लिहायचे ते लिहून टाकू
उगाच मनावर भार नको

दाबून सगळे उरामधे
मनावर सारे वार नको

एकदाचे बोलूनच टाकू तोंडावर
मागून छळण्याचे प्रकार नको

थोडं कडू आणि थोडं गोड लिहू
तिखटाचा जास्त अत्याचार नको

जराशी कल्पना, जरा सत्य
खोटेपणाचे षटकार नको

झाले सारे लिहून कि मग
त्यावर फार विचार नको


२९ मार्च २०१०
--प्रिया गवई