याच्या कवितेची दादा Speed लई भारी,
वाचक शोधायची याची Idea सुद्धा न्यारी.
Friend List पहा भली मोठी आहे,
मिसिसिपी नावाची ती मैत्रीण खोटी आहे.
पुन्हा पुन्हा Scrap Book मध्ये Link फेकतो आहे ,
थांबवा हो .... कवी चुकतो आहे ....!

याची कविता खाली तर त्याची कविता वर,
चाले नुसती रस्सीखेच Reply च्या नावावर.
याच्या प्रत्येक Game चा Fanda नवा आहे,
याला Reply च्या बदल्यात Reply हवा आहे.
पहा आज पुन्हा तो कवित्व विकतो आहे ,
आवरारे दादानो .... कवी चुकतो आहे ....!

आपली प्रत्येक कविता वाचावी हा याचा घाट असतो,
पण प्रत्येक जाणकार वाचक म्हणजे निव्वळ भाट नसतो.
याच्या प्रेम कवितेला मध्येच भरती येते,
तेंव्हा जुनीच कविता पुन्हा वरती येते.
शिळीच कधी वाढून हा तुम्हास ठकतो आहे,
सावरा ताईनो .... कवी (दादा) चुकतो आहे ...

चंद्रपूर हा विदर्भामधील एक जिल्हा आहे. पूर्वी चांदा म्हणूनही हा जिल्हा ओळखला जात असे. वर्धा नावाची नदी या जिल्ह्यामध्ये साधारण उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. चंद्रपूरच्या दक्षिणेकडे बल्लारपूर स्टेशन आहे. तसेच बल्लारपूर गाडीमार्गानेही उत्तमपैकी जोडले गेले आहे.

चंद्रपूरकडून राजूरा अथवा अलापल्लीकडे जाणारा गाडीरस्ता बल्लारपूरमधून जातो. वर्धा नदीच्या काठावर वसलेले बल्लारपूर शहर कोळसा खाणीमुळेही प्रसिद्ध आहे. इतिहास प्रसिद्ध असलेल्या बल्लारपूर मधे वर्धा नदीच्या काठावर भुईकोट प्रकारचा किल्ला आहे.



शहरामधील वस्तीच्या एका बाजुला असलेला किल्ला मुख्य रस्त्यापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्याचे प्रवेश पूर्व दिशेला आहे. प्रवेशद्वारापासून जवळच केशवनाथाचे मंदिर आहे. या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेली पण मूळ शिशाची असलेली केशवनाथाची मुर्ती होती. इ. स. १८१८ च्या वेळी झालेल्या युद्धाच्या धामधुमीमध्ये ही मुर्ती चोरीला गेली. तेव्हा भोसल्यांनी तेथे नेमलेल्या कमाविसदार पुंजपाटील मोरे यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करुन नवीन दगडी मुर्ती बसवली.

बल्लारपूर किल्ल्याच्या पहिल्या दारातून आत शिरल्यावर दुसरा दरवाजा लागतो. या दरवाजावर कमळ तसेच सिंहांची शिल्पे आहेत. या दरवाजामधून आत गेल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या मार्गाने दरवाजाच्या वरही जाता येते. येथील तटबंदीचे बांधकाम पुन्हा नव्याने करण्यात येत आहे.

साधारण चौकोनी आकाराच्या या किल्ल्यामधील मुख्य वाड्याची वास्तू इंग्रजांनी पाडून टाकली असल्यामुळे हा भाग मातीच्या ढिगार्‍यामधे लुप्त झाला होता. तोही सध्या साफ करण्याचा प्रयत्न चालू आहे. या ढिगार्‍यामधे काही तळघरे दिसतात. तसेच नदीकाठाकडील बांधकाम सुस्थितीमधे असून नदीकडे जाणार्‍या दरवाजात पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या पायर्‍यांनी नदीच्या पात्रापर्यंत जाता येते. या बाजुने तटबंदीची भक्कम बांधणी पहायला मिळते.

बल्लारपूरच्या किल्ल्याला तीन बाजुंना प्रवेश मार्ग आहेत. किल्ल्यामध्ये राजवाड्याचे अवशेष, तळघरे, भुयारे, तसेच निरीक्षणासाठी सज्जा अशा वास्तू पहायला मिळतात.

बल्लारपूरचा किल्ला आदिया उर्फ अंड्या बल्लाळसिंह या गौड राजाने बांधला. त्याने शिरपूरवरुन आपली राजधानी बल्लारपूर येथे आणल्याचा इतिहास आहे.




माता ज्याची थोर जिजाऊ
शहाजी ज्याचे पिता
तो लढला ज्यासाठी जन्मभरती
होती ती मराठी अस्मिता ||
हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी
तो संतापून पेटून उठला
जो किल्ला त्याने चढला
तेथे भगवा नेहमीच फडफडला ||
तरुणांच्या हाती देऊनी समशेर
घडविला त्याने मावळा
स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी
सोसल्या लाखो कळा ||
धोक्यात आहे आज पुन्हा मराठी
काढूनी टाका सुरांतून नाराजी
उठा अन् शोधा स्वता:तच
तोच मावळा अन् तोच शिवाजी ||

सोलापूर जिल्ह्यात हे लहानसे गाव आहे. सोलापूरपासून ४५ कि. मी. अंतरावर हे स्थान असून श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

अक्कलकोट हे पूर्वी संस्थान होते व ते राजधानीचे नगर होते. येथील राजे मालोजीराजे भोसले श्री स्वामी समर्थांचे अनन्य भक्त होते. अक्कलकोटच्या परिसरात श्री स्वामी समर्थांनी अनंत चमत्कार केले. विदेही अवस्था व संपूर्णतया मुक्त संचार यामुळे श्री स्वामी समर्थांच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारची गूढता असे. असे असूनही हजारो भक्त त्यांच्या दर्शनार्थ अक्कलकोटला गर्दी करीत असत.

अक्कलकोटला येण्यांपूर्वी श्री स्वामी समर्थांनी अनेक ठिकाणी भ्रमंती केलेली असल्यामुळे त्यांचा जन्म आणि पूर्वायुष्याबद्दल अनेक तर्क आहेत.

इ.स. १८७८ मध्ये त्यांनी अक्कलकोट येथेच समाधी घेतली. त्यावेळी त्यांचे वय ५०० वर्षाहूनही अधिक होते असं मानलं जातं.
नंतरच्या काळात सिद्धपुरूष म्हणून परिचित असलेले श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्यामुळेही अक्कलकोट हे भाविकांचं श्रद्धास्थान झालं आहे. अलिकडेच श्रीगजानन महाराजांनी समाधी घेतली. अक्कलकोट हे या दोन तपस्वी पुरूषांच्या वास्तव्याने पुनीत झालेले शहर आहे.

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे नाथ पंथीय घोर तप करणारे स्वामी. त्यांनी वेगवेगळे जन्म घेतले आणि ते समाधी घेऊन आजही वेगळ्या रूपात आहेत, असे भाविक मानतात. समाधी स्थळ, शिवपुरी आश्रम ही येथील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. शिवपुरी आश्रमात सातत्याने अग्नी तेवत ठेवण्याचे शास्त्र - अग्निहोत्र- जतन केले आहे.