मोठया मोठ्या हाई-वे ला छोटे छोटे वलन..
मोठया मोठ्या हाई-वे ला छोटे छोटे वलन..
इट्स मी आता तरी व्हा सरल ..
हौस आहे म्हणुन का
आठवण तुझी मी काढली ?
येणार नाही तरीही पुन्हा
परत परत वाट तुझी पहिली
पण...
कितीही समजावले मनाला
तरी ही आस उरी का उरते ?
"बर झाल तू गेलीस ते ............"
- मॅकरोनी (एल्बो अथवा कुठलाही आकार)
- मॅकरोनी बुडून वर राहील इतके पाणी ती शिजवायला आणि चवीप्रमाणे मीठ
- डिस्टील्ड व्हाईट विनेगार ३ चहाचे चमचे
- मेयोनीज अर्धी वाटी
- काळी मिरी पाउडर १ चहाचा चमचा
- साखर चवीप्रमाणे (अगदी चिमुटभर आवडत असल्यास)
- १ कांदा (बारीक चोकोनी चिरून)
- १ टोमॅटो (बारीक चोकोनी चिरून)
- १ वाटीभर हिरवी/लाल/पिवळी सिमला मिरची (बारीक चोकोनी चिरून) + मुठभर कोथिंबीर चिरून
मार्गदर्शन
मायक्रोवेव्ह मध्ये काचेच्या वाडग्यात पाणी उकळात ठेवून त्याला उकळी आली की मॅकरोनी घालून त्यात मीठ घालून ती बोटचेपी शिजवून घ्यावी आणि चाळणीवर निथळत ठेवावी
एका वाडग्यात मेयो आणि विनेगार चांगले फेटून मग वरील (क्रमांक ५ ते ९) जिन्नस चांगले मिसळून घ्यावेत आणि त्यात शिजवलेली मॅकरोनी चांगली मिसळून फ़्रीझ मध्ये सेट करायला ठेऊन द्यावी
१ तासानी बाहेर काढून (म्हणजे सर्व भाज्या आणि ड्रेसिंग्स यांचा छान साद लागतो) हवे असल्यास मेयो घालून ढवळावी पण फार क्रिमी करायची नाही आणि खायला द्यावी.
टीपा
मेयोनीज आणि विनेगार मध्ये मीठ असते हे ध्यानात ठेवून सर्वात शेवटी गरज वाटल्यास वरून मीठ घालावे आणि फ्रीझ मध्ये सेट करावे
सोजन्य गूगल
सांता प्रवेशद्वारा जवळ बसुन परिक्षा द्यायला परवानगी का मागत होता ?
डोकं खाजवा.
कारण ती प्रवेश परिक्षा होती !
रात्री आल्यावर खातो मी भात............
रात्री आल्यावर खातो मी भात ...............
आणि देविकाला भरवताना राज चा मोडला हात .....
सांता पोलीसला फोनवर : हॅलो, पोलीस स्टेशन.हं बोला काय झाले ?
सांता : मला फोनवर धमक्या येताहेत.
कोण धमक्या देताहेत ? कोण आहेत ते ?
सांता : मला टेलिफोनवाले धमकी देताहेत.
काय ?
सांता : मला म्हणताहेत की, "बिल नही भरा तो काट देंगे.
हौसेने तरी आठवण करत जा
वाट पहायची हेच हाती आहे
येईन ना येईन मी कधी
प्रारब्धात माहीत नाही काय आहे
पण ..
ही मीणमीणती आस ऊरातच ऊरते
" बरं झालं तू गेलीस ते !"
बरं झालं तू गेलीस ते
तुज़्या अठ्वनित जगाता येइल
माजी जाली नाहीस तरी
कधीतरी माजी होतीस
यातच समाधान मनाता येइल...
बरं झालं तू गेलीस ते
तुज़्या अठ्वनित जगाता येइल
माजी जाली नाहीस तरी
कधीतरी माजी होतीस
यातच समाधान मनाता येइल...
केलीस ना पारख माझी
दोनच शब्दात..." कापरे भरते "
उत्तर आता उरलंच नाही,
जणु नव्हतेच प्रेमास भरते !
जवळ होतेच तरी का ?
खरंच काही सांभाळलं का ?
समर्पण कळलं होतं का ?
चर्र होते नि कापरे भरते !
बरं झालं मी विरून गेले ते,
बरं झालं, हिरा नाही, काच ठरले ते !!
राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी रायगड
पूर्ण नाव संभाजी शिवाजीराजे भोसले
जन्म १४ मे, १६५७
पुरंदर किल्ला, पुणे
मृत्यू ११ मार्च, १६८९
वढु(पुणे)
उत्तराधिकारी राजाराम
वडील शिवाजीराजे भोसले
आई सईबाई
पत्नी येसूबाई
संतती शाहू महाराज
राजघराणे भोसले
चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
लहानपण
संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
तरुणपण व राजकारण्यांशी मतभेद
१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. महाराजांचे अमात्य संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढय शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील भाऊबंदकीपुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.
शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.
मोगल सरदार
या सगळ्या घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने लढवला पण शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.
संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. त्यांनी संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. मात्र संभाजीराजांच्या स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकर्यांमधील दरी अजूनच रूंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.
सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गादीचे हक्काचे वारसदार होते. तसेच शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते.
छत्रपती
१६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.
औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
१६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.
दगाफटका
१६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले.
शारीरिक छळ व मृत्यु
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास आणि धर्मांतर करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.
मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने स्वधर्म आणि स्वराज्यासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल त्यांना धर्मवीर ही सार्थ उपाधी दिली.
निश्चित सांगता येत नाही. दूरसंचार, वैद्यकशास्त्र, कम्प्युटर सायन्स, खगोलशास्त्र, रॉकेटविज्ञान, आटिर्फिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, जैव-तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान अशी विविध क्षेत्रे आज वायुवेगाने प्रगत होत आहेत.
- जनतेच्या जीवितास व मालमत्तेच्या दृष्टीने घातक असा माल बाजारात विकला जाऊ नये यासाठी संरक्षण.
- बाजार पेठेतील मालाची गुणवत्ता, वजन, क्षमता, शुध्दता, दर्जानुसार किंमत जाणून घेणे
- दुकानात अथवा बाजारपेठेत वेगवेगळ्या वस्तू व त्याच्या विविध किंमती पहाण्याच्या, हवी ती पसंतीस पडलेली वस्तू विकत घेणे.
- ग्राहक मंचासमोर बाजू मांडणे, चर्चा करणे, मार्गदर्शन घेणे, ग्राहक हितासाठी लक्ष देणे.
- व्यापार्यांकडून होणार्या ग्राहकांची पिळवणूकीसंदर्भात दाद मागणे.
- ग्राहक मंचच्या कायद्यासंदर्भातील शिक्षण घेणे.
Contd.....
तक्रार केव्हा कराल?
- खरेदी केलेला माल खराब असल्यास ...
- खरेदी केलेल्या मालाच्या किंमतीपेक्षा व्यापार्याने अधिक किंमत घेतली असल्यास
- जीवितास किंवा सुरक्षिततेस घातक ठरणारा माल (वस्तू) दुकानात ठेवला असेल अथवा विक्री केला असल्यास...
- विकलेल्या वस्तुचे वजन आणि प्रत्यक्षात छापील असलेले वजन यात फरक आढळल्यास ...
- जुना अथवा खराब माल नवीन वेष्टनात आकर्षक पध्दतीने ठेवून, ग्राहकांना उत्तम दर्जाचा माल असल्याचे सांगून फसवणूक केल्यास ...
- मालाची विक्री करताना योग्य चाचणी न घेतलेला माल अन्य मालाच्या तुलनेत स्वस्त दरात देऊन ग्राहकांची दिशाभूल करीत असल्यास ...
- मालाच्या वस्तुस्थिती संदर्भात वेष्टनावरील माहिती खाडाखोड केल्यास, चिकटपट्टी लावल्यास व त्या ठिकाणी चुकीची माहिती छापल्यास उदा.मुदत बाह्य तारखेत खाडाखोड करणे, वजनाच्या ठिकाणी जादा वजन दर्शवणे, किंमतीत खाडाखोड करणे.
- स्वत:चा माल खपविण्यासाठी ग्राहकाला खोटी आश्वासने देऊन सातत्याने प्रचार व प्रसार केल्यास.
- मालाचा साठा करुन तो विक्री न केल्यास अथवा भाववाढ होण्याची वाट पाहून नंतर विक्री केल्यास ...
- आपला खराब माल जास्तीत जास्त खपावा म्हणून वृत्तपत्रे, इलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे अथवा अन्य जाहिरात माध्यमातून प्रसिध्दी करुन ग्राहकांना विकल्यास व तसे पुरावे असल्यास...
- ग्राहकांसाठी भेटवस्तू, बक्षिसे किंवा इतर मोफत वस्तू देण्याच्या योजनेत सहभागी करुन घेऊन नंतर योजनात फेरफार केल्यास, निकाल लावण्यास टाळाटाळ केल्यास ...
कोणाविरुध्द तक्रार करावी ?
- किराणा माल विक्रेता ...
- औषध विक्रेता ...
- शीतपेय विक्रेता ...
- ट्रव्हल एजंट ...
- सर्व प्रकारचे व्यापारी ...
- शेतीची बियाणे, औषधे तसेच अवजारे विक्रेता ...
- हॉस्पिटलमधील डॉक्टर्स ...
- पोस्ट खाते किंवा कुरिअर तसेच बँक सेवा ...
- दूरध्वनी, पाणी, गॉस संदर्भातील कार्यालय ...
- वीज कनेक्शन आणि रस्ते संबंधित कार्यालय ...
- विमा, शेअर किंवा कर्जरोख्यांची खरेदी विक्री ...
- एसटी, रेल्वे तसेच अन्य वाहन विक्रेते ...
- शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे ...
- फ्लॉट अथवा प्लॉट विक्रेता ...
- जाहिराती सादर करणार्या संस्था, मॉडेल्स ...
- पोस्टर्सवरील मजकूर आणि जाहिरात प्रसिध्द करणार्या संस्था ...
- वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे ...
तक्रार कशी कराल?
- मालासंदर्भात काही दोष आढळून आल्यास जिल्हा ग्राहकमंच्याकडे साध्या कागदावर अथवा टंकलिखित तक्रार सहा प्रतीत सादर करावी. एकापेक्षा अनेक ग्राहकांच्या तक्रारी असतील तर जिल्हा ग्राहक मंचाच्या परवानगीने एक किंवा अधिक ग्राहक तक्रार करु शकतात.
- तक्रार दाखल करताना मुद्देसुद माहिती द्यावी तसेच दोषपूर्ण मालाचे नमुने सोबत सादर करणे आवश्यक आहे. पुरावे सादर करतांना माल खरेदी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे. त्या पावतीवर खरेदी केलेल्या वस्तूचे नाव, विवरण, उत्पादक कंपनीचे नाव, हमी कालावधी आदी नेंदी घ्याव्यात.
- तक्रारदाराने प्रादेशिक भाषेतील अर्जाबरोबरच इंग्रजी भाषेत अर्ज व तपशील दिला तर ग्राहक मंच तसेच आयोगाला कार्यवाही करणे सुलभ होते.
- तक्रार दाखल करतांना फक्त पीडित ग्राहकालाच नव्हे तर त्याच्या वतीने दुसर्यांनाही तक्रार करता येते.
तक्रारीची कार्यवाही
- अ.क्र- तक्रारीचे स्वरुप कार्यवाही
- १.-तक्रार दाखल केल्यानंतर-६ महिन्यात कार्यवाही
- २.-मालाची प्रयोगशाळेत तपासणी-४५ दिवसांचा कालावधी
- ३.-२० लाख रुपयापर्यंतची नुकसान भरपाई-जिल्हा ग्राहक मंचाकडे सुनावणी
- ४.-१ कोटी रुपयापर्यंतची नुकसान भरपाई-राज्य आयोगाकडे सुनावणी
- ५.-१ कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई-राष्ट्रीय आयोगाकडे सुनावणी
तक्रार दाखल करतांना घ्यावयाची काळजी
- तक्रारदाराचे नाव व पत्ता :
- विरुध्द पक्षाचे नाव व पत्ता :
- तक्रारीचा विषय :
- तक्रारीबाबतचे पुरावे, दस्तऐवज :
- तक्रारदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई :
- ठिकाण, दिनांक व सही
तक्रार दाखल करतांना येणारा खर्च
अ.क्र-नुकसानीची रक्कम-भरावयाची रक्कम
१.-१ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास १०० रुपये
२.-१ ते ५ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास २०० रुपये
३.-५ ते १० लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास ४०० रुपये
राज्य आयोगाकडे अपील का? व कसे करावे?
- जिल्हा न्यायालयाचा निकाल असमाधानकारक वाटल्यास संबंधित व्यक्ती राज्य आयोगाकडे ३० दिवसांच्या आत अपील करु शकते.
- जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाने ग्राहकाला कोणतीही रक्कम भरावयाची असेल तर, अपील करणार्या अशा व्यक्तीने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा २५ हजार रुपये यापैकी जी कमी असेल अशा रकमेचा भरणा केल्याशिवाय राज्य आयोग अशा अपिलाची दखल घेणार नाही.
- राज्य आयोगाकडे तक्रार करतांना संपूर्ण तक्रारीचे स्वरुप सुस्पष्ट लिहावे. पुरावे सादर करावेत.
- अपील स्वीकार केल्याच्या दिनांकापासून राज्य आयोग ९० दिवसाच्या आत अपिलाची सुनावणी करतो.
- अपीलकर्त्यांने अपील अर्जासोबत राज्य आयोगाच्या कार्यालयीन प्रयोजनासाठी तक्रार अर्जाच्या सहा प्रती जोडणे आवश्यक आहे.
- अपिलाच्या सुनावणी काळात अपीलकर्त्याला स्वत: आयोगासमोर उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. जर अपीलकर्ता अनुपस्थित राहिला तर आयोग एकतर्फी निकाल देतो.
- अपीलाच्या संदर्भात राष्ट्रीय आयोगाचे आदेश पक्षकारांना मोफत देण्याची तरतूद या कायद्यात आहे.
राष्ट्रीय आयोगाकडे अपील का? व कसे करावे?
- राज्य आयोगाचा निकाल असमाधानकारक वाटल्यास संबंधित व्यक्ती ३० दिवसांच्या आत राष्ट्रीय आयोगाकडे अपील करु शकते.
- राज्य आयोगाच्या आदेशान्वये कोणती रक्कम भरणे असेल तर अपील करण्यार्या ग्राहकाने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा ३५ हजार रुपये यापैकी जी कमी असेल, अशा रकमेचा भरणा केल्याशिवाय राष्ट्रीय आयोग अशा व्यक्तिंच्या अपीलाची दखल घेणार नाही.
- राष्ट्रीय आयोगाकडे ग्राहकाने अपील दाखल केल्यानंतर अपीलाची सुनावणी, अपील स्वीकार केल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत केली जाते.
- अपिलकर्ता किंवा पक्षकाराचे विरुध्द राष्ट्रीय आयोगाने एकतर्फी निकाल दिल्यास बाधित पक्षकाराला आयोगाकडे आदेश रद्द ठरविण्यासाठी अर्ज करता येतो.
- अपीलकर्त्यांच्या अर्जावरुन किंवा राष्ट्रीय आयोगाला स्वत:हून कोणत्याही वेळी, न्यायाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्यास, राज्यातील कोणत्याही जिल्हा ग्राहक मंचाकडील प्रलंबित प्रकरण दुसर्या जिल्हा मंचाकडे किंवा एका राज्य आयोगामधून दुसर्या राज्य आयोगाकडे वर्ग करण्याचा अधिकार आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडे अपील का? कसे करावे?
- राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या आदेशामुळे पीडित झालेल्या व्यक्तीला असा आदेश मिळाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येते.
- राष्ट्रीय आयोगाच्या आदेशान्वये रक्कम भरणे असेल तर, अपील करणार्या व्यक्तीने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा ५० हजार रुपये यापैकी जी कमी असेल ती भरल्याशिवाय न्यायालयात अपील करता येणार नाही.
- जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांच्या आदेशाविरुध्द संबंधिताने अपील न केल्यास आदेश अंतिम समजला जातो.
आदेशाचे अनुपालन न केल्यास दंड व कारावास
- जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांच्यासमोर दाखल करण्यात आलेली तक्रार निरर्थक असल्याचे आढळल्यास मंच किंवा आयोग लेखी कारणे नोंदवून अशी तक्रार फेटाळतात. तसेच पक्षकाराला १० हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल एवढ्या खर्चाची रक्कम देण्याबाबत आदेश देतात.
- ज्यांच्याविरुध्द तक्रार करण्यात आली, असा कोणताही व्यापारी किंवा राष्ट्रीय आयोग यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अनुपालन करण्यात कसूर करीत असेल तर किंवा अनुपालन करण्यास चुकत असेल अशा बाबतीत संबंधितास कारावास आणि दंडाची शिक्षा आहे. त्यामध्ये एक महिन्यापेक्षा कमी नसलेल्या परंतु तीन वर्षापर्यंत वाढवता येण्याजोग्या मुदतीच्या कारावासाची आणि दोन हजार रुपयांपेक्षा कमी नसलेल्या परंतु १० हजार रुपयापर्यंत वाढविता येण्याजोग्या दंडाची किंवा दोन्हींची शिक्षा दिल्या जाण्यास पात्र असेल. अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे.
राज्य ग्राहक आयोगाचा पत्ता :
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग,
प्रशासकीय महाविद्यालय, कक्ष क्र.१ व २, हजारीमल सोमाणी मार्ग, मुंबई - ४०० ००१.