मी माघार घ्यायला शिकलोय
पिउन तुझ्या आठवानिना
या डोळ्यातल्या आश्रुना
जागा देऊन शकलोय
मी माघार घ्यायला शिकलोय
ह्रुदयाचे झाले तुकडे
प्रेमाच्या वलवंटात इकडे
ते वेचायला कंटाळलोय
मी माघार घ्यायला शिकलोय
हजारदा येउदे समुद्र लाटा
त्याचीच एक झालोय छटा
कण कण आता विराघळलोय
मी माघार घ्यायला शिकलोय
झगडत नहीं कलोकाशी
स्वतहाला त्याच्या कुशी
सामावून जायला निघालोय
मी माघार घ्यायला शिकलोय
तोडून आनायाचे होते तारे
आकाश झाले रीते सारे
एक टक बघत बसलोय
मी माघार घ्यायला शिकलोय
सारीपाट हा जीवनाचा
कस काय मोडायचा
आठवनिना तुझ्या मुकलोय
मी माघार घ्यायला शिकलोय.........
--------- @/\/\it
एक सरळ आणि साधासूधा मुंबईकर
बरं झालं
अजुनही माझ्या श्वासात तु अडकलास
माझ्या मनी स्वप्नांचे आभाळ सांडलेले
उपाय नाही म्हणुन मनाला समजावतो
वेदनेच्या मी छेडून तारा ,आळविल्या यातना जेव्हा...
दाद देऊन दर्दी म्हणाले ..".व्वा! काय सुरेल गीत आहे!"
वरातीत तिच्या बेधुंद नाचून , मी निर्जीव परतलो घरी...
सजीव होऊन अंगण हळहळले... "त्यागातच खरी प्रीत आहे!''
हरलो जरी प्रत्येक डाव, ह्या रडव्या जगाबरोबरचा...
अखेरपर्यंत खेळलो खऱ्या दमाने ...ह्यातच माझी जीत आहे!
बहराबरोबर थिरकत्या दुनियेच्या, सापडलो मी पायदळी...
हरकत नाही!पालवी सुकली की पाचोळा म्हणण्याची रीत आहे!
निघताना म्हणालीस तू..." पुढच्या जन्मी नक्की भेटू..."
हा जन्मच वाया मग ! आता मरणातच माझे हीत आहे!
बधीरतेवर फीदा होऊन माझ्या, मद्यही पडले फिके...
निराशेच्या भरात ,आजकाल मदीराच मला पीत आहे!
कैफियत मी ,माझी ,मलाच सांगतो सराईतपणे...
इथे जगही तटस्थ , अन स्वतः 'देव' तिराईत आहे!!!
गौरी सावंत .
नवीन पहाटे ....
सरलेले दिवसाही...
इतिहास जमा होतात।
उश्ाहाकालेच्या उंभारट्यावर्ती॥
डोळेही नवीन स्वप्ना पाहतात॥
विरालेल्या सुरा नंतर...
शब्द तेच रहातात॥
मनालाही जसे॥
नवीन सूर गावस्तात॥
स्मृतींच्या धुरात विस्म्ृत होऊन॥
मनाच्या भटकंती ही कधी॥
चालता चालता॥
नवीन पायवाट शोधतात॥
नव्हते जे आपले कधी॥
त्याच्या गमवण्याचे दुखही॥
उरलेल्या क्षणानाच॥
आपले मानतात॥
होते ती नवी पहाटे॥
मिळतात विरालेले सूरही॥
परत होता मन ओलेचिम्ब
भिजून स्वप्नांच्या धुंद पावसात...
प्रियंका
म्हणूनच हृदययंत्र चालतय.
तुझे खरच प्रेम आहे,
म्हणूनच ते ही धडधडतय.
© अमोल भारंबे (२००८).
तुझे आपल बर आहे
स्व:ताशीच लपंडाव खेळतोस
वेडा झालास की आठवण येते
आठवण आली की वेडा होतोस
का तू असा स्व:तालाच फसवतोस
बोलायला पुन्हा मोकळाच
"बर झाल तू गेलीस ते "
kadambari