परमेश्वराने मानवाची निर्मिती केली. मानवाने अनेक गोष्टींची निर्मिती केली.प्रत्येक गोष्टीचा जन्म ठराविक वेळी झाला व ती वेळ बहुतांश लोकांना माहित असते. तरीही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण दररोजच्या आयुष्यात नियमीत वापरतो परंतु त्या गोष्टींच्या उगमाचा आपल्याला जराही थांगपत्त नसतो. उदाहरणार्थ फक्त एकच पण मजेदार 'नाम' आणि ते म्हणजे "शिवी".
दचकू नाका हो! खरंतेच लिहितोय. तुम्हीही कधी ना कधी आपला राग व्यक्त करताना या "मोहिनीचा" आधार घेतलाच असणार. "मोहिनी" यासाठी म्हणतोय की कितीही मनावर ताबा ठेवला तरी कधी ना कधी तिचे नामःस्मरण केल्याशिवाय चैनच पडत नाही. शिवीचा भक्तगण नाही, असा मनुष्य लाखातच काय पण करोडोतसुद्धा क्वचितच आढळतो.
अशा व्यक्तिंन्ना माझा कोटी-कोटी प्रणाम कारण मी त्यांच्यातला नाही.
शिवीचा जन्म कधी झाला, कोणामुळे झाला, कुठे झाला याचा काडीमात्र पुरावा नाही. तरीही आजच्या युगात जेवढ्या झपाट्याने शिक्षणाचा प्रसार होत नाहीये, तेवढा प्रसार "ही"चा होतोय."मनुष्य" हे एक कोडेच आहे, कारण शिवी हे माध्यम एकच परंतु त्याचा प्रचार, प्रचारक विविध मार्गांन्ने करतात. कोणी आप्तेष्टांचा उद्धार करुन प्रचार करतो तर कोणी स्वतंत्र "ईस्टाईलमध्ये" करतो.
या आधुनीक युगात संस्कारांचा अभाव प्रखरतेने जाणवत आहे, परंतु शिव्यांचा अभाव मुळीच जाणवणार नाही. शास्त्रज्ञ जेवढा वेळ एखाद्या वस्तुच्या संशोधनास लावतात, तेवढ्याच वेळात आजचे युवक (+ युवती) २०-२५ शिव्यांचे संशोधन करून भावी आयुष्यात सर्रास वापरून मोकळे पण होतात. घरी जर आई-वडिलच शिव्या देत असतील, तर तीच प्रथा पुढे त्यांची मुलेपण चालवितात. वडिलोपार्जित संपत्ती नाही मिळाली तरी वडिलोपार्जित "शिव्या" मुले आरामात, काहीही कष्ट न करता आत्मसात करतात.
प्रत्येक मनुष्य या जगात येतो आणि जातो आणि मागे उरतात त्या फक्त त्याच्या . . . . . . . . आठवणी .... आठवणी नाही हो, फक्त शिव्या.
तात्पर्य: अन्न, वारा आणि निवारा यांप्रमाणे "शिवी" ही माणसाची आज एक मूलभूत गरज बनली आहे.
````````` ` सुरज ` ```````````````
मृत्यु निघाला रे आज
गीत स्वस्तुतीचे गात
देण्या माझ्याशी टक्कर
आहे कोण या जगात
असो राजा किंवा रंक
सारे माझ्यापुढे फ़िके
जन्मलेल्या प्रत्येकाला
वेढे मरणाचे धूके
धुक्यातून मरणाच्या
नसे सुटका कोणाची
गाथा मग का ती गावी
अशाश्वत जीवनाची
प्रेम शतदा करता
जीवनावर ज्या तुम्ही
जिवनाची त्या बैठक
क्षणातच उधळे मी
क्षणभंगूर जीवन
मृत्यू हेच एक सत्य
सामर्थ्यापुढे माझिया
बाकी सारे सारे मिथ्य
आहे यादीमध्ये आज
आजी एक नव्वदीची
खूप जगली आयुष्य
वाट आता परतीची
अंधुकशी दृष्टी तिची
त्वचा सुरकूतलेली
भार वाहून वयाचा
आजी आता थकलेली
आजी बसलेली खिन्न
तिची नजर शून्यात
मृत्यू ठाकला समोर
परी तिच्या न ध्यानात
मृत्यू झेपावला पुढे
गुंडाळण्या गळा फ़ास
दचकले जिवनही
आता शेवटचा श्वास
परी कोणाचे हे हास्य
कानी आले आकस्मात
नाद मधूर ऐकता
थांबे मृत्यूचाही हात
आले कसे खळाळत
दीड वर्षाचे तान्हुले
चालत नि लुटूलुटू
आजीकडे झेपावले
खदाखदा हास्य त्याचे
काय हासण्याचा डौल
हासण्यात त्या खळाळे
लक्ष जिवनांचे बळ
गेली खिन्नता पळून
आजी खळाळून हसे
हासण्यात तिच्या आता
बळ जिवनाचे दिसे
बिचकून मृत्यू मागे
दोन पाउले सरला
बळ हास्याचे कळता
अहंकारही जिरला
मृत्यू पाही यादी पुन्हा
आता तिचे नाव नाही
जिवनाच्या बळाने या
थांबविले काळालाही
लपे हर्षात जीवन
आणि हर्ष जिवनात
अशा जिवनाचे बळ
करी मृत्यूवर मात
आज इथे एकटाच
मृत्यू फ़िरला माघारी
जन्म हेच एक सत्य
हाच भाव दाटे उरी
"अळवावरच्या पाण्यात मी
आताच न्हाऊन आलोय
आठवणींचा गाळ मी
आताच जाळून आलोय
खरचं,
शब्द हे मुके असतात
डोळे हे अधु असतात
तु असलीस नसलीस तरी
पापण्या मात्र रडत असतात
एकच गोष्ट आता मी
तुझ्याकडून शिकलो
जाळलेल्या आठवणींवर
जगायला शिकलो
मात्र आता खूप झाले
तुझ्यासाठी झुरणे
आसवांच्या नदीमध्ये
पुन्हा पुन्हा डुंबणे
ठरवलयं,
आता एकच गोष्ट करणार
समोर तुझ्या असाच जगणार
पाहू नको तेव्हा तू
माझ्या डोळ्यामध्ये
अधू ते नक्कीच असतील
"पाऊलखुणांमध्ये"
समोर कधी आलीस तरी
खंबीर उभा राहीन
चुकुनच जर बोललीस तर
हसून दाद देईन
"पण,"
यापुढे मात्र मला आठवू नकोस
स्वतःसाठी मला तू साठवू नकोस
कारण,
मीच नसेन तेव्हा
तुझ्या कश्यासाठीही
एकच फक्त असेल तेव्हा
"तुझ्या जीवामधूनी"
अळवावरच्या पाण्यात तेव्हा
तू न्हाऊन येशील
आठवणींचा गाळ तेव्हा
तू जाळून येशील."
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामान्च्या अभन्गाचा अर्थ
आता थोडा कळायला लागलाय,
तो बरोबर आहे ना.. हे विचारयला...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
पेट्रोल महागणार ...
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?
ओ.बी.सी. कोटा वाढणार ...
माझे शिक्षण झाले ... मला काय त्याचे?
जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला ...
जेसिका माझी कोणीच नव्हती ... मला काय त्याचे?
शेअर बाजार पडला ...
मी कुठे पैसे गुंतवले होते ... मला काय त्याचे?
हिंदू देवतांची विटंबना होतेय ...
मी धर्मांध नाही ... मला काय त्याचे?
२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या ...
मी काश्मीरी नाही ... मला काय त्याचे?
शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही ...
मी तर नोकरदार आहे ... मला काय त्याचे?
सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय ...
आपल व्यवस्थीत चाललय ना ... मला काय त्याचे?
आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत ...
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? ... मला काय त्याचे?
या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे ...
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे ...
मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे ...
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे ...
मला काय त्याचे मला काय त्याचे ...
म्हणत म्हणत जगायचे ...
आणि आपले रोजच ...
कुढत कुढत मरायचे ...
जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असत कुणीतरी...
दिवे सगळे विझल्यावर जळत असत कुणीतरी...
त्याच खिडकित चन्द्र होउन टप टपण्यात मजा आहे ...
कुणीतरी ऐकत असत म्हनूच गाण्यात मजा आहे...
मैफील सारी जमुन येते समईवरती दाद येते
कैवल्याच्या शिखराला गवयाची साद येते
अशाचवेळी पन्ख फुटून उडून जाण्यात मजा आहे
कुणीतरी ऐकत असत म्हनूच गाण्यात मजा आहे...
कुणीतरी वाट पाहत असत म्हणुनच जाण्यात मजा आह
!!!!!!!!!!!!!!!!!
माझ्या वाचनातील एक कविता..
डोळ्यात समुद्र दाटलेला,
आजूबाजूला विहीरी आटलेल्या
हाती फक्त प्रतिक्षा,तरीही जगणे आहेच..
शेतात नाही पीक
शाश्वत फक्त भूक
तरीही जगणं आहेच
कधी जातात औषधाविना,
तर कधी चुकीच्या औषधामुळे,
घराघरातील कोवळी मुलं
तरीही जगणं आहेच
गरीबाई, महागाई, भ्रष्टाचार,
यामुळे खचले फार
झालो जरी उदास फार
तरीही जगणं आहेच
माणूस करतोय माणुसकीवर वार
सैतान झालाय मनावर स्वार
आणि नाती म्हणजे निव्वळ व्यवहार,
तरीही जगणं आहेच
जगणं झालं महाग
मरण जरी स्वस्त,
हे जरी असलं सत्य
तरीही जगणं आहेच,
तरीही जगणं आहेच............
कासवाने मान खसकन आत ओढून घेतली
तेव्हा पहिल्यांदाच मला जाणवलं त्याचं अभेध्य कवच
स्वत्वाला कवटाळून बसणारं,
इतरांना दाद न देणारं,
स्वतः केलेल्या गुन्ह्याना पाठिशी घालणारं,
इतरांकडे पाठ फ़िरवणारं
आणि स्वसंरक्षणासाठी टक्कर देणारं
माझी तलवार आता निरुपयोगी होती
कासवाने मान बाहेर काढेपर्यंत