गुल्लू
कट्टी फू..
अज्जिबात अज्जिबात
बोलणार नाही
मी तुझ्याशी
ज्जा
नाही येणार तुझ्यापाशी
ज्जा
जळत रहा तू एकटाच
हुं....
तुझ्याखाली
उभं असतांना
’ त्याने ’ माझा हात काय धरला.
टुप्पदिशी
मोठ्ठ्या शेंगेने
त्याला प्रसाद दिलास
डोक्यावर..
आणि खिदळलास
हिरव्या हिरव्या पानांआडुन
लाल लाल दात दाखवत..
जळकुटा कुठला..
- स्वप्ना
कालच्यासारखी आज्पुन्हा
भेटशील काय??
माझा आनंद वाटुन घेशील काय
माझ्या ओन्झालित तुझा चेहरा देशील काय
पुन्हा पुन्हा मी तुझाच आहे काय
विचारशील काय ?
kalpi joshi
23/12/2008
चुक तुझी ना माझी
पण कारे ,घालावलस मला ,
हृदयी वार देऊन कायमचा ...
पापन्यांचा पाउस .....
अस्तित्वांचे आभास ....आणि एकंतान्ताचा सहवास
बर झाल मी गेली ........
तू अजूनही म्हनतच असणार
कल्पी जोशी २०/०३/2009
निघून गेलेले आजकल येतात का ?
वसंतात आजकल फुले फुलतात का ?
साद घालत चाललो काटयांवर
पायदळी काटेच आजकल तुटतात का
दगडांबरोंबर पहा आज नाते जुळले
..."बरं झाल तू गेलीस ते .................."
.........................ocanheal
गर्दीतही तुझी साथ शोधते,
सदाफुलीलाही वास शोधते...
काटेच आहेत वाटेत आता,
काट्यात एखादं फुल शोधते...
"बरं झालं तू गेलीस ते...."
या ओळीतही प्रेम शोधते...
बर झाल तु गेलीस तु परतण्याची आस तर उरली
आठवणित जगण्याची ती हौसही फिटली
येशील परतून, वाट अशीही पाहिली
ये न,ही बाघ, साद ही घातली....
तु जावून सेंचुरी ही झाली !!!
बर झाल तु गेलीस ...
रजनी अरणकल्ले १४. ३.०९
निघून गेलेले आजकल येतात का ?
वसंतात आजकल फुले फुलतात का ?
साद घालत चाललो काटयांवरपायदळी काटेच आजकल तुटतात का
दगडांबरोंबर पहा आज नाते जुळले
..."बरं झाल तू गेलीस ते .................."
रुतलेय ती खोल छातीत इतक्या
वेदनेचा वीझज्व्ताना दाह
येणार्या प्रतेकीच काळीज़ चीरते
प्राक्टीक्ली जगण्यासाठी फक्त
नाममात्र आता शरीर उर्ते
" बरं झालं तू गेलीस ते ! "
पाणझड़ी सारख्या जीवनात माझया तू वसंत घेउन आलीस . ..
होतो अगदीच अनोळखी पण
आपालासा करून गेलीस....
दिली साद मनाने जेंव्हा
तुझी साथ मला आजुन हवी ...
सोडून अशी मधेच
का निघून गेलीस ..
तू का निघून गेलीस ?
.............................
बरं झालं तू गेलीस ते म्हणायला सोपं रे...
का मग समाधान ...आणि आठवण
शब्दांची घालमेल करतोस नुसती ....
विसरून दाखव ना पुरता मला
तेव्हाच मी म्हणेल ...
बरं झालं मी गेली ते ..
कल्पी जोशी १९/०३/2009
वेड लावून गेलीस तू,
स्वप्न रंगवुन गेलीस तू,
भावनाशी खेळुन गेलीस तू,
जाता जाता सलग टोचत
जिवंत रहाण्याची जाणीव
मात्र देऊन गेलीस तू
OCEANHEAL