कोण कोणाला का सोडता?
का सोडावे तिन्हे मला?
एवढा वाईट होतो मी?
चुकलो असें॥त्याची एवढी मोठी सिक्षा?
का सोडला तिन्हे मला?
आठवत असेल का तिला मी?
माजे जुने स्म्स वाचून रडत असेल का ती?
माजे पत्रा वाचून डोळे भारत असतील का तिचे?
ओरकुत वरचे मज़े फोटो बघत असेल का ती?
ज़ोप येत असेल का तिला?
त्या अथांग आकाशा कडे बघत शोधूत असेल का मला ती?
का नाही फोन करत मला आता आणि॥" चंद्रा किती सुरेख आहे..बघ लवकर" असा का नाही म्हणत आता?
का त्या चंद्रा वरचे डाग ज़ालो मी आता?
एवढे नज़ूक असतात प्रेमाचे धागे?
कसा नाही आठवत मी तिला आता?एवढा कच होता का माज़ा प्रेम?
रणध्रा रणध्रत नुसती तीच का?
का दुसरा कोणी जागा घेत नाही तिची?
तिचीही परस्तीटी असीच असेल का?
मज़ा पहिला प्रेम मी गमावून बसलो का?
नाही पहिला आणि शेवटचा॥?
नाही करू शकत पुन्हा मी हे सगळा?
काय काय म्हणून करू मी?
आक्खी राटरा जुहु बीच वर काढू मी?
परत त्या कविता करू मी ज्या तिच्यासाठी केल्या होत्या?
परत सगळे ते पत्रा?
परत सगळे ते स्म्स॥?
कसा करू शकेल मी हे सगळा?
मज़ा पहिला प्रेम दुऊर गेला मzह्यपसुन॥
पहिला प्रेम...ह्म॥
पहिली आठवण॥
तुम्ही वाचन्यारयांमध्ये कोणी पहिला प्रेम गमावला असेल?
काय केला तुम्ही तेव्हा..?
कसा सांजौ स्वतःला?
पण ती याईल॥नक्की याईल..यावच लागेल..हे वाचून तरी याईल..?
ह्म...प्रश्नच नुसते??
उत्तरच हरवून बसलोय?
ऋतू बदलतात, चंद्र-सूर्य उगवतात, आपोआप
माणसेही बदलतात, उगवतात मावळतात, आपोआप
तुला सोडून, कधी जाताना दूर, तुजपासून
डोळे पाणावतात, अश्रू दाटतात, आपोआप
हळूच बाहेर, ती डोकावते, खिडकीतून
नजरा मिळतात, बोलत राहतात, आपोआप
नजरेचे तीर तुझिया, घे जरा, आवरुन
खोल शिरतात, घायाळ करतात, आपोआप
कवितेत तुझ्याबद्दल, जातो कधी, लिहुन
चौकशा घडतात, चर्चा होतात, आपोआप
आयुष्याची सापशिडी, नाही खेळायची, अजुन
फ़ासे पडतात, साप-शिड्या गिळ-मिळतात, आपोआप
"वैष्णव जन तो", गेले कुणीसे, सांगून
अर्थ विरतात, तारखा उरतात, आपोआप
संसाराची घडी, गेलीये 'त्याच्या', विस्कटून
येइल तो जगात, कुठल्याशा अवतारात, आपोआप
-प्रणव
या आशांचं गाठोडं घेतलेला मी एक प्रवासी
हातात ध्येयाची काठी अन झालो मी अनिवासी
निराशेला नाही स्थान हिम्म्त आहे अपार
मोह माया भुलभुलॆय्या पण नाही आत्मविश्वासाला खिंडार
सूर्य पिउन झालो मी आरक्त समुद्राची ती काय दशा
झाले डोंगर माझ्या ढांगा वारा झाला माझी नशा
उगवत्या सूर्याला करतं हे सारं जग नमस्कार
सुसाट चाललो मी करुणी या ग्रहणावर प्रहार
अंधाराच्या झाल्या ठिकर् या प्रकाश झाला विजयी
विसरलो का मी काही बरोबर कोणी नाही ..बरोबर कोणी नाही
मीही तेच पाहतोय...
अशोका। . .
[This Poem is dedicated to Great Ashoka। . .]
तो खूपदा निघायचा त्या शितिजाच्या शोधात
मागे सोडून ती लक्तरे आठवणीची। . .
पण भटकायची पावले त्या वैशाख वणव्यात
उरायची मागे फ़क्त जाणीव सावलीची। . .
कोणीच नसायाचे वाटेवर। . . एकटाच तो, एकटीच ती धाव
एकसारखीच गर्दी त्या पडक्या कबरीचीं। . .
का जिंकायचंय त्याला ह्या जगाला हरवून?
भेदरलेली कुजबूज मग त्या मुक्या तलवारींची। . .
रोजचंच युद्ध अन रोजचाच तो आकांत
रोजचीच खळखळ आता फ़ुटक्या बांगड्यांची। . .
नांदायची शांतता त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर
पुसटशी ओळख मग हरवलेल्या श्वासाची
पण। . . . . . . . . . .
एके दिवशी श्वास त्याचाच त्याचाबरोबर रडला
विझवली अश्रुने त्यानं रण्भुमी कलिंगाची। .
उघडले डोळे। . . तलवार हातुन निसटून पडली
हिच होती सुरुवात त्याच्या सोनेरी विजयाची। . .
अखेरीस जिंकलाच तो। . .जिंकलच त्यानं शितिजाला
उमलली फुल त्याच्या प्रत्येक पावलाशी
आता नव्हता तो एकटा। . .नव्हे एकासाठी त्याची धाव
सापडलेली ओळख एका हरवलेल्या "अस्तित्वाची"
- रोहन
होतं एक आटपाट राज्य
माझ्या मनातील स्वप्नांचं
अगणित, अवास्तव, अबोल
तरीही सुंदरशा विचारांचं
अशा या मनोराज्यात
आली एक परी
होउ का मी राणी याची
तीच मला विचारी
मी बापडा साधाभोळा
उत्तर काही न देई
हो-न करता,मुखातुन माझ्या
शब्दच फ़ुटत नाही
अकस्मात प्रत्येक गोष्टीच्या
मध्येच यायची राणी
तिच्यावाचुन या राज्याची
अपूरी रहायची कहाणी
प्रत्येक कहाणी राणी
रंगतदार बनवायची
कोण्याही कारणे मनोराज्यात
ती डेरेदाखल व्हायची
असे होता हळुहळु
राज्य हातून गेले
नकळत सारे भावविश्व माझे
तिनेच व्यापून टाकले!
-प्रणव
स्वप्ने ही
आपलीच असतात
ह्र्दयात त्यांना
जपायची असतात
फुलांसारखी
फुलवायची असतात
घरांसारखी
सजवायची असतात
कारण स्वप्ने
आपलीच तर असतात
रेशीम बंधाने त्यांना
बाधायची असतात
मनातल्या मंदीरात
पुजायची असतात
कधी कधी
अश्रुंच्या पुरात
अश्रुंच्या पुरात
आठवणींच्या जगात कोठेतरी
साकारायची असतात
पुर्ण झाली नाहित तरी
शेवटी स्वप्ने ही
आपलीच असतात
ह्र्दयात त्यांना
जपायची असतात
----स्वप्निल
सुखद स्म्रुतिन्च्या हिन्दोळ्यावर, स्वच्छन्द झोके घेतना
अलगद एक पीस स्पर्श करुन गेले, अन मनी काहुर माजले
तो हवा हवा सा स्पर्श, ती हवी हवीशी ओढ
तो हवा हवा सा गन्ध, ती अगतिकता बेजोड
सगळे काहि एका क्शणात डोळ्यासमोरुन गेले
अन आपोआप गालावरुन दोन थेम्ब ओघळले
एरवी स्पश्ट पणे दिसणारा तो खिडकीतला चाफ़ा
आज पुसट्पणे बरेच काहि सान्गुन गेला
त्याचा तो रोजचाच सुगन्ध आज कडवट भासला
एक दिवस असेच ...
लोक मला नेहमी सांगतात।
आश्वाद हा एक विरग जसा,
गुहेत उलटे लटकुनी राहावे।
त्यातला हा प्रकार असा।
कुणी क्रांती घडवली।
तर कुणी शांती हरवली,
आश्वादने बरीच।
स्वप्ने पिकवली,एकाच थेंब।
आणा ओघहाडले अश्रू,
अशी किमया।
ह्या स्वप्नाने मिदवली.
मग कुणी मला सांगत बसते।
भिंतीवर तसबीर का दिसते,
विरघडलेल्या अहस्या रात्री।
तंबुस पाहत का नसते।
या अनेक कथनात।धागे दोन,
आशा आणा निराशा।
विंतात ज्याचे कोण,
ह्या कोणात वादातीतजीवन-मृत्यू दडला,
आशे मागून निराशा।
असा `बूडिया' म्हटला।
पण एक मृगजाद।
भरीच दिसे,मी आशावाद ठेऊ नये।
हाच या सर्वांचा आश्वाद असे।
गुहेत ज्या सारे वस्तात।
तिथे कोणी सांगेल का,
वटवाघुडा नव्हेऽतर मी कोण असे?
अमर
ढगांमध्ये विरून मी तुझ्याच साठी बरसलो,
बरसून आता तुझ्या चिंब ओल्या केसातून निथळलो। . .
हरवून बसताना मी तुझ्या त्या गोड मंद हास्यात
मिसळलो पुन्हा तुझ्या त्याच पाणीदार डोळयात। . .
वाहत जाऊन शितिजापर्यंत मी फ़क्त तुझ्यासाठीच भटकलो
भटकून पुन्हा विरघळून मी तुझ्यासारखाच तरसलो। . .
थेंबाथेंबातून गायलो मी आपल्या पावसाचे गाणे
हिरव्यागार पाउलवाटेवर मन तृप्त होत भिजणे। . .
जळुन पूर्ण उन्हाळाभर, मी आता पावसाबरोबर परतलो
पण धरून तुझा हात हाती, मी फ़क्त ओंज़ळभरच बरसलो। . .
प्रत्येक पाऊस आता तुझ्या-माझ्यासाठीच असेल
अन तुझ्या प्रत्येक पावलाआधी तो मातीला भिजवेन। . .
कदाचित तेंव्हाच जाणवेल तुला की "का मी इतका बेहकलो?"
आणि जाणवल काही तर मी ही म्हणेन "म्हणूनच मी जन्मलो। . . "
रोहन
जिकडे-तिकडे माणसांचा...
मोकाट सुटलेला थवा आहे।
पण मला थव्यातून जायचं नाही,
माझा मार्ग थोडा नवा आहे.
पहिल्या कवितेचा प्रयत्न,
कसा करु कळत नाही?
खूप काही मनात आहे,
पण कागदावरती येत नाही।
विषय घेऊ का चाल ठरवू,
सुरुवात आधी कशी करु?
मग म्हटले विषय नको,
सोप्या चालीचीच कविता करु।
चाल ठरवून झाली तरी,
विषय अजून शोधत आहे।
तो पर्यंत विषय सोडून,
नुसतेच यमक जोडत आहे।
कधी तरी शांतपणे,
पुन्हा एकदा प्रयत्न करेन,
चालीबद्दल नक्की नाही,
पण विषय तरी नीट धरेन।
मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'
तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'
मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'
तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'
मी चकीत झालो!
विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'
तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'
.......मी निशब्द....
असंही प्रेम असतं