|
0
comments
]
नव्हे वर्षांत
भेटली नाहीस तू
कुठे आहेस तू ?
तुला शोधण्याचा
खूप केला मी प्रयत्न
पण व्यर्थ ठरले
माझे सारेच यत्न
नव्हता तुझा पत्ता
यास्तव सुटलेला धीर
तरीही तू भेटशील
म्हणून होते मी अधीर
पूर्वी कशी अवचित
भेटली होतीस मला
वाटले तशीच तश्शीच
भेटशील आताही मला
कुठे कुठे शोधले तुला
सुखात , दु:खात
निराशेत , उत्साहात
गावात , शहरात
अंधारात , चांदण्यात
दिवसा , रात्रि
रानात , वनात
पावसात , नव्हे उन्हातही
पावसात , नव्हे उन्हातही
कुठे तुझा थांग
कुठे आहेस तू ?
आता तरी सांग.
कुठे आहेस तू ?
कुठे आहेस तू ?
प्राणसखी " कविते "
कुठे आहेस तू ?
-----संगीता सावंत. कोथरुड.पुणे.
४१२००८.