सहज रस्त्याने जाताना
नजर मारीली तिने
साथ दिली माझ्या मानाने
फार उन्मतपणे -१-
डोळे माझे तिथे स्थिरावले
नजर बाण मम भिरकावाले
मम बनाने लक्ष्य छेदिले
पुन्हा वलूनी तिने पाहिले -२-
तिने आडवा हात केला
रास्ता ओलांडून झाला
ती माझ्याकडे येत चालली
माझी पाउले तिथे स्थिरावली -३-
ती माझ्या जवळ आली
पाठमो-यास दादा म्हणाली
माझी पाउले चालू लागली
पुन्हा निराशेने -४-
---------------------------- बाजी दराडे

आज नव्याने दिवस उजाडला आहे
सर्व जगच छान वाटत आहे
मन पुन्हा ऊल्हासित झाले आहे
काही नाही आज पुन्हा ती मला दिसली आहे...

पानाफुलांतुन पक्षी किलबीलत आहेत
इंद्रधनुष्यही आपले रंग खुलवत आहे
पावसाचा गारवा आज अधिकच जाणवत आहे
कारण आज पुन्हा ती मला दिसली आहे...

आज मी जग जिंकलो आहे
स्वर्गाचा आनंद येथेच मिळवला आहे
तरीही मन शेवटी उदास आहे
कारण आज ती मला शेवटची दिसली आहे.................

आज प्रथमच तिला पहिल
मन वेडावुनच गेल,
एकाच नजरेत तिने
मला पुरत घायाळ केल,

गुलाबी गाल... हरीणिची ती चाल
मादक अशी तिची अदा,
काय सांगू मित्रांनो...
मी झालोय तिच्यावर फ़िदा,

एकटक पाहत बसलो
विसरून सर्व भान,
मिळताच नजरेला नजर
तिने खाली घातली मान,

तिच्याजवळ बोलायची
इच्छा खुप झाली,
कसलाही विचार न करता
सरळ तिचीच वाट धरली,

तीही थोडीशी पुढे आली
कदाचित तिलाही काही बोलायच होत,
काय सांगू मित्रांनो....
नेमक तेव्हाच आईने जागवल होत...

- परेश चाफे
२६/०८/२००९

थांबव ग राणी
तुझ मिस कॉल देण,
मोबाइल च बिल झालय
आता ग जीव घेण,

मिस कॉल देण्याची
तुला हौस ग न्यारी,
बिल मात्र पडतय
माझ्या ग पदरी....

अलार्मच्या आधीही
येतो तुझा मिस कॉल,
माझ्याही आधी होते
माझ्या मोबाइलची सकाळ,

कॉल करायला राणी
तुला कधी जमतच नाही,
चुकून केलाच कधी तर
५ मिनिटापेक्षा जास्त बोलायच नाही,

मी कॉल केल्यावर मात्र
तुला तासनतास बोलावास वाटत,
तुझ बोलन वाढलेल पाहून
काळीज्ञ माझ फाटत (धडधडत)

तुझ हे मिस कॉल देण
आता रोजचच झालय,
माझाही तुला कॉल कारण
मग साहजिकच झालय,

पण ....
मी ही आता ठरवलय
तुला कॉल नाही करायच,
आलाच तुझा मिसकॉल
तर तुलाच परत मिसकॉल द्यायच,

तुझा कॉल येईपर्यंत
तुला मिस कॉल देत रहायच,
आणि तू कॉल केल्यानंतर
मुद्दामहुन जास्त वेळ बोलायच,

तुलाही कळूदे आता
कॉल करण्याच दु:ख,
मलाही मिळूदे मग
थोडस मिस कॉल देण्याच सुख

- परेश चाफे
22/08/09

Mi

Tuz jan mi manala
Kadhi lavun ghetalach nahi,
Manhi maze shahan aahe,
Te tuzyasathi radal nahi.
Tuzya yenyachi Aas,
Hi nahi urali
Tuza nirop gheun yenarya
Varyat ti hi misalun geli.
"Jato Mi" asach sangun geli.
Aaj hi mala swapn padatat,
Oth aaj hi manapasun hasatat,
Chehryache Bhav hi Bolake asatat.
Mi sukhat Ahe.
Asa mi kay? saglech mhantat.
Kadhi yet dolyat pani,agadi nakalat,
Pan te dolyatun khali sandat nahi,
Aathavani tuzya manatach rahtat
Othaparyant alya tari,tya mi kunala
Sangat nahi.
Papnyanchya kada matr alagad olavtat,
"TU" aaj hi mazyatach ahes,
As haluvar pane Sangatat.

Sneha

पावसात या हरवून गेलो
शोधताना तिला, जगन विसरून गेलो,
वेळ सरत होती, पण मन हलतच नव्हत
आपल्यासाठी ही कोणी असेल
सारखे असेच वाटत होते,
विसरलो तिला पण
डोले पाण्याने भरले,
तिच्या नुसत्या आठवणीने
हे वेडे मनही रडले.....

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ..

तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

एक मैत्री अशी हवी ........
पाहता क्षणी मन भरून यावे.......

एक मैत्री अशी हवी ........
मन तिच्याच भोवती सतत रुंजी घलाव.........

एक मैत्री अशी हवी ........
मनातल्या गोष्टी तिला संगीतल्याशिवाय मन हलके न व्हावे

एक मैत्री अशी हवी ........
अवगुनाकडे हक्काने बोट दखावानारी
आणि आदराने चूका कबूल करणारी

एक मैत्री अशी हवी ........
प्रेमाचा स्पर्श असलेली
प्रेमाने चेहर्यावर हस्याची कारंजी फुलावनारी

एक मैत्री अशी हवी ........
विश्वसाने विश्वास सम्पादुन
मैत्रिच्या नात्याला एकरूप करणारी

एक मैत्री अशी हवी ........
भविष्यत कितीही नाती जोडली गेली
तरी मैत्री या नत्याला अंतर न देणारी ................!!!!!!!!!!!!