आणाभाका तूच घेतल्यास माझ्याशिवाय न जगण्याच्या
मी फक्त प्रेमच करत गेलो
जातेवेळी मागे न पाहताच
जातेवेळी मागे न पाहताच

आजूनही हे काळीज तीळ तीळ तूटते

"बर झाल तू गेलीस ते "

Oceanheal

राम:-ही समाधि माझ्या मित्राची आहे .
त्याने आपल्या मॄत्युनंतर आपले सारे काही
अनाथआश्रमास देऊन टाकले..
शाम:-फ़ार थोर होते ते,काय दिले त्यांनी?
राम:-चार मुली आणि दोन मुलगे....

आठवणी नेहमीच गोंजारलयास हळुवार तु
सुगंध त्या क्षणांचा
जपलास मनात अपार तु

"बरं झालं तू गेलीस ते...."
या ओळीतही प्रेम शोधते तु
आसतात जगावेगळी माणसे
एक निशब्द दूसरी तु !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

क्षितीजाचा हव्यास मला कर्तव्याचे भान मला
धयेय पूर्ती करतांना
आता देता येणार नाही साथ तुझी मला !

अस्वस्थ करून जाणारी तुझी आठवण
परत आलो जिकडे होतो तिकडे

असे वाटते
बर झाले होते तू गेलीस होतीस ते

आलीस परत
होते जे दरवाजे बंद परत बरे उघडावे
उजेड्लेला सूर्य परत का अंधारात जावा

असे वाटते
बर झाले होते तू गेलीस होतीस ते

अश्रु चा ओघ जो थांबला होता
तोच का अनावर

नयन टिपून होते तुझ्या वर
असे वाटते
बर झाले होते तू गेलीस होतीस ते

पंकज रोकडे

आठवनी चे जे कारंजे
विस्तावाची जी आग
स्पर्ष जो तुझा

मना मद्ले ते उगम स्थान
विनाकारण येणारी.. हवा
आणि होणारी जीव्हाची त्राघा

बर झल तू गेलिस ते

पंकज रोकडे

ना झालीस माझी न मी झालो तुझा
बस एवढेच होते की प्रेम करतो सदा

वाटले नवते तू एवढ्या लॉकर निघून जाशील
वाटले नवते माझ्या लग्न मदे पोर खेलवु लागशील

"बर झल तू गेलिस ते "

स्वप्ना मदली होतीस तू
मना मदे भरलिस तू....

विचार नवता आचारनवता झाले कसे प्रेम

बर झल तू निघून गेलिस ते

तुला बरे विश्वास होता मी तीकडे येणार
रडू आवरले नाही तुझ्या सारखापुध्या च्या दिवशी
तुझ्या डोल्या मद्ल्या भावना का बरे ना दिसणार

बर झल तू निघून गेलिस ते

पंकज रोकडे

मीच चन्द्र, सूर्य मीच...
सुर्याला लागलेल ग्रहण मीच...

मीच सुर, ताल मीच,
किंचाल्यांतला ला आक्रंद मीच.

पंख माझेच, आकाश मीच,
तडफडणारा जटायु मीच...

मीच डोंगर, नदी मीच,
उफाळलेला पुर मीच...

मीच ढग, विज मीच...
कोसळणारी आग मीच

आयुष्य मीच अंत मीच,
धडपड़णारा श्वास मीच....

स्वतःलाच मीच सवारनारा, मीच स्वतःला बुडवणारा...
आणि मीच माझ्याच आयुष्याला नविन वाट दाखवणारा....

PRIYA GAWAI

विश्वासाला माझ्या मीच तोडून पाहीले... माझ्यातून तुला उणे करूनही
फक्त तुझेच अस्तित्व राहीले ...

शब्दांना असते धार ... तेही मला कळाले ...
का गेलिस तू त्याचे उत्तरही मला मिळाले ...
बरे झाले तू गेलिस ते ...

पुन्हा वळून बघू नको माझा पुन्हा म्हणू नको
हव्यास हव्यास आसुदे असाच
कर्तव्याचा ,धैयाचा ,क्षितीजाचाच

साथ कुणाची कुठवर पुरते ?
...."बरं झाल तू गेलीस ते .................."

हृदय ठिसूळ असेल नसेल,
स्फ़टिकाचं बनलं होतं, जाणते मी
काचेलाही " हॅण्डल विथ केअर " म्हणतात,
स्फ़टिकाचं मोल जाणलंच नाहीस.

बरं झालं मी परतले नाही ते !!!

प्रियकर - राणी, लग्न झाल्यावर तू माझ्यासाठी काय काय करशील गं?

प्रेयसी - राजा, सारं सारं करील रे!

प्रियकर - म्हणजे नेमकं काय काय करशील?

प्रेयसी - समजा, दिवसभर काम करून तुझे हातपाय दुखले, तर मी ते चेपून देईल!

प्रियकर - डोकं दुखलं तर...प्रेयसी - दाबून देईल!

प्रियकर - पण समजा, दिवसभर तुझ्याशी भांडून भांडून माझा घसा दुखला तर....?

प्रेयसी - तर मी तुझा गळा दाबीन!

आता ठरवलं आठवणीच्या समुद्रात शिरायच नाही मला माहित आहे किनारा लवकर सापडत नाही
काळाबरोबर विसरणार मी तूला, तू माझी सोबत नाही पुन्हा वळून बघणार नाही मी तुझा आहे आता परत म्हणनार नाही
....................

पण सगळे भरले असुनही
आत कुठेतरी आहे 'रीते'
उरलेली पोकळी भरायला
पुन्हा पुन्हा तुझी आठवण येते

"बर झाल तू गेलीस ते.........."

पहिला प्रेम कुणी विसरता का

गर्दीला आपले

कुणी म्हनत

का

नजरेत तुच असतांना दूसरा कुणी

दिसते काय

"बरं झालं तू गेलीस ते...."

कल्पी जोशी

मला रडताना तू पहाते,
हे ना मला साहते,
तुझे जाणेच सुसह्य ते,

बरं झालं तू गेलीस ते.......

"काय चाल्लेय?", सॅवियोने करणला विचारलं. गेली बराच वेळ करण कॉंप्युटरवर बसून काहीतरी करत होता.


"माझी मेनका-द-ड्रिमगल.कॉम साईट अपडेट करतोय. परवा तिच्या आगामी चित्रपटाचे ‘इधर उधर’चे फोटोज मिळाले ते अपलोड करतोय. हे बघ!"सॅवियो तिचे फोटो बघायला, भुकेला सिंह ज्या उत्साहाने कोऱ्या गवताकडे बघेल, तेवढ्या उत्साहात पुढे सरसावला. सॅवियोला मेनकात बिलकुल रस नव्हता. समीरदादा सांगतो तशी त्याला ती थोडी थोराडच वाटायची. भरपूर मेक-अप करून अन फोटो इफ्फेक्ट्स वापरून वय कमी करणे हे काही अशक्य नव्हते. पण हे सगळं करणच्या समोर बोलून दाखवण्याइतका तो काही मूर्ख नव्हता.





"छान आहे!", सॅवियो फोटोतली दूसरी हिरोईन मालविका कडे बघून म्हणाला. करणने कॉंम्प्युटरवर सॅवियोच्यासमोर उत्तान मालविकाला फोटोतून खोडलं अन मेनकाची इमेज साईटवर अपलोड केली.





"परवा बॉलीवूडब्लॉग्स वर गेलेलो, तिकडे मेनकाचा फॅन क्लब आहे. तिथे मला आज सेप्शल गेस्ट म्हणून ऑनलाईन चॅटवर बोलावलंय. मी इतर नवशिक्या मेनका फॅन्सच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे." करण दिमाखात म्हणाला.


"अरे पण सायन्स होमवर्क! सोलंकी मिस पट़्ट्या मारते रे होमवर्क नसेल तर!"


"माझा झालाय!"


"अरे मग इतका वेळ सांगितलं का नाहीस?"


"तू विचारलंस का?"


"तुझा होमवर्क झाला ह्याचं काय मला स्वप्न पडणार होतं? ठिक आहे. दे मग टेक्स्ट बुक. मी छापतो."


""नाहिये!"


"का? कुठे आहे?"


"एका मित्राला दिलीय."


"कुणाला?"


"आहे एक वर्गातला मित्र."


"कोण विनोद? हेतन? दानिश शाह? "


"नाही! वेगळंच कुणीतरी!"





सॅवियो गोंधळला पण थोड्या वेळातच काहीतरी समजल्यागत डोळे मिचकावत म्हणाला, "मित्र? हं? की मैत्रीण! प्प.प्प...पूजा प्रधान ना? काय?"करण ओशाळला. त्याच्या गोऱ्या गालावर लाली चढली.


"कधी आलेली? काय बोलली? सांगना!"


"दुपारी आलेली. काही विशेष नाही. सायन्स होमवर्क केला का म्हणून विचारत होती. मी दिला!"


"काय दिलं? आणखी काय म्हणाली?", सॅवियो उत्साहात होता.


"मी दिला, सायन्स, मॅथ्स आणि मराठीचा होमवर्क! म्हणाली थॅन्क्स. रात्री परत देईन म्हणून."


"ले बिड्डू!! म्हणजे रात्री पुन्हा गुटर्गू आहे! काश मै भी मेरा होमवर्क टाईमपे करता तो मेरे भी घर लडकियां आतीं और कहतीं..."


"भैया!", करणने सॅवियोची जन्नत-ट्रीप तोडली, "होमवर्क बाकी है भैया!"





वियो त्रागा करत उठला, दरवाज्याशी जाऊन, "उद्या भेटूया! रात्री काय काय झालं ते सांग तेव्हा!" असं म्हणून निघून गेला. सॅवियो नाहीये तर करणला पुढचे काही तास शांतता मिळणार होती. समीर अजून ऑफिस मधून आला नव्हता. सुट़्टीवर आला असताना समीरदादा, मनोहर मामांना कामात मदत करायला म्हणून त्यांच्या ऑफिसात जाई. "मोहिते फायनान्स कन्सल्टण्ट" चे हेड "मनोहर मोहिते" हे आईचे चुलते. आता समीर नाहीये म्हणजे घरी शांतता होणारच होती. तिकडे आई किचनमध्ये बिझी.





करणने बॉलीवूडब्लॉग्स.कॉम वर लॉगिन केलं. "क्रेझीकरन"(!) ह्या नावाने प्रोफाईल बनवला. पाच दहा मेनका फॅन्स आधीच लॉगिन झाले होते. ग्रुप चॅट सुरू झाला.





ऍडमिनिस्ट्रेटर: वेल्कम टू द बिग्गेस्ट मेनका फॅन एव्हर! करन! ही इज अवर क्रेझीकरन!!!


क्रेझीकरन: हाय फ्रेण्ड्स!


वैशाली२००२: हाय क्रेझीकरन. तू मेनकाचा फॅन कधीपासून झालास?


क्रेझीकरन: लहान असल्यापासून. आई म्हणते की मी एक दोन वर्षांचा असेन तेव्हापासूनच तिचे पोस्टर बघून बोट दाखवायचो. गाण्यांवर डांस करायचो. टि.व्ही. वर तिचे पिक्चर लागले की तीन तीन तास टि.व्ही.समोर बसून रहायचो. हलायचो नाही.


वैशाली२००२: हाऊ नाईस!!


कूल-आनंद: मेनकाचे काय फिचर्स तुला आवडतात?


क्रेझीकरन: सगळेच. तिचे डोळे, ओठ, आवाज. तिचा केस फिरवण्याचा अंदाज. डांस, ऍक्टींग सगळच!


कूल-आनंद: बूब्स, बट़्ट?


क्रेझीकरन: हाहा! बी सिरियस! त्यापेक्षाही बरंच काही चांगलं आहे तिच्याकडे


गुजरातीज-रॉक: शी इज गुजराती ना?


क्रेझीकरन: हो! तिच्या आईकडून. तिचे बाबा मराठी आहेत.


गुजरातीज-रॉक: म्हणजे हाफ-गुजराती? ओह नो!


वैशाली२००२: पण मी एकलं की तिचे बाबा नंतर त्यांना सोडून गेले म्हणे!


क्रेझीकरन: हो खरंय ते! तिथूनच तर तिने स्वतः घराचा भार उचलला. सुरूवातीचे फ्लॉप चित्रपट तिने पैसा मिळावा यासाठीच केले.


फझ्झीफ़ातिमा: हो तिचा तो पहिला पिक्चर लवबर्ड्स! फ्लॉप!


क्रेझीकरन: अगं असं नको बोलूस! त्यातला तो आत्महत्येचा सीन आठवतोय? त्या परफॉर्मन्स मध्ये कित्ती परिपक्वता होती.


केशवकमल: मला तर तिचा पहिला हीट "ममता" आठवतो!


क्रेझीकरन: येस इंडिड! त्यात आपल्या बाळाला सोडून युद्धावर जाणारी आई कित्ती छान रंगवली आहे तिने. असं वाटत होतं की ती त्या बाळाची खरी आई असावी.


फझ्झीफ़ातिमा: पण त्यानंतर तिने एवढे सशक्त रोल्स केले नाहीत, ग्लॅमरसच राहिली.





क्रेझीकरन: तू तिचा तमिळ "कालक्षणम" विसरलीस. कॅन्सरग्रस्त मुलीची व्यक्तिरेखा कित्ती छान केली तिने. लोकं तर त्या चित्रपटाला तमिळमधला "आनंद" म्हणत होती.


फझ्झीफ़ातिमा: दॅट्स ट्रू!


ब्लॅकवल्चर: पण तिच्या खाजगी आयुष्याविषयी तुला किती माहित आहे?


क्रेझीकरन: मला नीट कळलं नाही?


ब्लॅकवल्चर: तिच्या खाजगीतल्या गोष्टी. म्हणजे तू तिला तिचा फॅन म्हणवतोस. तुला तिची काही गुपितं माहित असतीलच!


क्रेझीकरन: गुपितं! म्हणजे काय विचारायचे ते नीट विचार.


ब्लॅकवल्चर: ओके. मग तिचा पहिला चित्रपट कुठला?


गुजरातीज-रॉक: सगळ्यांना महितीये. लव्ह्बर्ड्स!


क्रेझीकरन: नाही. एक मिनिट. तिचा पहिला चित्रपट आहे "तूफान". पण तो लव्हबर्ड्सच्या नंतर रिलीज झाला.


ब्लॅकवल्चर: छान! आता सांग तिचं शिक्षण किती अन कुठे झालं?


क्रेझीकरन: बडोद्यात. न्यू नरसी स्कूल शाळा, सेण्ट पायस कॉलेज. बी.ए.


ब्लॅकवल्चर: उत्तम! तिचा पहिलं अफेयर?


क्रेझीकरन: अनुज कुमारच! "ममता" पासून!


ब्लॅकवल्चर: नाही, म्हणजे फिल्मी बिझिनेस च्या बाहेर!


क्रेझीकरन: असं ऎकलं आहे की तिचा तिच्या कॉलेजात बॉयफ्रेन्ड होता.


ब्लॅकवल्चर: हो, गौतम दोशी! तो आता अमेरीकेत एका मल्टीनॅशनल फार्मस्युटीकल कंपनीचा हेड आहे.


क्रेझीकरन: ग्रेट! तुला त्याचं नावही माहितीये?


ब्लॅकवल्चर: तिच्या वयाच्या २३ वर्षापर्यंत तो तिच्या सोबत होता. नंतर सोडून गेला.


क्रेझीकरन: ओके. दॅट्स सॅड!


ब्लॅकवल्चर: का सोडून गेला माहितीये?


क्रेझीकरन: नाही. का?


ब्लॅकवल्चर: तिचं दुसऱ्याशी अफेयर होतं!


ती प्रेगनण्ट राहिली होती त्या दुसऱ्याकडून!





करण चमकला...





क्रेझीकरन: व्हॉट रब्बीश!!!


ब्लॅकवल्चर: एवढंच नाही तर तिनं अबॉर्शन न करवता ते मूल जन्माला घातलं अन सोडून दिलं.





करण अस्वस्थ झाला. हे नवीनच होतं.


क्रेझीकरन: आय डोण्ट बिलीव्ह धिस? एनी प्रूफ!





ब्लॅकवल्चर: प्रूफ! अरे हाडामासाचा तिचा मुलगा असताना प्रूफ कशाला पाहिजे? मीच आहे तो! तिचा टाकलेला मुलगा. चांडाळणीने मला वाळीत टाकून दिले. दॅट स्लटी बिच्च!!!





करणचे हात थरथरू लागले. हे अनपेक्षित होतं. काय करावे हे न सुचल्याने करणने ताबडतोब स्पॅमर दाबला अन ब्लॅकवल्चरला ब्लॉक केले. त्याचं डोकं भणाणत होतं. काही वेळ तो असाच तो मॉनिटरकडे पाहत होता. त्याच्या सगळ्या संवेदना मंद पडल्या होत्या. चॅट रूममधले इतर फॅन्स ब्लॅकवल्चर ला शिव्या घालत होते. पण आधीच करणने ब्लॉक केल्याने ब्लॅकवल्चर निपचित होता



थोड्यावेळातच ऍडमिनिस्ट्रेटरने त्याला चॅटरूम बाहेर हाकलले. तो लॉग आऊट झाला.

त्याच्या नावापुढचा कर्सर आता नुसतीच उघडझाप करीत होता.



"हाऊ डेयर ही!", करण रागाने शहारला होता, "मेनकाच्या खाजगी आयुष्यावर कसा कुणी असा गलिच्छ आरोप करू शकतो? नक्कीच हा कुणीतरी माथेफिरू आहे...", त्याचं मन सांगत होतं, "पण त्याला तिच्या जुन्या बॉयफ्रेण्डच नाव गाव माहित होतं!", एक दुसरा विचार बोलू लागला, "खरंच जर त्याला हे माहित असेल तर....?"



नसत्या शंकानी त्याच्या मनात कल्लोळ माजवला होता. त्याचं दैवत लांच्छनी लागलं होतं. रागात त्याच्या मुठी आवळत होत्या.



रागाच्या भरात त्याला दारवरची टकटकही ऎकू आली नव्हती.



"हाय!", नेहेमीचा परिचित आवाज पुन्हा ऎकू आला, "मी आत येऊ का?".

करणने धीर धरला अन स्वतःला सावरून तो म्हणाला, "या प्लीज कम ईन!"

दार हललं अन एक प्रसन्न चेहेरा आत शिरला, पूजा प्रधानचा.



"थॅन्क्स! तुझा होमवर्क चांगला होता! बरीच मदत झाली.", पूजा करणला त्याच्या वह्या सोपवत म्हणाली. करण पेक्षा थोडी बुटकी पण फिकट निळ्या सलवार अन जीन्स मध्ये जणू एखादी बाहुलीच वाटावी. तांबटभोर केस. गोल गोरा चेहेरा. पिंगट डोळे अन गुलाबी ओठ. चेहेऱ्यावर नेहेमीची प्रसन्नता. आवाजात नेहेमीचा गोडवा. स्वभावात नेहेमीची शालीनता.



करणसारख्याला पूजा प्रधान सारखी मुलगी भाव देते ह्याचं करणच्या मित्रमंडळींना उगीच अप्रूप वाटत नव्हतं.


"थॅन्क्स!", करण उभा राहत म्हणाला, "आय मिन वेलकम... ऍण्ड थॅन्क्स टू!"


पूजा थोडक्यात हसली. "मी निघते!", पूजा म्हणाली अन जायला वळली.


"का?" ऎवजी "ओके!" असा करणच्या तोंडून शब्द पडला. करण आणखी शब्दांची जमवाजमव करणार तोच पूजा मागे वळली. बोलायच्या आवेशातलं करणचं तोंड दोन मिनिटं उघडंच राहिलं...



"वन अपॉन साईन हा कोसाईन असतो. तुझ्या दहाव्या गणितात कोसेक लिहिलास तू. ते चुकलंय म्हणजे. नंतर करेक्ट कर!", पूजा म्हणाली.तिच्या पिंगट डोळ्यांत पाहत करण गुंगच झाला. गणिताच्या गोष्टीही तिच्या तोंडून गोड वाटत होत्या.



"ओके वेलकम! (की ‘थॅन्क्स’!?)", गोंधळून करणने म्हटले. अजूनही सही शब्दांची जुळवाजुळव होत नव्हती. मेंदूचा तोंडाशी संपर्क जणू तुटल्यातच जमा होता. करणचा मेंदू, त्याचे पूजाला पाहणारे डॊळे अन तिला ऎकणारे कान, हेच सांभाळण्यात जास्त बिझी असावा!


"बाय. गुड नाईट!", तिनं मधाळ आवाजात निरोप दिला.


"बाय!" करणने हात हलवला, "हॅव स्वीट ड्रीम्स!"...


अचानक आपण तिला "स्वीट ड्रीम्स!" म्हटल्याचे जाणवून करण लाजला. आज पहिल्यांदाच करणने तीन शब्दांचं वाक्य व्याकरणासहीत तिच्याशी नीट म्हटलं होतं.


तिनेही त्यावर हसून दाद दिली अन रातराणीच्या फुलांच्या सुगंधासारखी ती करणच्या संवेदना दरवळून निघून गेली.


हा सुगंध समीर येईपर्यंत दरवळत होता....


*******************


Contd..

सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय...
सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय...
प्राची कुठे दिसत नाही हरवली की काय..?

"आखों मे तुम्हें बसालूं कभी", टी.व्ही.वर मेनकाचं गाणं चालू होतं. निळा हिरवा समुद्र अन त्याच्या किनाऱ्यावरची ती पांढरी वाळू. त्याच समुद्राच्या पाण्यात भिजलेला कमावते शरीर असलेला देखणा सुपरस्टार अनुज आणि ओलीचिंब कमनिय मेनका ह्यांचं हे मादक गाणं आजच्या घडीचं सुपरहीट गाणं होतं. कित्येक टिनेजर आणि तरूणांना मोहिनी घातलेल्या ह्या जोडीने त्यांच्या नव्या "प्यार का साथ" चित्रपटाने सफलेतेचे रेकॉर्ड्स तोडले होते. कित्येक तरूण मुली आज अनुजच्या प्रेमात अन कित्येक युवक मेनका च्या मादकतेत रंगून गेले होते.



करणही ह्याच टिनेज युवकांतला एक.



गाणं संपलं तरी करणने पडद्यावरून आपली चमकदार नजर हलवली नव्हती. तो मेनकाच्या चिंतनात उसासे टाकत, उजवा गाल तळहातावर टाकून बसला होता. मागून समीरने त्याला डोक्यावर टपली मारली.



"आऊच्च!", करण किंचाळला, "दॅट हर्ट्स!"

"मेनका!", समीरने हृदय पकडल्याचं नाटक केलं, "माय डार्लिंग! मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. माझी ४० वर्षांची म्हातारी! कवळी लाऊन सुरेख हसतेस!!!""दादा! गप्प बस्स हा!", करण चवताळला, "४० नाही, ३९! आणि तुलाच म्हातारी वाटते ती. परवा टीन सेन्सेशन अलिशिया म्हणाली की तिला मेनका सारखं व्हायंचय. सगळे तुझ्यासारखे नसतात. ३३ ऍण्ड स्टील सिंगल! लूक ऍट यु!" करणने जुना सूर छेडला.



"सिंगल! हह! माझ्या तर कित्येक गर्लफ्रेण्ड्स होत्या. तुझ्या वयाचा होतो तेव्हा तिघींना पटवलेलं मी... आणि बाय द वे, तुला किती गर्लफ्रेण्ड्स आहेत रे? " समीरने करणचा दुखती नस दाबली, "ओह! येस! एक आहे ना; पूजा प्रधान! राईट?"



करणने डोळे वटारले...



समीरला आणखीच आवेश चढला....



"प..प्प, पूजा!.... प..प्प..प्रोजेक्टचं विचारायचं होतं.... प...प्प...पप्पी देशील का?", समीरने करणचा पाय खेचला. करणच्या बाजूला बसलेला त्याचा मित्र सॅवियो तोंड दाबून हसत होता. करणचं मुलींशी होणारं संभाषण त्याच्या मित्रमंडळीत आधीच थट़्टेचा विषय झालं होतं.



"काय सॅवियो! मी बरोबर म्हणतोय ना?", समीरने सॅवियोलाही मस्करीत सामिल करून घेतले.

"तो कशाला हो म्हणेल तुला? तो माझा मित्र आहे.", करणने सॅवियोकडे बघितलं, सॅवियो आधीच हसत हसत लोळू लागला होता

"काय सॅवियो! मी बरोबर म्हणतोय ना?", समीरने सॅवियोलाही मस्करीत सामिल करून घेतले.

"तो कशाला हो म्हणेल तुला? तो माझा मित्र आहे.", करणने सॅवियोकडे बघितलं, सॅवियो आधीच हसत हसत लोळू लागला होता



"यू बोथ आर इमंपॉसिबल!", करण रागावला अन तणतणत त्याच्या खोलीत निघून गेला.

आईने पलिकडून समीरला नेहेमीची "वयानुसार वाग!" अशी मुळूमुळू ताकिद दिली. पण सहा महिन्यांसाठी नेव्हीतून घरी आलेला समीर, प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आस्वाद घेणारा, अशी करणची थट़्टा करणं कशी सोडेल? शेवटी लहान भाऊ असतातच कशाला?



काही वेळ गेला. करण अजूनही त्याच्या बिछान्यावरच बसून रागाने धुमसत होता. तसा इतरांनी त्याची थट़्टा करणं त्याला गैर वाटत नव्हतं पण मेनकाला ‘म्हातारी’ म्हणवून समीर दादाने पुन्हा लाईन क्रॉस केली होती. मेनका करणची ड्रीमगल. करण लहान होता तेव्हाच मेनका फिल्मस्टार म्हणून नावारूपास आली. तेव्हापासूनच करण हातातले खेळणे सोडून, टिव्ही वर मेनकाची गाणी, इण्टरव्ह्यू, चित्रपट लागले की ते तल्लिनतेने बघायचा. का कुणास ठाऊक? पण तिचा चेहेरा बघताना एक वेगळाच आनंद वाटायचा त्याला. ती जाणिव अश्लील नव्हती. उलट एक आपुलकी होती, कौतुक होतं. दोन वर्षांपूर्वी तिच्या "रूमानी बदन" ह्या चित्रपटावर अश्लिलतेचा आरोप करणाऱ्या काही संस्थांच्या सभासदांनी थिएटरवर केलेल्या दगडफेकीत करणही जखमी झालेला. तरी त्याने रक्तबंबाळ अवस्थेत दुसऱ्या थियेटर मध्ये जाऊन तो चित्रपट पूर्ण पाहिला. त्यामुळे मेनकाला त्याच्या हृदयात लहानपणासून हळवा कोपरा लाभला होता. म्हणतात ना पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही. तसलंच ते. फक्त फरक एवढा की मेनका करणचं पहिलं, मधलं अन कदाचित शेवटचं प्रेमही होतं!

घरी समीरनंतर १८ वर्षांनी उगवलेलं हे शेंडेफळ आणि त्याची सोंगं घरातल्यांनी तळाहातावरच्या फोडासारखी जपली नसती तर नवलंच. करण लहान असतानाच, अगदी एक दोन वर्षाचा असेल, त्याचे अन समीरचे बाबा हार्ट अटॅकने वारले. बिझिनेसमध्ये बराच तोटा झाला होता. मलबार हिलचे मोठे घर विकून तेव्हापासूनच समीर, त्याची आई अन छोटा करण हे "रूपवते कुटुंब" उपनगरात राहू लागलं. आईने बॅंकेत मॅनेजर म्हणून नोकरी धरली, म्हणूनच समीरचं शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकलं. करण कडून त्यांना जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. करणला आयआयटीत जायच होतं. तसं करण अभ्यासात हुशार. त्यामुळे ती चिंता नव्हती. समीरने नेहेमी वडिलधारा थोरला भाऊ म्हणून करणचा नीट सांभाळ केला होता. बाबा सोडून गेल्यावर १८ वर्षांच्या समीरने, अशा कठीण परिस्थितीत, आईला जमेल तेवढी मदत करून मोठा मुलगा म्हणून आपलं कर्तव्य नीट बजावलं होतं. म्हणूनच एवढी वर्षं समीरने लग्नही केलं नव्हतं.

तसंही नेव्ही वाल्यांचं कौटुंबिक आयुष्य यथातथाच. सहा महिने घरी, सहा महिने डॉकवर. कुठली मुलगी अशा परिस्थितीत समीरला सांगून आली असती. तरीही, दिसण्यात ह्रितिक रोशनश्टाईल, समीर अजून अविवहित कसा हे आजूबाजूच्या लोकांना न सुटणारं कोडं होतं. आईनेही शेवटी कंटाळून नियतीसमोर हात टेकले होते. धाकट्या करणला नेव्हीत इंटरेस्ट नव्हता हे तिचं नशीब!



"मोठा भाऊ आहे म्हणून काय झालं. मीही त्याच्या सरांना, ल्युटिनिण्ट देशपांडेना, "चकण्या" म्हणतो तेव्हा कित्ती चिडतो तो! जर त्याला थट़्टा सहन होत नाही तर मी का सहन करावी?", करण त्याच्या कोंदट खोलीत बसून मनातल्या मनात स्वतःची बाजू मांडत होता.तोच दारावर ठकठक झाली. समीर आणि सॅवियो आत आले. "सॉररी ब्रो!", समीर करणच्या खांद्यावर हात टाकून बसला आणि त्याने त्याचा खांदा आपुलकीने दाबला."फरगेट इट यार!", सॅवियोने नेहेमीचे तीन शब्द म्हटले.करण काहीच बोलला नाही. दोन मिनिटं शांततेत गेली. तिघे खोली न्याहळत बसले होते. तसं खोलीत बेड, टेबललँप, अभ्यासाची पुस्तकं आणि कॉंप्युटर सोडून एकच गोष्ट ठळक होती. अन ती म्हणजे भिंतींवर चिकटवलेले मेनकाचे मोठ्ठाले पोस्टर्स. डोळे बंद करूनही "सुकलेल्या फेविकॉलचा वास म्हणजे करणची खोली" असं सहज सांगता येत असे.



"चकण्या ...ल्युटिनिण्ट कमांडर ....देशपांडे.", करण हळूच म्हणालासमीर सुरूवातीस थोडा गुरगुरला पण करणच्या बालिश डोळ्यांत बघून मग शांत चित्ताने पुटपुटला "ओके! चकण्या ‘सडू’ ल्युटिनिण्ट कमांडर देशपांडे! खूष?"



करणने हसून दाखवलं. पण प्रकरण इथवरंच संपलं नाही.



(म्हणजे संध्याकाळी पिझ्झा पार्टी करायची शिक्षा समीरला ठोठवण्यात आली. अन समीरने ती आनंदात पूर्णही केली.)



Contd...

आता आहे तयार मी
मोडायला थोड्या रीती
कर्वेनगर ते डेक्कन
होते शंभर दा 'प्रीती'......

पण तरीही कधी-कधी
उगाच पुन्हा भरते येते
पण ओठा वाटे उमटते
"बर झाल तू गेलीस ते........."
"बर झाल तू गेलीस ते........."

रीते पणाची ही पोकळी तुझ्या विना भरत नाही
आठवणी च्या त्या जगामधे
आस माझी सरत नाही

पण तरीही वर वर
चेहरयावर हसुच हे खेळते
आणि विचारांती पट वावे लागते

"बर झाल तू गेलीस ते"...........
"बर झाल तू गेलीस ते"...........

तरीही आत का दुखतं ?
गोठल्या श्वासांवर दंव धरतं,
डोळे लागतात वाटेकडे,
मन कुढत म्हणत रहातं.....

" बरं झालं तू गेलीस ते !"

"काय चाल्लेय तुझं मघापासून? किती ते चॅनल बदलणार? एक धड तरी ठेव किंवा तो टि.व्ही. बंद तरी कर." आई थोडी चिडून म्हणाली. करण आणि त्याची आई सुलभा बाजूलाच बसलेले टि.व्ही. पाहत होते. करणने रिमोटची सगळे नंबर तीनदा दाबून पाहिले होते. टि.व्ही.वर काहीच मनोरंजन चालू नव्हतं.



"हो गं! ठेवतो ना.", करणनेही मग आठ्या पाड्लया अन एक फिल्मी चॅनल ठेवला.



"वेल्कम टू बॉलिवूड न्यूज!", टिव्हीवरील वी.जे. सांगत होती, "सुमीत सिन्हा और गौरी पंडित की नयी ‘सात सपने’ बॉक्स ऑफिसपर पीट गयी। ये उन दोनोकी साथ साथ दूसरी फिल्म है। ..."



खरं तर सॅवियोची वाट पाहत करण वेळ मारत होता. बॉलिवूड न्यूज वर मेनका शिवाय आणखी कोणीही करणला उल्साहित करत नसे. आईही पेपर वाचित होती. त्यामुळे टि.व्ही. खरं कोण पाहत होतं हे सांगणं कठीणच होतं.

"कधी येणार सॅवियो? ५ चे साडेपाच झालेत." करणने घड्याळाकडे पाहिलं. आई पेपरात. तिथे टि.व्ही.वर त्या वी.जे.ची बडबड चालू .

"और अब एक खास खबर! हजारों दिलों की धडकन मेनका के बारेमें नयी कॉण्ट्रोवर्सी आजकल सुनाई दे रही है।", करणने घड्याळाकडे बघत टि.व्ही.कडे कान टवकारले. "सुना है की मेनकाके एक खास करीबी एन.आर.आय. दोस्तने उनके और अपने पुराने अफेयर के बारेमें किसी न्यूज चॅनल को काफी गुप्त बातें बतायी है। जिसमें एक काफी इंटरेस्टींग लव्ह ट्रायंगल भी है। और तो और ये भी सुनाई दिया है की मनिष भट़्ट उसपे नयी फिल्म भी बना रहें है। तो आखिर इस फिल्म में हिरोईन मेनका की रायवल मालविका काश साईन होही जायेगी। आखिर मनिष भट़्ट सेक्स और मालविका के बगैर कैसे रहेंगे? देखतें है की मेनका के सेक्रेटरी टिक्कू की इसपे क्या राय है? ... "



"एन.आर.आय.? अफेयर? लव्ह ट्रायंगल?", करण ताडकन उठला.



समोर टि.व्ही.वर थुलथुलीत टिक्कू अवतीर्ण झाला. करणचं लक्ष पुढच्या मुलाखतीत लागलं होतं, "टिक्कूजी क्या ये सच है की मेनकाजीके कोई अमरिकी दोस्त आजकल मुंबईमें आये हुऎ हैं?"

"जी।!, टिक्कूने आपल्या बारीक आवाजात म्हटलं.

"क्या ये भी सच है की मेनकाजी और उनके बीच काई करीबी रिश्ता था?"

"नही। बिलकूल नहीं।"

करनने भुयव्या उंचावल्या.

"आप तो मुकर रहें है पर हमने ये सुना है की ये रिश्ता इसिलिये टूट गया था की कोई और मेनकाजीके जिंदगी में आ गया था?"



"देखिये ये मुझे मालूम नही। लेकीन मुझे येह मालूम है की मेनकाजी और उनके दोस्त के बीच अब सिर्फ अच्छी दोस्ती है। और कुछ नही। जो हुआ वो क्या और क्यूं हुआ ये मुझे पता नही। लेकीन जो अभी है वो सिर्फ गहरी दोस्ती है बस्स।"



"लेकीन फिर भी आपको कुछ तो पता होगा ही?"



"देखिये मैं दस साल पहले मेनकाजीका सेक्रेटरी बना हूं। ये बात उस्से भी पाच छे साल पुरानी है। मुझे इसके बारे में कुछ भी नही पता। लेकीन इतना पता है की मेनकजी इस अफवा की वजह से काफी व्यथित हैं और टेलिफोन कॉल्सभी नहीं ले रहीं। इसिलिये मेरी आप सब लोगोंसे गुजारिश है की प्लीज आप इस बात को इतना महत्त्व देना बंद किजीये।"



"लेकीन ये एन.आर.आय दोस्त हैं कौन? क्यूं उन्हे इतना गुप्त रखा गया है?"

"देखिये वो खुद अपनी शख्सियत गुप्त रखना चाहते हैं। ये उनकी मर्जी है।"

"लेकीन फिर मनिष भट़्ट की फिल्म के बारेमें आपका क्या खयाल है?"



यावर टिक्कू थोडा भडकला, "मनिष भट़्ट उन्हे चाहें उस विषय पर फिल्म बना सकतें है। वैसेभी कॉट्रोवर्सी उनसे दूर कहा रहती है। ये शायद उनका और एक गिमिक होगा!"



"क्या येह सच है की इन मेनकाजीके दोस्त का नाम गौतम दोशी है?.... "

"ओह माय गॉड!", करणने आ वासला होता.... तिकडे टिक्कूचं "नो कमेण्ट्स प्लीज!" ची टेप सुरू झाली. आईने थोडक्यात करणकडे बघितलं अन पुन्हा पेपरात मान घातली.

"आई! माहितीये?", करणने गोंधळलेल्या स्वरात आईला म्हटलं.



"काय?"

"परवा काय झालं?" "काय?",

आहे!" आईने पेपरातच डोकं घातलं होतं.

" एका ऑनलाईन चॅट मध्ये मला कुणीतरी माथेफिरू भेटला होता. म्हणाला की तो मेनकाचा मुलगा

आईने झटकन पेपर दूर सारला, "काय?", हा ‘काय’ मघासच्यापेक्षा नक्कीच मोठा होता.



"हो! आणि म्हणाला की मेनकाचं गौतम दोशी नावाच्या माणसाशी अफेयर होतं आणि ती एका तिसऱ्या माणसाकडून प्रेगेनण्ट राहिली होती. तिने ते मूल जन्माला घातलं अन सोडून दिलं. तोच तो तिचा मुलगा!"

"कोण होता तो? आणखी काय म्हणाला?", आईने गोंधळून विचारलं.

"काही नाही म्हणे, एवढंच हे सगळं तिची फिल्म लाईन जॉईन होण्याधीचं लफडं होतं."



आई दोन मिनिटं थोडी चकितच होती मग तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत गेले.



"फिल्मी आयुष्याधीचं नं मग ते खोटच असणार? पेपराझींचा फक्त सेलिब्रिटीच्या फिल्मी आयुष्यावर कण्ट्रोल असतो. त्याधी काय झालं ह्यावर त्यांचा फक्त कयास असू शकतो. मला तर बाई ही त्या मेनकाला फसवायची कुणाचीतरी चाल वाटते. बऱ्याच दिवसात तिच्याकडून कुठलं गॉसिप आलं नव्ह्तं. तोच तिचा एन.आर.आय मित्र कुठूनतरी आला, तिला भेटला अन ह्या अफवा सुरू. तो जो कुणी तुला ऑनलाईन भेटला ना तोही ह्या गटातला असेल.", आई शांतपणे पुन्हा पेपरात डोकं घालून म्हणाली.



करणही आईच्या ह्या विचारावर सहमत झालेला वाटत होता.

पण त्याच्या मनात कुठेतरी एक हुरहुर लागली होतीच. तेवढ्यात सॅवियो आला.



"लेट्स गो! उशीर झालाय ना. सॉरी रे! घरी मम्मी लेट आली. मग मोठा भाऊ म्हणून क्रिस्टल ला सांभाळत थांबावं लागलं. ओह बाय द वे... हॅलो आण्टी!"करणच्या आईने हसत विचारलं, "हॅलो. कशी आहे क्रिस्टल? गेल्या आठवड्यापासून के.जी.त जायला लागली ऎकलं मी?"



"हो! के.जी. एकदम फर्स्टक्लास चाल्लंय.", सॅवियो डोळे मिचकावले, "आत्ता मलाच ए, बी, सी शिकवते!

"मिश्किलीत आई उठली अन करणला, "लवकर ये. जेवायच्या आधी." असं बोलून किचनमध्ये निघून गेली.



करण डेनिम जॅकेट चढवून सॅवियो सोबत बाहेर पडला.

"सॅवियो अरे मी ते तुला सांगितलेलं बघ, ब्लॅकवलचर बद्दल! आठवतंय?"



"कोण तो मेनका हेटर ना? हो. त्याचं काय?"

"आज टिव्हीवर त्याने सांगितलेल्यासारखीच एक न्यूज ऎकली मी. मेनकाचा आधीचा बॉयफ्रेण्ड इंडियात आलाय अन इथे येऊन तिला भेटला. त्यानंतर त्याने त्यांच्या अफेयर विषयीच्या आपल्या काही गुप्त गोष्टी कुठल्यातरी न्यूजचॅनलना कळवल्या. यावर सगळा वादंग उठलाय!"

"वादंग?!", सॅवियो गोंधळला

"अरे कॉण्ट्रोवर्सी रे!", सॅवियो कॉन्व्हेण्ट शाळेत शिकणारा एक अमराठी मुलगा आहे हे करणच्या मग ध्यानात आलं.

"ओके. मग?"

"त्यात त्या मनिष भट़्टने ह्या गॉसिपवर नवा पिक्चर काढायला लावलाय. त्यात तो मालविकाला घेणारेय..."

"काय? मालविका इन मनिष भट़्ट फिल्म? वुह्ह्हू!" सॅवियोने आनंदात टाळ्या पिटल्या. उत्तान मालविकाला छोट्या कपड्यात पाहण्याची स्वप्न सॅवियो उभ्याचा उभ्या पाहू लागला, पण मग ध्यानावर येऊन करणचा सिरियस मूड बघून "ओह्ह बिच्चारी मेनका!" असं म्हणत त्याने आपला आनंदी चेहेरा झटक्यात पालटला.

"इट्स ओके, यू कॅन चियर. नो नीड फॉर अ फॉल्स कॉन्डोलन्स.", करणने थोड्या रागातच म्हटलं.



"फरगेट ईट यार", सॅवियोने आपले नेहेमीचे आवडते शब्द म्हटले, "कशाला ही संध्याकाळ ह्या अर्धवट माहित असल्या नसल्या फिल्मी बातम्यांवर घालवायची? छान पैकी बोलिंग करायाला जाऊ चल."



आणि असं म्हणून त्यांनी आपल्या सायकल्स वर टांग मारली अन ते अंधेरी लिंक रोडला निघाले. संपूर्ण रस्ता सायकल चालवित करण मनात फक्त गौतम दोशीचाच विचार करत होता.....



२०० पॉईण्ट्स! करणचा नवा रेकॉर्ड!

सॅवियो अजून ८० वर! ही अंधेरीचा बोलिंग ऍली करण अन सॅवियोची अत्यंत आवडती जागा.

"मला आज एकही फुल्ल स्ट्राईक मिळाला नाहिये आणि तुला सात मिळले." सॅवियोने गाल फुगवले आणि करणने ऎटीत कॉलर ताठ केली.

"जाऊ दे रे. एव्हरी डॉग हॅज हीज डे!" करणने विनोद केला तसा सॅवियो अजून रागावून त्याच्याकडे पाहू लागला.



आता दिलेलं १०० रूपयांचं क्रेडीट संपत आलं होतं. फक्त एक सेट उरलेला. त्या एका सेटच्या जोरावर सॅवियोने करणला हरवणे शक्य नव्हते. पण तरीही सॅवियोने करणला बोट उंचावून म्हटलं, "क्रॉस दॅट २१० मार्क आणि मी तुला ५० रूपये देईन!"



करणने त्याने दाखवलेल्या स्कोअर बोर्डकडे पाहिले अन त्याच ऍलीत दुसऱ्या कुणीतरी युनिकॉर्न नावाच्या प्लेयरचा २१० चा स्कोर दिसत होता. हे चॅलेंज करणने स्वीकार केलं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला अन आवडीचा ओशन-ब्लू-बॉल व्यवस्थित पुढच्या पिन्सच्या सेटकडे फेकला. बॉलने सरळ दिशा पकडली पण हाय! मध्येच दिशा बदलून एकाही पीनला धक्का न शिवता बॉल गटर मध्ये घुसला.



एक चान्स वेस्ट.

"बूऊऊऊऊ!" सॅवियोने ‘कशी जिरली!" म्हणून करणचा आत्मविश्वास खच्ची करायचे निष्फळ प्रयत्न केले, पण करण खरंच पेटला होता. अजून एक चान्स बाकी होता. तो २१० चा स्कोर त्याच्या जणू जीवनमरणाचा प्रश्न झाला असावा!



करणने पुन्हा त्याचा ओशन-ब्लू बॉल व्यवस्थित बोटांत अडकवला अन त्याच्या लेनच्या बरोबर मध्यभागी उभा राहून बोलिंगची एक्स्पर्ट पोझ घेतली अन खाली वाकून बॉल नीट सरपटत फेकला. तीन सेकंद त्याचा श्वास आतच अडकला असावा...



... आणि बॉल ने स्ट्राईक केलं. आजची ही आठवी स्ट्राईक! करणचा पर्सनल बेस्ट स्कोर!

"जिंकलो!" म्हणत करण सॅवियोला चिडवत ब्रेक डांस करून दाखवू लागला. सॅवियो ओशाळला.



आता स्कोर बोर्ड वर फक्त करणचा कूलकरन आणि यूनिकॉर्नच २१० दाखवत होते.



"हाय करन!", पाठून एक मधाळ आवाज आला.

ब्रेक डांस करत करणने मागे वळून पाहिलं तसं समोर पूजा प्रधान! त्याचा ब्रेक डांस पाहून ती थोडी गोंधळलेलीच दिसत होती.



करणने झटक्यात डांस बंद केला.



"हाय पूजा!", करण थोडक्यात.

"इथे कुठे?", पूजा.

"असंच!", करणचं एका शब्दात उत्तर

"मी तुझं नाव पाहिलं स्कोरबोर्डवर. माझ्याएवढा स्कोर पाहिल्यावर मी म्हटलं बघूया कोण आहे ते. तर तू दिसलास!"

"ओह! म्हणजे यूनिकॉर्न..."

"हो मीच यूनिकॉर्न!"

एका मुलीच्या स्कोरला टफफाईट दिलेली बघून करणचा बेस्ट स्कोरचा आनंद क्षणात मावळला.

"ओके", असं बोलून करण पुन्हा मुका झाला, पूजा कडे बघत.



"आख्ह:अंख्ह!", पाठून कुणीतरी घसा साफ करीत होतं.

"सॉरी!", करणने त्रागा करीत म्हटलं, "सॅवियोही आहे माझ्यासोबत."



"हाय पूजा!", सॅवियो सोज्वळपणे पुढे येऊन म्हणाला.

"हॅलो सॅवियो!", पूजानेही मग दोनच शब्द म्हटले.

पुढची दोन मिनिटं एकमेकांची तोंड बघण्यातच गेली.



"कोल्ड कॉफी?", सॅवियोने एकांत फोडला.

"व्हाय नॉट!", पूजानेही पटकन होकार दिला.

अन तिघे ‘कॉफी डे’ च्या काउन्टर कडे निघाले. पुढे दोघे लव्हबर्ड्स. मागे विसरला गेलेला सॅवियो!



"तर मग आज सॅटरडॆ! काय केलंस?", पूजानं चॉकोलेटमोकाची एक सिप घेत विचारलं.

"काही नाही. आता काही वेळ सॅवियोबरोबर आहे, नंतर संध्याकाळी समीरदादा बरोबर जीम.", करणने कॉफीतच लक्ष घालून म्हटलं. पूजाकडे पाहत एक पूर्ण वाक्य म्हणायला अजून त्याच्यात अवसान आलं नव्हतं. सॅवियो करणची मजा बघत त्याची आईस्क्रीम कॉफी मिटक्या मारत चाखत होता.



"तू काय केलंस पूजा आज?", सॅवियोने मध्येच चोमडेपणा केला तसे करणने डोळे वटारले.

"काही नाही. मीही संध्याकाळी माझ्या वडिलांच्या मित्रांना भेटायला जाणार आहे, जे डब्ल्यू मॅरियट मध्ये"

"कूल. म्हणजे कोणी स्पेशल आहे का?", करणला बोलण्याचा काहीही चान्स न देत सॅवियोने पुढचा प्रश्न केला



"हो माझे पप्पांचे खास दोस्त आहेत. त्यांच्या सोबत फॅमिली डिनर आहे.", पूजा म्हणाली.

"म्हणजे तुझी संध्याकाळ फिक्स आहे.... आऊच्च!!", खालून करणने सॅवियोला एक कीक मारली तसा सॅवियो कळवळला. पूजा गोंधळून सॅवियोकडे पाहू लागली. एक नजर करणकडेही गेली. करणने आपल्याला काहीही माहित नसल्याचे दाखवत पुन्हा जवळजवळ रिकाम्या कॉफी ग्लासमध्ये डोकं घातलं.

"म्हणजे छान!", सॅवियो उसनं हसू आणत पाय लटपटत म्हणाला.



तेवढ्यातच पूजाचा मोबाईल वाजला.



"हॅलो? हा आई बोल... हो माहितीये. हो ग. मी येईन. तुम्ही जा पुढे. टॅक्सी पकडेन. अगं अंधेरी ईस्टलाच यायचंय ना. येईन ना मी. हो हो माहितीये साडेसात. हो गं रूम ३०२. आता नाव का विचारतेयस? आधी मी भेटलेय ना त्यांना लहान असताना. हो गं. गौतम दोशी! ओके? आय नो मॉम...."



"फुर्र्र्र्र!", ‘गौतम दोशी’ नाव ऎकताच सॅवियोने कॉफी फुंकली अन करण ताडकन खुर्चीवरून उडाला.

पूजा दोन मिनिटं घाबरलीच.

"काय झालं. एनी प्रॉब्लेम?", पूजा ने विचारलं.

"तू गौतम दोशी म्हणालीस?", करणने प्रश्न केला. अगदी पूजाच्या डोळ्यात पाहत (!)

"हो. का? मी सांगितलं ना ते पप्पांचे फ्रेण्ड. तेच ते. यूएस वरून आलेत. "

"आय नो! द फार्मा विझार्ड!", करण म्हणाला.

"व्हॉट?", पूजा गोंधळली, "तुला कसं..."

"ते जाऊदे! डू यू नो एनीथींग अबाऊट हीज रिलेशनशिप विथ ..." करणने थोडा आवंढा गिळला, "..विथ फिल्म ऍक्ट्रेस मेनका?"

पूजा संशयित नजरेन दोघांकडे पाहू लागली. आता सॅवियोने कॉफीत तोंड घातलं होतं. तसं तिला करण मेनकाचा फॅन आहे हे माहित होतं पण हा प्रश्न थोडा पर्सनल वाटत होता.

"तू कशा बद्दल म्हणतोयस?"

"टिव्हीवर..."

"हो ते?...", पूजाने करणला तोडलं, तिच्या चेहेऱ्यावरचे संशयित भाव नाहीसे झाले होते, "..आय थिंक इट्स जस्ट अ गॉसिप!"



"आर यू श्युर?"

"हो. पण असं का विचारतोयस?"

करणने ब्लॅकवल्चरची स्टोरी पूजाला सांगू की नको ह्या विचारात काही सेकंद घालवले. मग सॅवियोनेच पुढाकार गेतला... "काही नाही गं. यू नो करण इज कन्सर्न्ड अबाऊट मेनका. ही इज हर फॅन ना..."

पूजा हसली आणि म्हणाली, "तुला हवं तर मी त्यांच्या कडून काही खबरबात काढते ह्याविषयी. आय कॅन बी अ गॉसिप गल टूडे!", पूजाने डोळे मिचकावले.

करण हसला, "नको इट्स ओके. इट्स कूल."

"...याह जस्ट फरगेट अबाऊट ईट!", सॅवियो. अजून कोण?

"चल मी निघते. बाय! थॅन्क्स फॉर द कॉफी!"

"नो प्रोब्लेम!", करण पुन्हा त्याच्या द्विशब्द संभाषणावर आला.

"बाय सॅवियो!", असं म्हणून पूजा निघून गेली.

"क्या ड्युड! इव्हनिंग स्पेशल झाली म्हणायची!", सॅवियोने करणचा पाय खेचला.

करण थोडा लाजला अन दोघे बील फेडून घरी निघाले. पण येतानाही करणचा फक्त गौतम दोशीविषयीच विचार चालू होता.

**********************************

contd...

एकमेकांशिवाय जगुत कसे

प्रश्न मला पडले होते

उत्तरादाखल म्हणुन का होईना

बरे झाले तू गेलीस ते

....................

एकत्र जगायची शपथ घेतली होती

पण

सहज जाते म्हणुन निघून गेलीस

आटा मेलो वा मोडलों तरी म्हणेन

बरे झाले तू गेलीस ते .........

सगळ्या सोबत असताना
राहतो मी आनंदी
तुझ्यासोबत होतो तसा
आता राहिलो नाही 'नंदी'....

पण सगळे भरले असुनही
आत कुठेतरी आहे 'रीते'

"बर झाल तू गेलीस ते.........."
"बर झाल तू गेलीस ते.........."

संता : मी Train मधे रात्रभर झोपु शकलो नाही.
बंता : का ?
संता : upper birth मिळाली होती.
बंता : अरे मग तु exchange करायची ना जागा.
संता : अरे यार exchange करायला खालच्या बर्थ वर कोणीच नव्हते.

दारू हे कुठल्याही प्रश्नचं उत्तर असू शकत नाही...

... ... पण, ती काही काळासाठी प्रश्नचा विसर तर पाडते!!!
कष्टाचे फळ कधी ना कधी, उशिराने का होईना, मिळतेच...

... आळसाचे फळ मात्र तात्काळ मिळते!!!!

न्गलात होते साप सपानी घेतला चावा...
जन्गलात होते साप सपानी घेतला चावा...
सुधीर राव आता तरी तुमचा Copy-Past चा धन्दा थाम्बवा..

"आई गं!", सॅवियो पाठ अन तळहात चोळत म्हणाला; सोलंकी मिसने होमवर्क न केल्याने दहा पट्ट्या मारून, त्याला इतर २ मुलांच्या सोबत ओणवे उभे केले होते. १५ मिनिटांची ती शिक्षा भोगून तो करणच्या बाजूस परत येऊन बसला होता.

"तरी मी तुला होमवर्क कर म्हणून बोल्लो होतो!", करणने कालची संध्याकाळ त्याला आठवून दिली, "उगीच पट्टी खायची हौस तुला!"

"हौस कसली?", सॅवियो कपाळावर आठ्या आणून म्हणाला, "घरी गेलो आणि मॅथ्स होमवर्क सुरू केला मी. आय स्वेअर! पण तोच टि.व्ही.वर विम्बल्डन फायनल सुरू. अरे फेडरर आणि नदाल कोण सोडणार यार?"

"अरे पण होमवर्क इम्पॉर्टण्ट की टेनिस?", करणने फळ्यावरचं लक्ष न ढळू देता सॅवियोला हळूच विचारलं.

"ऑफकोर्स टेनिस!" सॅवियोने स्वाभविक उत्तर दिले, "फेडरर आणि नदालनं कधी मॅथ्स होमवर्क केला होता?"

"पण त्यांच्या शाळेत सोलंकी मिस नव्हती!...", करण त्रासला.


"...मि. रूपवते! स्टॅण्ड अप!", सोलंकी मिसने चश्मा रागात डोळ्यांवरून काढला. वर्गात भीतीचे हुंकार फुटले. सगळे वळून करणच्या बाकाकडे "आता ह्यांची लागली!" अशा मोठ्या डोळ्यांनी पाहू लागले. सोलंकी मिसने डोळ्यावरचा चश्मा काढणे ही वर्गातल्या मुलांसाठी वाईट बातमी असायची.


"इज युवर डिस्कशन विथ मि. रूडॉल्फ मोअर इम्पॉर्टण्ट दॅन माय लेक्चर? ईफ सो? देन प्लीज शेयर इट विथ द क्लास!"

"सॉरी मिस!", करण अडखळत उभा राहिला.

"व्हॉट सॉरी? मि. सॅवियो रूडॉल्फ हॅस ऑलरेडी हॅड हीज पनीशमेण्ट! नाऊ डू यू वॉण्ट टू फॉल फोर इट?"

"नो मॅम! सॉरी मॅम!", करणने मान खाली घातली.

"लूक करण! यू आर अ व्हेरी गुड स्टुडण्ट. डोण्ट वेस्ट युअर टाईम विथ दॅट स्कॉउण्ड्रल नेक्स्ट टू यू! लूक ऍट अदर स्टुडण्ट्स! लूक ऍट मिस. प्रधान! बी सिंसीयर लाईक हर!"

सोलंकी मिसच्या ह्या टिप्पणीवर पूजा अन सॅवियोचे चेहेरे दोन विरूद्ध भाव दर्शवू लागले. पुढच्या बाकावर बसलेल्या पूजाने आनंदाने पण मिश्किलीत करणकडे वळून पाहिलं. करण थोडा ओशाळला.


"धिस इज अ लास्ट वॉर्निंग! यू मे सिट डाऊन!" सोलंकी मिसने चश्मा डोळ्यावर पुन्हा चढवला. सगळ्यांना हायसं वाटलं. तसा करण सोलंकी मिसचा आवडता स्टुडण्ट होता त्यामुळे भिती नव्हती.


"डीड यू हियर दॅट?", सॅवियो अस्पषट्सा कुजबूजला...."ती मला स्कॉउण्ड्रल म्हणाली!!!"...

अर्थातच होपलेस आणि यूजलेस ह्या सॅवियोच्या नेहेमीच्या विशेषणांत आज एक नवी भर पडली होती.

करणने गणिताच्या पुस्तकात डोकं घातलं. सॅवियोच्या ऍन्टि सोलंकी केमेण्ट्सकडे पूर्ण दुर्लक्ष करत तो अभ्यासात गुंतला. अर्थातच त्याला पुन्हा ओरडा खायचा नव्हता. करण आपल्याला प्रतिसाद देत नाहीये म्हणून इथे सॅवियो रागात सोलंकी मिसचं कार्टून त्याच्या वहीच्या मागल्या पानावर काढू लागला.


तास संपता संपता सॅवियोचं ते व्यंगचित्रही संपलं. मधली सुट्टी झाली अन सगळे वर्गाबाहेर पडले. आजूबाजूच्या काही मंडळींना ते कार्टून दाखवून सॅवियोने करमणूक करून घेतली अन स्वतःचा राग शमवला.


"करण.... सॅवियो! सॅवियोऒ!!!" दानिश शाह मागून दोघांना हाक मारत होता.


"च्यायला!", सॅवियोने तोंड लपवलं, "सावकार आला वाटते!.. यार करण! ५० रूपये आहेत काय?"

"कशाला", करणने विचारलं.

"अरे गेल्या वीकमध्ये मी हॉकी प्रॅक्टीसच्या वेळी नी-बॅंण्ड आणायला विसरलो. तेव्हा पीटीच्या सरांनी सगळा सेट आणल्याशिवाय आत येऊ दिलं नाही. मग दानिशकडून पन्नास रूपये उसने घेऊन मी ते नी-बॅण्ड्स बाजूच्या स्टेशनरी दुकानातून विकत घेतले. त्याला मी आज परत देतो सांगितलेलं! पण ..."

"..विम्बल्डनच्या जोशात विसरलास!"

"होय! आणि मग आता नाहीयेत म्हटल्यावर तो रडायला लागेल आणि तुला माहितिये ना! दानिश इज सच अ ड्रामा क्वीन!", सॅवियो मुळूमुळू उत्तरला.

"म्हणजे?"

"अरे! गेल्या खेपेस हेतनला थोड्यावेळ्यासाठी त्याने त्याचं स्वीस घड्याळ दिलं. ते हेतनच्या हातात बॅटरी संपून बंद पडलं. तरी पूर्ण शहानिशा न करता हा हेतनच्या नावाने रडू लागला. शेवटी हेतनकडूनच घड्याळजीकडे उघडून नवी बॅटरी टाकून घेतली त्यानं!"

"आणि एवढं असूनही तुला आयत्या वेळेला पैसे उसने घ्यायला हाच मिळाला?", करणने विचारले.

"काय करणार? माझं तुला ठाऊकच आहे! माझ्या डिक्श्नरीत लक हा शब्द बॅडच्या सोबत येतो!"

करण उपहासाने हसला आणि त्याने पन्नास रूपये काढून दिले,"हे घे! माझे लॅब कोटचे आहेत! माझा जुना फाटलाय म्हणून नवा घ्यायला मी आईकडून घेतलेले. आज सायन्स प्रॅक्टीकल नाहिये तेव्हा तुला उपयोगी पडतील!"


पन्नास रूपये सॅवियोने घेतले नसतील तोवर दानिश शाहाने सॅवियोला गाठलेच.

"माझे पैसे?"

"हे घे!"

"नोट जुनी दिसतेय!"

"मग नवीन नोटेसाठी उद्या ये!"

"नको असूदे. ही चालवीन."

नोट मिळाल्यावरही दानिश शाह दोन सेकंद काहीतरी ऎकण्याच्या अपेक्षेने त्यांच्या समोर उभा राहिला होता.

"थॅंक यू दानिश. खूप दानशूर आहेस!", सॅवियो खोटी कॄतार्थता चेहेऱ्यावर आणत म्हणाला.

दानिश खूष झाला अन नोटेतून सूर्याकडे बघत, नोट तपासत निघून गेला.

"पाहिलंस! एकदम सावकार!"

"जाऊ दे रे."

"जाऊ दे काय? एवढा श्रीमंत असूनही एवढा कद्रु? अरे त्याच्या वडीलांचा इस्तांबूलला मसाल्याचा मोठा बिझिनेस आहे आणि त्याची आई फिल्मफेयर मॅगझिनची असिस्टण्ट एडिटर आहे. एवढं असूनही..."

"काय!", करण एकदम चमकला?

"मग काय एवढा श्रीमंत आहे तो..."

"...अरे ते नाही! त्याची आई फिल्मफेयरची हेड आहे?"

"नाही असिस्टण्ट एडिटर!"

"तेच ते!..." करण पुढचं काहीही न बोलता मागे पळाला.

सॅवियो काहीच न कळल्याच्या आवेशात तिथेच उभा होता. दोन मिनिटात करण खूश होऊन परतला.

"कुठे गेला होतास!", सॅवियोने आठ्या पाडल्या.

"दानिश शाह रॉक्स!"

"व्हॉट्ट! आर यू ओके?"

"यप्प!"

"काय झालं? काय सांगशील का?

"दानिश शहाला नव्या फिल्मफेयरची कॉपी आणायला सांगितलीय!"

"पण अजून नवा महिना यायचाय!"

"त्याधीच आणायचीय!"

"का?"

"अरे दोन आठवड्यांनी मेनकाचा बर्थडे! न्व्या फिलफेयरमध्ये कव्हर आणि फ्रण्ट पेज तिचंच असणार आहे ह्या वेळी."

"मग पुढच्या महिन्यापर्यंत थांबला असतास ना?"

"अंहं! अजिबात नाही. अरे मेनकफॅन्सच्यांत चुरस असते. मेनकाचे फिल्मी मॅगझिनवरचे कव्हर पेजेस मिळवण्याची. मला जर तिच्या बर्थडेच्या वेळी मेनकाचं पुढल्या महिन्यात छापून येणारं कव्हर पेज स्कॅन करून माझ्या साईटवर टाकता आलं तर किती भाव मिळेल मला मेनका फॅनग्रुपमध्ये!"

"अंहं! अजिबात नाही. अरे मेनकफॅन्सच्यांत चुरस असते. मेनकाचे फिल्मी मॅगझिनवरचे कव्हर पेजेस मिळवण्याची. मला जर तिच्या बर्थडेच्या वेळी मेनकाचं पुढल्या महिन्यात छापून येणारं कव्हर पेज स्कॅन करून माझ्या साईटवर टाकता आलं तर किती भाव मिळेल मला मेनका फॅनग्रुपमध्ये!"


करण हसला पण तोच ‘क्रेझीकरन’ वरून त्याला आठवली कालची रात्र. कुण्या एका माथेफिरूने मेनकाच्या चारित्र्यावर विनाकारण उडवलेले शिंतोडे! करण पुन्हा अस्वस्थ झाला.

"हे करण! काय विचार करतोयस?", सॅवियो करणच्या चेहेऱ्यासमोर हात हलवित म्हणाला.

"काही नाही! जस्ट एक्सायटेड!", करण चेहेऱ्यावरचे भाव लपवत म्हणाला.


"अरे पण दानिश शाह मानला कसा? पक्का सावकार तो! काय गहाण ठेवलंस त्याच्याकडे? अं?", सॅवियोने भुवया उंचावल्या.

करण हळूच मागे मानेवर हात चोळू लागला,"मॅगझीन आणल्यावर पुढच्या तीन दिवसांचा मॅथ्सचा फ्री होमवर्क!", करण बोलता बोलता अडखळला. सॅवियोच्या भुवयांची स्थिती बदलणार होती.


"व्हॉट्ट! दॅट्स सो अनफेअर!", सॅवियो चिडला, "मी तुझा मित्र असून तू माझा कधी होमवर्क केला नाहीस!", सॅवियोने रागात भुवया आकुंचल्या


"तुझी आई फिल्मफेयरची एडिटर आहे का?"

"असिस्टण्ट एडिटर!"

"हो तेच ते! नाहिये ना. मग मी का तुझा होमवर्क करू?"

"करण दॅट इज रियली मीन!", सॅवियो ओरडला.

"व्हॉट मीन! आणि पेपरात माझ्या पुढे बसून मागे वळून वळून माझ्या सम्सची कॉपी करतोस त्याचं काय?", करणनेही मग आवाज चढवला.


भांडण चव्हाट्यावर येणार तोच मागूनच प्रिन्सिपल सिस्टर निलिमा गेल्या, ते दोन मिनिटं दोघे गप्प बसले. प्रिन्सिपलच्या ऑफिससमोरचचा बाक हा ‘प्रॉक्सी होमवर्क’ आणि ‘एक्झाम कॉपी’ विषयी बोलायचा कट्टा कदापी नव्हता. हे त्या चाणाक्षांनी जाणलं अन ते साळसूदपणे पुढच्या लेक्चरला चालते बनले.


Contd..

जगातलं मृत्यूचं प्रमाण वर्गाला समजावून देताना गुरुजी म्हणाले, "माझ्या प्रत्येक श्‍वासागणिक या एकूण जगात एक माणूस मरत असतो."गुरुजींचं हे विधान ऐकून चिंतूनं त्यांना विचारलं, "असं जर आहे, तर गुरुजी तुम्ही श्‍वास घेताचं कशाला?"

एकमेकांशिवाय जगुत कसे
प्रश्न मला पडले होते
उत्तरादाखल म्हणुन का होईना

बरे झाले तू गेलीस ते

तू दीलेल्या जख्मा
आठवण तुझीच करतात
पेग्वर पेग केले रीते

बर झाल तू गेलीस ते

लपवले स्व:ताला जगाच्या भीतीने
फार दूर दूर गेलो सगळ्या पासून
पण स्व :तापासून कोण कधी का लपते

"बर झाल तू गेलीस ते "

त्या नाममात्र शरीरात
एक काचेचं हृदय आहे,
प्रॅक्‍टीकलपणाच्या पडद्याखाली
जतन प्रेम-रतन आहे,

घाव तू केला, वा मी---
वेदना दोहीकडे होते,
ह्या जुळ्या दु:खात वेड्या
विझली वेदना सजीव होते

अहंकाराच्या आगीत का रे
असे आपण स्वत:स जाळतो ?
मन माने ना, तरी म्हणत रहातो.....

" बरं झालं..............."

पुरे रे, पुरे आता !!!

" हॅण्डल विथ केअर " जरूर केलेस

फक्त आस्ताना जवळ तू

परतणार तू पुन्हा ह्या भीतीने

अंगात कापरे भरते

" बरं झालं तू गेलीस ते ! "

लाजुन हसतेस , हसून लाजतेस आशी तू सखी ग .....
जीवनात येउन प्रेम करतेस,मला जीव लावतेस ग ........
आणि क्षणार्धात मला असा एकठा सोडून जातेस ग ............

आयुशात मला वाटले नाही , माज्या वर पण कधी कोणी इतके प्रेम करेल ग .....
स्वप्नात पण वाटले नव्हते नियति इतकी वाईट चेष्टा करेल ग .......

तुज्या विना आयुष आता अगदीच उदासीन आहे ग ......
तुज्या बरोबर घालवलेला हर एक क्षन लाख मोला चा आहे ग ........

तू परत येशील ही च आशा ह्या वेड्या मनाची ग ......कसे समजावू मी त्याला .....
आता तू परत येणार नाहीस म्हणुन ग ....

सखे अशील तीथे सुखी रहा ग ...
आता परत माझी आठवण ही काढू नकोस ग...

समोर आलोच कधी चुकन तर माज्या कड़े पाहू पण नको ग ....
उडेल ह्या काळजा चा थरकाप म्हणून ग .......
आठवेल तो मग सारा माघचा भूतकाल म्हणून ग .....

आता ह्या आठवणी सोबात घेउनच .....
आयुष मजेत मी जगेल ग ............

निर्मिती :-संदीप राज
दी:- १५ मे २००९

का जगु हा प्रश्न आहे

मरण्याचे पण भय संपले

बरं झालं तू गेलीस ते

मरण्याचे पण भय संपले

navin aayush aahe pudhey .........................

चमचमणार्‍या मद्याचे थेंब
तुझ्या अश्रूंचे का भासतात ?
" तू जख्मी केलंस " म्हणताना
माझे मग्रूर वार का स्मरतात ?

डोळे स्रवत अस्तानाही
ओठ मात्र म्हणत रहातात.....

" बरं झालं तू गेलीस ते ! "

चमचमणार्‍या मद्याचे थेंब
तुझ्या अश्रूंचे का भासतात ?
" तू जख्मी केलंस " म्हणताना
माझे मग्रूर वार का स्मरतात ?

डोळे स्रवत अस्तानाही
ओठ मात्र म्हणत रहातात.....

" बरं झालं तू गेलीस ते ! "

माझ्यात लपलेला अस्वस्थ अश्वत्थामा
माझ्या गात्रागात्रावर राज्य करु लागतो
चिरंजीवत्वाची खूण शोधत पेटवत
माझ्यातनामनावर पेरत जातो
एक भयाण अस्यस्थता

माझ अस्तित्व शोधायला लागते मीच मग
घरी दारी माझ्या भोवतालच्या वस्तुत
काही मागमुस नसतो त्याचा
वा-राचाही गंध अपरिचीत येउ लागतो
मी थकते शोधुन शोधुन मझ्याच स्वप्नखुणा

तेलाचा एक कण त्याला हवा असतो
अन मी तोच नाकारते त्याला
माझ्या दु:खाची भळभळती जखम
माझ आसमंत मझ्याच अस्तित्वाच्या
खुणा नाकारत तेह्वा....

तो चिरंजीव आणि मी अस्तित्व्विहीन
दिवस कलतो रात्र अंधारात संपते
सकाळ उमलल्यावर फ़ुंलांचे विध
रंगते"आई किती छान फ़ुल उमल आहे तुझ"
आणि माझ्यातला तो अस्वस्थ तो
शांत होऊन जातो
तेल मिळाल्यावर जखम निवळल्यागत....

सौ.विणा बेलगांवकर....