी गाठ -७ -
मी जरी गेलो तरी
येतील दोस्त माझ्याच साथिचे
यातून मुक्ति नाही तुमची
आम्ही "वैश्विक नेता " जातीचे -८-
-------------------------------------- बाजी