- हरबरा डाळीचे पीठ १ वाटी
- पाऊण वाटी आंबट ताक, २ वाट्या पाणी
- १ चमचा मैदा
- बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (कमी तिखट असलेल्या)
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- नारळाचा खव
- किंचित लाल तिखट व हळद, चवीपुरते मीठ
- किंचित साखर
- फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
|
0
comments
]
जिन्नस
मार्गदर्शन
वाटीभर तेलाची फोडणी करून घ्या. बारीक चिरलेल्या मिरच्या , कोथिंबीर आणि नारळाचा खव ३-४ वाट्या करा. त्यात चवीपुरते थोडे मीठ व थोडी साखर घाला.
डाळीचे पीठ, आंबट ताक, मैदा व पाणी एकत्र करून हाताने कालवावे. त्यात अगदी थोडे तिखट, हळद व चवीपुरते मीठ घाला. पीठ कालवताना पीठाच्या छोट्या गुठळ्या होतात त्या हाताने पूर्णपणे मोडून काढा. नंतर हे एकसंध झालेले मिश्रण एका कढईत घालून गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. कालथ्याने हे मिश्रण सतत ढवळावे लागते. काही वेळाने हे मिश्रण शिजेल. शिजल्यावर त्यावर एक झाकण ठेवा व आच मंद करा. २-३ मिनिटांनी झाकण काढून परत सर्व मिश्रण एकसारखे करा. आता हे मिश्रण पूर्णपणे शिजलेले असेल. गॅस मंद ठेवा.
५ मध्यम आकाराची स्टीलची ताटे उपडी करा व त्यावर प्रत्येकी थोडे मिश्रण घाला. एकावेळी एका ताटावर थोडेसे मिश्रण घालून त्यावर थोडे तेल लावलेला प्लॅस्टीकचा पसरट कागद ठेवून अगदी हलक्या हाताने लाटण्याने लाटा. सर्वबाजूने एकसारखे पातळ लाटा. याप्रमाणे ५ ताटे करून घ्या. मिश्रण गरम असतानाच लाटले जाते म्हणून एका वेळी एक ताट. तोवर बाकीचे मिश्रण कढईतच ठेवा मंद आच करून
आता सुरीने उभे कापून पट्ट्या पाडाव्या. नंतर त्यावर मिरच्या कोथिंबीर व नारळाचा खव सर्व बाजूने घाला. शिवाय तयार केलेली फोडणीही घाला. प्रत्येक पट्टी अलगद हाताने गुंडाळी करून एक गोल वळकटी करा. वळकटीसारख्या गोल केलेल्या वड्या म्हणजेच सुरळीच्या वड्या.
टीपा
सुरळीची वडी आणि सोबत आले घालून केलेला गरम चहा!
|
0
comments
]
हे एक छानस डाएट फुड आहे. त्यात तुम्ही तुम्हाला हवीतशी व्हेरिएशन्स करु शकता.खर तर आत्ता भाज्या छान असतात त्यामुळे मस्त मजा येते करायला पण आणि खायलापण.
साहित्यः-
३ वाट्या कॉर्नचे दाणे वाफवुन३ वाट्या मोड आलेले मुग वाफवुन३ कांदे बारिक चिरुनलाल,पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची प्रत्येकी १ बारिक चिरुन३ गाजर किसुन३ टोमॅटो बारिक चिरुन१-१+/२ कोथिंबीर बारिक चिरुन१ वाटी हिरवी चटणी ( पुदिना+कोथिंबीर+लसुण+आल+लिंबु+मिठ+मिरची)१+१/२ चमचा जिरे खमंग भाजुन+१ चमचा काळ मीठ एकत्र करुन घ्यावे१+१/२ चमचा पाणीपुरी मसाला.
डेकोरेशन साठी: चिंगु चटणी , जिरेपुड, पाणीपुरी मसाला, डाळींबाचे दाणे ,आणि बटाटाची लाल सळी( "डाएट फुड" लोकाना नको.)वरिल सर्व साहित्य आयत्यावेळेस एकत्र करुन त्यावर चिंगु चटणी , जिरेपुड, पाणीपुरी मसाला,डाळींबाचे दाणे , आणि बटाटाची लाल सळी घालुन खायला द्यावे.
|
0
comments
]
जिन्नस
- जाडे पोहे-३ वाट्या
- ओले खोबरे- १ वाटी
- कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- लिंबू चवीनुसार
- साखर लिंबाच्या प्रमाणात
- हिरवी मिरची बारीक चिरून
मार्गदर्शन
जाडे पोहे धुवून घ्यावेत. त्यात ओलेखोबरे, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, लिंबाचा रस, मीठ, साखर सगळे घालायचे. नीट एकत्र मिसळून घ्यायचे आणि गटं स्वाहा करायचे.
टीपा
व्हाईट पोहे हे नाव माझ्या मुलीचे. मी झटपट पोहे म्हणायचे.बनायला झटपट आणि संपतातही पटपट... घाईच्या वेळी पटकन तय्यार होतात. फ़ोडणी आवश्यक नाही. घातली तरी चालते. रंगत वाढते. फोडणी द्यायची असेल तर हिंग-जिरे घालून द्यावी.
|
1 comments
]
साहित्यः
२ मध्यम आकाराची पापलेट,१/२ नारळाचा चव,३ हिरव्या मिरच्या,पाव चमचा हळद,१० लसूण पाकळ्या,थोडेसे आले,थोडासा पुदिना१ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर,१/२ लिंबाचा रस,१/२ वाटी तांद्ळाचे पीठ,तेल.
कृती:
पापलेट भरण्यासाठी संबंध ठेवावी.पोटाकडुन ऊभी चीर देउन साफ करावी व धूउन घ्यावी.वरूनही आड्व्या चिर्या द्याव्यात.नारळाचा चव ,मिरच्या ,आलं,लसुण्,ह्ळ्द, कोथिंबीर्,पुदिना ,लिंबुरस,व मीठ यांची पेस्ट करुन पापलेट मधे भरावी.हल्क्या हाताने पापलेट तांदुळ्याच्या पिठीत घोळ्वून फ्राय पॅन मध्ये तळुन घ्यावे.
|
0
comments
]
जिन्नस
- ३ मध्यम आकारची कारली
- अर्धी वाटी हरबरा दाळ पीठ भाजून
- अर्धी वाटी बारीक खोबरे
- अर्धी वाटी दाण्याचे कुट
- अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
- एक मोठा चमचा लिंबाचा रस
- गुळाचा खडा
- लसून जीरे कुटून एक मोठा चमचा
- धने पुड, जीरे पुड
- दोन मोठे चमचे गरम मसाला
- चवीनुसार ति़खट, मीठ
- हिंग, कोथिंबीर, कडिपत्ता, तेल
मार्गदर्शन
कारलाचे १-११/२ इंच लांबीचे तुकडे करावे आणि मधला गर काढून ४ काप द्यावे.हरबरा दाळ पीठ भाजलेले, खोबरे, दाण्याचे कुट, कांदा, लिंबाचा रस, गुळ, लसून जीरे पेस्ट, धने पुड, जीरे पुड, गरम मसाला, ति़खट, मीठ, कोथिंबीर मिसळून घेणे. हे मिश्रण कारल्यात भरणे आणि जिरे, मोहोरी, हिंग, कडिपत्याची फोडणी करून त्यात कारली टाकणे आणि झाकण ठेवून शिजवून घेणे. अधून मधून कारली खालीवर करणे.
टीपा
नॉनस्टिक भांड्यात केल्यास भाजी जळत नाही. असाच मसाला वापरून वांगी पण छान लागतात.
|
0
comments
]
लपंडाव.
आहे इथे? की नाही??
मुळात आहे की ...
नाहीच?
राज्य कायम आपल्यावरच.
भरती- ओहोटी,
अधिक-उणे
पाणी मात्र कायम तेवढेच
शून्य
मी विचारांत...
आहे इथे? की नाही??
मुळात आहे, की....
नाहीच???
लपंडाव....
आसावरी
|
0
comments
]
बाबा मी तुझ्यासाठी गम्मत आणलीय
काय गं चींटू माझ्यासाठी काय आणलं?
तिने हातात ठेवली आगपेटीची डबी
बाबा हे घे तुझ्यासाठी आकाश आणलं
माझ्यासाठी आकाश कुठे आहे ग दाखव?
हे काय डबीत बंद करून दिले ना तुला
मी अवाक झालो ती कल्पकता पाहून
अजून माझे हसू काही आवरे ना मला
माझं आकाश तिने माझा हातात दिले
ते बालगून मी तुफान भरारी घेतली
का कुणास ठाऊक पण तिच्या खेळाने
मला कधी न थकण्याची हुशारी दिली
तुषार जोशी, नागपूर
|
0
comments
]
झोपडीत जन्म झाला
झोपडीतच मरणार काय?
डोसक फिरायला लगतय विचार सुधा करवत नाही???
आई बा न लाडा ज़पल
उसचा फडत दीसभर टाकलाय
ईवलिशी भाजी आणि ईवलिशी भाकरी
त्यान पोट माज भरणार काय???
हाताच्या फोडवणी मला जपल
शाळेत मला त्यानी घाट्ल
पोरग पण जाम हुशार निगाल
पण पुढ करणार काय???
बान घेतली मागार
आईन घेतला पुढाकार
दोघांची लागली हुजत
पण त्यान माज भल होणार काय???
शाळेतणे काढला ढकला
बान दिला हातात कोयता
मी भी लागलो जोमान उस वाढायला
पण तेन घर वर निघणार काय???
हातवरच पोट आमच
टेवडच बसेतोय भरत
दुनियेचा नाही पता आम्हा
ज़ोपडीतच सार जीवन जाणार काय???
गरीबाची पोरे कधी शिकणार काय???
आई बा चा पांग ती फेडनार काय???
मोठे कधी ती होणार काय???
डोसक लगतय फिराय विचार सुधा करवत नाही
विजय माळी....
|
1 comments
]
काल घरातून माझी जुनी ब्रीफकेस गेली
चोर हि पाहून वरमला असेल
म्हणत असेल आज दरीद्राच्या घरात चोरी झाली
पहिले तर त्यामध्ये काहीच नव्हते आणि
पहिले तर माझी जिंदगी त्या मध्ये साठलेली
एक जुनी जीन्स होती
पायाखाली येऊन येऊन तळव्याजवळ फाटलेली
एक तुझं रेखाचित्र होतं तुला आठवताना मी काढलेलं
कोणाली पटलं नसलं तरी
मला ते तंतोतंत तुझ्या सम भासणारं
मी डोळ्यात बघताच
माझ्याकडे पाहून हसणार
आणि एक हि दिवस विसर पडला तर
नाक मुरडून रुसणार
तू स्वतः कधी बोलली नसशील
येवढ ते चित्र मज सवे बोलायचं
येवढ मात्र नक्की की
त्याला पाहून छातीत काही तरी सलायचं
तू दिलेला पेन हि आज गेला
त्या पेनाने मी किती तरी कविता तुझ्यासाठी लिहिलेल्या
किंवा असं म्हण की त्या पेनाला पाहून मला त्या सुचलेल्या
त्या सोबत गेल तुझं ते एकुलतं एक पत्र
तू रात्री जागून लिहलेलं
तुझ्या प्रेमाने काठोकाठ भरलेलं
कित्येकदा माझ्या छातीला लागून निजलेलं
वाचताना नकळत अश्रूचा थेंब पडून थोडसं भिजलेलं
कधी हि चोरला जाणार नाही असा
तुझ्या आठवणींचा ठेवा मी डोळ्यात भरला आहे
काल आठवणींचे शरीर चोरीस गेले,
काल आठवणींचे शरीर चोरीस गेले,
-- दीपक इंगळे २६/०५/२००९
|
0
comments
]
प्रेम् नव्हे, आकर्शण होते
तेव्हा हे कललेही नव्हते
वागायाला कुठेसा मी चुकलो
वागायला कुठेशी ती चुकली
सुदैव माझे प्रीतही विरली
चुकीचे घड्याळ ,
चुकीचे पाहिले
पाळली गेली वेळ
पण पहोचल्यावर कळाले,,,
याहुन् सुन्दर अवेळ.........!!!!
- digant
Type rest of post here
|
0
comments
]
तप्त मन, शीत ठरवी दिनकरा
लपवी अनंत विचारांचा भोवरा
अफ़ाट, अनावर, अपार, आकाशी
ओलेत्या मनात थरथर जराशी
वीतभर घरात नात्यांचा गराडा
गावभर आवारात भासे कोंडवाडाजुन्या वाटांची सराईत चाचपणी
दारातून डोकावतेय लाल ओढणी
मी लिहून काढलंय माझंच चरित्र
त्याला दिशा कसली, ना कसले सूत्र
-- अभिजित ..