साहित्य - अर्धी वाटी साबुदाणा , दोन वाटी नारळ , साखऱ , साजूक तूप , वेलची पावडर
कृती - साबूदाणा दोन-अडीच तास भिजवून ठेवावा. खोब-याच्या प्रमाणात साखर मोजून त्यात घाला. नारळाचं पाणी घालून ढवळा. जाड बुडाच्या पातेल्यात एक टे. स्पून साजूक तूप गरम करावं. त्यात वरील मिश्रण घालून ढवळून घ्या. त्या मिश्रणात वेलची पावडर घाला. मिश्रणाचा गोळा होऊ लागला व ढवळण्यास जड वाटू लागले की पातेलं गॅसवरुन उतरवावं. त्यानंतर त्या मिश्रणाचे लाडू वळा.
साहित्य- दोन वाटी शिंगाड्याचे पीठ , एक वाटी दाण्याचा कूट , मीठ , जिरे , आलं , चार टे. स्पून दही , दोन ओल्या मिरच्या , तूप , सोडा , ओलं खोबरं , हवी असल्यास कोथिंबीर
कृती - दोन वाटी पीठ , दही , पाणी घालून ढवळून सात-आठ तास भिजवून ठेवा. त्याआधी त्या मिश्रणात मिरच्या , आल्याचा तुकडा आणि जिरं वाटून घालावं. दोन टे. स्पून तूप घालून ढवळून घ्या. थोडासा सोडा घालून पुन्हा ढवळा. तूप लावलेल्या थाळ्यात पीठ ओतून कुकरमध्ये किंवा मोदक पात्रात वाफवून घ्या. थंड झाल्यावर ओले खोबरं घाला.
साहित्य - व-याचे तांदूळ , कोमट पाणी , मीठ
कृती - तांदूळ मिक्सरमधून वाटून पीठ करुन घ्या. चवीपुरतं मीठ घालून कोमट पाण्याने भिजवा व नेहमीप्रमाणे व-याचे कोरडे पीठ वापरुन भाकरी करा.
गरमागरम भाकरी उपवासाच्या बटाट्याच्या , रताळ्याच्या भाजीबरोबर किंवा खोब-याच्या आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर वाढा.
साहित्य - दोन वाटी शिंगाड्याचे पीठ , एक वाटी दही , एक वाटी तूप , दोन वाटी दूध , दीड वाटी साखर , एक वाटी ओलं खोबरं , एक टे. स्पून ओल्या नारळाचे पातळ काप , पाऊण टी स्पून सोडा
कृती - शिंगाड्याच्या पीठात साखर , तूप , दूध , दही घालून एकत्र मिसळून चार-पाच तास ठेवा. केक करायच्यावेळी त्यामध्ये खोबरं , सोडा घालून एकत्र मिसळून चार-पाच तास ठेवा. केक करायच्यावेळी त्य़ामध्ये खोबरं आणि चिमूटभर सोडा घालून फेटून घ्या. त्यानंतर ओवनमध्ये हे मिश्रण ठेवा. ओवन नसल्यास एका थाळीला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण ओता. ती थाळी गरम तव्यावर ठेवा. त्यानंतर त्यावर आणखी एक तवा घट्ट ठेवा आणि केक भाजून घ्या
साहित्य- पाव किलो सुरण , चार-पाच हिरव्या मिरच्या , एक टी स्पून जिरं , ओलं खोबरं , पाव वाटी दाण्याचा कूट , तीन चार टी स्पून चिंचेचा कोळ , मीठ , साखर , तूप किंवा तेल.
कृती- सुरण किसून घ्या. पातेल्यात तूपाची फोडणी करुन त्यावर जिरं-मिरच्यांचे तुकडे घाला. सुरणाचा कीस , चिंचेचा कोळ , साखर आणि मीठ चवीप्रमाणे घालून परतून शिजू द्या. किस शिजून मोकळा व्हायला हवा. शेवटी दाण्याचा कूट आणि खोबरं घाला