PART II

नाही, आता आयुष्य सुरु झालं...
गेलेल्या त्या पाउलाणा परत आणण्यासाठी ...
गहाण ठेवलेलं नाव परत मिळविण्यासाठी...

जिद्द असू दे तुझ्या जीवनात
मोडलेलं बाबाचं आयुष्य ,
पुन्हा नव्यानं जोडण्यासाठी...

मोठं तर जीवनात तुला खूप व्हायचंय
पण लक्षात असू दे
बाबांच्या अगांच पडलेलं पाणी,
आणायला तुला खूप दूर जायचंय...

आई-बाबासारखे देव घरात असताना,
कुठलं रे बाहेर मंदिर तू शोधतोय...
आदरपूर्व त्यांना नमस्कार कर,
बघ,
तुझं स्वप्न कसं तुझ्या पायात येऊन पडतं.....

- मयुर वाकचौरे