नेहमी प्रमाणे डोळे माझे मिटायला तैयार नव्हते,
कितीही समजावले तरी तिलाच शोधत होते....

तिचाच विचार करताना लागला डोळा चुकून,
स्वप्न ते होते की नव्हते दिसे ती इथून तिथून....

मिटलेल्या डोळ्यांपुढे दिसते ती छोटी परी,
नाजुक हात पसरलेले, बोलावताना मला घरी....

डोळे किती निरागस तिचे, ओठांवर मोहक हसू,
समजेना मला माझ्या, डोळ्यात हे का आले आसू?

कठिन परीक्षा आहे तुझी ही,
समजावले मग मीच मनाला,
गवसणी घालण्या आकाशा,
बीज घेते आधी गाडून स्वताला....

ज़मीर १९-मार्च-२००९