पुरुषत्व माझे षंढ झाले
आज उडल्या चिंधड्या
क्रुरतेला झाकणा-या
आज उसवल्या गोधड्या

अंधपणाने षंढ पाहतो
धृतराष्ट्रचि मी आंधळा
चोपताना बालतनु ते
जीव केवढा कोवळा
उडूच का नयेत धमन्या

रक्त असे का गोठावे
क्रुर पशूंना निर्दय पाहून
पौरूष का न पेटावे

शब्द झाले कोरडे सारे
भावना जरी भळभळल्या
जीथे कृतीची जोड हरपली
कविता सा-या व्यर्थ गळल्या

=======================सारंग भणगे. (डिसेंबर 2008)

मित्र मानतात पण
मित्रत्व कधी जपत नाहीत
आपुलकी दाखवतात पण
आपलस कधी करत नाहीत
जवळ करतात पण
जवळीक कधी साधत नाहीत
गोडीने वागतात पण
नात्यात गोडवा आणू शकत नाहीत
धीर देतात पण
संकटांना धैर्याने सामोरे जाऊ शकत नाहीत
खुशामत करतात पण
इतरांना खुश कधी बघवू शकत नाहीत
व्यक्तीमत्व घडवतात पण
एक चांगली व्यक्ती बनू शकत नाहीत
इच्छा व्यक्त करतात पण
इच्छापूर्ती मात्र करू शकत नाहीत
हसू शकतात पण
कुणाला हास्य देऊ शकत नाहीत
त्यातूनही वाईट म्हणजे
प्रेम करतात पण
प्रेम निभावू शकत नाहीत.
--गौरव देसाई (२१/०१/२००९)

कोणास कधी कळतात वाटा
वेड्या कोठून कश्या वळतात वाटा।

एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना
सोडूनी हात कधी पळतात वाटा।

पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते
जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा।

पाहूनी त्या वळणावर आसवांना
काळोखाआड कधी गळतात वाटा।

कोणी बोले दुनिया तर गोल आहे
फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा?

तीही सोडून मला वळनात गेली
तीच्या वाचून मला छळतात वाटा।

हो येथेच सुरवात , इथेच अंत
(कीती प्रवास असे गिळतात वाटा।)

माझ प्रेम तुला कळायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत

तु हसतेस आज माझ्यावर
आणि मी आसवानी भिजलेला
दोन थेम्ब पाणी
तुझ्याहि डोळ्यातुन गळायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत

दिल होतस वचन तु
मला सात्त जन्माच्या सोबतिच
निदान सात पावल तरी
तु माझ्यासोबत चालायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत...

लावुन गेलिस आग
आता ही विझवनार कोन
माझ्यासारख थोडस
तुही जळायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत...

प्रेम करतोस ना तिच्यावर,
मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव,
तिने ही कराव प्रेम म्हणून
आणायचा नसतो दबाव....

असेल तिचा नकार,
तरतो हि तू हसत स्विकार,
तिलाही आहे ना स्वत:चा
निर्णय घेण्याचा अधिकार...

नाही म्हणाली तर तूझ्या
प्रेमाने नकाराला होकारात बदल,
का नाही म्हणाली याचा विचार
करुन आधी स्वत:ला बदल...

नाही म्हणाली तर तिच्या
नकारावरही प्रेम कराव,
नाही म्हणता म्हणता तिला
प्रेम करायला शिकवाव...

नको रे घेउस तूझ्या वेड्या
हट्टा पाई तिचा बळी,
काय मिळणार तूला तोडून
एखादी उमलणारी कळी...

खरे प्रेम करतोस ना,
मग ठेव सच्ची निती,
कशाला दाखवतोस उगाच
तिला जिवाचि भिती...

तूझे हे सच्चे रुप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार,
तिलाही होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार...

अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तूही घे अवश्य माघार,
कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार...

काही दिवसांपुर्वीचे अपरीचीत आपण लगेच कसे ओलखीचे झालो
वाटसरु आपण वेगळेवेगळे
आता सहजिवनाचे सोबती झालो......

निरगस तुझे बोलके डोळे
वेड मजसी लाउन गेले
भिडता नजर एकमेंकाशी
पापण्यानी स्वत:स जुळवुन दिले.....

मनमोकळा तुझा हसरा स्वभाव
जिवास मझ्या खुप भावला
समजणेच न मला आता
मज लळा तुजा कसा लगला ???

देशील न साथ मज मरणोत्तर सुध्धा?
वचन मागतोे मी प्राणप्रीया
आता इच्छा दटते एकच उरी
म्रुत्युही आता तव कुशीत यावा.......

धर्म,जात,राष्ट्राच्या नावे, विध्वंसाचा पाया खोदत
थडग्यामधुनि प्रेते उठली, रक्ताचे पाणवठे शोधत

गर्वाचि ते मदिरा प्याले
शब्द पेटते हाती धरले

आग पाहणे छंद तयांचा, फिरती झुंडीना संबोधत
थडग्यामधुनि प्रेते उठली...

मेंदू त्यांचा जरी सडलेला
स्वार्थ साधणे कळते त्याला

थंड सुरीने मान छाटती, असतील जेही त्यांना रोधत
थडग्यामधुनि प्रेते उठली...

करण्या आपले उखळ पांढरे
तयार केले मठ्ठ मेंढरे

असे विषारी साप पाळले, विष जयांना नाही बाधत
थडग्यामधुनि प्रेते उठली...

तिरंग्याला सलाम करताना
आज पाउले नाही नाचली
दर्दभ-या आठवणिनि
डोळ्यात आसवे मात्र साचली १
भिरभिरनारा वा-यावरचा
तिरंगाही होता मंद
आनंदाच्या क्षणालाही
भितिचाच गंध २
नाना रुपे, नाना कला,
बोल नवे, मुखडा जुना
कितीही मार खाल्ला तरी
शेपुट कुत्र्याचे वाकडे पुन्हा ३
असुराची जात त्यांची
वर पुतनेचे दूध
शांतीचे उपासक आपण
रोजच हरतो द्युत ४
अग्नि परीक्षा घेवुनही
अजुन नाही मुक्ति
आधुनिक पुष्पक विमानांनी
काही मिळेल का शक्ति ? ५
अणुची भीती नाही
फ़क्त आपल्या तिरंग्याला
त्याची झळ बसनाराच
त्या हिरव्या रंगला ६
चला एक होऊ
पुरे आता भेदाभेद
सहजच होइल मग
आसुरी शक्तीचा छेद ७
वन्दे मातरम् ....!!! जय हिंद ...!!!
------------------------------ बाजी दराडे

आई गेली तेव्हा ताई आणि मी रडलोच नाही
दोघेही अचानक मोठे झालो
आणि पपा अचानक म्हातारे

रात्री उशीरा येऊ लागले
दाढी वाढू लागली
केस गळायला आणि पिकायला लागले
पाठीत पोक
आणि तोंडाला नको नकोसा वास
अडखळत बोलायचे
अडखळत चालायचे
लोक त्यांना टल्ली म्हणायचे जवळच रहाणारी आत्या रोज घरी यायची
सकाळीच दोन वेळचं जेवण करायची
आमचा राग राग करायची
ताईला तर काहीही बोलायची

नरुकाका - आत्याचे यजमान- मात्र
खुप चांगले
खाऊ चॉकलेट आणायचे
आणि ताईला आग्रहाने खाऊ घालायचे'
माझेही लाड करायचे
पण ताईचे मात्र खुप

का कोण जाणे
ताई मात्र त्यांना टाळायची
माझ्या बरोबर-बरोबर रहायची
माझ्याबरोबरच बाहेर निघायची
इतर वेळी दुकानात जायला आळस करायची
पण नरुकाका घरात असले की
आपणहून घराबाहेर रहायची.

एके दिवशी मात्र विचित्रच झालं.
घरात आत्या आणि आम्ही दोघं
अचानक काका आले आणि आत्याला काही सांगितलं
आत्या तशीच तिच्या घरी गेली
जाताना ताईला स्वयंपाक घरातलं काम सांगून गेली
मी मात्र बाहेरच खेळत, टीव्ही बघत बसलेला

अचानक ताई बाहेर आली
हमसाहमशी रडत
आणि काका तिच्यामागून
आम्ही दोघे कितीतरी वेळ तिची समजूत काढत होतो
पण ती थांबेचना

मग आत्या आली
काकांकडे प्रश्नार्थक बघत
काका म्हणाले, "तिला आईची आठवण येतेय"
आणि आत्या नाक मुरडून आत निघून गेली.
जळलेल्या भाजीवर पाणी ओतायला...

मला मात्र एक गोष्ट कधीच नाही कळली
ताई इतक्या दिवसानंतर का रडली ?

------ टल्ली

आमची कौलारू चाळ
आणि स्वयंपाक घरातच मोरी.
शेजारच्या घरातले वास फ़टींवाटे इथे यायचे.
जीभेला पाणी सुटायचं
कुणालदादाचं लग्न झालं तेव्हा तर घमघमाट.
मी त्यांच्या घरात रेंगाळायचो.

मोरीही स्वयंपाक घरातच.
ताई आंघॊळ करताना दार लावायची स्वयंपाक घराचं.
पण मी मात्र तसाच करायचो.
ताईला काय लाजायचं ?
पपा तर असून नसून ...
ताई सकाळच्या शाळेला जायची म्हणुन आधी आंघॊळ तिची
मग मी.

एकदा ताई घरात नव्हती म्हणून
दांडीवरचा टॉवेल काढायला
कठड्यावर चढलो
आणि चुकुन पलिकडे लक्ष गेलं
तर पलिकडे कोमल वहिनी आंघॊळ करत होती
मी लगेच खाली उतरलो
ज्याम थर्थरत होतो
सगळं अंग कांपत होतं
आणि कानशिलं गर्म गरम
वीज गेल्यासारखं झालं
मानेखालून सर्रकन
नको म्हटलं तरी डोळ्यांसमोर तेच दृश्य.
तेच ते दृश्य...

शाळेत सुद्धा तेच दृश्य.
सुजयने बरोब्बर हेरलं
तसं अभ्यासात लक्ष नसायचंच आमचं कधीच
पण त्यादिवशी टिवल्याबावल्यांत पण रस नव्हता.
त्याला सांगितलं नाही
पण धडधड तशीच दिवसभर.
आपण काही चूक केलंय, काही नको करू असं.
पण दुसर्‍या दिवसापासून आपोआप पाय कठड्या कडे
एखाद्या दारुड्यासारखे
स्वयंपाकघराला कडी लावू लागलो
पण पुन्हा काही दिसलं नाही...
पण तरीही
नुस्तं फ़टी तून पहाताना गोडशी धड धड व्हायची
हवी हवीशी वेदना
कळतच नसे...
कधी कोमल वहिनी घरात काम करताना दिसे
तशी मी तिला नेहमीच पाहायचो
पण फ़टीतून पहाण्याचा काही वेगळाच
सुखमय अनुभव
धडधड , भिती आणि सुख असं विचित्र मिश्रण.

आणि एक दिवस लवकरच
मी असा फ़टीला डोळा लावून असताना
कडी लावायची राहिली
पायाच्या पोटरीवर फ़टका बसला तसा कळवळलो
ताईच्या हातात पळि होती
आणि डोळ्यांत अंगार
सपासप सपासप फ़टके मारत सुटली...

मला कळेचना
भिती
मार
मला तर रडायचीही चोरी. शेजारी येतील ना ...
कळवळत हुंदके देत होतो
आणि ताई तर बेभान

अखेर ताईच थकली
आणि रडायला लागली...

" अरे मी इतरांना राक्षस म्हणते रे,
सगळे माझ्या पाळतीवर
पण तू सुद्धा त्यांच्यातलाच निघावास ?"

ताई,
मी वचन नाही दिलं काही
पण
पुन्हा कधीच असं काही केलं नाही गं.
तुझं दुसरं रडणं तरी कामी आलं.
-टल्ली

तुझं ते निरागस बोलणं
मला खुप आवडतं ,
चारचौघातही तुझ वेगळेपण
अगदी आपसुखच जाणवतं!!!

डोळ्यात तुझ्या दिसुन येतो
माझ्यावरचा अतोनात विश्वास,
खळखळून तुझ हसणं
खरंच वाटतं झकास!!!

तुझा तो मिश्कीलपणा
आणि ते खोड्या करणं,
जरा जरी रागावलो मी तरी
चट्कन डोळ्यातनं पाणी काढणं!!!

माझा प्रत्येक शब्द
तु किती सहजपणे जपतेस,
सांग बरं ही कला
कुठ्ल्या शाळेत शिकतेस?

तुलाही फुलाप्रमाणे जपण्याचा
मी आटोकाट प्रयत्न करतोय,
अभिमान वाटतोय मला माझा
की मी तुझ्यावर प्रेम करतोय!!!

----कुणाल----

जेव्हां हात तुझा हातात होता
तुझ्यासगे लाबं चालत रहायची
आता घराच्या बाहेर पडत नाही
मन घाबरतं कुठेतरी हरवायची.
जेव्हां तुझा हात खाद्यांवर असायचा
मी त्याला आधार समजायची
आता उभी राहताच तोल जातो मझा
धडपडताना तेव्हां तुझा हात धरायची.
जेव्हां तु माझ्या जवळ होतास
तेव्हा सारी सुखं माझ्या जवळ होती
आता काटे विखरलेत अगंणात माझ्या
तेव्हां फ़ुल माझ्या दारात होती.
जेव्हां तु माझ्या काळजात होतास
तेव्हां आत्मा माझ्या मनात होता
आता मी इथे जिवंत प्रेत झालेय
कारणं जिव माझा तुझ्यात होता.

----कुणाल----

निळ्याशार आकाशात चांदणं झरत राहतं
ॠतु कावराबावरा होतो ...... मन स्वप्नांमधे वाहतं

तुझ्या आठवांची पेरण केली ... की नेहमी असं होतं
डोळ्यांचं शेत फूलतं नी आसवांचं पीक येतं !!!!!!!!

हा चंद्रही असा वेडा ......
धड उगवत नही ... धड मावळत नाही
त्यातच काळीज फितूर झालय ....
तुझ्या आठवांची एकही संधी दवडत नाही

काय चाललंय तरी काय
हे कळायला मार्ग असावा लागतो ....
आजकाल तर होश यायला किंवा बेहोश व्हायला
तुझा चेहरा दिसावा लागतो ....

ए, खरंच तुझ्या आठवणीत मला वेड लागेल काय?
आणि माला वेड लागलेलं तुला चालेल काय?

तुझ्या आठवांना हेवा वाटावा असं काही करून जा
नेहमीच तुझी आठवण येते कधी तू ही येउन जा ...

तुझ्या आठवांचा लळा जपतो आहे मनापासून
एक आसवांचा झरा झरतो आहे मनापासून ..... (!)

एकदातरी उभ्या आयुष्यात प्रेमाची फूंकर मारशील ना ??
अवघ्या अंगाची जळती ज्योत कधीतरी विझवशील ना ??
****************** as written by ** ABHIJIT S. NAGLE *******

दुपार सरून गेल्यानंतर,
संध्याकाळ होण्याआधी,
हवेत दाटतो हलकासा गारवा
निर्माण होते काहीशी पोकळी,
वाहू लागते अचानक वादळ,
क्षणार्धात होते अनोळखी स्तब्धता,
मनात होते अकारण घालमेल ,
कारण येऊ घालते कातरवेळ

दुपार संपते कापरासारखी
पण संध्याकाळ होत नाही
खोल खोल दरी सारखी
कातरवेळ सरत नाही

कातरवेळी उभे ठाकतात
असंख्य विचार मनासमोर
पण सर त्यांची जुळत नाही
गुंता सुटता सुटत नाही
घनदाट वनात गेल्यासारखे
विचार नुसते भटकू लागतात
अधिक आत शिरताना
अंधारात रुतत जातात

जणू काही काळही
या वेळी स्तब्ध होतो
घद्याळाचा कटा मात्र
उगाचच पुढे सरकतो

एके दिवशी...
एकांतात असतांना..
ढग दाटलेले बघितले..
अगदी माझ्या मनात्य भावनान्न प्रमाने...
एकदम तुझी उणीव..
जास्तच जाणवू लागली...
तू जवळ का नाहीस..??
असे प्रश्न आले मनी..
जस जश्या
मनातील भावना
वाढत होत्या
तस् तसे..
हे वेडे ढग ही...
दाटत होते...
वाटुन गेले एकदा मानत..
यांना कलले तर नसेल न..
माझ्या मनातील..
तुझ्या विरहाचे दुख...
तितक्यात अश्रु एक,
डोळ्यातून निसटला...
अणि..
आश्चर्य एक रे..
तो धगा ही कोसलू लागला..
तेव्हा मला कलुन आले..की,
तो तूच आहेस...
फ़क्त लांब आहे तनाने..
पण अजुन ही...
तसा च सोबत आहेस....
frnds... ही कविता..एका प्रियसी ची..जिचा प्रियकर या जगात नहीं..
composed by... केतकी...प्रेम वेड लावुनी गेले.....

आठवण माझी कधीतरी येईलच तुला,
तु कदाचीत रडशीलही,
हात तुझे जुळवुन ठेव तु,
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील,
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे,
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल.....
माझ्या आठवणी एखदयाला सांगताना,
तु कदाचीत हसशीलही,
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता,
नीट वापर त्याला,
अडखळलेला तो शब्द मीच असेल.....
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला,
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील,
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं,
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल.....
कधी जर सुटला बेधुंद गार वारा,
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील,
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक,
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल.

प्रेमाला का असावा
विरहाचा अभिशाप,
आणि रात्रीच वैरिण होण
दिवसाचा प्रत्येक क्षण,
तुझ्या आठवणीत जाण.

सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?
तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?
''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ

तिने मज इशारा केलेला
पण कुणास न कळलेला

तो तिचा इशारा तसला
मज उशीरा समजलेला

मी शीळ घातली आणिक
कुत्रा तिचा सुटलेला

पाहून तीच्या कुत्र्याला
मी पुरता घाबरलेला

हिमतीच्या कसल्या गप्पा
मी स्वतःच ढासळलेला

तीच्या घराचा रस्ता
का कुत्र्यांनी गजबजलेला

विसरू कसा तो कुत्रा
पळता पळता चावलेला

सांगतो कुत्र्यांच्या गोष्टी
केशवसुमार पस्तावलेला

सागरी मीठीत हळुच शिरले किनारे
आसवे गाळून परत फ़िरले किनारे.

आयुष्यात एकरुप असुन सागराशी
दुष्ट लाटांनी हसत उधळले किनारे.

मीठ चोळूनी हळूच लहर फ़ीरली ती
शेवटी कीचांळत तडफ़डले किनारे.

वादळाच्या मीठित जणु उरलाच वारा
सागरा घेऊन कुशित निजले किनारे.

साउलीसाठी जिव गुदमरला उन्हांत
संपण्याआधीच जिव हरले किनारे.

आज येऊदे प्रलय अचल मी उरेन
ठोकुन छाती मग गडगडले कीनारे.

पापण्यांती घेउन जखम जगी जगलो
निवडूंगा पाहुन कुजबुजले किनारे.

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

तीलाच द्याव मन हेच विचार होते
तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.
ती दोष देउन जरी नियतीस गेली
माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.
कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच
आयुष्य जणु नुसतेच उधार होते.
तीला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां
आले गळुन नयनात तुषार होते.
अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा
माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.
काळोख तो सहज नशेत तोल गेला
झाली सकाळ तर तेच गटार होते.
आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना
माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

तीची नव्हती कधी पण माझी साथ होती
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावाराचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.


वाटणारी प्रत्येक गोष्ट ,

शब्दात व्यक्त करता आली तर...

मनातली प्रत्येक भावना,

बोलून दाखवता आली तर...

तुझावर प्रेम आहे ,

हे सहज संगता आले तर....

तुझाशिवाय जगुच सकत नाही,

हे पटवून देता आले तर...

तुझी खुप आठवण येते,

हे विसरून जाता आले तर....

माझेसुद्धा अस्तिव आहे,

हे समजवून घेता आले तर.....

तू फक्त माझाच आहेस,

हे तुला न सांगताच कलले तर ..

तू असाच जवळ रहा,

हे स्पर्शाने सांगता आले तर...

तू जवळ नसतोस तेव्हा,

तुझा स्पर्श जानता आला तर...

किती बरे होईल,

जर मन वाचता आले तर...

शब्दपलिकड़ल काहीतरी,

नजरेनेच जानता आले तर....

हे सगलेच " तर..." नाहीसे होतील,

एकदाच म्हणालास जर...

" मी खुप सुखी होईन,

जर तू माझीच झालीस तर..."