जगीन प्रत्येक मनात आनंद म्हणून

राहिन प्रत्येक मनात आठवण बानून

दुःखाची नसेल सोबत कुठल्याच क्षणाला

सुखाचा देईन ओलावा प्रत्येक मनाला!

ठेवेल प्रत्येकजण मला आठवणीत,

मी म्हणून, । . . माणूस म्हणून

दिसेल प्रत्येकला सुर्य-स्वर्ग माझ्यात,

पण नसेल मोह माझ्या सह्वासाचा,

असतील प्रत्येकाला स्वप्न मी होण्याची, आकाश बनण्याची

जाणवेल शितलता चंद्राची मझ्यात,

तरी नसेल इछा तिला मिठीत घेण्याची!

असेल फक्‍त जाणिव

माझी। . . माझ्या आधारची

जाणवेल माझं प्रेम प्रत्येक श्वासात

तरीही नसेल मोह । . . श्वास घेण्याचा

तेंव्हा मी असेन तिथे

माझा श्वास तुला द्यायला

तेंव्हा जाणवेल तुला माझं अस्तित्व

मॄत्युच्या पलिकडे दिसणारं। . .

सोडेन माझा श्वास

तुझ्या श्वासात मिसळून

पाहिन वाट उद्याची, पुनः जन्माची

पुन्हा एकदा जगण्यासाठी। . .

ह्या वेळी असेन एक माणुस सामान्य

तुझ्याकडे, त्याच्याकडे आधार शोधणारा

आधार शोधतांना अनेकदा पडणारा

आणि । . . आधार मिळाल्यावर सिंह होउन गरजणारा!

त्यावेळी मी प्रयत्न करेन जगण्याचा ‘तू’ बनून

तेंव्हा तू प्रयत्न करवास , खुप मोठं होण्याचा,

मला पंखाखाली घेण्याचा!

मी थांबीन विसाव्याला तुझ्याजवळ थोडावेळ,

घेईन अनुभूती, तुझ्या स्पंदनांची

बघीन ठोडी स्वप्न - नव्याने जगायला,

वाकेन, मोडेन – पुन्हा नव्याने धावायला!

पण । . . पण तेंव्हाही तू नसशील तर?

तर । . . तर मलाच व्हवं लागेल मोठ . . . खुप मोठं

व्हावं लागेल तोच सुर्य – तोच स्वर्ग,

ठेवावी लागतील मनाची दारं उघडी,

तुझ्यासाठी, त्याच्यासाठी। . . प्रत्येकाचंसाठी!

सांग ना, तू असशील ना तेंव्हा?

मला थोपटायला, निजवायला, मला मिठीत घेऊन कुर्वाळायला

मी रडलो तर माझे डोळे पुसायला, माझ्या बरोबर रडायला

आणि रडता-रडता माझ्यात हरवायला!

सांग ना, आसेल ना तुझी जणिव

माझा श्वास जिवंत थे्वायला?

असेल ना तुझा आधार

मला पुन्हा रुजवायला?

कदाचित तू नसशील तिथे

तरीपण । . . माझी एक आपेक्षा

तुझ्यात असाण्याची, माझा आत्मा असण्याची!

आणि तू असतांना सुद्धा

कदाचित मलाच व्हावं लागेल मोठं

द्यावा लागेल तुला हात,

द्यावाच लागेल मझा श्वास

तरी पण घेईन मी पुःजन्म

पुन्हा जुन्याच अपेक्षेने

एक ‘माणूस’ होण्याच्या

तुझ्या पंखाखाली जगण्याच्या

त्यासाठी कदाचित पहवी लागेल मला वाट

तुझी, तू आकाश बनण्याची

विसरून स्वतःला तुझ्यात,

‘आनंद' होऊन,फक्‍त ‘आनंद' होऊन जगण्याची!



-ॐकार बापट

भेट अशी की...

भेट अशी की जिला पालवी

कधीच फुटली नाही

कोर शशीची घनपटलातून

कधीच सुटली नाही

मिठीविना कर रितेच राहिले

दिठीही फुलली नाही

ओठांमधली अदीम ऊर्मी

तशीच मिटली राही

युगायुगांचा निरोप होता

तोही कळला नाही

समीप येऊनी स्वर संवादी

राग न् जुळला काही

खंत नसे पण एक दिलासा

राहे हृदयी भरूनी

अलौकिकाची अशी पालखी

गेली दारावरूनी

- 'कुसुमाग्रज' - 'पाथेय' काव्यसंग्रहातून

सये...

आता तुझा प्रत्येक क्षण माझ्या अस्तित्वापासुन दूर असेल...

वर वर तु निश्चिंत असशील...पण मनात मात्र दुःखांचा पुर असेल...!

कही दिवसांनंतर हा पुर ओसरेल...

कुठल्यातरी बेसावध क्षणी ... पुन्हा पाऊस घसरेल...

पुन्हा कुणीतरी आवडू लागेल... पुन्हा डोळे झुरतील

मनात मात्र तुझ्या तेंव्हा... माझेच ऊसासे असतील...

वाट बघ॥ प्रेमाची भावना पुन्हा उफाळुन येते का?...

त्या क्षणी नकळत का होईना॥बघ माझी आठवण येते का?

किंवा कदचित असेही होईल...तुला एखाद स्थळ सांगुन येईल

दोन्ही घरची बोलणी होतील...दोन्हीकडुन होकार असेल...

घरात जरी हो म्हंटलस्...तरी मनात तुझ्या नकार असेल...

मनं पुन्हा दुबळ होईल...स्वतःची बाजू मांडायला...

अपयशी ठरल म्हणून 'वेड'॥तुझ्यशीच लागेल भांडायला

भांडण मिटेपर्यंत कदाचित॥अंगावरती हळद चढेल..

आपण नक्की काय करतोय॥तुझ्या मनाला कोडं पडेल

सनईच्या सुरांवर॥ वाजंत्र्यांच्या तालावर..नव्या घरात प्रवेश होईल

पायान माप ओलांडताना मात्र मनाला क्लेश होईल

क्लेश होउ देऊ नकोस॥असेल त्याचा स्विकार कर..

"तुझ्यावर आता जबाबदारी आहे"॥याचाही तेंव्हा विचार कर।

अंगावरची हळद आता बघ हळुहळु उतरते का॥

पिवळ्या पाण्याकडं लक्ष गेल तर बघ॥ माझी आठवणं येते का?..

दिवसांमागुन दिवस जातील॥वर्षां मागुन वर्षे जातील

नव्या आयुष्यामध्ये पुन्हा॥नवी नाती निर्माण होतील..

नव्या नात्यांच्या नवेपणात॥आपल नात जुन होईल..

नात्याप्रमाणेच हळुहळु॥मनसुध्दा सुनं होईल..

माझ्या सुन्या मनात मात्र॥फक्त तुचं उरशील..

माझ्यासारखीच॥एक दिवस..तु सुध्दा झुरशील..

बघ॥ एखादी पाऊलवाट तुला..माझ्या आठवणींकडे नेते काय..?

बघ॥सुकल्या झाडाला.. नव्याने पालवी फुटते काय?

आयुष्याच्या अंतापर्यंत निदान॥ निखळ "मैत्री" तरी उरते काय?

आणि आयुष्यात॥एकदा तरी..."बघ माझी आठवण येते का?"



मित्रहो मी काही कवी नाही पण चांगल्या कविता जमा करण्याचा एक छंद आहे त्यातीलच ही एक कविता..

कितीदा पुसशी तु मला ?

काय आवडते तुझे मला ...

कितीतरी मोहक गोश्टी अशा

शब्दात अरे त्या सा॔गु कशा ?

विरहाच्या पिसाराच्या शेकडो छ्टा,

दाविती मज प्रेमच्या अवखळ वटा !

Gtalk,Yahoo ,Email चे ते वादळ,

तुजसवे पाडी मनाला भुरळ !

बोलणे स॔पता स॔पेना ,काळ सरता सरेना

तुजसवे बोलतना ,उडुन जाती मम वेदना...

रगवून थोडे चिडणे ,तू मला समजावणे ,

हो॥हो करत ते भा॔डण मिट्वणॆ

असाच स्वप्ना॔चा झोपळा रे ॥

मनमोरच्या काव्यप॔क्ती स्फुरती रे

प्रेम काय कधी तरजुत मोजतात

अश्रु॔ची सुध्दा जेव्हा फुले होतात

ते हसणे ....ते जीव लवणे

कळ्जी घेणे ...कशातच मुळी नही उणे !!



------धनश्री पोटे

"तसं पहायला गेलं तर माझ्यासाठी काहीच बदललेलं नसतं। . ."



मळकटलेल्या त्या कालनिर्णयची पानं,

बर्र्याच दिवसांपासुन पलटायची विसरलेली असतात

अन ॠतुत झालेले ते किंतिचसे बदलही,

उगाचचं फुटक्या कौलातून आत डोकावत राहतात। . .



कधी थंडी शिरते हळूच आत। . .उबारा शोधायला

तर कधी बरसुन जातो ढगं। . . थोडंसं कोरडं व्ह्यायला

अवखळ असा एक कवडसा, दिवसाउजेडी घरात शिरतो

दिवस मावळता तोही बेचारा, मला एकट्याला सोडुन जातो। . .



रात्री मात्र थोडे बदल नक्कीच जाणवायला लागतात

कुस बदलल्यावर थोड्या चांदण्या, जेव्हा खिडकीबाहेर दिसायला लागतात

तिकडे मग दुर्लश्य करुन, नुसतंच कुस बदलतं राहायचं,

उमलु लागलेल्या तिच्या स्वप्नाला दचकून सारखं जागं करायचं। . .



कित्येक दिवस झाले असतील त्या घटनेला,

पण काल अजून जणू तिथेच गोठलेला असतो

अन तिला भेटायचो तिथला वडंही आता,

ॠतुबदल झेलून थोडा म्हातारा दिसत असतो। .



उरलेले उन्हाळे-पावसाळे मात्र लवकर सरुन जात असतात

ॠतुंचे अर्थही आता जाणवतील एवढे बदललेले असतात,

पण। . .

"पाहायला गेलं तर माझ्याचंसाठी काही बदललेलं नसतं,

फ़क्त पत्त्याबरोबरं तिने तिला नवं आडनाव शोधलेलं असतं। . . "


- रोहन

तुझ्याच वलयात रहायची सवय झाली होती...



आता त्या वलयांचा गुंता झालय

वलयं वाफ होऊन केव्हाच हवेत विरुन गेलीत...

तुझा गुंता राहिलाय!!!

ज्यात गुंतलीय मी...



तुझ्या त्या विरलेल्या वलयाला
मुठीत पकडण्याची माझी अखंड धडपड

पण तु केव्हाच सुटुन गेलायस।



मी धडपडतेय,

आण्खीन गुंततीये,

गुंता वाढतोय,

वलयं संपलीत,

तु ही गेलास,

मी तिथेच,

तु नाहीस,

फक्त गुंता,



गुंता तुझा

गुंत्यात मी

तरीपण वेगळे

तु अन मी...



-अस्मित

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात

खूप आहे माझा तुझ्यावर प्रेम
पण कसा वेगळाच आहे ह्या फीलिंग्स चा गेम

प्रेमाची भाषा मला कधीच नाही कळली
पण मलाच माहीत नाही मी तुझ्या प्रेमात कशी पडली

मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस किती वर्ष???

तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी
पण पायात अडकली आहे करियरची बेडी

हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे

.................NETRA MULE...............

मलाही वाटतं

ढगांवर झुलावं

वारयावर खेळावं

पाण्यावर पळावं

अन सगळ्यांनी ते पाहताना

माझ्यावर ज़ळावं

अन त्याना पाहुन मी

पोट धरुन हसत हसत लोळावं

अन डोळे उघडल्यावर

स्व्प्न असं असतं हे मला कळावं



...अस्मित

व्य़था या व्य़ाकुळ मनाची

डोळ्यातुन सागण कठिण आहे

मला सागता आली तरी

तुला ते कळण कठीण आहे.....


तु जवळ नाहीस तरीही


मी एकटा कधीच नसतो


तुझ्या अस्तित्वाचा गध


माझ्याभोवती दरवळत असतो


विरहाचे ऊन जाळते कधी


मनाची तगमग होते


तुझ्या डोळ्यातील शितलता


त्यावर ह्ळुच फुकर घालते


तुझ्या भेटीची ओढ


थन्डी होउन अन्गाला झोबते


तुझ्या आठवणी शाल होउन


पाघरुन घालीत उब देतात


स्नध्याकाळी,एकान्तवेळी


आठवणीचा वारा सुटतो


मझ्या प्रत्येक श्वासागणिक


तुझ्या केसाचा सुन्गध् येतो


होतो अबोल मग मी सुध्दा


अन् तुझ्यामधे रन्गुन जातो,


मी प्रेमात पडल्याच


प्रत्येक क्शण सान्गुण जातो...............


.अतुल पाटील

सांता डॉक्टरला : डॉक्टर सर्व अंगावर दुखते आहे.
डॉक्टर : कुठे दुखते आहे ?
सांता : (सांता एका बोटाने दाखवतो) हे बघा, डाव्या पायाला हात लावला तर दुखते.
डॉक्टर : आणि ?
सांता : हे बघा, उजव्या पायाला हात लावला तरिही दुखते.
डॉक्टर : आणि ?
सांता : कानाला हात लावला तरिही दुखते.
डॉक्टर : आणि ?
सांता : कपाळाला हात लावला तरिही दुखते.
डॉक्टर : तुम्हाला काही झालेले नाही, तुमचे बोट दुखावलेले आहे

गाड़ी असताना चालत का जाऊ??
गाड़ी असताना चालत का जाऊ??
वर माज़ेच नाव असताना उखाणा मी का घेऊ?

अव्यक्त माझे भाव अन् बोलणार तूही नाही !

दडवलय मी हे गुपित अन् खोलणार तूही नाही !



रमणीय सृष्टी,रंगली मैफल स्वर्गीय सुरांची !

निश्चल मी तरी अन् डोलणार तूही नाही !



लपवूनि अर्थ गहिरे; उधळले शब्द सारे !

न मोजले मी कधी अन् तोलणार तूही नाही !



भरलेला समोर हा प्याला; साखर सर्व तळाला !

प्यालो मी तसाच् अन् घोळणार तूही नाही !



हा अबोल दूरावा भासे जणु वैषाखाचा वणवा !

थंड आहे मी तरी अन् पोळणार तूही नाही !



क्षणोक्षणी तुझेच् स्मरण; आलो कधी चुकून समोर॥

नजर मी चुकवेन; अन् ओळखणार तूही नाही !



-परीक्षित

विसराताना मी तुला॥
विसराताना मी तुला।
मी मलाच विसरून गेलो।
विसराताना मी तुला।
मी तुझ्यासावे हरवलो।

कोण मी? अं कोण तू?
प्रश्नच उरले नाही।
मी असा का? तू तशी का?
प्रश्नच उरले नाही।

‘प्रेम म्हणजे दुर्बालता’।
हे सत्या मज कळले।
‘प्रेम म्हणजे आधार का?’
हे प्रश्नही जळाले.

प्रेम असते धागे सारे।
का प्रेम अंधार अस्तों?
प्रेम असते सॉँग सारे।
का प्रेम प्रमोद अस्तों?

जन्मा जहाला सूशका सारा।
जीवानमार्ग खुंतला।
तरी रंगवें चित्रा तायचे।
जरी हरवला कुंचला…
जरी हरवला कुंचला….

मित्रांनो आणि मैत्रिणिंनो ,ही कविता मी लिहीली नाही ,आपल्यात इतकी प्रतिभा असण शक्यच नाही ...

उशाला माझिया
उमले मोगरा
गंध दुलईत
तुझाच बाबरा

श्वासात बेभान
उन्माद कापरा
उन्माद कापरा
तुझाच नखरा

करात माझिया
लाजते अबोली
होऊनि बेधुंद
मिटते पापणी

माझिया गळ्यात
हार दो करांचा
हलके उघडी
पडदा लाजेचा

स्पर्शाने तुझिया
वणवा पेटतो
बेभान किनारा
नदीला भेटतो

डोळ्यात माझिया
सखे तुझा नूर
जातेस का दूर
लावून काहूर

थांब ना जराशी
ओसरू दे पूर
छेडून जा सखे
एकदाच सूर

-- क्षिप्रा

लहानपणी पाठ्यपुस्तकात ही कविता आपल्याला होती. आजही ही कविता मला संपूर्ण आठवते. कवीचे नाव मला आठवत नाही पण फ़ार छान आहे ...तुम्हाला आवडली तर सांगा

आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावार करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो, मावळणारा रवी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

सहज म्हणुन ?
सहज म्हणुन ?

सहज म्हणुन आजवर
दोन तें शब्दन वर ,
किती असशी थिजली आहेस ??
किती आतून विजली आहेस ??

सहज म्हणुन आजवर ,
मस्करी मी केलि तर ,
का नेहेमी असा गुसयाचा ??
का एकत्यात कुजयाच ??

तू जातेस तय वाटेवर कदाचित
तुझेच नियम नसतील ,
म्हणुन दरवेलेस रगों ,
वाट तुज्ही बदशील ??

जून बांध तोडायाचे ?
सहज म्हणुन ज्हलेल्या गमतीत ?
खरा सांग जगशील का?
नशील जेव्हा माज्या संगतीत ??

लोक तशेच आसतात ,
त्यांना बदलायचा आपण पहायचा ??
त्याना मागे टाकुन निघू खरा ,

पण स्वताहाच आह्त्वन म्हणुन रहायचा ?

Mandar

टांण टांण टांण टांअण टांण..........
हे ऐऐऐऐ.......................... हुर्रे!
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

काही दिवस आता आई
लागू नकोस हा पाठी
नको दप्तर नकोच पाटी
नको देऊस खाऊची वाटी

सुटी सुटी सुटी मी मे महिन्याची सुट्टी

अस्स स.......................... चक

कच्च्या पक्क्या मण्यांनी लगडली
आहे करवंदाची जाळी
आंबट झेर फोड कैरीची
अन चिंचेची अवीट गोडी

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

नको रिबीन नकोच वेणी
फिरूदे मला तशीच झिपरी
सैल गाठ अंबाड्याची
दे घालून माने वरती

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

बोंडा बोंडातून उडणारी
चल पकडू उनाड शेवरी
रानामधल्या सोनं तुऱ्यांची
चल जमवूया जुडी

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

तास अन तास नदी काठी
मारू डोहामध्ये दडी
सूळ-सूळ सूळ-सूळ पोहणारी
मी पाण्यामधली मासोळी

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

आऽऽछी.....!

तशाच भिजल्या अंगांनी
तशाच भिजल्या अंगांनी
तांबूस पिवळी.. हिरवट निळी
ही बघा अनोखी मज गाठी

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

या डोंगरा पलीकडची
दिसली का गं निळी टेकडी
त्या टेकडी पल्याड राहते
चल बघू मोरांची जोडी

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

चिंगी नाही पिंकी नाही
भुण-भुण करते म्हणते ताई
चल मामाच्या गावाला जाऊ आई
झुका-झूक झूक-झूक अगिनगाडी

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

मामीच्या खोलीत जाऊनी
उगाच उचक पचक करावी
साळसूद आव आणून वरती
साळसूद आव आणून वरती

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

.आता बस्स ना गं आई
बाबा एकटा आहे घरी
बाट बघत असेल चिंगी
कान गोष्टींची झालीये घाई

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

मुरंबे मोरावळ्याची बरणी
आजी देणार यंदाही नक्की
कोणतीही कर मग भाजी
बरणीभर मज पुरे बेगमी

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

आवळ्याची कडक सुपारी
साबूदाण्याची मस्त पापडी
साखरेमध्ये मुरत घातली
रातांब्याची लाल वाटी

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
घेऊन बसेन हां मी काठी
राखाया अंगणात दुपारी
कावळे चिमण्या बघेन हां मी
मला खाऊदे ओली चकली

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

असा लगडलाय पेरू दारी
आई आता कर ना गं जेली
आणून देते रंगासाठी
फळे तूतूची हवी तेवढी

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

अंगण उकरू खडे फेकू
धोपटून धोपटून माती बसवू
शेणसडा अन रांगोळी
अंगणाची ऐटच न्यारी

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी

कुहु-कुहु कोकिळ गाती
टीर-टीर टीर-टीर पोपट जोडी
आणि दारी चिवचिवणारी
आम्ही पाखरे सारी

भुर्रर्रर्र................!

किती लवकर संपते ना ही सुट्टी
किती राहिली अजून मस्ती
ठके आता मोठी हो गं बाई
ये शिकवते तुला दोन गोष्टी

मुलगी म्हणून आलीस बाई
असा उनाडपणा बरा नाही
ही बघ वीण, घाल साखळी
भरून टाक सुबक नक्षी
विणताना धर जपून सुई
नाहीतर तुलाच लागेल काही
सुखी सुखी सुखी
राहशील तरच बाई

सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
सुखी सुखी सुखी
मी मे महिन्याच्या सुट्टीतली


स्वाती फडणीस ....................... २००७

माझ्या कवीतांना रिप्लाय करा, माझा अहंकार सुखावतो
रिप्लाय नाही केला तर, माझा ग उगाच भुकावतो

माझी कवीता उत्कृष्ट आहे, इतरांची खैर नाही
असे प्रत्येकाला वाटले, त्यात काही गैर नाही

स्तुती करताना जरा तोंड भरून करा
टिका थोडीशीच, जरा हात आवरून करा

सत्य सांगताना थोडं ठासून सांगा
खोटं सांगताना थोडं हासून सांगा

मला चांगलं म्हणा, तुम्हाला चांगलं म्हणेल
मला वाईट म्हणा, तुमचे धाबे दणाणेल

मी महान आहे, शंका काढू नका
मी लाथा झाडेन, तुम्ही झाडू नका

माझ्या प्रतीभेची साक्ष, माझ्या घरी शारदा पाणी भरते
(शारदा नावाची मोलकरीण, आमच्या घरी भांडी धुणी करते)

माझी कवणे गा, तुमचे नगारे झडत जातील
माझ्याशी पंगा धेणारे, वार्‍यावर उडत जातील

हरीश दांगट
May 17, 2009

का मला माहित नाही
पण आज अचानक दुपारी
मी माझ्या खोलीची खिडकी उघडली
रणरणत्या अशा दुपारी
भकास रस्त्यावर नजर माझी धावली
उजाड वाटेवर लक्ष जाताना
घामाच्या धारा शरीरातून वाहत होत्या
अंगाची काहिली होताना
दुर्गंधीचे धुमारे वातावरणात पसरत होते
दुरवर कोणी चिटपाखरू
डोळे फाडुन पाहिल तरी दिसत नव्हते
आणि एकदम अचानक....
कुठूनशी गार हवेची झुळूक आली
मला खर तर तुझी आठवण आली
आणि अचानक तू नजरेस पडली
माझी भकास दुपार तुझ्यामुळे गारेगार झाली
प्रसन्ना जीके




Posted by Picasa


Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa




Posted by Picasa







Posted by Picasa