जी-मेलमध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारची अॅटॅचमेंट (उदा. pdf, doc, xls, wmv, ppt) असलेले मेल कसे शोधावे, अशी विचारणा साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे वाचक सचिन दुभाषी यांनी केली होती. जी-मेलच्या सर्च बॉक्समध्ये पुढील फॉरमॅटमध्ये क्वेरी दिल्यास तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळू शकेल. तुम्हाला पीडीएफ अॅटॅचमेंट असलेल्या मेल्स शोधायच्या असतील तर पुढीलप्रमाणे सर्च द्याः filename:{pdf} याच पद्धतीने तुम्ही महिरपी कंसात स्पेस देऊन विविध प्रकारच्या अॅटॅचमेंट्स शोधू शकता. एखाद्या ठराविक व्यक्तीकडून आलेल्या अॅटॅचमेंट शोधण्यासाठी अॅडव्हान्स्ड सर्च अॉप्शन्समध्ये जाऊन From मध्ये त्या व्यक्तीचे नाव व Has the words मध्ये filename:{pdf doc} असे टाईप करा. तुम्हाला हवे ते रिझल्ट्स मिळतील. वेळ वाचवण्यासाठी ही टिप खूप उपयोगी ठरते.

मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला. २६ नोव्हेंबरच्या रात्री सुरू झालेले ते भयनाट्य तब्बल ६० तास सुरू राहिले आणि आपल्यापैकी अनेकांनी न्यूज चॅनेल्सवर हे नाट्य लाईव्ह पाहिलेच असेल. या घटनेनंतर भारतीय न्यूज चॅनेल्सवर टीकेची झोड उठली. न्यूजवॉच या वेबसाईटने यासंबंधी एक झटपट survey घेतला. हा survey तुम्ही येथून डाऊनलोड करू शकता. असो. याच घटनेच्या वेळी तरुणांनी सोशल मीडियाचा - अथर्थात ट्विटर, फ्लिकर, फेसबुक इ.चा मोठ्या प्रमाणावर वापर केला (ई-सकाळवरील ही बातमी वाचा). अनेकांनी न्यूज चॅनेल्सपेक्षा या सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवला. सोशल मीडियासाठी सोर्स होते तुमच्या-आमच्यासारखे लोक. काही थेट घटनास्थळाहून माहिती देत होते; काही ताज, ओबेरॉयमध्ये अडकलेल्या मित्रांशी फोन, एसएमएसद्वारे संपर्क साधून माहिती देत होते. सोशल मीडियातून लाईव्ह व्हिडीओज मात्र प्रसारित झाले नाहीत. घटनेचे गांभीर्य ध्यानात घेता, एका अर्थाने बरेच झाले असे म्हणावे लागेल. पण तुमच्यासमोर बातमीमूल्य असलेली घटना घडत असताना तुम्ही व्हिडीओ फॉर्ममध्ये ती इतरांशी थेट शेअर करू शकलात तर?

होय. असे करता येणे शक्य आहे. मोबाईलचा वापर करून एखादा व्हिडीओ तुम्ही आता थेट इतरांशी शेअर करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे जीपीआरएस अथर्थात मोबाईल इंटरनेट कनेक्शन आणि क्विक असणे गरजेचे आहे. क्विक(Qik) ही सेवा वापरून तुम्ही मोबाईलवरून शूट करत असलेला व्हिडीओ थेट इतरांशी शेअर करू शकता. क्विक आयकफोन, ब्लॅकबेरी, विंडोज मोबाईल आणि सिंबियन फोनसाठी उपलब्ध आहे. क्विक वापरण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. १. क्विकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. यासाठी केवळ २ ते ३ मिनिटे लागतात. २. त्यानंतर तुमचा मोबाईल हॅंडसेट निवडून क्विकचे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करून घ्या. तुम्ही एसएमएसने वॅप लिंक मागवू शकता अथवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून ब्लुटूथने मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता.

३. मोबाईलवर क्लिक इन्स्टॉल झाल्यानंतर त्यातून तुमच्या क्विक अकाऊंटवर लॉग-इन व्हा. ४. आता क्विकमध्ये जाऊन स्ट्रीमवर क्लिक केल्यानंतर काही क्षणांत तुम्ही शूट करत असलेला व्हिडीओ तुम्ही कॉम्प्युटरवर पाहू शकाल. लक्षात ठेवा, क्विकचा वापर करून स्ट्रीम केलेला पहिला व्हिडीओ तुम्हाला सवर्वांसोबत शेअर करावा लागतो. त्यानंतर मात्र तुम्ही ग्रुप्स तयार करून तो ठराविक लोकांसोबत शेअर करू शकता. ५. स्ट्रीम होत असलेला व्हिडीओ लाईव्ह पाहता येतो. त्यानंतर तो तुम्ही FLV, 3GP किंवा MP4 फॉरमॅटमध्ये डाऊनलोडही करून घेऊ शकता. व्हिडीओ कुठे शूट केला याचे लोकेशन गुगल मॅपवर पाहता देखील येते.
क्विकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्ट्रीमिंग सुरू असताना तुम्ही इतरांशी चॅटही करू शकता. म्हणजे, तुम्ही समोरच्या व्यक्तीस हवा तसा कॅमेरा फिरवून त्याला हवा तो अॅंगल मिळवून देऊ शकता. न्यूज चॅनेल्स आणि न्यूज वेबसाईट्सना या सेवाचा प्रचंड फायदा होऊ शकतो.

तुम्हाला मूडनुसार वॉलपेपर बदलणं आवडत असेल तर तुम्ही गुगलवर ‘जरा हटके’ वॉलपेपर शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असाल. व्यर्थ अशासाठी की वॉलपेपर असा सर्च दिल्यास शेकडो साईट्स मिळतात, पण त्यातल्या काहीच साईटवर तुम्हाला हवे तसे वॉलपेपर्स मिळतात. मिळालेल्या वॉलपेपर्सचा आकारही तुमच्या स्क्रीन रिझोल्यूशनला कम्पॅटिबल नसेल तर मग स्ट्रेच, टाईल असे प्रकार आपण करून बघतो. पण त्याने मूळ वॉलपेपर डिस्टॉर्ट होतो व त्यातील गंमत निघून जाते.

तुम्हाला आवडेल असा आणि तुमच्या स्क्रीन साईजचा वॉलपेपर देणारी साईट म्हणजे इंटरफेस लिफ्ट. या साईटवर तुम्हाला हव्या त्या रिझोल्यूशनचे (वाईडस्क्रीन, ड्यूअल मॉनिटर, एचडीटीव्ही, मोबाईल इ.) वॉलपेपर्स मिळतील. आर्टिस्ट्स आणि टॅग्जनुसार सर्व वॉलपेपर्सचे वर्गीकरण केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला आवडीचे वॉलपेपर शोधण्यासाठी फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. या साईटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर विंडोज आणि मॅकिन्तोषसाठी लागणारे आयकॉन्स आणि थीम्सही उपलब्ध आहेत.

नव्या वषर्षात हिशेब मांडून ठेवण्याचा निश्चय केल्यानंतर शैलेशने आणखी एक निश्चय केलाय. टेलिफोन बिल, मोबाईल बिल आणि इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यात त्याचा अर्धा गुरूवार गेल्याने तो जाम वैतागला सेफ्टी, सिक्युरिटी सर्व काही बाबी तपासून शक्य तेवढी बिलं अॉनलाईन भरायची असा निर्णय त्याने घेतलाय. तुम्ही अजूनही रांगेत उभे राहत असल्यास, अॉनलाईन बिल पेमेंटचा विचार करावयास हरकत नाही. तुम्ही म्हणाल, आपल्याकडे (भारतात) हे फारसं चालत नाही - पण जरा खालील आकड्यांवर नजर टाका, म्हणजे याचा अंदाज तुम्हाला येईल.
मुंबईतील २८ टक्के, दिल्लीतील २२ टक्के, चेन्नईतील १२.५ टक्के, बेंगळुरूतील १२ टक्के लोक त्यांची बिलं अॉनलाईन भरतात. - प्रमुख १० शहरांतील एकूण पोस्टपेड मोबाईलधारकांपैकी ७५ टक्के मोबाईलधारक, ७० टक्के क्रेडिट कार्डधारक, ६० टक्के वीजधारक संबंधित सेवांची बिलं अॉनलाईन भरतात, असे असोचॅमने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.

अॉनलाईन बिल भरणाऱ्यांमध्ये १८ ते ३६ वयोगटातील तरुणांची संख्या अधिक असल्याचेही (६८ टक्के ) या अभ्यासात म्हटले आहे. ३६ ते ६० या वयोगटातील सुमारे ३१ टक्के लोक अॉनलाईन बिलाचा पयर्याय स्वीकारतात. - सवर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अॉनलाईन बिलिंगचा पयर्याय स्वीकारलेली व्यक्ती वषर्षाला तब्बल ८० तासांचा वेळ वाचवते…

आता बोला!अॉनलाईन बिलिंगसाठी तुमच्याजवळ डेबिट अथवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बॅकिंगची सुविधा असणे गरजेचे आहे. तुमच्या बॅकेतफर्फे इंटरनेट बॅंकिंगची सुविधा मिळत असल्यास त्यासाठी अर्ज करा. क्रेडिट कार्डचे पेमेंट, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन, मोबाईल बिल याशिवाय प्रॉपटर्टी टॅक्स, पाणीपट्टी आदी सर्व तुम्ही अॉनलाईन भरू शकता. त्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही सेवेचा वापर करता येऊ शकतोः
बिलडेस्कः http://www.billdesk.com/
बिल जंक्शनः https://www.billjunction.com
ईझी बिल इंडियाः http://www.easybillindia.com/
व्हिसा बिल पेः http://www.visabillpay.in

याखेरीज इन्शुरन्स पॉलिसीजचे प्रीमियमदेखील अॉनलाईन भरता येते. टाटा स्काय किंवा डिश टीव्ही सारख्या डीटीएच सेवादेखील अॉनलाईन रिचार्ज करता येतात.

शैलेशच्या डायरीतले एक पानः पुढच्या वषर्षापासून (म्हणजे १ जानेवारी, २००९ पासून) डेली एक्स्पेन्सेस लिहून ठेवायचं ठरवलं आहे. त्यासाठी नवी डायरी आज आणली-‘व्हीनस’मधून. मग येता-येता दीपकसोबत ‘रुपाली’त बसून इडली-वडा, फिंगर चिप्स आणि कॉफीपान असा कार्यक्रम झाला. गुडलक चौकातून काही नवी पुस्तके आणि मासिके घेतली आणि पेट्रोल भरून सरळ घरी आलो.

शैलेशप्रमाणेच तुम्हीदेखील नव्या वषर्षापासून हिशेब लिहून ठेवायचे ठरवले असेल. अगदी गेल्या वषर्षी ठरवले होते, तसेच. हिशेब लिहून ठेवणे ही खूप चांगली सवय असली तरी ती जमणाऱ्यांनाच जमते. तुमच्या-आमच्यासारखे फार तर आठवडाभर हिशेब लिहून ठेवू शकतात. कंटाळा केला की डायरी पुढे वर्षभर कोरीच राहते. तुमच्यासारख्या नेट सॅव्ही लोकांना तर डायरी वगैरे सांभाळणे अाणखीनच कठीण जाते. कल्पना करा, हिशेब मांडण्यासाठी तुम्ही जी-टॉक किंवा याहू मेसेंजर किंवा ई-मेल वापरू शकलात तर?

एक्स्पेन्सर ही अशीच एक सेवा. मंदीच्या काळात तर एकेका पैशाचा हिशेब लिहून ठेवण गरजेचे होणार आहे. तुम्ही जर इंटरनेटचा भरपूर वापर करीत असाल तर एक्स्पेन्सर ही सेवा वापरून तुम्ही तुमचे डेली एक्स्पेन्सेस अॉनलाईन स्टोअर करून ठेवू शकता. एक्स्पेन्सरवर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही याहू, गुगल, एओएल आणि एमएसएन इन्स्टा मेसेंजर वापरून तुमचा दैनंदिन हिशेब नोंदवून ठेवू शकता. Xpenserbot तुमच्या फ्रेंडलिस्ट मध्ये अॅड केल्यानंतर तुम्ही Petrol on 16th Dec. Rs. 100 असा मेसेज पाठवला की याची नोंद थेट एक्स्पेन्स रिपोर्टमध्ये केली जाते. तुम्ही ट्विटरवरूनही हिशेब नोंदवू शकता. d xpn Petrol on 16th Dec. Rs. 100 असे टाईप करून तुमचा हिशेब पाठवू शकाल. d xpn म्हणजे direct message to Xpenser. याखेरीज तुम्ही ई-मेलच्या Subject लाईनमध्ये Petrol on 16th Dec. Rs. 100 असे टाईप करून e@xpenser.com यावर ई-मेलही पाठवू शकता. अमेरिका आणि कॅनडातील रहिवासी EXP टाईप करून 66937 (MOZES) ला एसएमएस पाठवून हिशेब नोंदवू शकतात. त्यांच्यासाठी व्हाईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे.

एक्स्पेन्सर वापरायला लागल्यानंतर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी एक्स्प्लोअर करता येतील. महिन्यांनुसार कीवर्ड करून त्या-त्या महिन्याचे एक्स्पेन्स रिपोर्ट अपडेट करता येतात. उदा. DEC 08 Petrol on 16th Dec. Rs. 100 असा मेसेज पाठवल्यास तो आपोआप डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये नोंदवला जाईल. तेव्हा नव्या वषर्षापासून नव्हे; तर आजपासूनच हिशेब नोंदवायला लागा.

नव्या साईट्स, नव्या अॉनलाईन सेवा, नवी सॉफ्टवेअर्स, टेक्नॉलॉजी टिप्स आदींसाठी साधी-सोपी टेक्नॉलॉजीला नियमित भेट देणाऱ्या वाचकांसाठी आणखी एक नवे टूल - SasoQuick टूलबार. इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि फायरफॉक्ससाठी तयार केलेला साधी-सोपी टेक्नॉलॉजीचा हा कस्टमाईज्ड टूलबार. SasoQuick इन्स्टॉल केल्यानंतर त्यातून तुम्ही गुगल वेब आणि इमेज सर्च, साईट सर्च यासह एनसायक्लोपेडिया, डिक्शनरी, न्यूज, सॉफ्टवेअर, ई-बे आदी साईट सर्च करू शकता. याखेरीज साधी-सोपी टेक्नॉलॉजीवरील ताज्या आणि सरत्या आठवड्यातील टॉप फाईव्ह पोस्टही वाचू शकता. या टूलबारचे अाणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे तुम्ही साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या इतर वाचकांशी चॅटही करू शकता. टेक्नॉलॉजी विषयातील ताज्या बातम्याही तुम्हाला या टूलबारमध्येच वाचता येतील. Conduit ही सेवा वापरून हा टूलबार तयार केला असून तुम्हीदेखील तुमच्या साईट अथवा ब्लॉगसाठी असा टूलबार तयार करू शकता.
SasoQuick टूलबार डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
हा टूलबार इतरांशी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा.

सुट्यांमध्ये मस्त भटकंतीला गेलेल्या शैलेशने मोबाईलवर भरपूर फोटो काढले. परत आल्यानंतर एकेक फोटो डाऊनलोड करून फ्लिकर, अॉरकुट, फेसबुकवर अपलोड करत बसलेला असताना त्याला जाणवले की, त्याचवेळी आपल्या मित्रांना फोटो पाठवता आले असते तर? मोबाईलवरून थेट फोटो पाठवायचे म्हटले तर एमएमएस हा सोपा आणि खात्रीलायक पयर्याय. पण त्याला पैसे अधिक मोजावे लागतात. तुमच्याकडे जीपीआरएसचा अनलिमिटेड डेटा ट्रान्स्फर प्लॅन असेल तर तुम्ही विशिष्ट अॅप्लीकेशन वापरून थेट मोबाईलवरून फोटो इतरांशी शेअर करू शकता.


फोटो शेअरिंग साईटमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या फ्लिकरवर तुमचे अकाऊंट असेल आणि जीपीआरएस अॅक्टिव्ह फोन असेल तर तुम्ही हे काम चुटकीसरशी करू शकता. मोबाईलच्या ब्राऊजरमध्ये जाऊन m.flickr.com (किंवा m.yahoo.com) असे टाईप करा किंवा येथे जाऊन तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. तुम्हाला आलेल्या मेसेजमध्ये एक लिंक असेल त्यावर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईलवर तुमचा याहूचा आयडी आणि पासवर्ड एंटर करा. तुम्ही फ्लिकरच्या मोबाईल व्हर्जनमध्ये एंटर झालेला आहात. ‘अपलोड न्यू फोटो’वर क्लिक करून फोन मेमरी किंवा मेमरी कार्डवरील फोटो सिलेक्ट करा. काही क्षणांत तुमचा फोटो फ्लिकरवर अपलोड होईल.


या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही सिटीझन जर्नलिस्टही होऊ शकता. ज्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे वातर्ताहर तात्काळ पोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी तुम्ही असाल तर तेथील फोटो तुम्ही फ्लिकरवर अपलोड करून संबंधितांना कळवू शकता. प्रसारमाध्यमेदेखील आपल्या वेबसाईटवरून असे आवाहन करू शकतात. त्यासाठी त्यांनी आपला फ्लिकर आयडी देऊन प्रेक्षकांना अथवा वाचकांना आपल्या फ्लिकर कॉन्टॅक्ट्समध्ये अॅड करण्यास सांगावे. असे केल्याने फोटो अपलोड करताना शेअर विथ कॉन्टॅक्ट्स असे म्हणून फोटो थेट त्यांच्यापर्यंत पोचवता येऊ शकतो.

नोकियाच्या एन सिरीज फोन्सवर फ्लिकर हे अॅप्लीकेशन अगोदरच उपलब्ध करून दिलेले आहे.
ब्लॅकबेरी वापरणाऱ्यांनी येथे क्लिक करावे.
याहूच्या इतर सेवा मोबाईलवर अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही याहू गो वापरू शकता. त्यासाठी येथे क्लिक करा.
साधी-सोपी टेक्नॉलॉजीदेखील तुम्ही मोबाईलवर वाचू शकता. त्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये

तुमचा माहितीचा प्राथमिक स्रोत कोणता, असे विचारल्यास आज १० पैकी आठ जण इंटरनेट असेच उत्तर देतील. आपण दररोज किमान पाच-पन्नास साईट्सना नक्कीच भेट देत असू. एखाद्या साईटवर असलेल्या लिंक्स इंटरेस्टिंग वाटल्या तर तेथेही जाऊन आपण अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. काही साईट्स आणि ब्लॉग्जवर तर अशा रिलेटेड पोस्ट्स आणि साईट्सचा खजिनाच दडलेला असतो. या पद्धतीने माहिती गोळा करताना मूळ साईटवरून इतके भरकटायला होते, की आपण काय वाचत होतो, हेच लक्षात राहत नाही. शिवाय अनेक लिंक्स क्लिक केल्यामुळे विंडोज (किंवा टॅब्ज)ची गर्दी होते. मोठ्या अपेक्षा ठेवून क्लिक केलेल्या लिंक बऱ्याच वेळा अपेक्षाभंग करतात. त्यामुळे आपला वेळही वाया जातो. त्या लिंकवर नेमकं काय आहे, याचा क्लू मिळाला तर?इंटरक्लू हे फायरफॉक्सचे एक्स्टेंशन वापरून तुम्ही तुमची सर्फिंग प्रॉडक्टिव्हिटी वाढवू शकता. इंटरक्लू तुम्हाला लिंकचे टीझर किंवा ट्रेलर दाखवते. कसे ते सांगतो. इंटरक्लू इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही जेव्हा एखाद्या साईटला भेट द्याल (उदा. न्यूयॉर्क टाईम्स) तेव्हा हायपरलिंक केलेल्या प्रत्येक इलेमेंटचे ट्रेलर तुम्हाला पाहता येईल. संबंधित लिंकवर माऊस पॉईंट केल्यानंतर काही मिलिसेकंदात त्यासमोर इंटरक्लूचा किंवा त्या साईटचा फेव्ह-आयकॉन दिसायला लागेल. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मूळ विंडोत एक छोटी विंडो ओपन होईल व त्या लिंकवर काय आहे याची थोडक्यात माहिती पाहावयास मिळेल. त्यानंतर तुम्ही संबंधित लिंकवर जायचे किंवा नाही, हे ठरवू शकता.
इंटरक्लू टेक्स्ट, व्हिडीओ, पीडीएफ, इमेजेस आदी सगळ्यांचे ट्रेलर तुम्हास दाखवू शकतो. तसेच इंटरक्लूच्या छोट्या विंडोतून तुम्ही संबंधित लिंक फेव्हरेटमध्ये अॅड करू शकता, ई-मेल करू शकता, कॉपी करून घेऊ शकता, डिग, न्यूजव्हाईन, डेलिशियस किंवा फेसबुकवर पोस्ट करू शकता आणि प्रिंटही करू शकता. या छोट्या विंडोचा आकार कमी-जास्त करण्यापासून ते लिंकचे स्टॅटिस्टिक्स डिस्प्ले करण्यापर्यंत अनेक कस्टमायजेशन्स तुम्ही यात करू शकता. त्यासाठी इंटरक्लूच्या सेटिंग्ज पाहा. थोडक्यात काय तर, मस्ट हॅव, असे हे एक्स्टेंशन आहे. इंटरक्लू इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.

आर्थिक मंदीमुळे जागतिक तसेच भारतीय विमान कंपन्यांना मोठा फटका बसत असल्याच्या बातम्या सध्या रोज वाचायला मिळताहेत. खालील लिंक्सवर जरा नजर टाका, म्हणजे तुम्हाला याचे गांभीर्य लक्षात येईल. Airlines See Big Traffic Drop and Expect More Bad NewsAirlines record sharp drop in business travelMeltdown effect: Airlines grounded, Rlys take wings

कॉपर्पोरेट हाऊसेस आणि वैयक्तिक पातळीवरदेखील कॉस्ट कटिंग सुरू झाल्याने काही महिन्यांपूवर्वी सहज विमानाने प्रवास करणारे आता एक तर प्रवास रद्द करीत असल्याचे दिसून येतेय. अगदीच अपरिहार्य असल्यास विमानाचा पयर्याय घेतला जातोय. अन्यथा लोक रेल्वेचा अॉप्शन पसंत करताहेत. काही महिन्यांपूवर्वी एव्हिएशन फ्युएलच्या किमती गगनाला भिडल्याने लो-कॉस्ट कॅरिअर देखील परवडत नव्हते. आता फ्युएल सरचार्ज कमी केल्याने लोक पुन्हा लो-कॉस्ट कॅरिअरचा अॉप्शन ठेवतील अशी चिन्हे आहेत. ही झाली भारतातील परिस्थिती. परदेशातील परिस्थितीही याहून वेगळी नाही. अशावेळी खासगी किंवा कायर्यालयीन कामाकरिता परदेशात प्रवास करावयाचा झाल्यास आपण देखील सर्वप्रथम लो-कॉस्ट कॅरिअर शोधण्याचा प्रयत्न करू.

अॉनलाईन बुकिंगची सेवा जवळपास सर्वच विमान कंपन्या देतात. पण कुठल्या कंपनीचा तिकिट दर तुलनेने कमी आहे, हे शोधण्यासाठी सर्व कंपन्यांच्या साईटला भेट देणे म्हणजे वेळखाऊ काम आहे. अशा वेळी तुम्ही यात्रा किंवा मेक माय ट्रिप किंवा ट्रिपिटसारख्या साईटचा आधार घेता. यातून सर्व कंपन्यांचे फ्लाईट प्लॅन्स पाहून निर्णय घेता येतो व सवलतीत तिकिट बुकही करता येते. भारतात प्रवास करावयाचा असेल तर आपण थेट स्पाईस जेट किंवा इंडिगो एअरलाईन्सच्या साईटवर जाऊनही तिकिट बुक करू शकतो. पण समजा तुम्हाला दक्षिण अाफ्रिकेत किंवा अॉस्ट्रेलियात जायचं असेल तर? तेथील लो-कॉस्ट कॅरिअर आपल्याला सहसा माहित नसतात. अशावेळी तुम्ही एअर निन्जा या साईटची मदत घेऊ शकता. जगभरातील लो-कॉस्ट कॅरिअरची माहिती या साईटवर साठवलेली आहे. तुम्हाला ज्या ठिकाणाहून प्रवास सुरू करावयाचा आहे त्या देशाचे व ठिकाणाचे नाव आणि जिथे जायचे आहे त्या देशाचे आणि ठिकाणाचे नाव ड्रॉपडाऊन मेनूतून सिलेक्ट केल्यानंतर संबंधित मार्गांवरील लो-कॉस्ट कॅरिअर्स डिस्प्ले होतील. तुम्ही ठराविक कॅरिअरच्या साईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता व तिकिटही बुक करू शकता.