पिंजरा तोडून
मुक्त झालेला तो पक्षी
जखमी पंखातील रक्ताने
हिरव्या भूमीवर
लाल नागमोड उमटवीत
उडतो आहे आपल्या घरट्याकडे,
कदाचित आपल्या म्रुत्युकडेही.
पण
त्याच्याकडे करुणेने पाहणारे सारे आकाशही
हिरावून घेऊ शकत नाही
रक्तात माखलेला
त्याचा आनंद ... अभिमान...
पिंजरा तोडल्याचा.
- कुसुमाग्रज

डोलणारी झाडे गाती झोक्यामध्ये
पावसाच्या थेऎम्बात चिम्ब म उ म उ धुक्यामध्ये

थन्ड हवेचे आल्हाद रुप , आणि दवान्चे पिसारे
आवाज ट्प ट्प खळाळत्या , पाण्याचे अन्कुरे

वीज पळत खो देते ढगान्ना,
गुद गुली करीते पाणी छ्परान्ना

झिर पत पाणी वाहे मातीतून,
ढगही हसतो सदाफूलीतून

हिर वळीचे हिर वे गवत गोन्जरे दवान्ना
पावसाचे कारन्ज तुशार देतान्ना


डोलणारी झाडे गाती झोक्यामध्ये
पावसाच्या थेऎम्बात चिम्ब म उ म उ धुक्यामध्ये
म्रुणाल

सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी
हे चन्द्र-सूर्य-तारे होते तिच्याचपाठी;
आम्हीही त्यात होतो, खोटे कशास बोला
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी......

विन्दा करन्दीकर.

नको आयुष्यात थारा त्याला, ज्याला म्हणतात 'SORROW'
भूतकाळातील चुकांकडून, शहाणपण करा 'BORROW'

नाती-गोती हवीत अशी, ज्यामध्ये नकोत 'FURROW'
चाड राखा त्याची, जे तयार करतं 'MARROW'

करा मनोव्रुत्ती विशाल, नको ती 'NARROW'
शब्द वापरा जपून, कारण ते असतात 'ARROW'

पहाटे ऐका चिवचिवाट, जी करतात छोटे 'SPARROW'
सुखद आठवणींने भरीव असू दे, ह्रुदयाचा 'BURROW'


~~~~~~~~~~ सुरज ~~~~~~~~~~~~~~~

वॅलेन्टाईन्स डेनं क्येलं आमाले खडबडून जागे
जाताना रस्त्यानं "आर्चीस"मदि लै लोकं दिसल्ये
म्हनुन आमिबि पल्यांदा गुमानशान आत शिर्लो
येग-येग्ल्या वस्तु अन झगमग पगुन आमी थतंच हरीवलो

येक तास झाल पन कोनतीच वस्तु न्हाय घ्येतली
मंग येक चिमत्कार झाला,म्हाज्या डोळ्यापुढं "ती"आली
तिच्या सुंदर मुखड्यापर्मानं येक झकास कार्ड घ्येतलं
थतुन मंग क्वालिजात जायला आम्ही भायेर पड्लं

क्वलिजात आमच्या चश्म्यानं तिला लै शोधलं
भितीपोटी हातातलं कार्ड घामानं वलं-वलं झालं
अचानक "ती"माका दिसली,पन फटफटीवर येका पोरासंगं
चश्मा माझा बोलला,असलं कायबी वंगाल बगु नगं

रंग आमच्या कार्डाचा,त्या फटफटीसमुर फिका ठरला
ईचार कार्डाचा धा तुकडं करन्याचा,आमच्या मनात आला
पन अशी चूक पुन्यांदा करायची न्हाय म्हनून त्यो ईचार मनातुन काढून टाकला
आज भित्ताडावर लटकवल्येलं "ते"कार्डं बगुन त्यो खराब वॅलेन्टाईन्स डे आठिवला....त्यो खराब वॅलेन्टाईन्स डे आठिवला.....


~~~~~~~~~~~~~~ सुरज ~~~~~~~~~~~~~~~~~

पाहुनी सौंदर्य तुझे, झालो मी 'BEDAZZLED'
काळीज माझे तुझ्याकडे,'GONE IN 60 SECONDS'

तू नसतेस तेव्हा,रक्ताचं वाढतं 'SPEED'
मिळविणे तुला म्हणजे, आहे 'MISSION IMPOSSIBLE'

रूसवा तुझा दूर करण्यास, जातो माझा 'RUSH HOUR'
दे होकार मलाच, नाहितर होशिल तू 'UNFAITHFUL'

प्रेमात नको बनूस,तू माझी 'TERMINATOR'
फेकून दे ते द्वेशाचे, खोटार्डे 'THE MASK'

वाटेत आपल्या प्रेमाच्या, येइल का तुझी 'THE MUMMY'
की उभे ठाकतिल पिताश्री तुझे,बनूनि वेडे 'RAMBO'

भेटताना तुला वाटे, जणु 'ENTER THE DRAGON'
प्रेमाची आपुल्या करू नकोस, ती दयनिय 'TITANIC'

दोघेच असू आपण, नको प्रेमामध्ये 'TRAFFIC'
वाट पाहीन तुझी मी, कारण 'TOMMOROW NEVER DIES'

होशील का माझी तू, प्रेमळ 'Mrs.DOUBTFIRE'
कारण तुझ्यासारखी दुसरी,नाही कोणी 'PRETTY WOMAN'

~~~~~~~~~~~~~~ सुरज ~~~~~~~~~~~~~~~~

जवा ग्येलो होतु पगायला, म्हाज्या गंगुला,
ईचारान्नी क्येलं होत हैरान, आमच्या डोसक्याला,
पन गंगु समोर येताच, लागली ग्वाड लाजायला,
आमचं नरम कालीज, लागलं बिगी-बिगी पागळायला.

अंबाबाईच्या साक्षीनं, क्येलं आम्ही लगीन,
म्हनलं झकासमंदी आता, आवुक्षं घालविन,
गंगु म्हनली, रोज झुनका-भाकर चारीन,
सांच्याला व्हरांड्यात, तुमची वाट बगत बशीन.

पन कसली झूनका-भाकर अन कसलं काय,
रातच्याला, आम्हीच च्येपतुया तिचं हात-पाय,
कधी म्हनलं, पुरन-पोळी करून द्येतीस काय,
तर म्हनती, ह्ये हातातलं लाटनं बगितलं काय.

सकाळच्याला, म्हशिचं दूध म्या काढतु,
गनप्याचं शेंबडं नाकबी, म्याच पुसतु,
तिचं नौवारी लुगडं, म्या धुतु,
अन शेतामंदीबी, म्या येकटाच राबतू.

सपान म्या कंदी, बगत न्हाय,
थतंबी धुपाटनं घिऊन, गंगु हूबी हाय,
आता आठिवत्यो, माझा बा आन माय,
हिला बगायला ग्येलो तवा, डोसकं श्येन खात व्हतं काय.

दोस्ताला म्हनलं, ह्यो समदा परिनाम कशाचा,
म्हनला, ल्येका, ह्योच तर हाय फोबिया प्रेमाचा.... ह्योच तर हाय फोबिया प्रेमाचा....

~~~~~~~~~~~~~ सुरज ~~~~~~~~~~~~~~~

येकलेपनाची कास सोडू नगं
पिरेमाची वाट बाळा धरू नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

नुसतं रुपावर भाळू नगं
येड्या भवर्‍यापरमानं भुलु नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

नजर कुनाशी कदी भिडवू नगं
भिडलीच कदी तर येडा होऊ नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

काळ्या क्येसांच्या जाळ्यात अडकू नगं
पान्याविना असलेल्या ह्या तळ्यात पवू नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

पिरेमपतर कदी कुनाला ल्हिऊ नगं
कागूद अन शाई वाया घालवू नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

पोरीसाठी तुजं BP वाडवू नगं
सपनातला त्यो वाडा सजवु नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

पन आता मरायचंच हाय की ओ कवातरी
मंग दगडापरिस ही ईटंच बरी
म्हनुन पिरेम कराया कदी ईसरू नगं.....म्हनुन पिरेम कराया कदी ईसरू नगं.....

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ सुरज ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

तु असताना तुझाशी,
खुप खुप बोलायचं ठरवतो,
मुक्या भावनांना,
शब्दात बसवायचं ठरवतो,
चार ओळी जोडुन
कवीता करायची ठरवतो,
पण तु आलीस की,
शब्द अबोल होतात,
मन मात्र बोलयला लागत
तु नसताना मात्र
मुक्या भावनांनचे शब्द होतात,
आपसुक चार ओळींची कविता होते,
एक गोष्ट मात्र नक्की
तुझ्या असण्यापेक्शा तुझ्या,
नसण्यातच मी जास्त जगतो.......
........ नागेश

जोगेश्वरी उपनगराच्या मधोमध वसली आहे जोगेश्वरी देवी. महाकाली गुंफेत या देवीचं अतिशय संुदर असं प्राचीन मंदिर आहे. चहुबाजूंनी नवीन बांधकामाचा विळखा पडला असला तरी या मंदिराचं सौदर्यं अबाधित आहे. या मंदिरात प्रवेश करताच क्षणी पावित्र्य आणि मांगल्याने भारलेल्या वास्तूत प्रवेश केल्याचा अनुभव येतो. हजारो वर्षांपूवीर्च्या या गुंफांचं बांधकाम म्हणजे भारतीय भारतीय वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. या गुंफेत जोगेश्वरी महाकाली देवीप्रमाणेच भगवान शंकर आणि श्रीगणेशाचीही मंदिरं आहेत. मंदिराच्या आत प्राचीन कोरीवकाम पाहायला मिळतं. न दुभंगणारी शांतता , प्रसन्न वातावरण अंतर्मुख करतं. भल्या मोठ्या कातळात ही गुंफा खोदलेली असल्यामुळे गुंफेच्या आत बारा महिने गारवा असतो. नवरात्रीच्या काळात या देवळात भक्तगणांची पहाटेपासून रीघ लागलेली असते. सुंदर नक्षीदार भव्य खांबावर तोललेलं हे देऊळ प्रेक्षणीय तर आहेच पण त्याचबरोबर ही देवी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहे अशी श्रद्धा आहे. अशाप्रकारची प्राचीन मंदिरं मुंबईत आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उरली असल्याने जोगेश्वरीच्या या देवळाचं महत्त्व वेगळं आहे. सिमेंटचं जंगल वाढत चाललेलं असताना या मंदिराचं पुरातन सौंदर्यं जपणं मुंबईकरांचं कर्तव्यच आहे.

आपल्या देशात प्रत्येक गाव हा देवीमातेचाच एक अवतार मानला जातो. देवीच्या या अवताराला उत्तरेकडे ' माताजी ' म्हणतात तर दक्षिणेत ' अम्मा '. आपल्याकडे ही देवी येते ' गावदेवी ' होऊन. या देवीच्या मूर्त स्वरुपात म्हणूनच बहुदा फक्त मुखवटा आणि हात दिसतात. अवघे गाव हे तिचे बाकीचे शरीर असते. म्हणूनच गावाला नाव मिळते ते त्या देवीचेच. जसे , चंडीवरून चंडीगड , कालीमातेवरून कोलकाता , श्यामलादेवीवरून शिमला , नैनादेवीवरून नैनीताल आणि ' मुंबादेवी ' वरून मुंबई!

गावाने या ग्रामदेवतेचा योग्य मान राखला नाही की ती ' मरीआई ' चा भयावह अवतार धारण करते. रोगराई आणते , मृत्यूचे तांडव मांडते , दुष्काळाने ग्रासते. ' जरी ' च्या अवतारात ती लहान मुलांना कांजिण्याच्या तापाने ग्रासते. मग देवीचा कोप थांबावा यासाठी गावातील पुरुष क्षमायाचना करतात , स्वत:ला शिक्षा करून घेतात. स्त्रिया देवीला शांत करण्यासाठी दही वाहतात. तिला बांगड्या , फुलांचे हार अशी सौभाग्यलेणी अर्पण करतात. देवी जेव्हा शांत होते तेव्हा तिला ' शितलादेवी ' म्हणतात.

देवीच्या ' जरी-मरी ' अवताराचे पुराणात वर्णन आढळते ते हे असे. पण मुंबईतील प्रमुख ' जरी-मरी ' मंदिरं मात्र या पुराणकथेशी नातं सांगताना दिसत नाहीत.
.................................
जरी मरी माता मंदिर , एस.व्ही. रोड , वांदे पश्चिम

वांद्याला एस.व्ही. रोडवरून लिकिंग रोडकडे जाताना तलावाच्या अगदी समोरच असलेले हे मंदिर सहज लक्ष वेधून घेते. मंदिरावरची ' जरी-मरी माता मंदिर ' पाटी दूरूनच वाचता येईल अशी. मंदिराने १९९६ सालीच त्रिशताब्दी महोत्सव साजरा केला आहे. म्हणजे मंदिर तब्बल ३१० वषेर् येथे उभे असून ' क्षत्रिय मराठा परीट ज्ञाति मंडळा ' च्या ताब्यात आहे. सध्या या मंडळाच्या श्ाी जरीमरी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षस्थानी रमाकांत नारायण पुरारकर आहेत.

ट्रस्टच्या कार्यर्कत्यांनी दिलेल्या माहितीनुसार , तीनशेहून अधिक वर्षांपूवीर् वांद्याच्या या परिसरात परिटांची मोठ्या प्रमाणात वस्ती होती. मंदिराच्या समोर आजही तलाव आहेच. पूवीर् मंदिराच्या मागील भागातही असाच तलाव होता. पण काळाच्या ओघात त्यात भराव घालण्यात येऊन आज तिथे इमारती उभ्या आहेत.

मंदिराची दंतकथा अशी सांगितली जाते की , तेथील एका शिळेवर एक गाय रोज पान्हा सोडायची. तिथेच मग गावकऱ्यांनी ' जरी-मरी ' चे अर्थात ' जगवणाऱ्या-तारणाऱ्या ' मातेचे मंदिर उभारले. ही ' जरी-मरी ' देवी ही वसोर्व्या नजीकच्या मढगावच्या हरबादेवी व हरडादेवी यांची धाकटी बहीण मानली जाते. त्यामुळेच आषाढात हरबादेवीच्या यात्रेनंतर आठ दिवसांनी जरी-मरीची यात्रा असते. नवरात्रातही येथे नऊ दिवस जागरण-भजनकीर्तन , हळदीकुंकु आदी कार्यक्रम चालतात. गाडगेमहाराज पुण्यतिथीलाही येथे कार्यक्रम असतो. मार्गशीर्ष महिन्यात देवीची पालखी निघते. संपूर्ण वांदे परिसरात निघणाऱ्या या मिरवणुकीत दहा हजाराच्या आसपास लोक सहभागी होतात.

' जरी-मरी ' चे हे देवस्थान स्वयंभू व जागृत मानले जात असल्याने मोठ्या संख्येने येथे लोक नवस बोलण्यासाठी वा सुपारीचा कौल लावण्यासाठी येतात. पश्चिम उपनगरांच्या वाटेवर हे मंदिर असल्याने सिंधी , पंजाब्यांचीही इथे मोठी गदीर् दिसते.

जिच्या नावातच ' शितल ' ता आहे , ती ही शितलादेवी! शितलादेवी कोळी बांधवांच्या घरात होणाऱ्या प्रत्येक शुभकार्याची साक्षीदार आहे. नवरा-नवरीला हळद शितलादेवीच्या मंदिरात लागते. मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीच्या पाण्याने गोवर , कांजिण्या झालेल्या मुलाला आंघोळ घातल्यानंतर त्या पुन्हा येत नाहीत , असा समज आहे. येथे शांतादुगेर्चे व त्याचबरोबर खोकलादेवीचेही मंदिर आहे. खोकल्याच्या रुग्णांचे आजार खोकलादेवीच्या कृपाप्रसादाने बरे होतात , असा एक समज आहे. मंदिरात अष्टमीला होमहवनाचा मोठा कार्यक्रम असतो , असे मंडळाचे विश्वस्त कमलेश शेटये यांनी सांगितले.